Breaking News LIVE : नांदेड येथील हिमायतनगर बसस्थानक परिसरात महाविद्यालयीन तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून दिवसाढवळ्या खुन, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Breaking News LIVE Updates, 11 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Sep 2021 04:27 PM
वर्षा शासकीय निवासस्थानी  शरद पवारांनी दिली भेट

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार  शरद पवार, त्यांच्या पत्नी  प्रतिभाताई, खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे यांनी भेट देऊन प्रतिष्ठापना केलेल्या श्रीगणेशाचे दर्शन घेतले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते उद्या विमानतळाचा दौरा करणार

श्रेयवादामुळे चर्चेत असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक उद्या दुपारी 12.30 चिपी विमानतळाला भेट देऊन पाहणी करणार. यावेळी पालकमंत्री उदय सामंत चिपी विमानतळाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेनं चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी सुरू केली असल्याची चर्चा आता राजकिय वर्तुळात सुरू झालीय.

लसीकरणात सोलापूर जिल्हा राज्यात 2 नंबर वर , सोळा लाख 97 हजार इतके विक्रमी लसीकरण

 पुणे नंतर सोलापूर जिल्हा राज्यात लसीकरणामध्ये दोन नंबर वर आला आहे.मुंबई , अहमदनगर आणि नाशिक हे अनुक्रमे 3 ,4 आणि 5 वर आले आहेत.सर्वाधिक लसीकरण करण्यात राज्यात सोलापूर जिल्हा हा दुसऱ्या नंबर असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. 

राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय

राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय आज झाला असून साखर कामगारांना 12 टक्के पगार वाढ मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं साखर कामगारांनी स्वागत केलंय.. कोल्हापुरातील बिद्री साखर कारखान्यावर शाहू साखर कामगार संघाच्या वतीने साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कामगारांनी फटाक्यांची आतषबाजी करुन शरद पवार आणि बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांचे भव्य फलक उभारुन त्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी केली. राज्यातील साखर कामगार गेल्या काही वर्षापासून या पगारवाढीच्या प्रतिक्षेत होते.

डॉ. उज्वला चक्रदेव यांची नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी  नियुक्ती, डॉ दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती

डॉ. उज्वला चक्रदेव यांची नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी  नियुक्ती, डॉ दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती

नांदेड येथील हिमायतनगर बसस्थानक परिसरात महाविद्यालयीन तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून दिवसाढवळ्या खुन, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद.

हिमायतनगर शहरातील बसस्थानक परीसरात आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान महाविद्यालयीन तरुणास धारदार शस्त्राने भोसकून खून झाल्याची घटना घडलीय. सदर खुनाचा संपूर्ण घटनाक्रम CCTV कॅमऱ्यात कैद झालाय. यश उत्तम मिराशे (वय 17 वर्ष) रा. कारला पी. असे खुन झालेल्याचे नाव असून या घटनेमुळे हिमायतनगर येथे दहशतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे ग्रामिण भागातुन शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या पालकांतुन चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि मृताच्या नातेवाइकांना धीर दिला.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

समृद्धी महामार्गाच्या कार्यालयाला आग, 55 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक

सिंदखेडराजा येथील मुंबई नागपूर महामार्गावर समृद्धी महामार्गाच्या कार्यालयाला सकाळच्या सुमारास आग लागून 55 लाख रुपयांचे साहित्य व समृद्धी महामार्गाचे कार्यालयाचे नुकसान झाले आहेत.  

Breaking News LIVE : मनोहर भोसलेला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसलेला झाली आहे अटक

Breaking News LIVE : मनोहर भोसलेला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसलेला झाली आहे अटक 


https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-september-11-2021-maharashtra-political-news-ganesh-chaturth-1002935

सत्ताधारी भाजपचा नगरसेवकाचेच शोले स्टाईल आंदोलन

सत्ताधारी भाजपचा नगरसेवकाचेच शोले स्टाईल आंदोलन


शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने चढला पाण्याच्या टाकीवर 


सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकावरच आंदोलनाची वेळ 


मनपा आयुक्तांच्याविरोधात नगरसेवक संतोष भोसले यांचे आंदोलन


पोलीस आयुक्तालयासमोरील टाकीवर चढला नगरसेवक

साकीनाका अत्याचार पीडित महिलेची मृत्युशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

Breaking News LIVE : साकीनाका अत्याचार पीडित महिलेची मृत्युशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू


https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-september-11-2021-maharashtra-political-news-ganesh-chaturth-1002935

काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षसह 200 ते 250 जणांविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल, पदग्रहण सोहळ्यास गर्दी जमा जमविल्याचे प्रकरण

 सोलापूर काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्याला गर्दी जमवल्या प्रकरणी अडीचशे ते तीनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  9 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास सोलापूर शहर-जिल्हा काँग्रेस कार्यालयात नूतन जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाय जिल्ह्यातील सर्व स्थानिक नेत्यांची देखील मोठया प्रमाणत उपस्थिती होती. सोलपूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू आहेत. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवीत मोठ्या प्रमाणात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्यात नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह एकूण 12 पदाधिकारी आणि 200 ते 250 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.  

‘येड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’, पडळकरांची मंत्री वडेट्टीवारांवर टीका


विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असणाऱ्या ‘महाज्योती’ संस्थेला  ‘येड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकलीय अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर केलीय. काल कुठलीही पुर्वसुचना न देता 13 सप्टेंबरला अचानकपणे UPSC चाळणी परीक्षेचे आयोजन केल्याच्या मुद्यावरून टीका त्यानी ही टीका केली. चाळणी परिक्षा विद्यार्थ्यांशी चर्चा करून नियोजीत केली नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही असा पडळकर यांनी  इशारा दिलाय.

बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील रंग रसायन या कंपनीला लागलेली आग आटोक्यात

बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर 9/5 मधील रंग रसायन या कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली असून कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक ही आग लागून मोठे स्फोट झाले.आजूबाजूचा परिसरामध्ये या स्फोटांचे आवाज आले गेल्या आठवडाभरात मध्ये या औद्योगिक कार्यक्षेत्रातील दुसरी दुर्घटना असून संबंधित प्रशासनाच दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे ही आग लागली तेव्हा सुदैवाने कारखान्यात कोणतेही कामगार नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली सध्या आग विझवण्यात आली असून कुलिंग च काम सुरू आहे तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत

हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा धक्का

हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास काही गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. जिल्ह्यातील पिंपळदरी, कुरुंदा, बोल्डा, पांगराशिंदे यासह अन्य अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.या भूकंपातबाबत प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

पार्श्वभूमी

Corona Vaccination : हिमाचल पाठोपाठ गोव्यातही 100 टक्के लसीकरण, देशात 73 कोटी डोस वितरित
देशातील कोरोनाचे संकट अद्याप कमी झालं नसलं तरी कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने मात्र गती घेतल्याचं दिसून येतंय. आपल्या राज्यातील 100 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याची कामगिरी गोव्याने केली आहे. अशा प्रकारची कामगिरी करणारे ते हिमाचल प्रदेश नंतर देशातील दुसरं राज्य आहे. देशामध्ये लसीकरणाच्या कार्यक्रमाने आता 73 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 


गोव्यामध्ये सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व आरोग्य सेवकांचे आणि नागरिकांचे आभार मानले आहेत. राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या अविरतपणे केलेल्या कष्टाचे हे फळ असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गोव्याच्या या कामगिरीची स्तुती केली आहे. 


Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी  4,154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात
 राज्यात आज  4,154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 524  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 91 हजार 179  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे. 


राज्यात आज 44 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 49 हजार 812 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 213 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 57,02,628 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,91,179 (11.65 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,96,579 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,952  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


सलग 49 वर्षांपासून डहाणू तालुक्यातील उर्से गावात 'एक गाव एक गणपती'!
डहाणू तालुक्यातील कुणबी आणि आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेल्या डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य 'उर्से' गाव. ह्या गावाने 'एक गांव एक उत्सवाच्या' माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत किंवा गल्लोगल्ली. जिथं-तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. त्यात आता कोरोनाचं सावट. तरी या कोरोनाच्या सावटाखाली पालघर जिल्ह्यात घरोघरी दीड, अडीच आणि पाच दिवसांचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच, सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना झाली. मात्र, एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचितचं ठिकाणी दिसून येते. अशीच एक गाव एक गणपतीची संकल्पना पालघर जिल्ह्यातल्या एका गावानं गेल्या 49 वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.