Breaking News LIVE : ट्रक आणि जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार तर दहाहून अधिक जखमी

Breaking News LIVE Updates, 12 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Sep 2021 10:16 PM
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र; उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र, पुढील 48 तासात उत्तर उडीशा, उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून प्रवास करत पुढे सरकेल. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. घाट माथ्यांवर काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागाकडून इम्पॅक्ट वाॅर्निंग जारी.  पूर येणे, सखल भागात पाणी साचणे, दरड कोसळणे, कच्च्या घरांची पडझड होणे, दृश्यमानता कमी होणे त्याचसोबत सखल भागात पाणी साचल्याने ट्रॅफिकला अडथळा देखील येण्याची शक्यता, जोरदार वाऱ्यामुळे पिकांना नुकसान होण्याचा अंदाज.  पुढील 3-4 तास रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, सातारा, आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता.

ट्रक आणि जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार तर दहाहून अधिक जण जखमी

ट्रक आणि जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार तर दहाहून अधिक जण जखमी. चिक्कबळापूर जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यातील मरिनायकनहळी गेटजवळ हा अपघात घडला.

अंबरनाथच्या पालेगाव भागात रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात

अंबरनाथच्या पालेगाव भागात रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू. मृत आणि जखमी अशा सर्वांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलंय.

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले, दरवाजे एक फुटावरून अडीच फुटांवर

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले, दरवाजे एक फुटावरून अडीच फुटांवर, कोयना महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने निर्णय,  कोयना धरणातून 23 हजार 700 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु, नदीपात्रालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा, आज दुपारी दोन वाजता उघडण्यात आले होते एक फुटाने दरवाजे

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता!
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता! 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीची शक्यता. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता. ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन.
गुजरातच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव समोर, भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब

गुजरातच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव समोर, भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब

काँग्रेस आमदार पी एन पाटील यांच्यासह मुलगा राजेश आणि मुलगी टीना यांच्यावर गुन्हा दाखल

काँग्रेस आमदार पी एन पाटील यांच्यासह मुलगा राजेश आणि मुलगी टीना यांच्यावर गुन्हा दाखल, आमदार यांची स्नुषा आदिती राजेश पाटील यांची कराडमध्ये तक्रार, आदिती यांच्या तक्रारीनंतर पी एन पाटील, राजेश आणि टीना यांच्याविरोधात गुन्हा दाखल, एक कोटी मागितले, शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार

पुण्यात प्रशिक्षणासाठी गेलेल्या नागपूरच्या 10 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुण्यात प्रशिक्षणासाठी गेलेले नागपूरचे 10 पोलीस कर्मचारी नागपूरला परतताच कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या 10 पैकी 9 कर्मचाऱ्यांच्या लसीचे दोन्ही डोस अनेक आठवड्यापूर्वी झालेले आहे. नागपुरात कोरोनाचा ग्राफ उतरत असताना बाहेरून नागपुरात परतणारे अनेक जण कोरोनाबाधित आढळत असल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्याची गरज आहे. 

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 16 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांच्यासह इतर 16 कलाकारांचाही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. याआधी प्रिया बेर्डे, विजय भाटकर, आनंद शिंदे यांच्यासह अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. 

प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर गौतम पाषाणकर यांच्यावर मारहाणीचाही आरोप करण्यात आला आहे. फ्लॅटसाठी दोन कोटी 40 लाख रुपये घेऊनसुद्धा फ्लॅट नावावर केला नाही, याप्रकरणी जाब विचारल्यानंतर कार्यालयात बोलावून मारहाण केली अशी फिर्याद तक्रारदारानं शिवाजीनगर पोलीस स्थानकात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौतम पाषाणकर यांच्यासह रिनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

राष्ट्रीय महिला आयोगाची साकीनाका दुर्घटनास्थळी भेट , पोलीस महासंचालकांनाही भेटणार


राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा याच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या एक टीमन साकीनाका दुर्घटनास्थळी भेट दिलीआहे. त्यानंतर ही टीम पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार असून राज्याच्या पोलीस महासंचालकांचीही भेट घेणार आहे.

राबोडी येथील खत्री इमारतीचे तीन स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू, लहान मुलाची प्रकृत्ती गंभीर

राबोडी येथील खत्री इमारतीचे तीन स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी राबोडी येथील  खत्री अपार्टमेंट नावाच्या इमारतीच्या सी विंगचे तीन स्लॅब कोसळून खाली पडले. त्यामध्ये तीन लोक जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केले असता दोन मयत झाले असून एकावर उपचार चालू आहेत. 

कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटाने उघडणार. दुपारी 2 वाजता कोयनेतून 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरण परिसरात पडत असलेल्या तुरळक पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला. 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या 103 टीएमसी पाणी साठा आहे. गेल्या 24 तासात 54 मिलीमिटर पावसाची नोंद तर महाबळेश्वर परिसरात 107 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. 

हिंगोलीत गाडी पुलाच्या खड्ड्यात पडून दोघेजण जागीच ठार

सेनगावकडून येलदरीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणीरी मोटारसायकल पुलाच्या खड्ड्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. सेनगाव येलदरी रस्त्याचे काम सुरू आहे आणि तिथल्या पुलाच्या कामासाठी निर्माण केलेल्या खड्ड्यामध्ये पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी  तात्काळ धाव घेतली आणि मृतदेह नजीकच्या शासकीय इस्पितळात पाठवला. काहीच दिवसांपूर्वी या खड्ड्यांमध्ये चार चाकी गेल्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता 

परभणीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या 4 जणांना अज्ञात वाहनानं चिरडलं

परभणी : मॉर्निंग वॉकला गेलेल्या 4 जणांना अज्ञात वाहनानं चिरडलं. 2 जणांचा मृत्यू-दोघं गंभीर जखमी झाले आहेत. मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील घटना. चौघांना चिरडून वाहन चालक फरार. मृतांमध्ये गावच्या पोलीस पाटलांचाही समावेश. पोलीस पाटील उत्तम लाडाने, आत्मराम लाडाने यांचा मृत्यू, तर नंदकिशोर लाडाने, राधेश्याम लाडाने गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

चंद्रपूरात दोन महिलांचा भूक आणि आजारानं मृत्यू

चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील रहिवासी झेलाबाई पोचू चौधरी (वय 73) आणि तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (वय 45) यांचा काल सायंकाळी भूक आणि आजारानं मृत्यू झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून या मायलेकी आजारानं ग्रस्थ होत्या. त्यांच्याकडून कुठलीही कामे होत नव्हती आणि पोटात अन्नही नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.  घटनेची माहिती ग्रा.प. कार्यालयात मिळताच सरपंच मोरेश्वर लोहे घटनास्थळी पोहोचून पोलीस प्रशासनाला माहिती दिली. ठाणेदार तुषार चव्हाण पोहोचले आणि मृतदेहाचा पंचनामा केला असता त्यांना संशयास्पद असं काहीही आढळून आलेले नाही. मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविले असून पुढील तपास कोठारी पोलीस स्टेशन हद्दीत सुरु आहे.

बुलढाण्यात जोरदार पाऊस, अनेक भागांत धुक्याची चादर

बुलढाणा : जिल्ह्यात रात्री अनेक भागात जोरदार पाऊस पडल्यानंतर आज सकाळपासून जिल्ह्यांतील अनेक भागांत धुक्याची दाट चादर पसरली आहे. धुक्यामुळं मात्र काही महामार्गांवर वाहतुकीचा खोळंबा झालाय. मुंबई-नागपूर महामार्गावर दाट धुक्यामुळं दृष्टिमानता कमी असल्यानं वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.

आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये नीटची परीक्षा

हिंगोली : आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये नीटची परीक्षा आहे. दुपारी दोन ते पाच या वेळेत दरम्यान ही परीक्षा असून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. तर वारंगा फाटा आणि जवाहरलाल नवोदय विद्यालय असे दोनच परीक्षा केंद्र असून या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

भाजपची आज महत्वाची बैठक, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार?

विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी अनेक नेत्यांनी लॉबिंग सुरु केली आहे. आज दुपारी दोन वाजता भाजपच्या निर्वाचित सदस्यांची एक महत्वाची बैठक आयोजित केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीन पटेल यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय.

Shiv Sena in UP Elections : शिवसेना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत 403 जागांवर निवडणूक लढवणार

Shiv Sena in UP Elections : 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांबाबत (UP Assembly Elections) उत्सुकता वाढणार आहे. AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी उत्तर प्रदेश निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेनंही उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुक 2021 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. अद्याप या निवडणूकीत शिवसेना युती करणार का? आणि  कोणासोबत युती करणार? हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. 

पार्श्वभूमी

UP Assembly Elections : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची एन्ट्री, 403 जागांवर लढवणार निवडणूक


2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांबाबत (UP Assembly Elections) उत्सुकता वाढणार आहे. AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी उत्तर प्रदेश निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेनंही उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुक 2021 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. अद्याप या निवडणूकीत शिवसेना युती करणार का? आणि  कोणासोबत युती करणार? हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. 


पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासून होणाऱ्या निवडणुकांपूर्वी शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे की, शिवसेना उत्तर प्रदेशातील सर्व 403 जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेचा हा निर्णय निवडणुकीत भाजपसाठी अडचणी वाढवू शकतो.


Gujarat Chief Minister : भाजपची आज महत्वाची बैठक, मुख्यमंत्रीपदासाठी 'हे' नाव आघाडीवर


 विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी अनेक नेत्यांनी लॉबिंग सुरु केली आहे. आज दुपारी दोन वाजता भाजपच्या निर्वाचित सदस्यांची एक महत्वाची बैठक आयोजित केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीन पटेल यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय.


कोण आहेत नितीन पटेल?
नितीन पटेल हे भाजपचे राज्यातील महत्वाचे नेते असून 2016 साली त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. गुजरात सरकारमध्ये ते 2001 साली अर्थमंत्री होते. नितीन पटेल आतापर्यंत सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. उत्तर गुजरातमधील असलेल्या नितीन पटेल हे 1990 साली पहिल्यांदा आमदार झाले होते. 


केंद्रीय मंत्र्यांचेही लॉबिंग
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय मंत्री मनसूख भाई मांडविया यांचं नावही चर्चेत असल्याची माहिती आहे. त्यांनी दिल्लीतील नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु केली असल्याच्या बातम्या आहेत. मनसूख मांडविया यांच्याकडे आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा चार्ज आहे. ते गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले असून गेल्या दोन दशकांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत.


गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा अवधी शिल्लक असल्याने विजय रुपाणी यांचा राजीनामा अनेक राजकीय पंडितांना आश्चर्यचकित करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय विजय रुपाणी राजीनाम्याचा निर्णय घेऊ शकणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे.  26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये  बहुमत मिळवले होते. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.