Breaking News LIVE Updates : बस चालकाचा विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
Breaking News LIVE Updates, November 04 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
आष्टी आगारातून जबरदस्तीने पुण्याला बस घेऊन जाण्यास सांगितल्याने एका एसटी चालकांन बस घेऊन पुण्याकडे जात असताना कडा येथील बस स्थानकातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या चालकाला आता आष्टीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय
मुंबई शेअर बाजारात लक्ष्मीपूजन पूर्ण झालं असून मूहूर्त ट्रेडिंगला सुरुवात झाली आहे. मूहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेपर्यंत सुरु असेल.
आष्टी डेपोचे ड्रायव्हर बाळू महादेव कदम यांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आष्टी आगारातून साधारणपणे दोन वाजण्याच्या सुमारास पुणे ही बस पुण्याकडे घेऊन जात असताना कडा बसस्थानकामध्ये चालकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत
एस टी कर्मचाऱ्यां संपाचा फाटका ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता या ठिकाणी दिवसाला साडेसात लक्ष रुपयाचा तोटा एस टी महामंडळाला सहन करावा लागत आहे. तर आवाज दिवाळीचा दिवस असल्याने स्वगावी परत येत असलेल्या लोकांना अतिरिक्त भाडे मोजून खाजगी बसेस तसेच काली फिवळी वाहन चालकांना पैसे मोजावे लागत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण करावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात गेल्या आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असून जोपर्यंत राज्य सरकार आमचे विलगीकरण करून घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे आज दिवाळी सारखा सन असल्याने स्वगावी परतणाऱ्या लोकाना याचा फटका बसला असून एसटी महामंडाला तोटा सहन करावा लगत आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड येथील डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेल्या शंकर झिने (वय वर्ष 30) यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीय .औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील चांगतपुरी फाटा येथे त्यांनी काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली , दोन वर्षांपूर्वी ते अंबड आगारात चालक म्हणून रोजंदारी तत्वावर लागले होते,दरम्यान आर्थिक विवंचनेतून त्यांनी आपले जीवन संपल्याचा आरोप बस संघटनांनी केलाय ,गेल्या काही दिवसापासून नैराश्यात असलेल्या शंकर झिने दिवाळीच्या रात्रीच पंख्याला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतेय..
राज्यातील 250 डेपोंपैकी 59 डेपोंचं कामकाज बंद, एसटी कामगारांनी हायकोर्टाच्या सुनावणीकडे पाठ फिरवली
उद्या पुन्हा होणार सुनावणी
तूर्तास एस.टी. कर्मचा-यांनी संपावर न जाण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
पालघर - जव्हार - नाशिक मार्गावर तोरंगण घाटात भीषण अपघात, अपघातात 13 कामगार जखमी . पाच कामगारांची प्रकृती चिंताजनक . मध्यरात्रीच्या सुमारास घाटात लोखंडी मशीन घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा अपघात . प्रवासासाठी टेम्पोचा आसरा घेतलेले 13 कामगार जखमी . जखमी कामगारांवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू
पोटनिवडणुकीतील पराभवामुळे 5 रुपये कमी झाले, 50 रुपये कमी करायचे असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागेल - संजय राऊत, शिवसेना खासदार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काल संध्याकाळी पासून मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर पावसाने काहीशी उसंती घेतली. मात्र मध्यरात्री जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात सध्या मोठ्या प्रमाणात भात शेतीची कापणी केली जात आहे. त्यात अचानक अवकाळी पावसाच्या हजेरीने भातशेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
आज अश्विन अमावस्या अर्थात नरक चतुर्दशी निमित्त विठ्ठल मंदिराला बीड च्या एका विठ्ठल भक्ताकडून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . आज दिवाळीची पहिली अंघोळ म्हणजेच नरकचतुर्दशी असल्याने आजपासून विठूरायाची दिवाळी देखील सुरु झाली आहे . आज बीड येथील विठ्ठल भक्त करण हनुमंत पिंगळे यांनी हि आकर्षक फुलं सजावटीची सेवा अर्पण केली आहे . या फुल सजावटी साठी झेंडू , शेवंती , गुलछडी , विविध रंगीबेरंगी गुलाब , अँथेरियम , ऑर्केड , कामिनी , तुळस असा जवळपास दोन हजार किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे . या सजावटीमध्ये फुलांचे पडदे , फुलांच्या पायघड्या , फुलांचे आकाशदिवे आणि पणत्या बनविण्यात आले आहेत . विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी या ठिकाणी हि फुलांची आकर्षक सजावट केल्याने विठ्ठल मंदिर फुलांच्या सुवासाने दरवळून निघाले आहे .
पार्श्वभूमी
Petrol-Diesel : केंद्राच्या कपातीनंतर काही राज्यांकडूनही व्हॅट कपातीचा निर्णय, महाराष्ट्र सरकार कधी करणार?
दिवाळीच्या शुभमुहुर्तावर काल केंद्र सरकारकडून सामान्य लोकांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला गेला. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्याचा काल निर्णय घेतला. राज्यांनीही त्यांच्या व्हॅट करात कपात करण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. याला प्रतिसाद देत तात्काळ गोव्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला. आता महाराष्ट्रात वॅट करात कधी कपात होणार? असा सवाल केला जात आहे. केंद्राचा निर्णय आल्यानंतर भाजप शासित राज्यांपैकी गोव्याने व्हॅट कपात केली आहे. गोव्यासह उत्तरप्रदेश, मणिपूर, कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांनीही अतिरिक्त व्हॅट कपात केली आहे. आता अन्य भाजपशासित राज्य काय निर्णय घेतात याकडेही लक्ष लागून आहे. दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतीवरुन केंद्राच्या विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. आता केंद्रानं कपातीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी वॅट कपात कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गोव्यात पेट्रोल 12 रुपयाने आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त
काल केंद्रानं निर्णय घेतल्यानंतर लगेच गोवा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गोव्यात आता पेट्रोल 12 रुपयाने आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त झालं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन मोदींनी देशातील जनतेला दिवाळी भेट दिल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटलं . त्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोवा सरकार पेट्रोलच्या दरात अतिरिक्त सात रुपये आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपये कपात करत असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलं.
PM Modi On Diwali : पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या जवानांसोबत साजरी करणार दिवाळी
PM Modi Diwali 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाही देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जाऊ शकतात. पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर, पंतप्रधानांच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचं ठिकाण शेवटच्या क्षणी बदललं जाऊ शकतं. दरम्यान, पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जातात, तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची भेट गुप्त ठेवली जाते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -