Breaking News LIVE : अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली

Breaking News LIVE Updates, 13 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Sep 2021 10:32 PM
अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली, ज्योती देवरे यांची जळगाव येथे बदली, ज्योती देवरे त्यांच्या ऑडिओ क्लिपमुळे आल्या होत्या चर्चेत

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 4, 5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. 

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 4, 5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. 

राज्यात आज 2740 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3233 रुग्णांची कोरोनावर मात, 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 2740 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3233 रुग्णांची कोरोनावर मात, 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद

कोयना धरणाचे दरवाजे आणखी वर उचलले, कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 5 फुट 3 इंचावर

कोयना धरणाचे दरवाजे आणखी वर उचलले, कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 5 फुट 3 इंचावर, कोयना धरणातून 50 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु

ICMR ला ड्रोनच्या माध्यमातून लस पुरवठा करण्याची परवानगी

ICMR ला ड्रोनच्या माध्यमातून लस पुरवठा करण्याची परवानगी, अंदमान निकोबार, मणिपूर आणि नागालँड या भागांमध्ये लसीच्या वाहतुकीसाठी ड्रोनला परवानगी, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ICMR ला विशेष परवानगी, तीन हजार फूट उंचीपर्यंत ड्रोनच्या माध्यमातून दुर्गम आणि वाहतुकीस कठीण भागांमध्ये लस वितरण

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 30 ते 40 कोटींच्या अनावश्यक खर्चाची सखोल चौकशी करण्याचे सहकार आयुक्ताचे निर्देश

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 30 ते 40 कोटींच्या अनावश्यक खर्चाची सखोल चौकशी करण्याचे सहकार आयुक्ताचे निर्देश, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील इमारत बांधकाम, मुख्य कार्यालय व शाखेमधील फर्निचर खरेदी, एटीएम व नोटा मोजण्याचे मशिन यावर आवश्यकता नसताना 30 ते 40 कोटींचा खर्च केला असल्याचा आक्षेप , राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी बँकेतील कारभारावर आक्षेप घेत सखोल चौकशीची केली होती मागणी

अमरावतीच्या तिवसा येथे जनावरांची अवैध वाहतूक, सात जनावरांचा गुदमरून मृत्यू

अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर जनावरांची अवैध वाहतूक होते, आज सकाळी तिवसा येथे कंटेंनर ट्रक मध्ये अतिशय निर्दयपणे ५३ जनावरे भरून असलेला ट्रक रोडवर दिसून आला. यात ट्रक नादुरुस्त असल्याने गुदमरून ७ जनावरांचा मृत्यू झाला असून ४६ जनावरांना जीवदान मिळाले आहे. तर तिवसा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे...

चंद्रपूर शहरातल्या महाकाली मंदिर परिसरातील चाकूहल्ला झालेल्या 17 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

चंद्रपूर शहरातल्या महाकाली मंदिर परिसरातील चाकूहल्ला झालेल्या 17 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू, मृत्यूनंतर नातेवाईक व परिसरातील नागरिक संतप्त, पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे हल्ला झाल्याचा आरोप

साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीने गुन्हा कबुल केला, मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती

साकीनाका बलात्कार प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्रकार परिषद घेत, आरोपीने गुन्हा कबुल केल्याची माहिती दिली आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. 

येत्या 24 तासांच्या आत 6 जिल्ह्यातील पोटनिवडणुकांची होणार घोषणा, 6 जिल्ह्यात होणार पोटनिवडणुक

येत्या 24 तासांच्या आत 6 जिल्ह्यातील पोटनिवडणुकांची होणार घोषणा, 6 जिल्ह्यात होणार पोटनिवडणुक, पालघर, नागपूर, वाशीम, धुळे नंदुरबार, अकोला मधील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीची होणार घोषणा, 6 जिल्हा परिषद आणि त्यांच्या पंचायत समितीमधील रिक्त जागांची पोट निवडणूक, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर जिल्हा परिषदांच्या 85 आणि पंचायत समित्यांच्या 144 जागांसाठी होणार पोटनिवडणुक

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचा निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचा निधन, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात सुरु होते उपचार

किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, हसन मुश्रीफांचा पलटवार

किरीट सोमय्या हे कुणीतरी सांगितलं म्हणून काहीही आरोप करत आहेत, त्यांना वास्तवाची काहीच माहिती नाही असा पलटवार राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे. दोन आठवड्यांमध्ये 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं मुश्रीफांनी सांगितलं.

उद्या ईडीकडे  मुश्रीफांच्या विरोधात अधिकृत तक्रार करुन पुरावे देणार: किरीट सोमय्या


शेल कंपन्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या मुलाने दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये मुश्रीफांनी 100 कोटी रुपये गुंतवले ते बेनामी असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केलाय. उद्या आपण मुश्रीफांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार असून पुरावे देणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

हसन मुश्रीफांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला; किरीट सोमय्यांचा आरोप

 


राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेल कंपन्यांच्या मार्फत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. 

कलाकार महासंघाचे कोल्हापुरात आंदोलन सुरु

नाटक, तमाशा यांच्यासह गणपती मध्ये बँड बेंजोला परवानगी द्यावी या मागणीसाठी कलाकार महासंघाचे आंदोलन सुरु आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघाचे आंदोलन सुरु असून आंदोलक हायवेवरच करणार गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत.

