Breaking News LIVE Updates : एनसीबी कारवायांबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार - नवाब मलिक

Breaking News LIVE Updates, 26 October 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 26 Oct 2021 06:54 PM
सोलापुरातील आग आटोक्यात, दोषींवर कारवाई करणार: पालिका आयुक्त

साडेतीन तासानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे.इमारतीमध्ये फायर सिस्टीम होती मात्र मागच्या दहा वर्षात त्याला रिन्यू करण्यात आलं नाही. तसेच या इमारतीचे फायर ऑडिट देखील झालेले नाही. इमारतीच्या बेसमेंटचा वापर पार्किंगसाठी करण्याऐवजी त्या ठिकाणी साहित्यदेखील स्टोअर ठेवण्यात आले होते. हे सर्व कारण पाहता दोषींवर ती कारवाई करण्यात येईल असं पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी म्हटलंय.  आग विजवण्यासाठी जवळपास 40 पाण्याचे बंब, तीन फोमचे बॅरल वापरण्यात आले. 

एनसीबी कारवायांबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार - नवाब मलिक

मुंबई पोलिसांकडून या सर्व प्रकरणाची चौकशी, खंडणी वसूली प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे. योग्य ती कारवाई करण्याचं गृहमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. पंच प्रभाकर साईल यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. एनसीबी कारवायांबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहेत - नवाब मलिक

सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील इमारतीत भीषण आग

सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील इमारतीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सेवन हेवन या इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागली असून  संपूर्ण परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं आहे. 

सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील इमारतीत भीषण आग

सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील इमारतीत भीषण आग लागली आहे. सेवन हेवन या इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या  दाखल झाल्या आहे. संपूर्ण  परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लो

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणातमनिष राजगरिया यांना पहिला जामीन मंजूर

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात पहिला जामीन मंजुर झाला असून मनिष राजगरिया यांना जामीन मिळाला आहे. 

मंत्रालयातील इंटरनेट सेवा तीन तासांपासून ठप्प

मंत्रालयातील इंटरनेट सेवा तीन तासांपासून ठप्प आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाल्याचं दिसून येतंय. ही सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासह दिवाळी बोनस जाहीर

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना पाच हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना दोन हजार 500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (State transport minister Anil Parab) यांनी केली. या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे 93 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा मात्र नोव्हेंबरच्या एक तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.  महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे अनिल परब यांनी यावेळी सांगितले. एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परब यांनी आभार मानले. 

...तर आर्यन खानची दिवाळीही तुरुंगातच!

आर्यनच्या वकिलांसमोर 30 ॲाक्टोबर पर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर 12 दिवस कोर्टाला दिवाळीची सुटी असणार आहे. जर या 7 दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टाने आपला निर्णय दिला नाही तर, आर्यन खानला दिवाळीपर्यंत  जेलमध्येच रहावे लागेल. कोर्टात एनसीबीने आर्यनचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीयाशी असल्याचा आरोप करत एनडीपीएस अॅक्टच्या कलम 29 अ अंतर्गत आर्यनच्या जामीनाला विरोध केला जो कोर्टाने मान्य केला. एनसीबीला आर्यन खानच्या विदेशी दुव्यांचा संशय आहे. आर्यन खानला एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी अटक केली. एनसीबीला आर्यन खानकडून ड्रग्ज किंवा रोख रक्कम मिळाली नाही. कोर्टात एनसीबीने म्हटले होते की, आर्यन खान अरबाज मर्चंटकडे सापडलेल्या ड्रग्जचं सेवन करणार आहे. एनसीबी आर्यन खानचे ड्रग्ज चॅट, परदेशी लिंक्सचे पुरावे असल्याचा दावा करत आहे. एनसीबीने युक्तिवादात आर्यन खानच्या ड्रग्ज चॅटचा ही उल्लेख केला, ज्यात तो परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागताना दिसला होता. एनसीबीला आर्यनने ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा संशय आहे.

माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी उच्च न्यायलात आर्यन खानच्या वतीनं बाजू मांडणार

Aryan Khan Bail Plea Hearing : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यावेळी आर्यन खानच्या वतीने माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी उच्च न्यायलात बाजू मांडणार आहेत. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कोर्टाचं कामकाज बंद होण्याआधी जामीन मिळवण्याचा आर्यनच्या वकीलांचा प्रयत्न असेल. आर्यनच्या वकिलांसमोर 30 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर 12 दिवस कोर्टाला दिवाळीची सुट्टी असणार आहे. जर या पाच दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टाने आपला निर्णय दिला नाही तर आर्यन खानला दिवाळीपर्यंत जेलमध्येच राहावं लागेल. 

देशातील कोरोनाची एकूण आकडेवारी

  • एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 42 लाख 2 हजार 202

  • एकूण कोरोनामुक्त : तीन कोटी 35 लाख 83 हजार 318

  • सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : एक लाख 63 हजार 816

  • कोरोनामुळे एकूण मृत्यू : चार लाख 55 हजार 068

  • एकूण लसीकरण : 102 कोटी 94 लाख 1 हजार लसीचे डोस 

कोरोनाची तिसरी लाट टळली? दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे, अशातच आज आठ महिन्यांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 12,428 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 356 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच 15,951 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Aryan Khan Bail Plea Hearing : जेल की बेल? मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Aryan Khan Bail Plea Hearing : मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गेल्या 18 दिवसांपासून आर्यन खान अटकेत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात मंगळवारी (आज) सुनावणी पार पडणार आहे. 

पार्श्वभूमी

क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी Sameer Wankhede यांच्या अडचणी वाढल्या, आजच चौकशीची शक्यता, NCB चं दक्षता पथक मुंबईत येणार


क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. पण या प्रकरणातला पंच प्रभाकर साईल यानं लाचखोरीचे आरोप केल्यानं समीर वानखेडेच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. एनसीबीनं वानखेडेंची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनसीबीचं दक्षता पथक आजच मुंबईत दाखल होणार आहे आणि आजपासूनच चौकशी सुरु होणार आहे. दरम्यान, समीर वानखेडे मात्र काल तातडीनं दिल्लीला गेले आहेत. कार्यालयीन कामासाठी दिल्लीत आल्याची माहिती त्यांनी दिली होती. दरम्यान, या प्रकरणात मनी लाँन्डिंग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एनसीबीकडून होणारी चौकशी महत्त्वाची ठरणार आहे. 


Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर, जाणून घ्या किंमत


ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असलेली पेट्रोल-डिझेल दरवाढीनं महिना अखेरला थोडीशी उसंत घेतल्याचं चित्र आहे.  लागोपाठ दुसऱ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झाला नाही. दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर उतार-चढाव पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 26 ऑक्टोबर रोजीही पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या किंमती स्थिर आहेत. याआधी 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. 


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 107.59 रुपये आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर आज (25 ऑक्टोबर 2021) 113.46 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर दिल्लीत डिझेल 96.32 रुपये आणि मुंबईमध्ये 104.38 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. देशातील प्रमुख महानगरांबाबत बोलायचं झालं तर, मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. ऑक्टोबरमध्ये तेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. एकीकडे कोरोना महामारीच्या संकटामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल दरवाढीची झळ बसत आहे. ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलची किंमत प्रति लीटर सहा रुपयांनी वाढली आहे. तर डिझेलची किंमतही सात रुपयांनी वाढली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.