Breaking News LIVE Updates : राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष लीलाधर हेगडे यांचं निधन
Breaking News LIVE Updates, 29 October 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष तसंच स्वातंत्र्य शाहीर लीलाधर हेगडे यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. स्वातंत्र्य चळवळ, साने गुरुजींचा पंढरपूर सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्र सेवा दलाचं कलापथक यात त्यांचं मोठं योगदान होतं.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
तहसील कार्यालय आणि बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून शासकीय दस्तऐवज हवे असल्यास कोरोना लशीची दोन्ही डोस घेतलेले प्रणाणपत्र दाखवणे बंधणकारक असणार आहे. राधाबिनोद शर्मा यांनी तहसील कार्यालयाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या व्यक्तीकडे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नसेल त्याला शासकीय कागद येऊ नये, असेही सांगण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठीचे आंदोलन आता अधिक आक्रमक होत असून आज सांगोला एसटी कर्मचाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत आज डेपोला टाळे ठोकले आहे . राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उभी फूट पडल्याचे समोर येत असून कर्मचारी संघटनांनी सरकारसोबत केलेली बैठक कामगारांना मान्य नसल्याने अनेक आगारातील कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या तोंडावर काम बंद ठेवले आहे . आज प्रशासनाचा विरोध डावलत सांगोला आगारातील कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत सांगोला आगाराला कुलूप घालून आपला निषेध व्यक्त केला . एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेण्याची त्यांची मागणी असून आता हे बंडाचे लोन राज्यभर जोरदार पसरू लागले आहे . सोलापूर जिल्ह्यातील अनेक आगारातील लालपरीच्या चाकांना कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ब्रेक लागला आहे . आता या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे भाजप उभी राहिल्याने आता या प्रश्न राजकीय रंग चढू लागला आहे .
लासलगाव बसस्थानकासमोरील विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर एसटीला कंटेनरने कट मारल्याने एसटी बसची पाहणी करण्यासाठी खाली उतरलेल्या चालकाला कंटेनरने धडक देत ओढून नेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे संदीप निकम असे मृत चालकाचे नाव असून या अपघातानंतर कंटेनरचालक फरार झालाय. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना आज सकाळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ आणि लासलगाव बस आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके व कर्मचारी यांच्यात चार्चाहून न्यायालयाचा आदेश असल्याने एसटी बस सेवा सुरु करावी लागेल, असा निर्णय झाल्यानंतर नाशिक साठी MH 14 ,BE 3641 ही एसटी बस लासलगाव आगारातून बस स्थानकावर घेऊन येत असताना विंचूर प्रकाशा राज्यमार्गावर बसस्थानकासमोर MH 43, Y 7463 या या कंटेनरने कट मारल्याने चालक संदीप निकम एसटी बस खाली उतरून पाहणी करत असताना कंटेनर चालकाने कंटेनर मागे घेऊन पळण्याच्या प्रयत्नात एसटी बस चालक संदीप निकम यांनाच धडक देत शंभर ते दीडशे मीटर कंटेनर खाली ओढत नेल्याने चालक संदीप निकम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी कंटेनर वरील नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर हा गुंजाळ पेट्रोल पंपासमोरील योगेश ऑटोमोबाईल्स आणि लतीफ स्प्रे पेंटिंग या दुकानात घुसल्यामुळे या दोन्ही दुकानांचे नुकसान होत एक दुचाकीचे ही नुकसान झाल्याने कंटेनर चालक कंटेनर सोडून फरार झाला असून या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून कंटेनर चालकाचा तपास पोलीस करत आहे
पुणे-मुंबई लोहमार्गावरील लोणावळा हद्दीत आज ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळं पुणे-लोणावळा लोकलमध्ये बदल करण्यात आलाय. ही लोकल पुणे-तळेगाव स्टेशन दरम्यानच धावणार आहे. त्यात ही आज ही संख्या कमी करण्यात आलेली आहे. शिवाय डेक्कन एक्सप्रेस ही रेल्वे आज रद्द करण्यात आलीये. तांत्रिक दुरुस्तीसाठी लोहमार्ग प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
नवाब मलिक यांच्याविरोधात मोहित भारतीयांची पोलिसांमध्ये तक्रार
कुटुंबाला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा मोहित भारतीय यांचा आरोप
सांताक्रुज पोलिस ठाण्यात मोहित भारतीय यांची तक्रार
पालकांनो, मुलांच्या हातात फटाके देण्यापूर्वी विचार करा. फटाके फोडताना नऊ वर्षाच्या मुलानं डोळा गमावला. हिंगोलीच्या गोजेगावमध्ये धक्कादायक घटना घडलीय, एका नऊ वर्षाच्या मुलाने फटाके फोडताना आपला डोळा गमावला.
सरकारी तेल कंपन्याच्या वतीनं आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज डिझेलच्या दरांमध्ये 33 ते 37 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या दरांत 31 ते 44 पैशांची वाढ झाली आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलनं कधीच शंभरी ओलांडली आहे, तर पेट्रोलपाठोपाठ डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या वाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे...सविस्तर वाचा
पार्श्वभूमी
एनसीबीच्या दक्षता पथकाकडून हैनिक बाफना यांची चौकशी
समीर वानखेंडेवर झालेल्या आरोपांनंतर एनसीबीच्या दक्षता पथकानं हैनिक बाफना यांना आज चौकशीसाठी बोलावलं आहे. पंच प्रभाकर साईल यांनी गौप्यस्फोट करताना वादग्रस्त पंच किरण गोसावी यांचा निकटवर्तीय असलेल्या सॅम डिसुझा यांचं नाव घेतलं होतं. आणि त्यांनी शाहरुखच्या मॅनेजरकडे 25 कोटी रुपयांच्या डीलसंदर्भात बोलणी केल्याचा दावा केला होता. पण आपण सॅम डिसुझा नसून हैनिक बाफना असल्याचा दावा पालघरच्या या व्यक्तीनं केला आहे. आणि प्रभाकर साईल यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केलीय. या पार्श्वभूमीवर हैनिक बाफना यांना एनसीबीच्या पथकानं चौकशीला बोलावल्यामुळे त्यात काय माहिती पुढे येते हे महत्वाचं ठरणार आहे.
ड्रग प्रकरण हे भाजपचं षडयंत्र : नवाब मलिक
क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज भाजपवर निशाणा साधला. ड्रग प्रकरण हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत आणि विधिमंडळ अधिवेशनात भाजपचं पितळ उघडं पाडू, असा इशारा नवाब मलिक यांनी दिलाय.
बेस्ट आणि मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा
बेस्ट आणि मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार असून तशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बोनसची मागणी केली होती. त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली होती.
बुलडाणा अर्बन बँकेच्या प्रमुख संचालकाची धर्माबाद येथे आयकर विभागाकडून झाडाझडती
बुलडाणा अर्बन बँकेच्या प्रमुख संचालकाची धर्माबाद येथे आयकर विभागाकडून झाडाझडती. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असणाऱ्या व्यापारी सुबोध काकानी यांच्या घर व कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी आयकर विभागाकडून सुरू.
लालपरी अखेर धावली! एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, शासनाकडून मागण्या मान्य
सामान्य माणसांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारनं मानल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -