Breaking News LIVE Updates : पोलीस बदल्यांमध्ये मध्यस्ती करत असल्याच्या आरोपावरुन एकाला अटक, सीबीआयची कारवाई
Breaking News LIVE Updates, 31 October 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
संतोष जगताप या नावाच्या व्यक्तीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या बदली प्रकरणाता मध्यस्ती करत असल्याचा आरोप संतोष जगतापवर ठेवण्यात आला असून त्याची चार दिवसांची सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आपल्या घरावर पाळत ठेवली जातेय असा आरोप समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केला आहे.
मिरजेत शहर युवा सेनेच्यावतीने इंधन दरवाढीचा सायकल, बैलगाडी आणि पायी रॅली काढून तीव्र निषेध करण्यात आला. गांधी चौकातुन मिरज मार्केट पर्यत ही रॅली काढण्यात आली.
नवी मुंबई - वाशी येथे एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या, आर्थिक नैराश्यातून उचललं पाऊल . आईसह मुलगा आणि मुलीचा समावेश, परवा रात्री तिघांनी उंदीर मारायचे औषध पिवून आत्महत्या करण्याचा केला होता प्रयत्न ,
अवस्थ वाटू लागल्याने महानगर पालिका रूग्णालयात केले होते भर्ती,
मात्र काल सकाळी एकाचा आणि रात्री दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर
काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी निवडणूक
29 नोव्हेंबरला मतदान, त्याच दिवशी मतमोजणी
16 नोव्हेंबर अर्ज भरण्याची अंतिम मुदत
काँग्रेस या जागेसाठी विधानपरिषदेवर कुणाला पाठवणार?
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांना कोरोनाची लागण, होम क्वारंटाईन असल्याची दिली माहिती, संपर्कात आलेल्यांना कोविड टेस्ट करण्याचं आवाहन
ज्येष्ठ संगीतकार, व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांचं निधन झालं आहे. प्रभाकर जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन आता मूक झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. व्हायोलिनला गायला लावणारा, शब्दांपलिकडे जाऊन त्यातून आर्त आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण गमावला आहे. गदिमांच्या गीतरामायणातील अनेक प्रसंग जोग यांनी आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींमधून जिवंत केले. त्यांच्या व्हायोलिनचे सूर आजही अनेकांच्या मनात रुंजी घालतात. संगीतकार सुधीर फडके यांचे सूर आणि त्यांना व्हायोलिनद्वारे साथसंगत करणारे प्रभाकर जोग अशी अनोखी पर्वणी कित्येक पिढ्यांसाठी राहिली आहे. संगीत क्षेत्रातील सच्चा साधक कसा असावा याचे प्रभाकर जोग आदर्श होते. यापुढे संगीत क्षेत्राला त्यांचे गाणारे व्हायोलिन आणि त्यांचे मार्गदर्शन यांची उणीव भासत राहील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
साताऱ्यातील शहराच्या मोरे कॉलनीत धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीसाठी घराला रोषणाई करताना संपूर्ण कुटुंबाला विजेचा धक्का. सुनील पवार यांचा मृत्यू. पत्नी आणि दोन लगान मुलं गंभीर जखमी.
मी पुन्हा येईन असं म्हटलं की लोक फार हसतात. मी आता ह्या वाक्याला रिप्लेसमेंट काय आहे शोधतोय, मात्र अजून तो शब्द मिळत नाही, म्हणून मी सगळ्यांना सांगतोय मी पुन्हा येईन. असं म्हणत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
पार्श्वभूमी
राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष लीलाधर हेगडे यांचं निधन
राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष तसंच स्वातंत्र्य शाहीर लीलाधर हेगडे यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. स्वातंत्र्य चळवळ, साने गुरुजींचा पंढरपूर सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्र सेवा दलाचं कलापथक यात त्यांचं मोठं योगदान होतं.
दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थ्यांना 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
एसटी कर्मचारी आक्रमक , सांगोला एसटी डेपोला ठोकले टाळे
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठीचे आंदोलन आता अधिक आक्रमक होत असून आज सांगोला एसटी कर्मचाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत आज डेपोला टाळे ठोकले आहे . राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उभी फूट पडल्याचे समोर येत असून कर्मचारी संघटनांनी सरकारसोबत केलेली बैठक कामगारांना मान्य नसल्याने अनेक आगारातील कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या तोंडावर काम बंद ठेवले आहे .
फटाके फोडताना नऊ वर्षाच्या मुलानं डोळा गमावला
पालकांनो, मुलांच्या हातात फटाके देण्यापूर्वी विचार करा. फटाके फोडताना नऊ वर्षाच्या मुलानं डोळा गमावला. हिंगोलीच्या गोजेगावमध्ये धक्कादायक घटना घडलीय, एका नऊ वर्षाच्या मुलाने फटाके फोडताना आपला डोळा गमावला.
लासलगावमध्ये एसटी चालकाचा मृत्यू
लासलगाव बसस्थानकासमोरील विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर एसटीला कंटेनरने कट मारल्याने एसटी बसची पाहणी करण्यासाठी खाली उतरलेल्या चालकाला कंटेनरने धडक देत ओढून नेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संदीप निकम असे मृत चालकाचे नाव असून या अपघातानंतर कंटेनरचालक फरार झालाय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -