Breaking News LIVE : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा 30 ऑक्टोबरला

Breaking News LIVE Updates, 29 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Sep 2021 06:38 PM
नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा धरणाने सलग चौथ्या वर्षी शंभरी गाठली

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेला गिरणा धरणाने सलग चौथ्या वर्षी ही शंभरी गाठली असून आज सकाळी ७  वाजता या गिरणा धरणातून ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, गिरणा धरणाचे चार दरवाजे एक फुटाने आता उचलण्यात आले आहे गिरणा धरणात पाण्याची आवक अजून सुरूच असल्याने अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा गिरणा धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे

विश्वचषक गोफण स्पर्धेसाठी ओंकार उतेकर या पोलादपूरच्या तरुण शेतकऱ्याची भारताच्या संघात निवड

ऑक्टोबर 2021 मध्ये स्पेनमध्ये होणाऱ्या विश्वचषक गोफण स्पर्धेसाठी ओंकार महादेव उतेकर या मूळच्या पोलादपूरच्या तरुण शेतकऱ्याची भारताच्या संघात निवड झाली आहे. ओंकार हा पूरग्रस्त पोलादपूर तालुक्यातील घागरकोंड गावचा रहिवासी
आहे. घागरकोंड गावची ओळख म्हणजे पर्यटकांसाठी आकर्षण असणारा झूलता पूल. या पुलाच्या बाजूलाच ओंकार कृषी पर्यटन केंद्र चालवत होता. जुलै २०२१ मध्ये मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला आलेल्या पुरात ते कृषी पर्यटन केंद्र उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळं उतेकर कुटुंबीयांचं मोठं नुकसान झालं असून, याही परिस्थितीत ओंकार उतेकर स्पेनमधल्या विश्वचषक गोफण स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेसाठी ओंकारला तीन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुण्यात सराव करत असताना हा खर्च उभारण्याचा त्याचा प्रयत्न आहे. ओंकार उतेकर ११ ऑक्टोबरपर्यंत पुण्यात असून, त्याचा संपर्क क्रमांक 8655073317 हा आहे. स्पेन या देशानंच आंतरराष्ट्रीय गोफण स्पर्धेला ओळख मिळवून दिली. स्पेनमधल्या दुसऱ्या विश्वचषक गोफण स्पर्धेत (Second Slinging World Cup) एकूण ३४ देश सहभागी होत आहेत. पुणे आणि पोलादपूर रिपोर्टर्सच्या सहकार्यानं हे पॅकेज होऊ शकतं.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा 30 ऑक्टोबरला

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. परिषदेकडून टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे. 

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी घेतली अमित शाह यांची भेट

 कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज संध्याकाळी अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे. 

पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, सोलापुरातील दुर्दैवी घटना

पतीचे मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, सोलापुरातील दुर्दैवी घटना,


अनुसया कोरे वय 33 असे मृत महिलेचे नाव, मूळ मंगळवेढाचे रहिवासी


अनुसया कोरे यांच्या पतीवर मागील 8 ते 10 दिवसापासून कोरोनामुळे सुरू होते उपचार


मात्र आज सकाळी त्यांचा उपचार दरम्यान झाला मृत्यू


पतीचे निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने अनुसया कोरे यांची रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या

अंबरनाथमध्ये हॉटेल चालकांकडून 'हायटेक' वीजचोरी
 अंबरनाथ पश्चिमेच्या विमको नाक्याजवळील नेताजी मार्केट परिसरात नवाब हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये विजेची हायटेक पद्धतीने चोरी केली जात होती. याबाबतची कुणकुण लागताच महावितरण कर्मचाऱ्यांनी हॉटेलवर धाड टाकत मीटरची तपासणी केली. यावेळी मीटरमध्ये एक सर्किट बसवण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या सर्किटला एका रिमोट सोबत जोडण्यात आलं होतं. रिमोटच्या साहाय्याने मीटर चालू आणि बंद करण्याचं तंत्रज्ञान या मीटरमध्ये बसवण्यात आलं होतं. त्यामुळं दिवसातून काही वेळ मीटर सुरू ठेवून नंतर सर्रासपणे चोरीची वीज या हॉटेलमध्ये वापरली जात असल्याचं समोर आलं. अशा पद्धतीने या हॉटेलने १२०२ युनिटची वीजचोरी केल्याचं उघड झालं. धक्कादायक बाब म्हणजे याच हॉटेलने २०१७ मध्ये सुद्धा वीजचोरी केली होती. त्यावेळी २ लाख ९५ हजार ७२० रुपये वीजबिल आणि ५५ हजार रुपये दंड या हॉटेलकडून वसूल करण्यात आला होता. आता मात्र या हॉटेलचे चालक अब्दुल शब्बीर बद्रुद्दीन आणि मालक सलीम शेख यांच्याविरोधात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ आणि १३८ नुसार वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांना विचारलं असता गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

 
खुशखबर... मुंबईकरांची वाहतूक कोडींतून सुटका होणार, अंधेरी ते दहिसर मेट्रो सरु होणार

पश्चिम उपनगरांमधील मेट्रोचे 7 आणि 2 अ हे दोन्ही मार्ग डिसेंबरपूर्वी सुरु होतील असं समजतंय. अंधेरी ते दहिसर आणि डि.एन.नगर ते दहिसर मार्गावरील मेट्रो सेवा डिसेंबरपूर्वी सुरु होणार आहे. 


नाशिकमध्ये पतीकडून पत्नीचा खून, किरकोळ वादातून घडली घटना

नाशिक : नाशिकमध्ये पतीनेच केला पत्नीचा खून झाला असून बिटको चौकातील हॉटेल पवनमध्ये काल रात्री ही घटना घडली. आपापसांतील किरकोळ वादातून आरोपी पोपट वीरने पत्नी ज्योतीचा ओढणीने गळा आवळला. आरोपी पोपट वीर नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील काळमवाडी इथल्या दुधगंगा धरणाच्या मुख्य भिंतीला गळती 

कोल्हापूर जिल्ह्यातील काळमवाडी इथल्या दुधगंगा धरणाच्या मुख्य भिंतीला गळती 


मुख्य भिंतीतून प्रतिसेकंद 300 लिटर पाण्याची गळती होत असल्याचा तज्ञांचा अंदाज


मात्र गळतीचं प्रमाण पाहता लाखो लिटर पाण्याची गळती होत असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दावा


'मेघोली धरण फुटीसारखी दुर्घटना घडण्याआधी मुख्य भिंतीची दुरुस्ती करा'


'अन्यथा धरण दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन उभारू'


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अजित पवार यांचा इशारा

सिडको परिसरातील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी गजाआड

सिडको परिसरातील विधवा महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचे प्रकरण घडलं होतं. त्यातील आरोपी नितिन पवारच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रात्री ठक्कर बाजार परिसरातून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी नितिन पवारने पॅरोलवर सुटल्यावर ब्यूटी पार्लरमध्ये घुसून महिलेवर अत्याचार केला होता आणि फरार झाला होता. या प्रकरणी अंबड पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. 


 

पार्श्वभूमी

Mumbai Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणी 18 दिवसांत आरोपपत्र दाखल, 77 साक्षीदारांचे जबाबही नोंदवले


मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या पाशवी बलात्कार प्रकरणी मंगळवारी (28 सप्टेंबर) मुंबई पोलिसांनी दोषारोपत्र दाखल केलं आहे. या घटनेच्या अवघ्या 18 दिवसांत सर्व साक्षीपुरावे गोळा करून पोलिसांनी 346 पानांचं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं आहे.


गणेश चतुर्थीच्याच दिवशी मुंबईत घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणानं संपूर्ण मुंबई हादरली होती. याप्रकरणातील नराधम मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीनं चालविण्यात येईल, असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी जनतेला दिलं होतं. त्यानुसार मंगळवारी मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत आपलं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं आहे. 346 पानांच्या या आरोपपत्रातील माहितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केलं. यात लोखंडी सळीचाही त्यानं वापर केल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे. 


Maharashtra Corona Update : राज्यात काल 2, 844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.26 टक्के
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल  2844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 029  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 65  हजार 277  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे. 


राज्यात काल 60 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 263  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (04), नंदूरबार (4),  धुळे (2), जालना (45), परभणी (58), हिंगोली (20), नांदेड (9),  अकोला (29), वाशिम (09), बुलढाणा (18), यवतमाळ (06),   वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (5), चंद्रपूर (92),   गडचिरोली (19 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


कोरोना लसीऐवजी रेबिजचं इंजेक्शन, ठाण्यातील धक्कादायक प्रकार; डॉक्टर, परिचारिका निलंबित
खोटं आयकार्ड देऊन लस देणं, एकाच महिलेला 3 वेळा लस देणं अशा संतापजनक प्रकरणानंतर देखील ठाणे महापालिकेतील असे प्रकार थांबत नाही. कारण काल (मंगळवारी) पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पालिकेच्या कळव्यातील आरोग्य केंद्रात एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्याच्या ऐवजी रेबीजचं इंजेक्शन देण्यात आल्यानं संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे.


ठाणे महानगर पालिका कळव्यातील आतकोनेईश्वर विभागात एक आरोग्य केंद्र चालवते. याच केंद्रामध्ये कोरोनाचं लसीकरण देखील सुरु असल्यानं, एक व्यक्ती कोरोना लस घेण्यासाठी 27 तारखेला गेली होती. तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी त्याकडील कागदपत्रांची पडताळणी करून त्याला लस घेण्यासाठी परिचारिकेकडे पाठवलं. मात्र परिचारिकेनं त्या व्यक्तीकडे असलेल्या कागदपत्राची पडताळणी न करताच त्याला थेट रेबीजचं इंजेक्शन देऊन टाकलं. ही गंभीर बाब काही वेळानंतर सर्वांच्या लक्षात आली. महापौर नरेश म्हस्के यांना हे प्रकरण समजताच त्यांनी काल ठाणे महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य विभागातील आणि पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर महापौरांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकेला निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेनं ताबडतोब कारवाई करत या दोघींना निलंबित केलं आहे. दरम्यान ज्या व्यक्तीला रेबीजचं इंजेक्शन देण्यात आलं त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगण्यात आलं आहे.


आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसेची युती होण्याची शक्यता
पालघर जिल्हा परिषद निवडणुकींसाठी भाजप-मनसे युतीनंतर आता मनसे-भाजप युतीच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. पालघर पाठोपाठ पुण्यात मनसे नेत्यांनी भाजपसोबत युती करण्याची मागणी केली तर अशीच मागणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून नाशिक, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींसाठी  केली जात आहे. मुंबई, ठाणे, केडीएमसी महापालिकेतून शिवसेनेला हद्दपार करायचंच असा चंग भाजपनं बांधला आहे. त्यात भाजपला मनसेची सरळ सरळ साथ मिळते का पडद्यामागून हा महत्वाचा प्रश्न आहे.


राजकारणात काहीही अशक्य नसतं, असं म्हणतात. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, यापैकी कोणाच्याही राजकीय भूमिका एकमेकांशी मेळ खाणाऱ्या नाहीत. तरीही हे सगळे एकत्र आले. मराठी माणूस आणि महाराष्ट्र हे मनसेचं कार्यक्षेत्र आहे. मराठी माणसावर अन्यायाचा मुद्दा पुढं करून मनसेनं परप्रांतीयांविरोधात राडेही केले आहेत. त्यामुळं मनसेची प्रतिमा परप्रांतीयविरोधी अशी झाली आहे. भाजपसाठी तो चिंतेचा मुद्दा आहे. मात्र, 25 वर्षांपूर्वी शिवसेनेची प्रतिमा नेमकी अशीच होती. तेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून त्यावर तोडगा काढण्यात आला. यावेळीही तोच फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.