नाशिकमध्ये धरणांच्या पाणी पातळीत वाढ

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या समाधानकारक पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ, गंगापूर, दारणा, पालखेड धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू. गंगापूर धरण विसर्ग सकाळी 9 वाजता एकूण 2500 cusecs करण्यात आलाय. पालखेड  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने पालखेड धरणातून 800 क्यू सेक्स विसर्ग करण्यात आलाय.

पालघर जिल्ह्याच्या प्रमुख शहरासह वसई विरार महानगर पालिकेला पाणी प्रश्न मिटला


पालघर जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पाऊस सुरु असून सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण पूर्ण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांबरोबर वसई विरार महानगर पालिकेचा पाणी प्रश्न मिटला आहे. या धरणाचे पाचही दरवाजे 35 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून धामणी धरणातून 6549 क्यूसेक आणि कवडास धरणातून 89847 असा एकूण 12500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या धरणातून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी व  वसई विरार महानगर पालिकेला पाणी पुरवठा होतो

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा पर्यावरण पूरक बाप्पा,  लसीकरण व कोविड निर्मूलनाचा दिला संदेश

नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व डॉ. शालिनी इटनकर यांच्या अर्ना या निवासस्थानात पर्यावरण पूरक श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आलीय. सदर बाप्पाची मूर्ती ही डॉ. विपीन यांच्या पत्नी डॉ. शालिनी यांनी शाडूच्या माती पासून तयार केली असून याच मूर्तीची स्थापना त्यांनी आपल्या घरात केलीय. दरम्यान श्रींची ही मूर्ती पर्यावरण पूरक असून मखरात, मास्क, सॅनीटायजर, लसीकरण, डॉक्टरांचा वेशभूषा केलेला मूषक कोरोना लस देत असल्याचे दाखवण्यात आलंय. तर सर्वांनी लसीकरण करून घ्या व कोरोनाला हरवा, मास्क ,सॅनीटायजर चा वापर करा , मास्क नाही तर मोदक नाही , असा संदेश यातून देण्यात आलाय.

पार्श्वभूमी

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेले भूपेंद्र पटेल आहेत तरी कोण?
गुजरातच्या नवीन मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांसाठी नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांची नाव सर्वाधिक चर्चेत होती. मात्र नेहमीप्रमाणे भाजपने पुन्हा आश्चर्यचा धक्का देत  मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या हाती गुजरातची कमान दिली. भूपेंद्र पटेल संध्याकाळी 5.30 वाजता राज्यपालांना भेटायला जातील. दुसरीकडे, भूपेंद्र पटेल यांच्यासह 15 मंत्री उद्या शपथ घेऊ शकतात.


भूपेंद्र पटेल पाटीदार समाजातून येतात. विजय रुपाणी सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. यासह, भूपेंद्र पटेल दीर्घ काळापासून संघाशी संबंधित आहेत. पटेल समाजातही त्यांची चांगली पकड आहे. त्याचबरोबर 2017 च्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला होता. भूपेंद्र पटेल विधानसभा निवडणूक 1 लाख 17 हजार मतांनी जिंकले होते. भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभेचे आमदार आहेत. यापूर्वी भूपेंद्र पटेल अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे (AUDA) अध्यक्ष होते. भुपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.


खड्ड्यात गेलं राजकारण म्हणत वाहतूक विभागानेच भरले खड्डे
पावसाळा सुरू होताच शहरातील विविध महामार्गावरील खड्डे डोके वर काढतात. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षातील प्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात. ज्या दिवशी आंदोलन किंवा राजकीय नेत्यांच्या दौरा असेल त्या दिवशी संबंधित विभागाचे अधिकारी अथवा ठेकेदार खड्डे बुजवण्याचे आश्वासन देतात. मात्र, खड्ड्याचं साम्राज्य जैसे थे राहते. हेच वाहतूक पोलिसांना खटकलं म्हणूनच राजकारण गेलं खड्ड्यात म्हणत शहरातील विविध मार्गावरील खड्डे भरण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले आहे.


भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विकास महामंडळ एमएमआरडीए तसेच रस्त्या संदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र, त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष केल्याने आज रोजी सामाजिक बांधिलकी म्हणून वाहतूक पोलिसांनी भिवंडीत विविध मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे पोलीस अधिकारी मायने यांनी असेही सांगितले आहे की मुंबई नाशिक महामार्ग तसेच ठाणे ते भिवंडी, कशेळी ते अंजुर फाटा व मानकोली ते चिंचोटी-कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शिवाय वाहनांचे अपघात आणि नुकसान देखील या ठिकाणी होतात आणि त्याला सर्वस्वी जबाबदार नागरिक वाहतूक पोलिसांना जवाबदार ठरवतात. त्यामुळे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवत नसल्याने आज वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे. 


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा लढविण्याचा विचार सुरु, संजय राऊतांची माहिती
शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. उत्तर प्रदेशात 80 ते 90 , तर गोव्यात 20 जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार आहे, असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. यापूर्वी एनआयए वृत्तसंस्थेनं शिवसेना उत्तर प्रदेश निवडणुकीत 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती ट्वीटमार्फत दिली होती. परंतु, संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींमध्ये शिवसेना 80 ते 90 जागा लढवण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. 


संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, "गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा विचार सुरु आहे. तशी आमच्या पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी संघटना आहेत. या संघटनांनी सांगितलेलं आहे की, तुम्ही निवडणूक लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इतर काही लहान पक्ष आहेत, त्यांनादेखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे. गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे. त्याला कितपत यश येतं त्यासंदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही, पण त्या संदर्भात हालचाली सुरु आहेत. त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगलं स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्यांच्यामध्ये सहभागी होऊ शकेल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.