Breaking News LIVE : ठाणे महापालिकेच्या महासभेत बुलेट ट्रेनला जमीन हस्तांतर करण्याचा ठराव झाला मंजूर

Breaking News LIVE Updates, 08 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Sep 2021 08:58 PM
ठाणे महापालिकेच्या महासभेत बुलेट ट्रेनला जमीन हस्तांतर करण्याचा ठराव झाला मंजूर

ठाणे महापालिकेच्या महासभेत बुलेट ट्रेनला जमीन हस्तांतर करण्याचा ठराव मंजूर झाला आहे.सत्ताधारी शिवसेनेने ठराव मंजूर केला  आहे. याआधी 4 वेळा हा प्रस्ताव महासभेत आला होता, त्यापैकी 3 वेळा तहकूब करण्यात आले होते तर चौथ्यांदा थेट हा प्रस्तावच दफ्तरी काढण्यात आला होता.मात्र दफ्टरी काढलेला प्रस्ताव आज पुन्हा महासभेत चर्चेसाठी आणला गेला आणि त्याला चक्क मंजुरी देखील मिळाली. त्यामुळे शिवसेनेचा बुलेट ट्रेन विरोध मावळला का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

गणेश मुर्तीचं मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन ॲानलाईन किंवा इलेक्ट्रॅानिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे : गृह विभाग

गणेश मुर्तीचं मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन ॲानलाईन किंवा इलेक्ट्रॅानिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे : गृह विभागानं जाहिर केली मार्गदर्शक सूचना

राष्ट्रवादी पार्टी विसर्जित करायची वेळ आली तरी अध्यक्ष बदलत नाहीत, मग तुम्ही कधी लोकशाही बनणार? : गोपीचंद पडळकर

भाजपमध्ये वेंकय्या नायडू, राजनाथ सिंह, अमित शाह, जे. पी. नड्डा अशांना अध्यक्षस्थानी संधी दिली जाते. पण काँग्रेसचा अध्यक्ष अजून बदलला गेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तर स्थापन झाल्यापासून मी बोलतोय या क्षणापर्यंत एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तरी या पक्षाचे नेते म्हणतात लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. जर तुम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहात, मग पार्टी आता विसर्जित करायची वेळ आली तरी पार्टीचा अध्यक्ष बदलला नाही. मग तुम्ही कधी लोकशाही मानणार आहात. मी राष्ट्रवादी वाल्यांना जागं करतोय, ही पार्टी टिकणारी पार्टी नाही. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. तेंव्हा पडळकर बोलत होते.

मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना हायकोर्टाचा दिलासा

 



मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना हायकोर्टाचा दिलासा

 

काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडनं अटकपूर्व जामीन मंजूर


 

मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना हायकोर्टाचा दिलासा

मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना हायकोर्टाचा दिलासा

 

काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडनं अटकपूर्व जामीन मंजूर

 

काळे यांच्याविरोधात पत्नीकडनं घरगुती हिंसाचाराची तक्रार

 

गजानन काळे यांच्या पत्नी हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

केंब्रिज बोर्डच्या शाळाही आता मुंबई महापालिका सुरू करत आहे, महाराष्ट्रातही अशा शाळा सुरू करण्याचा प्रयत्न: आदित्य ठाकरे

- मुंबईसाठी आजचा दिवस महत्वाचा. पालिकेच्या शाळा अपग्रेड कशा करायच्या यावर नेहमी प्रयत्न करत आलो आहोत. 
- पालिका शाळांचे रूप बदलू लागले आहे
- एसएससी बरोबरच सीबीएसई,आयसीएसई शाळा सुरू केल्या आहेत. सीबीएसई व आयसीएसई प्रवेशासाठी लॉटरी काढावी लागली, इतका प्रतिसाद मिळाला
- जगात सर्वोत्तम जे आहे ते मुंबईत देण्याचा प्रयत्न करतोय
- केंब्रिज बोर्डच्या शाळाही आता मुंबई महापालिका सुरू करत आहोत महाराष्ट्रातही अशा शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे
- प्रत्येक वॉर्डमध्ये किमान एक शाळा सुरू करण्याचा प्रयत्न. आज यासंदर्भात सामंजस्य करार करत आहोत
आदित्य ठाकरे
- पुढील वर्षी जूनपासून हा अभ्यासक्रम सुरू होईल
- मराठी हा विषय अनिर्वाय असेलच यात
- कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. मुलांसाठी लस आलेली नाही. तिसरी लाट येवू नये म्हणून प्रयत्नशील. 
- वेगळ्या प्रश्नांवर सगळी उत्तरे आहेत. जिथं उत्तर द्यायचे आहे तिथं देईन. शिक्षणात राजकारण नको

1 नोव्हेंबर पासून महाविद्यालय सुरू करा, पण त्याआधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं प्राधान्याने लसीकरण करा; विद्यार्थी संघटनांची मागणी
राज्यातील महाविद्यालय एक नोव्हेंबरपासून सुरु करण्याबाबत तयारी सुरु असल्याचं उच्च तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी काल सांगितले. मात्र, महाविद्यालय सुरु करण्यापूर्वी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचं लसीकरण प्राधान्य देऊन करावं, अशी मागणी विद्यार्थी संघटना करतायत. कोरोना काळात बंद असलेली महाविद्यालया सुरु करण्याचा निर्णय जरी सकारात्मक आहे. पण सुरु करण्यापूर्वी त्याचा योग्य पद्धतीने नियोजन शिक्षण विभागाने करावे असा विद्यार्थ्यांचा म्हणणं आहे. नोव्हेंबर मध्ये कॉलेज सुरू करायचे झाल्यास आतापासून विद्यार्थ्यांच्या लसीकरणसाठी कॉलेज, विद्यापीठ स्तरावर लसीकरण कॅम्प लावून लसीकरण पूर्ण करावं. जेणेकरून विद्यार्थ्यांची सुरक्षितता तर विचारात घेतलीच जाईल शिवाय, विद्यार्थ्यांना मुंबई, ठाणे या ठिकाणांहून लोकल प्रवास सुद्धा करता येईल आणि त्रास काही होणार नाही, असे म्हणणे विद्यार्थी संघटनानी मांडले आहे. 
बिंदुसरा नदीच्या पाण्यात पाच गायी गेल्या वाहून

बीड : मागच्या दोन-तीन दिवसाच्या पावसाने बिंदुसरा धरण शंभर टक्के भरले असून या धरणाचे पाणी बिंदुसरा नदी वाटे सिंदफणा नदीला जाऊन मिळते.. बिंदुसरा नदी बीड शहरातून जाते बीड शहरातील छोट्या दगडी पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे आणि आज पण यातून मार्ग काढताना चार ते पाच गाई वाहून गेल्या आहेत.. पाण्याचा मोठा प्रवाह चालू असतानाही आठ ते दहा गाई पाण्यातून जात असताना अचानक त्या वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळतात या गाई नेमक्या कोणाच्या मालकीच्या होत्या याची माहिती मात्र मिळू शकली नाही 

दरड कोसळून घाट बंद झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात पोहोचू न शकलेल्या महिलेचा रस्त्यातच मृत्यू

दरड कोसळून घाट बंद झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात पोहोचू न शकलेल्या महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. नंदुरबारमधल्या चांदसैली घाटातील ही घटना आहे. कालपासून घाटात दरड कोसळून रस्ता झाला बंद झाला आहे. सिदलीबाई पाडवी या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले जात होते. रस्ता बंद असल्याने सिदलीबाई पाडवी यांना खांद्यावर टाकून पायी चालत जाण्याची वेळ आली. या प्रवासादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश दोन लहान मुलींचा मृत्यू, आई गंभीर

एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश


दोन लहान मुलींचा मृत्यू, आई गंभीर


आईवर अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार सुरू 


केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील घटना


चार वर्षीय स्वप्नाली साखरे आणि तीन वर्षीय स्वीटी या सख्या बहिणींचा मृत्यू


आई जयश्री साखरे यांच्यावर उपचार सुरू

अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं निधन

अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं आज निधन झालं आहे. आपल्या आईच्या निधनावर अक्षय कुमारने शोक व्यक्त करत म्हटलं आहे की, मला आज अतिव दु:ख झालंय. माझ्या आईने आज हे जग सोडलं आणि दुसऱ्या जगात असलेल्या माझ्या वडिलांकडे गेली. 

अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक, अक्षयच्या आई अरुणा भाटिया यांचं निधन

Breaking News LIVE : अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक, अक्षयच्या आई अरुणा भाटिया यांचं निधन, ट्वीट करुन दिली माहिती 

राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरुवात,शरद पवार यांच्या उपस्थित बैठक सुरू

राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरवात,शरद पवार यांच्या उपस्थित बैठक सुरू


बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते, मंत्री, आमदार, माजी आमदार आणि पराभूत उमेदवार ही उपस्थित

सीएनजी पंपांवर गाड्यांची मोठी गर्दी

नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, भागात असलेले सीएनजी पंप बंद असल्यामुळे मुंबई गोवा हायवेवर असणाऱ्या सीएनजी पंपांवर गाड्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रवाशांच्या माहितीनुसार पूर्ण हायवेला केवळ 2 ते 3 सीएनजी पंप आहेत ते देखील बंद आहेत. त्यामुळे पुढील प्रवास आम्ही कसा करायचा असा सवाल उपस्थित केला आहे. सध्या बांधनवाडी नजीक असलेल्या सीएनजी पंपावर अनेक प्रवाशी दीड ते दोन तास ताटकळत बसले आहेत. प्रवाशांच्या माहितीनुसार पनवेल आणि कामोठे परिसरात असलेल्या पंपांवर मशीन बंद असल्याची कारणे देण्यात येत आहेत. त्यामुळे एकाच वेळी अनेक पंपांवरील मशीन कसे काय बंद पडले असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

धुळे : शहरातील मिल परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले पाणी

धुळे शहरासह परिसरात रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे मिल परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, या भागात महापालिकेने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्याने ही समस्या निर्माण झाली असून त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या निर्माण होत असते. यामुळे नागरिकांमधून महापालिके विरोधात रोष व्यक्त होत आहे. 

तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरु आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी 3405 मि.मी. पाऊस झाला आहे. देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग शिवगंगा नदीत सोडल्याने शिवगंगा नदी काढच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

बीड : जीव वाचवण्यासाठी झाडावर चढलेल्या आजोबा आणि नातवाची सहिसलामत सुटका
बीड : धरणाचे पाणी शेतात आले आणि शेतामध्ये असलेले आजोबा आणि नातू झाडावर चढून बसले रात्री उशिरा बचाव पथकाचे बोट त्यांना आणण्यासाठी गेली मात्र अंधारामध्ये न दिसल्याने ती बोट उलटली या बोट मधून एक जवान पाण्यात अडकून पडला होता मात्र तोसुद्धा सहिसलामत बाहेर आला आहे विशेष म्हणजे सहा-सात तासाच् अथक परिश्रमानंतर बचाव पथकाला आजोबा आणि नातवाला बाहेर काढण्यात यश मिळाले आहे

 

माजलगाव धरणाच्या गेटच्या पायथ्याजवळ देवखेडा येथील एका व्यक्तीचा गोठा होता. मात्र नेहमी रामप्रसाद गोविंद कदम यांचा गोठा होता. पाणी वाढल्याचे त्यांच्या लक्षात न आल्याने ते तिथेच अडकून पडले. दुर्दैव म्हणजे त्यांच्या सोबत त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हा देखील तिथेच अडकून पडला आहे. त्यांनी एका बाभळीच्या झाडावर आश्रय घेतलेला आहे. दरम्यान बचाव पथकातील फायरमन पवन कराड हे देखील बोट उलटल्यानंतर जवळच एका झाडावर अडकून पडले होते मात्र आता पहाटेच्या वेळी तेसुद्धा सहीसलामत बाहेर आले आहेत
परभणी जिल्ह्यात अनेक गावांत पाणी शिरले

परभणी जिल्ह्यात होत असलेला पाऊस आणि माजलगाव धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे गोदावरी नदीला पूर आला असुन अनेक गावांत पाणी शिरले आहे. ज्यातून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापुस,सोयाबीन, ऊस आदी पीक पाण्याखाली गेली आहेत. तर पाथरी-गुंज रस्त्यावर पाणी झाल्याने गुंज,अंधापुरी, गोंडगाव, उमरा या चार गावांचा संपर्क तुटला असून गुंज पाथरी रस्त्यावर तर जिथे वाहन चालायचे तिथं चक्क तराफ्यातुन गावकरी ये जा करत आहेत..


