Breaking News LIVE : शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरु करण्याच्या तयारीत

Breaking News LIVE Updates, 24 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Sep 2021 10:57 PM
शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरु करण्याच्या तयारीत

शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरु करण्याच्या तयारीत. जागतिक मराठी रंगभूमी दिनी नाट्यगृह सुरु होणार. नाट्यकलाकारांना मोठा दिलासा. येत्या 5 नोव्हेंबरला जागतिक मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. अनलॉकनंतर अनेक कलाकारांची नाट्यगृह सुरु करण्याची मागणी केली होती.

आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली

आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली. हॉल तिकीट गोंधळानंतर उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली.
विद्यार्थ्यांना त्यानुसार आरोग्य विभागाकडून एसएमएस, इमेल द्वारे काळविण्यात आले आहे. पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना काही तास आधी परीक्षा रद्द झाल्याने मनस्ताप.

राज्यात येत्या सात ऑक्टोबरपासून भाविकांसाठी मंदिरांची दारंही उघडणार असल्याची सूत्रांची माहिती

राज्यात येत्या सात ऑक्टोबरपासून भाविकांसाठी मंदिरांची दारंही उघडणार असल्याची सूत्रांची माहिती

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर!

देशभराचे लक्ष लागून असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC Result) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी कोरोनामुळे मुलाखत प्रक्रिया लांबणीवर पडली होती. त्यामुळे निकालालाही उशीर झाला. युपीएससीमध्ये शुभम कुमार याने सर्वाधिक गुण मिळवत देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे.

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! अनेक मराठी मुलांचं घवघवीत यश

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! अनेक मराठी मुलांचं घवघवीत यश

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिथिलता देण्याबाबत बैठक घेणार : अजित पवार

शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने नियमावली ठरवली आहे. शिक्षकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं बंधनकारक आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडची कोरोना परिस्थिती बरी आहे. येत्या एक तारखेला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिथिलता देण्याबाबत बैठक घेणार आहे. मास्क वापरणे बंधनकारक राहील. पुणे जिल्ह्यात लसीचा एक कोटीचा टप्प्या पार झालाय. जिल्ह्यातील 83 टक्क्यांहून अधिक लोकांना पहिला तर 44 टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. लसीच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांचे ठेवण्याचे बंधन काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करणार. बाजारात लस उपलब्ध झाल्यावर दोन डोसमधील अंतर 84 दिवसांहून घटवण्याची गरज जेणेकरून लसीकरणाचा वेग वाढवण्यास मदत होईल.

औरंगाबादमधील अंगणवाडी सेविकांचे आंदोलन चिघळलं

औरंगाबादमधील अंगणवाडी सेविकांचे आंदोलन चिघळलं. अंगणवाडी सेविका आणि पोलिसांमध्ये झटापट. मोबाईल परत करण्यावरून अंगणवाडी सेविका आणि पोलिसांत वाद. औरंगाबाद जिल्हा परिषदेत गोंधळ सुरू.

राज्यात 4ऑक्टोबर पासून शाळा सुरू, मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी

राज्यात ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील परवानगी  दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री यांच्याकडे मागितली  परवानगी होती

खराब रस्त्यांमुळे आणखीन किती लोकांचा जीव जाणार?, हायकोर्टाचा सवाल


खराब रस्त्यांमुळे आणखीन किती लोकांचा जीव जाणार?, हायकोर्टाचा सवाल


महामार्गांवरील खड्ड्यांबाबत राज्य सरकारनं गांभीर्यानं काम करायला हवं - हायकोर्ट


मुंबई नाशिक महामार्गाच्या दुर्दशेची हायकोर्टानं घेतली दखल


खड्डे आणि त्यामुळे होणा-या ट्राफिकमध्ये लोकांचे तासंनतास जातायत प्रवासात

ठाणे भिवंडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, पंधरा मिनिटाच्या प्रवासासाठी लागतोय दोन तासांचा वेळ

महाराष्ट्र राज्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे त्यातच ठाणे - भिवंडी  हा बीओटी तत्त्वावर बनवण्यात आलेल्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे कशेळी ते अंजुरफाटा दरम्यान रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवर प्रवास करण्यासाठी नागरिक घाबरतात आपली वाहन विरुद्ध दिशेने घेऊन जातात खरंतर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून त्याची लांबी 12 ते 15 फुटांपर्यंत असून त्याची खोली एक ते दीड फुटांपर्यंत आहे त्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त आहेत. 


 बीओटी तत्वावर बनवण्यात आलेला ठाणे ते भिवंडी हा रस्ता दहा किलोमीटरचा असून यासाठी 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले व कल्याण संगम इन्फ्रा या कंपनीने हा रस्ता बनवला यामध्ये एका ब्रीज सह माजी वाडा ते अंजुर फाटा पर्यंत हा रस्ता 2011 मध्ये हाती घेण्यात आला व संगम इन्फ्रा कंपनीकडून टोलवसुली सुरू करण्यात आले मात्र महसूल न आल्याने सार्वजनिक बांधकाम विरोधात कोर्टात खटला सुरू आहेत त्यानंतर 2019 मध्ये मेप या कंपनीने टोल वसुलीची जबाबदारी स्वीकारली . या रस्त्यावर 120 रुपये टोल घेतले जात असून तशी सुविधा याठिकाणी नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप  नागरीक करत आहेत व टेंडर प्रमाणे मेप कंपनीनेही पैसे पीडब्ल्यूडी ला वर्ग केले नाही म्हणून शेवटी पीडब्ल्यूडी नेहा रस्ता एमएमआरडीए मेट्रोचे काम करण्यासाठी हस्तांतरण केलेला आहे एमएमआरडीएकडे हा रस्ता हस्तांतरित करीत असताना काही अटी घालण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये संपूर्ण रस्ता गटारी नाली ड्रेनेज पाईपलाईनचे काम एमएमआरडीएने करणे गरजेचे आहे परंतु रस्त्याचे काम आज पर्यंत काही झालेले नाही त्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय अनेक जण आपल्या घरी पाठीचा मानेचा कमरेचा आजार घेऊन जात आहेत तर घरातील कुटुंब आपल्या घरातील गेलेला सदस्य परत येतो की नाही याची वाट बघत असतात या रस्त्यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली पत्रव्यवहार करण्यात आला मात्र या या रस्त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आला आहे  

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल


राज्य सरकारचा आरोप अत्यंत चुकीचा,


2011 चा डेटा हा सदोष आहे,


महाराष्ट्र आणि केंद्राची ओबीसी लिस्ट वेगळी आहे,


राज्याने स्वतःचा एम्पिरिकल डेटा तातडीने करण्याची गरज आहे,


सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो केवळ आणि केवळ महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे,


जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारचा, त्यावर काही बोलणार नाही,

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील खंडाळा स्टेशनवर आज मोठा गोंधळ

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील खंडाळा स्टेशनवर आज मोठा गोंधळ उडाला. डेक्कन क्वीन रेल्वे काही काळ थांबविल्याने प्रवासी देखील भयभीत झाले होते. एका अज्ञात व्यक्तीने चालत्या रेल्वेची चेन खेचली आणि पाच बॅग रेल्वेतून बाहेर फेकल्या. त्यामुळं रेल्वेत नेमकं काय सुरुये, असा प्रश्न सर्वांना पडला. खंडाळा स्थानकावर केवळ तांत्रिक कारणासाठी थांबणारी रेल्वे आज अचानक इमर्जन्सी रोखण्यात आली होती. त्यामुळं ही परिस्थिती उद्भवली होती. पुण्यातून डेक्कन क्वीन निघाली तेंव्हा एक प्रवासी मागेच राहिला. त्याने एका प्रवाश्याला फोन करून बॅग बाहेर फेकायला सांगितल्या होत्या. हे रेल्वे पोलिसांच्या तपासात समोर आलं अन सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मग रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ झाली.

अब की बार... एक हजार पार? एलपीजी सिलेंडर महागण्याची शक्यता

एलपीजी सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. अब की बार... एक हजार पार? उज्वला योजनेतील लाभार्थी वगळता इतरांचं अनुदान रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

 



सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेली परवानगी रद्द

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास नॅशनल मेडिकल कौन्सिलने दिलेली परवानगी अवघ्या 48 तासात रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला केंद्राच्या मान्यतेसाठी जुलैमध्ये केंद्रीय समितीने पाहणी दौरा केला होता. त्यानंतर नुकतीच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली होती. खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी तशी घोषणा केली होती.मात्र,परवानगी दिल्यानंतर अवघ्या 48 तासात पुन्हा प्रस्तावात त्रुटी काढून त्यांच्या पूर्ततेसाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

मांजरा धरणाचे 18 पैकी 12 दरवाजे उघडले

लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा आधार असलेल्या मांजरा धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले. काल रात्री झालेल्या पावसामुळे मांजरा नदीतून होणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. दोन दिवसापूर्वी मांजरा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते, मात्र आता 12 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मांजरा धरण निर्मितीपासून 12 दरवाजे उघडण्याची वेळ ही फार दुर्मिळ असते.

पुण्यात आज तृतीयपंथीयांच्या फॅशन शोचे आयोजन

पुण्यात आज तृतीयपंथीयांच्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. अर्धनारी नटेश्वर असं या फॅशन शोला नाव देण्यात आलं होत. पुणे आणि इतर शहरातील तृतीयपंथीय मॉडेल्सनी या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला. पुण्यातील सहकारनगर भागातील सातव सभागृहात हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये पुण्याबरोबरच इतर शहरांमधील तृतीयपंथीय मॉडेल्सही सहभागी झाले. तृतीयपंथीयांना समाजात सन्मानानं जगण्याची संधी मिळावी आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा हा फॅशन शो आयोजित करण्यामागील उद्देश आहे. त्याचबरोबर कोणाकाळात इतरांप्रमाणे तृतीयपंथीयांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून त्याकडे लक्ष वेधण्याचा या फॅशन शोच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. फोरफॉक्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने या फॅशन शोसाठी पुढाकार घेतला असून तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटनाही या फॅशन शोच्या आयोजनात सहभागी आहेत.

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट


 पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली. दरम्यान, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी भारतीय पंतप्रधानांचं स्वागत केलं आहे. 


उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत करुन आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, त्यांना भारताच्या पंतप्रधानांचं स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे. तसेच या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनीही कमला हॅरिस यांचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कमला हॅरिस संपूर्ण जगासाठी प्रेरणा आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचंही आमंत्रण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, जर त्या भारत दौऱ्यावर आल्या तर संपूर्ण देशाला खूप आनंद होईल. 


धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर जोर 


भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वास व्यक्त केलाय की, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या नेतृत्त्वात द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोहोचतील. बैठकी दरम्यान दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर जोर दिला. तसेच परस्पर आणि जागतिक हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी, भारतातील कोरोना संकटाच्या काळात कमला हॅरिस यांनी मोदींशी फोनवर चर्चा केली होती. हॅरिस यांनी भारताला अमेरिकेचा अत्यंत महत्वाचा भागीदार, अशी उपाधी दिली. 


अनिल देशमुख चौकशीत सहकार्य करत नाहीत, ईडीचा देशमुखांविरोधात कारवाईसाठी कोर्टात अर्ज


सक्त वसुली संचालनायानं सुरु केलेली चौकशी आणि बजावलेल्या समन्सला वाट्याण्याच्या अक्षता लावणार्‍या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत. अनिल देशमुख यांनी तपासयंत्रणेविरोधात पुकारलेल्या असहकाराच्या विरोधात ईडीनं मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात (किल्ला कोर्ट) धाव धेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर येत्या 28 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.


अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदावर असताना मुंबई पोलिसांना दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबइ मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनं याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल केला. सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआय आणि ईडी मार्फत या प्रकरणाचा तपास आणि चौकशी सुरु झाली. ईडीने वारंवार अनिल देशमुखांना चौकशीला बोलावलं मात्र ते चौकशीला सतत गैरहजर राहीले. 


चौकशीला हजर रहाण्यासाठी त्यांना तब्बल पाचवेळा समन्सही बजावले, त्याला देशमुख यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या. त्यामुळे अखेर अनिल देशमुख हजर रहात नाही अथवा चौकशीला सहकार्य करीत नसल्याचा आरोप करत ईडीनं आयपीसी कलम 174 अन्वये मुंबई दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करून देशमुखांविरोधात कारवाई करावी अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 29 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.


अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.