Breaking News LIVE : परभणी जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला असुन दुपारी 1 वाजल्यापासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Breaking News LIVE Updates, 26 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Sep 2021 05:59 PM
परभणी जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला असुन दुपारी 1 वाजल्यापासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस

परभणी जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला असुन दुपारी 1 वाजल्यापासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुय. विजांचा गडगडाट, वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील नद्यांना पुर आलाय. लोअर दुधना प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडण्यात आले असून 17 हजार क्यूसेक वेगाने पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दुसरीकडे येलदरीचे ही 2 दरवाजे उघडून 7 हजार क्यूसेक ने पुर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. शिवाय गोदावरी वरील ढालेगाव बंधाऱ्याचे दरवाजेही उघडण्यात आले असून गोदावरीत पाणी सोडण्यात आले आहे. एकूणच गोदावरी, दुधना, पुर्णा या तिन्ही नद्या सध्या तुडूंब भरून वाहत आहेत. या नद्यांचे पाणी हे अनेक गावांत शिरल्याने नुकसान ही झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने तालुक्याने यंदा पावसाची सरासरी ओलंडली

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने तालुक्याने यंदा पावसाची सरासरी ओलंडली आहे. आजही दुपारनंतर तालुक्यातील सोयगाव, भालूर, लक्ष्मीनगर, मांडवड या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचलंय. सतत पडणाऱ्या पावसाने कांदा, मका, कांदा रोप, कापूस या पिकांना त्याचा फटका बसलाय तर अनेक ठिकाणचे छोटे, मोठे पाझर तलाव तुडूंब भरुन वाहताय.

उद्याच्या बंद माध्यमातून केंद्र सरकारविरोधात नवी लढाई सुरू करणार : नाना पटोले 

अकोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद 


#उद्याच्या बंद माध्यमातून केंद्र सरकारविरोधात नवी लढाई सुरू करणार,   स्वतः अकोल्यातील आंदोलनात उद्या सहभागी होणार मोदी सरकारच्या माध्यमातून भाजपची देशात हुकूमशाही : नाना पटोले 

ठाकरे, पवार, हसन मिया हिम्मत असेल तर आडवा, किरीट सोमय्यांचं आव्हान

ठाकरे, पवार, हसन मिया हिम्मत असेल तर आडवा, सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन जाणार कोल्हापूरला, गुपचूप 55 लाख ईडीच्या कार्यालयात जाऊन भरणारे संजय राऊत माझ्यावर कसले लेख लिहितात. मिलिंद नार्वेकरांनी स्वतः बंगला पाडला आणि अनिल परब मला मानहानीची नोटीस पाठवतात, तुमचा बंगला पाडण्यासाठी आमचे कार्यकर्ते देतो, असं भाजप नेते किरीट सोमय्यांनी म्हटलंय.


 

परवानगी नाकारली तरी पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा

पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा पार पडतोय. सत्तेचा दुरुपयोग करत हा मेळावा पार पाडला जात असल्याचं समोर आलंय. कारण पिंपरी चिंचवड पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली होती. तरी देखील शिवसेनेचे खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडक यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा हा मार्गदर्शन मेळावा पार पडतोय. या मेळाव्यासाठी शिवसेनेने पिंपरी चिंचवड पोलिसांकडे परवानगी मागीतली होती. मात्र अद्याप ही कोरोनाचे काही निर्बंध कायम आहेत. म्हणूनच पोलिसांनी ही परवानगी नाकारली. पण हे झुगारून सेनेने हा मेळावा घेतलाच. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेवर असणारे कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल करत नाहीयेत, दुसरीकडे मात्र त्यांचे शिवसैनिक अशा प्रकारे नियमांना हरताळ फासत आहेत. मंचावर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडालाय तर मंचासमोर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांकडून मात्र बघ्याची भूमिका आहे.

सोलापुरात राजकारण्यांकडून पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पायदळी

राजकारण्यांकडून पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पायदळी, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटनास मोठी गर्दी


कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर उपस्थित


सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालय येथे पार पडतोय कार्यक्रम

माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांची भेट

माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांची भेट


अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय रद्द करण्याची बसवराज बोम्मई यांच्याकडे मागणी


बेळगावच्या सर्किट हाऊसमध्ये घेतली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराबाबत भेट


महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अलमट्टीचं पाणी नियंत्रित ठेवण्याची विनंती

मध्य रेल्वेच्या लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, ठाणे-दिवा दरम्यान ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर आज तुमचा खोळंबा होऊ शकतो. मध्य रेल्वेच्या लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. 





महाराष्ट्रात 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

चक्रीवादळाची तीव्रता कमी झालेले क्षेत्र महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उद्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे.  महाराष्ट्रात 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीमुळे रविवारपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. 

Cyclone Gulab : बंगालचा उपसागरातील अतीतीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे 'गुलाब 'चक्रीवादळात रुपांतर

बंगालच्या उपसागरातील अतीतीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे गुलाब चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर 'गुलाब' असं या चक्रीवादळाचं नाव असून पाकिस्तानकडून हे नाव देण्यात आले आहे. दक्षिण उडीशा-उत्तर आंध्र प्रदेश दरम्यानच्या कलिंगपट्टणमजवळ किनारपट्टीला 26 सप्टेंबरला संध्याकाळी हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर

CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) दिल्ली दौऱ्यावर आहेत. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उपस्थित राहाणार आहे. महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवाई संदर्भात मुख्यमंत्री यांच्या उपस्थित सोमवारी वर्षावर आढावा घेण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात स्वतंत्र बैठक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

पार्श्वभूमी

CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वाची बैठक


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) दिल्ली दौऱ्यावर आहेत. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उपस्थित राहाणार आहे. महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवाई संदर्भात मुख्यमंत्री यांच्या उपस्थित सोमवारी वर्षावर आढावा घेण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात स्वतंत्र बैठक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


नक्षलवादी परिसरात रखडलेल्या विकासकामांचाही कालच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. नक्षलवादी कारवाया या ग्रामीण भागातून शहरी भागात वाढत असल्यानं केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज दिल्लीत महत्त्वाच्या  बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीनंतर अमित शाह यांच्यासोबत सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची चर्चा होते का? याकडेही सर्वांचं लक्ष आहे.


PM Modi UNGA Speech : दहशतवादाला खतपाणी घालाणाऱ्यांनी विचार करावा, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा


अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशवाद पसरवण्याासाठी होऊ नये. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांनी विचार करावा, कारण दहशतवादाचा फटका त्यांना देखील बसू शकतो संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता  पाकिस्तानला इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात ते बोलत होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.


भारतात या लस निर्मिती करा


भारताने जगातील गरजू देशांना लस देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही जगातील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आमंत्रित करत आहे. आमच्या देशात या आणि लस निर्मिती करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले आहे. 


भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली


भारतात कोविन अॅपवर दिवसाला तीन कोटी लोकांच्या लसीकरणाची नोंद होते. भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली आहे. 12 वर्षापुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लस भारताने विकसीत केली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान कोरोना संकटात अर्थव्यवस्थेला बळकटी देणारं अभियान आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.