 

काल रात्रीपासून मुंबई-गोवा हायवेवरील अवजड वाहनांची वाहतूक बंद, पुढील 2 दिवस वाहतूक बंद राहणार
काल रात्रीपासून मुंबई-गोवा हायवेवरील अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपासून शुक्रवारी रात्री 8 वाजपर्यत म्हणजेच, पुढील 2 दिवस ही वाहतूक बंद असणार आहे. यामध्ये वाळूभरून जाणाऱ्या ट्रक्स यांना देखील बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. यामुळेचं रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

 
मुंबईत मध्य रात्रीपासून पावसाने पूर्णपणे उसंत

मुंबईत मध्य रात्रीपासून पावसाने पूर्णपणे उसंत घेतली आहे. त्या आधी मंगळवारी संध्याकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या रस्त्यावर पाणीच पाणी साचलं होतं. अंधेरी सबवे काल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

पार्श्वभूमी

राज्यात काल  3, 898 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 86 रुग्णांचा मृत्यू
राज्यात काल  3, 898 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 581  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 4 हजार 336 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 08 टक्के आहे. 


राज्यात काल 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 47 हजार 926 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,409 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (77), नंदूरबार (2),  धुळे (3), जालना (51), परभणी (60), हिंगोली (18),  नांदेड (28), अमरावती (76), अकोला (16), वाशिम (05),  बुलढाणा (84), यवतमाळ (2), नागपूर (72),  वर्धा (2), भंडारा (1), गोंदिया (5),  गडचिरोली (35) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 51,59,364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,93,698 (11.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,06,524 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,021  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


नऊ वर्षाच्या सुखी संसारानंतर शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनच्या घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर शिखरची पत्नी आयेशा मुखर्जीची  पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आयशाने मुखर्जीने घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लिहली आहे. परंतु या संदर्भात शिखर धवनकडून या बातमीला दुजोरा दिलेला नाही. शिखर धवन आणि आयशा मुखर्जी नऊ वर्षापूर्वी  2012 साली विवाहबंधनात अडकले होते. धवन आणि आयशा यांना एक मुलगा असून त्याचे नाव जोरावर आहे. आयशा शिखरपेक्षा दहा वर्षाने मोठ आहे. आयशाचा हा शिखर धवनशी दुसरा विवाह होता. आयशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. त्यानंतर 2014 साली आयशाने जोरावरला जन्म दिला. धवन आणि आयशाच्या लग्नावर अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. 


मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजाजन काळे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला
पत्नीचा मानसिक, शारिरीक छळ, मारहाण आणि परस्त्रीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेल्या गजानन काळे यांच्या अटकपूर्व जामीनावर मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी आपला निकाल राखून ठेवला असून तो उद्या म्हणजेच बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे भोवर्‍यात अडकलेल्या मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं कायम ठेवले आहेत. आपल्याविरोधातील सर्व आरोप चुकीचे असून हा निव्वळ पतीपत्नी यांच्यातील बेबनाव असल्याचा प्रकार आहे असं काळे यांच्यावतीनं हायकोर्टात सांगण्यात आलं.


रिलायन्सच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ! आता मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलर्स क्लबच्या शर्यतीत
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे अध्यक्ष या वाढीमुळे 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये सामील होण्याच्या शर्यतीत आले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती 3.7 अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. कारण रिलायन्सचे शेअर्स सोमवारी 52 आठवड्यांच्या उच्चांकी 2479.85 रुपयांवर पोहोचले.


ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 64 वर्षीय अंबानी 92.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून अंबानींनी त्यांच्या संपत्तीत 15.9 अब्ज डॉलरहून अधिक वाढ केली आहे. आरआयएलचा शेअर मंगळवारी 0.7% वाढून 2441.3 रुपयांवर बंद झाला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.