Breaking News LIVE : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आल्याने 27 गावांचा संपर्क तुटला
Breaking News LIVE Updates, 4 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आल्याने 27 गावांचा संपर्क तुटला तर जिल्ह्यातील सकल भागात पाणी साचलं. निर्मला नदीला पुर आल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या लोकांना गेल्या दोन तासापासून संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात सरासरी 27.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3257.6075 मि.मी. पाऊस झाला आहे.
आणखी एक गोल्ड!
प्रमोद भगतने ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 21-17 असा पराभव करत पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले. आणि याच प्रकारात मनोज सरकारला कांस्यपदक मिळालंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या भाषणात व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. मात्र आज त्यांच्याच कार्यक्रमात एका दारुड्यानं एन्ट्री केली. आणि अजितदादांनी आपल्या भाषणात माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत. लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत, असं म्हणत तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाईच्या सुचनाही त्यांनी केल्या.
आठ महिन्यांचं घरभाडे मागायला आले म्हणून भाडेकरूने घरमालकाच्या मुलाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलले. पिंपरी चिंचवडच्या सांगवीत ही घटना 29 ऑगस्टला घडली असून गुन्हा 2 सप्टेंबरच्या रात्री दाखल करण्यात आलाय. यात जखमी झालेल्या मुलांचं नाव सौरभ पोरे असं आहे. सचिन पोरे आणि त्यांचा मुलगा सौरभ हे भाडेकरू विजय पाटोळे यांच्याकडे गेले. त्यांनी आठ महिन्यांचे थकलेले भाडे मागितले. याचा राग मनात धरून पाटोळे कुटुंबीयांनी त्या दोघांना टेरेसवर बोलण्यासाठी नेले. तिथं धक्काबुक्की आणि शिवीगाळ सुरू केली. मग टेरेसवरून थेट खाली ढकलले असा आरोप पोरेंनी पाटोळे कुटुंबियांवर केलाय.
मुंबईत नामांकित कॉलेज दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर सुद्धा कट ऑफ नव्वदी पार झाल्याचं दिसून आलंय. पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत नामांकित कॉलेजच्या कट ऑफ जवळपास 1 टक्यांनी घसरला ( 4 ते 7 गुणांनी कमी). मुंबई विभागात 60,037 विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत कॉलेज प्राप्त झाले आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीत मुंबई विभागात 13,282 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. सायन्स 5125, कॉमर्स 37186, आर्टस् 17333 शाखेसाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत कॉलेज मिळाले आहेत.
गोवा या महामार्गावरील महत्त्वपूर्ण असा वाशिष्ठी नदी वरील नवीन पूल आज वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला. नुकत्याच चिपळूणमध्ये आलेल्या महापुरानंतर या नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा वाहून गेल्याने जवळपास आठ दिवस बंद होता त्यानंतर युद्धपातळीवर काम सुरू करून तो पूल वाहतुकीस खुला केल्यानंतर अवजड वाहतूक त्या पुलावरून एकेरी मार्गाने सुरू होते. मात्र त्या शेजारी असणारा नवीन पूल युद्धपातळीवर काम करून आणि गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरु केल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी आणि चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी न करता ती थेट गावातच केली जाणार आहे. त्याकरता नवीन नियमावली जाहीर केली असून रेल्वे प्रशासन, एस टी विभाग आणि गुगल फॉर्म च्या मदतीने कामा मध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची आणि भाविकांची माहिती गोळा केली जाणार आहे. गावात आलेल्या प्रत्येक चाकरमान्यांची प्राथमिक तपासणी ही आशा वर्करच्या मार्फत केली जाईल. त्यानंतर तपासणीअंती कोणतीही कोरणा ची प्राथमिक लक्षणे दिसल्यास अँटीजेन किंवा RTPCR चाचणी केली जाईल. याबाबतचा सर्व सूचना ग्रामकृती दल, सरपंच पोलिस पाटील यांना देण्यात आल्या असून सहकार्य न करणाऱ्या व्यक्तीवर पॉलिसी कारवाई केली जाईल. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने याबाबतची नवीन नियमावली काल रात्री जाहीर केली असून नव्या नियमावलीबाबत मात्र सर्वसामान्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. कोकण असेल किंवा रत्नागिरी जिल्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे संभाव्य कुराणाच्या तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेता यापूर्वी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी दोन डोस पूर्ण होणे किंवा 72 तासापूर्वी चा rt-pcr रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला होता. पण आता मात्र थेट गावात आल्यानंतरच गणेश भक्त किंवा चाकरमान्यांची कोरूना चाचणी होणार आहे. दरम्यान याबाबत नियोजन पूर्णपणे योग्यरितीने झाला असून ग्राम कृतीदल, आशा वर्कर, पोलीस पाटील, सरपंच त्यांच्या बाबत चर्चा झाली असून त्यांच्याकडून देखील याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय नागरिकांची देखील जबाबदारीच आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिली आहे. दरम्यान नवीन नियमावली पाहता प्रत्यक्षात या सर्व गोष्टींची अंमलबजावणी शक्य आहे का? आगामी निवडणुका आणि यापूर्वी व्यक्त केली गेलेली नाराजी या सर्व राजकीय दबावापोटी अशा प्रकारचे निर्णय तर घेतला गेले नाहीत ना? शिवाय, नवीन नियमावलीमुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर मिळणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.
Breaking News LIVE : आम्ही आमदारकी किंवा खासदारकीसाठी जन्माला आलो नाही, आम्हाला शेतकऱ्यांचा भरभक्कम पाठिंबा, काळ प्रत्येकाचा येतो, 100 टक्के हिशेब चुकता करु, रविकांत तुपकरांचा इशारा
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-september-4-2021-maharashtra-political-news-1001886
पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलीय.. शंभू महादेव साखर कारखान्याच्या शेचाळीस कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय..
उस्मानाबादच्या सावरगाव मधील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी मधल्या वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून शेचाळीस कोटी रुपयाची साखर ठेवली होती याच घोटाळाप्रकरणी कळंब पोलीस स्टेशन मध्ये शंभू महादेव साखर कारखान्याच्या चेअरमन दिलीप चाळीस जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.. याप्रकरणी यापूर्वी एकास अटक झाली होती आता हे दुसरी अटक करण्यात आलीय..
काय आहे प्रकरण -
हावरगावच्या शंभू महादेव साखर कारखान्याने 2002 ते 2017 या कालावधीत 47 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते..
या साखर कारखान्याची लीड बँक म्हणून वैधनाथ अर्बन बँक होती आणि याच बँकेकडे 1 लाख 54 हजार साखरेचे पोते तारण ठेवल्याचे साखर कारखान्याकडून भासवण्यात आले होते
तारण असलेल्या साखरेचे गोदाम वैद्यनाथ अर्बन बँकेने सील केले होते मात्र याच दरम्यान यात आफरा ताफर झाली होती या प्रकरणी कळंब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता..
पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलीय. शंभू महादेव साखर कारखान्याच्या शेचाळीस कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.उस्मानाबादच्या सावरगाव मधील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी मधल्या वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून शेचाळीस कोटी रुपयाची साखर ठेवली होती याच घोटाळाप्रकरणी कळंब पोलीस स्टेशन मध्ये शंभू महादेव साखर कारखान्याच्या चेअरमन दिलीप चाळीस जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.. याप्रकरणी यापूर्वी एकास अटक झाली होती आता हे दुसरी अटक करण्यात आलीय..
केलेला समझोता पाळायचा की पुन्हा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीनं ठरवायचं असं राजू शेट्टी म्हणाले. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करेन असा इशाराही राजू शेट्टींनी राष्ट्रवादीला दिला. मी एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही, जलसमाधी आंदोलन होणार असंही ते म्हणाले.
विदर्भातील एकमेव असलेला व रॉक मॅट्रिक्स पद्धतीने बांधण्यात आलेला सुंदर असा अर्धचंद्राकृती सांडवा असलेला मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्षा येथील उतावळी नदीवर असलेला उतावळी प्रकल्प या पावसाळ्यात ओव्हरफ्लो झालाय. पावसाळ्यात पर्यटकांचं आकर्षण असणारा उतावळी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे या धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. मागील चार दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात झाल्यापासूनच मोठ्या प्रमाणात पर्यटक देऊळगांव साकरशा मधील उतावळी धरणावर दाखल होताना दिसत आहेत.
कोल्हापूरच्या केनवडेमध्ये मुलानेच केली वडिलांची हत्या,
दारू पिऊन घरात मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याने संपवलं,
डोक्यात पहार घालून केली हत्या, अपघाताचा बनाव,
कागल पोलिसांनी छडा लावून मुलाला केली अटक,
दत्तात्रय पाटील असं मृताच नाव तर अमोल पाटील असं हत्या करणाऱ्या मुलाचं नाव,
पालघर - बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील जखारिया लिमिटेड कंपनीमध्ये स्फोट, तीन ते चार किलोमीटर परिसरात स्फोटाचा मोठा आवाज, स्फोट झाल्यावर कंपनीला आग, एका कामगाराचा मृत्यू तर चार कामगार जखमी, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्र वाशिम आणि गरुडा एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक शेतीमधील यांत्रिकीकरण व आधुनिक उपकरणांचा वापर ही काळाची गरज लक्षात घेता ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. ड्रोन द्वारे लागणारे औषधी व त्याचे प्रमाण तसेच फवारणी योग्य पिके याबाबतीत अधिक अभ्यासाची गरज व्यक्त करण्यात आली. शेतीतील नवीन तंत्रज्ञान समजुन घेऊन अवलंब करावा केल्यास श्रम कमी होऊन आर्थिक खर्च कमी केला जाऊ शकतो.
पार्श्वभूमी
राज्यात काल 4,313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 92 रुग्णांचा मृत्यू
राज्यात काल 4,313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 360 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 86 हजार 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के आहे.
राज्यात काल 92 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 50 हजार 466 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 973 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (66), नंदूरबार (2), धुळे (25), जालना (22), परभणी (53), हिंगोली (60), नांदेड (28), अकोला (18), वाशिम (1), बुलढाणा (74), यवतमाळ (13), नागपूर (64), वर्धा (3), भंडारा (6), गोंदिया (3), गडचिरोली (37) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 44,87,950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,77,987 (11.98 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,98,098 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,954 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या एक हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयानं शुक्रवारी फेटाळून लावला.
गिरीश चौधरी यांनी या प्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवलं गेलंय असा आरोप केला होता. मात्र विशेष पीएमएलए कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. साल 2016 मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना हा सारा व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे लाचलुपचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती. मात्र एसीबीनं खडसे यांना याप्रकरणी क्लीन चीट दिली होती.
अँटीलिया बाहेर स्फोटकांची गाडी का ठेवले याचा कारण स्पष्ट
अँटीलियाच्या बाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्याप्रकरणी आज एनआयए कोर्टात दहा हजार पानांची चार्जशीट केली सादर केली. ज्यामध्ये सचिन वाझेने अँटीलिया बाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली? याचं कारण देण्यात आलं आहे. ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात सचिन वाझेला सस्पेंड करण्यात आलं. मात्र, 2020 मध्ये वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं आणि इतकंच नाही तर क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट (सीआययु) सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर त्याला बसवण्यात आलं.
सचिन वाझेची ओळख ही उत्तम तपास अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून होती. मात्र, पंधरा वर्षानंतर मुंबई पोलिस दलात रुजू झाल्यावर त्याला ती ओळख पुन्हा मिळवायची होती आणि म्हणून त्याने अँटीलियाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्याचा हा सगळा कट रचल्याचा एनआयएने आपल्या आरोप पत्रात म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -