Breaking News LIVE Updates :मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त
Breaking News LIVE Updates, 29 October 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त झाले आहे राज ठाकरेंसह त्यांच्या आई आणि बहिणीची देखील कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. या प्रमुख मागणीसाठी इगतपुरी आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी इगतपुरी आगारात उपोषण केले राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या काल उशिरा मान्य केल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आज इगतपुरी आगारातील एस.टी.ची चाके फिरलीच नाहीत त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.
अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या सुटकेसाठी सत्र न्यायालयात पोहोचली आहे. जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात गेली आहे.
बेस्ट आणि मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार असून तशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बोनसची मागणी केली होती. त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली होती.
बुलडाणा अर्बन बँकेच्या प्रमुख संचालकाची धर्माबाद येथे आयकर विभागाकडून झाडाझडती. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असणाऱ्या व्यापारी सुबोध काकानी यांच्या घर व कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी आयकर विभागाकडून सुरू.
समीर वानखेंडेवर झालेल्या आरोपांनंतर एनसीबीच्या दक्षता पथकानं हैनिक बाफना यांना आज चौकशीसाठी बोलावलं आहे. पंच प्रभाकर साईल यांनी गौप्यस्फोट करताना वादग्रस्त पंच किरण गोसावी यांचा निकटवर्तीय असलेल्या सॅम डिसुझा यांचं नाव घेतलं होतं. आणि त्यांनी शाहरुखच्या मॅनेजरकडे 25 कोटी रुपयांच्या डीलसंदर्भात बोलणी केल्याचा दावा केला होता. पण आपण सॅम डिसुझा नसून हैनिक बाफना असल्याचा दावा पालघरच्या या व्यक्तीनं केला आहे. आणि प्रभाकर साईल यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केलीय. या पार्श्वभूमीवर हैनिक बाफना यांना एनसीबीच्या पथकानं चौकशीला बोलावल्यामुळे त्यात काय माहिती पुढे येते हे महत्वाचं ठरणार आहे.
क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज भाजपवर निशाणा साधला. ड्रग प्रकरण हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत आणि विधिमंडळ अधिवेशनात भाजपचं पितळ उघडं पाडू, असा इशारा नवाब मलिक यांनी दिलाय.
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील जिल्हा मध्यवर्ती बँक चोरट्याने फोडली, 7 लाखांची रोकड लंपास
सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा आंदोलन
कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही
कृती समिती शासनासोबत मिळून डील करते
आम्हाला शासनात विलगिकरन करावे ही प्रमुख मागणी
अहमदनगर : शेवगाव तालुक्यात एसटी चालकाची आत्महत्या, शेवगाव बस आगारात एसटीला गळफास घेऊन केली आत्महत्या, दिलीप काकडे असे आत्महत्त्या केलेल्या एसटी चालकाचे नाव, पोलिस घटनास्थळी दाखल
एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची धग पुन्हा वाढली...
शेवगावमधील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पुन्हा आंदोलन सुरू
कोल्हापुरातील अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी. केवळ पन्नास टक्के वाहतूक
सामान्य माणसांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारनं मानल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
पार्श्वभूमी
मी आर्यन खानसाठी लढत नव्हतो- नवाब मलिक
मुंबई ड्रग्जप्रकरणी अटक झालेल्या आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी आर्यन खानसाठी लढत नव्हतो तर, अनेकांना फसवले गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.
किरण गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी
किरण गोसावी विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा आधी नोंद होताच. आता आणखी दोन गुन्हे नोंद करण्यात आले. त्याला न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
* ईन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट 66 D अंतर्गत एक गुन्हा नोंद करण्यात आलाय.
* त्याचबरोबर बनावट कागदपत्रे वापरुन बॅकांचे व्यवहार करण्याचा गुन्हा नोंद आहे
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
जामीन देण्यासोबतच उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटीं आणि नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. अटींनुसार, उच्च न्यायालयानं आर्यन खानला इतर कोणत्याही आरोपीसोबत संपर्क साधता येणार नाही. याव्यतिरिक्त स्पेशल कोर्टाच्या कारवाईला कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण होतील, असं काहीही आर्यन खाननं करु नये. तसेच जामीन अर्ज मंजूर करताना उच्च न्यायालयानं आर्यन खानला आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
शाहरुखच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. शाहरुख खानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमा झाली होती. शाहरुखच्या फॅन्सनी त्यांच्या घराबाहेर येत आनंद साजरा केला. एएनआयनं जारी केलेल्या व्हिडीओनुसार, शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम आनंदी असून तो घराबाहेर जमलेल्या लोकांना अभिवादन करत होता.
सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अंडर ग्रॅज्युएट्स (NEET-UG) 2021 साठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली ज्याने एनटीएला निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.
अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीकडून छापा
अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीकडून छापा. जगदीश कदम हे पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स या खाजगी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्याचबरोबर जलसंपदा खात्यांमधील काही कंत्राटांचाही त्यांच्याशी संबंध आहे. पुण्यातील सिंध कॉलनीतील घरी ईडीने छापा टाकून कारवाई सुरु केलीय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -