Breaking News LIVE : यूपी निवडणुकांसाठी काँग्रेसची स्क्रिनिंग कमिटी जाहीर
Breaking News LIVE Updates, 4 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.
राज्य मागासवर्गीय आयोग सदस्य बबनराव तायवाडे यांचा राज्यपालांकडे राजीनामा. मागासवर्गीयांना 27% आरक्षण देऊ शकत नसल्यामुळे पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका. अजूनही एमपीरिकल डाटा गोळा करण्याची प्रक्रिया नाही.
यूपी निवडणुकांसाठी काँग्रेसची स्क्रिनिंग कमिटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून वर्षा गायकवाड या स्क्रिनिंग कमिटीवर आहे. तर आहेत. जितेंद्र सिंह हे अध्यक्ष तर दीपेंद्र हुड्डा, वर्षा गायकवाड सदस्य आहेत.
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. टी पद्मनाभन यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने पुण्यात निधन झाले. गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी जगभरात त्यांची विशेष ओळख होती. २००७ मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. पुण्यातील आयुका संस्थेत ते कार्यरत होते.
अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी निवास्थानी दीड तासांपूर्वी इन्कम टॅक्सचे अधिकारी छापेमारीसाठी पोहचले आहेत. इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांच्या चार गाड्या बंगल्यावर पोहचल्या असून अधिकारी याठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करत असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु आहे. राज्यात आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 9 पैकी 7 नगरसेवकांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर भद्रावती नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 17 पैकी 12 नगरसेवकांचा काँग्रेस मधला प्रवेश शिवसेनेच्या नेत्यांनी ऐनवेळी रोखलाय. काँग्रेस आमदार बाळू धानोरकर यांच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील राजकारणासोबतच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस विरुध्द शिवसेना हा संघर्ष उफाळून आलाय.
नांदेड मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विसावा गार्डन येथील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.. यावेळी मुख्य ध्वजारोहण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.. हुतात्म्यांना तीन राऊंड फैरी झाडत मानवंदना देण्यात आली... यावेळी स्वातंत्र्यसैनिक, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे, आमदार अमर राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी रावसाहेब दानवे पुढाकार घेणार असतील तर राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहिल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.
हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त परभणीत पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यानात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेंळी जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी,स्वातंत्र सेनानी यांच्यासह परभणीकरांची उपस्थिती होती.पालकमंत्री नवाब मलीक यांनी पहिल्यांदा हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले व यानंतर ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला..
आज राज्यात हैदराबाद मुक्ती संग्राम दिन पाळला जात असून त्या निमित्ताने विविध मान्यवरांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला या प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
पार्श्वभूमी
आज जीएसटी कौन्सिलची महत्वाची बैठक
एकीकडे खाद्यतेल आणि डाळींच्या वाढत्या किंमती तर दुसरीकडे शंभरीपार गेलेले इंधनाचे दर, यामध्ये सामान्य माणसाची अवस्था केविलवाणी होत असताना एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. मोदी सरकार आज पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर देशातील पेट्रोलचे दर हे अर्ध्याने कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली आज लखनऊ येथे जीएसटी कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला जाईल असं अर्थमंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं. असं जर झालं तर पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागून त्याच्या किंमती थेट अर्ध्यावर येण्याची शक्यता आहे.
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंची अध्यक्षपदी निवड
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारडून जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ लवकरच जाहीर होणार हे निश्चित होतं. त्यावेळी नव्या विश्वस्त मंडळाची यादीही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर विश्वस्त मंडळात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी जोर धरु लागली होती. शिर्डीतून 50 टक्के विश्वस्त नेमण्याची मागणी होती. मात्र आजच्या यादीत 3 जणांना संधी देण्यात आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा राष्ट्रवादीकडून बासणात; सरकार चार वर्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुद्यावरून सद्या स्थानिक भूमिपुत्र विरूध्द महाविकास आघाडी सरकार असा सामना गेली काही महिने सुरू आहे. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आगरी-कोळी जनता आक्रमक असताना सेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडको दरबारी पास करून घेतला आहे. असे असले तरी राष्ट्रवादी पक्ष मात्र नामांतराच्या मुद्दाला हात न घालता तो पुढे ठकलण्याच्या मनस्थितीत आहे. याबाबत आज सिडकोत बैठकीसाठी आलेल्या अजित पवार यांना विचारले असता त्यांनी ठोस भूमिका घेण्याचे टाळले. दोन्ही व्यक्ती थोर असल्या तरी सद्या विमानतळाचे काम अधूरे आहे. विमानतळ सुरू होण्यास अजून चार वर्ष बाकी असल्याने त्यानतंर विचार करू अशी सोईस्कर भूमिका अजित दादा यांनी घेतली. बैठकीला मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुनिल तटकरे, सिडको एमडी संजय मुखर्जी, मनपा आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते.
टी -20 वर्ल्डकपनंतर टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीची मोठी घोषणा!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे घोषणा केली आहे की, आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराट कोहली म्हणाला की, त्याने हा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतला आहे. कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे. कोहली म्हणाला, की "मी टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय माझ्या जवळचे लोक मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला आहे." माझ्या कर्णधारपदाच्या काळात मी संघाला खूप काही दिले आहे. कामाचा ताण पाहता, मी 2021 च्या टी 20 विश्वचषकानंतर टी -20 स्वरूपातील भारताचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक फलंदाज म्हणून मी संघाला पाठिंबा देत राहीन.”
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -