Breaking News LIVE Updates : समीर वानखेडे भाजपचे पोपट आहेत का? नवाब मलिकांचा सवाल
Breaking News LIVE Updates, 28 October 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत का? असाही सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.
मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई ड्रग्जप्रकरणी अटक झालेल्या आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी आर्यन खानसाठी लढत नव्हतो तर, अनेकांना फसवले गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वसई-विरार महापालिकेतील तीन विद्यमान नगरसेवकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे. हे तीनही नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे असून त्यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
किरण गोसावी विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा आधी नोंद होताच. आता आणखी दोन गुन्हे नोंद करण्यात आले. त्याला न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
* ईन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट 66 D अंतर्गत एक गुन्हा नोंद करण्यात आलाय.
* त्याचबरोबर बनावट कागदपत्रे वापरुन बॅकांचे व्यवहार करण्याचा गुन्हा नोंद आहे
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
'फोन टॅपिंगचा गोपनीय अहवाल फडणवीस नाही तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिकांनी उघड केला'
रश्मी शुक्ला यांच्यावतीनं ॲड. महेश जेठमलानी यांचा दावा
रश्मी शुक्ला यांच्याविरोधीत सुरू असलेली चौकशी एकतर्फी आणि राजकीय हेतूनं प्रेरीत असल्याचा दावा
रश्मी शुक्ला यांनी एसआयटी सोडल्यानंतर तिथून कुठलाही कागद, अहवाल अथवा पेन ड्राईव्ह सोबत नेलेला नाही
रश्मी शुक्ला यांच्यावतीनं युक्तिवाद संपला
मुंबई पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांची हायकोर्टात याचिका
तब्बल 12 वर्षानंतर पंढरपूर मध्ये कार्तिकीचा प्रसिद्ध घोडे बाजार भरण्याची शक्यता, देशभरातील अनेक घोडे व्यापारी घोड्यांसह पंढरपूरमध्ये दाखल
हिंगोली बस स्थानकात शुकशुकाट, एकही बस आगारातून बाहेर गेली नाही, मागण्या मान्य झाल्याशिवाय बस सुरू होणार नाही, कर्मचाऱ्यांचा इशारा
दिवाळीसारखा आनंदाचा क्षण येत आहे पण हा आनंद शेतकरी राजाच्या नशिबात दिसत नाही. यावर्षी पीकपद्धती जोमात होती शेतकरी आनंदाच्या वातावरणात होता पण अस असतानाच त्यानंतर अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले मालाची टक्केवारी 100% यावरून तीस ते चाळीस टक्क्यांवर येऊन ठेपली. एवढ प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं या अति पावसामुळे झालं. असंच धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील शेतकरी श्री बहादूरसिंग जोरसिंग पवार व मुलगा धनसिंग पवार यांनी आपल्या शेतात नाविन्याची कास धरत पारंपरिक कपाशी पिकापेक्षा काही वेगळं करू या महत्त्वाकांक्षेने तैवान जातीच्या पपईची 2000 रोपांची लागवड केली.पण सततच्या अतिपावसामुळे पपई पिकाला याचा मोठा फटका बसला. अति पावसामुळे फळधारणा कमी झाली. पिकाची सर्व पाने गळून गेल्यामुळे लागलेली फळ उन्हाच्या चटक्याने खराब झाले. प्रचंड प्रमाणात येणारे उत्पन्न अक्षरशा शून्य टक्क्यांवर येऊन ठेपले. वर्षभराची कमाई यामुळे या शेतकऱ्याची वाया गेली. या पिकासाठी 1 लाख रुपये खर्च केले पण ज्यावेळी मालाची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे व्यापार्याला बोलावून चेरी साठी पपई विकण्याचा निर्णय घेतला यावेळी अक्षरशः व्यापाऱ्याने सर्व पपईचे फक्त 2 हजार रुपये घडतील असे सांगत या शेतकऱ्यांची थट्टा केली. या अस्मानी-सुलतानी संकटामुळे या शेतकऱ्याने संपूर्ण पपई पिकावर रोटावेटर फिरवून सर्व पीक जमीनदोस्त केले. शासनाने अतिपावसाने नुकसान झाल्यामुळे कोणतेही पंचनामे न केल्यामुळे शेतकऱ्याला अजून मदत मिळालेली नाही. तरी बहादूरसिंग पवार व धनसिंग पवार यांनी कपाशी व फळ लागवड पपई याची नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून लवकरात लवकर मिळावी अशी विनंती शासनाला केली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकार लवकर मदत जाहीर करेल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अंडर ग्रॅज्युएट्स (NEET-UG) 2021 साठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली.
सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली ज्याने एनटीएला निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.
#BREAKING महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोना संसर्ग, वर्षभरात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीकडून छापा. जगदीश कदम हे पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स या खाजगी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्याचबरोबर जलसंपदा खात्यांमधील काही कंत्राटांचाही त्यांच्याशी संबंध आहे. पुण्यातील सिंध कॉलनीतील घरी ईडीने छापा टाकून कारवाई सुरु केलीय.
बुलढाणा अर्बन मुख्य शाखेत आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. अशोक चव्हाण यांच्या चार साखर कारखान्याला बुलढाणा अर्बन ने कर्ज दिले आहे. अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील चार साखर कारखाण्यासंदर्भातच फक्त ही चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाची या कारखान्यांना दिलेल्या कर्जासंबंधी ही चौकशी असल्याची माहिती बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राध्यशाम चांडक यांनी एबीपी माझा ला एक्सकलुसिव्ह दिली आहे.
पार्श्वभूमी
Maratha Reservation : ...मग आम्ही बांगड्या घालून बसलोय काय? छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक
मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) भाजप खासदार संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. काल सोलापुरात संभाजीराजेंची जनसंवाद यात्रा होती. त्यावेळी संभाजीराजेंना मॅनेज केलं की विषय संपला असं म्हणणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. तर, महाधिवक्ता कुंभकोणी यांनाही त्यांनी सुनावलंय. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आमच्या इतक्या सोप्या मागण्या आहेत, ज्या पूर्ण केल्या जात नाहीयेत मग आम्ही बांगड्या घालून बसलोय काय? संभाजीराजेंना मॅनेज केलं की विषय संपला असं काही जणांना वाटत असेल पण माझा जन्म छत्रपती घराण्यात झालाय, मॅनेज शब्द आमच्या जवळपास ही नाही, असंही संभाजीराजे म्हणाले. खासदार संभाजीराजे म्हणाले की, आम्ही मूक आंदोलन केलं, शांतपणे चर्चा केली पण तुम्हाला काही फरक पडत नाही, आता संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत. यापुढे आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील आता भेटणार नाही, आमचे समन्वयकही भेटणार नाहीत.
Buldhana Urban : बुलडाणा अर्बनमधील विशेष आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून रात्रभर चौकशी
आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली पतसंस्था म्हणजे बुलडाणा अर्बन. बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेत काल सकाळपासून एक 11 जणांचं आयकर विभागाचं पथक पतसंस्थेत दाखल झालं आहे. या पतसंस्थेमार्फत झालेल्या काही विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालेलं आहे. रात्रभर हे पथक बुलढाणा अर्बनच्या मुख्य कार्यालयात विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहे. अजूनही हे पथक चौकशी करत आहे. दरम्यान बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही आत जाता येत नाही. प्रसारमध्यामांना कुठलीही माहिती या पथकाकडून किंवा बुलढाणा अर्बनकडून दिली जात नाहीये. बुलढाणा अर्बनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाच्या विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करणारे हे पथक आहे.
नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मान्यता
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला खर्च वित्त समितीची (ईपीसी) मान्यता मिळाली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता 2,117 कोटी रुपयांचे हे काम प्रत्यक्षात सुरू होईल. आठ वर्षांचा कालावधी काम पूर्ण करण्यासाठी डेडलाइन असून या प्रकल्पांतर्गत 92 एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, 500 किमी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे जाळे, पंपिंग स्टेशन आणि सामुदायिक शौचालये बांधण्यात येणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -