मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 12 दिवस झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच आज अखेर सुटल्याचं चित्र आहे. महायुतीतील भाजपने आज मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव जाहीर झालं आहे. आज भाजपने अखेर मुख्यमंत्री पदाचं आणि विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे आता शपथविधीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे.  उद्या (गुरूवारी) 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहतील.


दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची महायुतीच्या नेत्यांनी भेट घेतली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह तुम्हीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना  विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलंय.


शिंदे यांनी नेतृत्व करावं , शिवसेनेच्या आमदारांचा वर्षावर सूर


संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला सगळं कळेल. त्यामुळे राज भवनातील पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे यांची शपथ विधिबाबत कोणतेही स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे आता याच मुद्यावरून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी शिंदे सेनेचे अनेक आमदार वर्षा या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नेतृत्व करावं , असा सर्व शिवसेनेच्या आमदारांचा सूर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


संध्याकाळपर्यंत सांगतो - एकनाथ शिंदे


दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंनाही तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, अडीच वर्षांपूर्वी याच ठिकाणी मी मुख्यमंत्री व्हावं ही शिफारस देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी मी शिफारस केली आहे. देवेंद्रजींनीही आता सांगितलं..संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळं कळेलच... अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे सर्व नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावा केला, उद्या शपथविधी सोहळा