Breaking News LIVE Updates : पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालं
Breaking News LIVE Updates, November 03 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
जागतिक आरोग्य संघनटेनने कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जगभरातील देशांमध्ये या लसीचा वापर करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
उद्या लक्ष्मीपूजन असल्यानं फुलबाजारात मोठी गर्दी पाहायला मिळतेय.. मुंबईला लागून असलेली मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय चित्र आहे, पाहुयात
अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि पाकिस्तानला मोठा झटका बसलाय. पाकिस्तानच्या आशीर्वादानं प्रभावी ठरलेल्या हक्कानी नेटवर्कचा कमांडर हमदुल्ला मुखलिस याची दहशतवाद्यांनी हत्या केलीय. आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्याला मारल्याचं सांगितलं जातंय. काबुलमध्ये आत्मघाती हल्ल्यात कमांडर हमदुल्ला मुखलिस मारला गेला. तालिबान सरकारमधील गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचा रणनीतीकार अशी त्याची ओळख होती. काबूलचा ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या कार्यालयात हमदुल्ला सगळ्यात आधी घुसला होता. त्यावेळी गनी यांच्या खुर्चीवर बसलेले त्याचे फोटो व्हायरल झाले होते.
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Covid-19) चा प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. देशात दैनंदिन रुग्णांचा आकडा कमी झालेला असला तरी गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11 हजार 903 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच काल 311 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यात वाढ झाली असून देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 59 हजार 191 वर पोहोचला आहे. जाणून घेऊया कोरोनाची सद्यस्थिती... https://bit.ly/3GL1BmO
समीर वानखेडेंवर एकापाठोपाठ एक आरोप होत असताना त्यांच्या समर्थनार्थही आता आंदोलनं होऊ लागली आहेत. बुधवारी सकाळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेतर्फे समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, नेमक्या त्याचवेळी कार्यालयात दाखल होणाऱ्या समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी करत त्यांना छत्रपती शिवरयांची एक प्रतिमा भेट देण्यात आली. समीर वानखेडेंनी या सर्व गोष्टींचा स्विकार केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यानंतर या संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली.
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, "नवाब मलिक हे केवळ एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदनामी करत आहेत. ड्रग्जच्या व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या मलिकांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. नवाब मलिकांविरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना यापुढेही अशीच आंदोलनं करत राहील."
शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात फक्त ऑनलाइन पासधारक भक्तांनाच दर्शनासाठी प्रवेश.
दिवाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता.
दररोज फक्त नऊ हजार भाविकांनाच दर्शनाचा लाभ घेता येईल.
दहा वर्षाखालील व साठ वर्षावरील नागरिकांना मंदिरात प्रवेश नाही.
दूरवरून येणाऱ्या भक्तांनी आधीच ऑनलाइन पास काढून यावे.
गेल्या वर्षी दिवाळी वर कोरोनाचं सावट असल्याने दिवाळी मध्ये निरुत्साह दिसून येत होता .यंदा मात्र कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने सणावरील निर्बध शिथिल करण्यात आले आहेत .त्यामुळे यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये देखील उत्साह दिसून येतोय आज फुल मार्केट देखील ग्राहकांनी फुलून गेलेय .सकाळपासूनच फुलांचे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी फुल मार्केट मध्ये एकच गर्दी केलेली पाहायला मिळतंय त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना दिवाळीत दिलासा मिळालाय .
PM Modi Return India : इटली आणि ब्रिटनचा संपूर्ण दौरा पूर्ण केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 8.15 वाजता दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. भारतीय वेळेनुसार, पंतप्रधान मोदी मंगळवारी रात्री 11 वाजता ग्लासगोहून दिल्लीसाठी रवाना झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलवायू शिखर सम्मेलनात जगभरातील अनेक दिग्गजांसह दोन दिवसांच्या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. ते म्हणाले की, भारतानं पेरिस प्रभावांना पार पाडले आहे, तसेच आता पुढील 50 वर्षांसाठी एक महत्वाकांक्षी एजेंडा देखील निर्धारित केला आहे.
2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्यासह एकूण 12 जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह याचाही खेलरत्न पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी 11 जणांची नामंकने होती. मनप्रीत सिंह याचं नाव समाविष्ट करण्यात आल्यामुळे एकूण 12 जणांना खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. शिखऱ धवन, संदीप नरवाल आणि भवानीदेवी यांच्यासह 35 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 10 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनमध्ये सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमुळे यंदा या पुरस्कारांची उशीरा घोषणा झाली आहे. यंदाच्या क्रीडा पुरस्कारांमध्ये ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 115.85 रुपये आणि डिझेलची किंमत 106.62 रुपये प्रति लिटर आहे. अशातच कोलकातामध्ये पट्रोल आता 110.49 आणि डिझेल 101.56 रुपये प्रति लिटर आहे. याव्यतिरिक्त चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर 106.66 रुपये आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत आता 110.04 रुपये आणि डिझेलची किंमत 98.24 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. भारतीय तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 115.85 रुपये आणि डिझेलची किंमत 106.62 रुपये प्रति लिटर आहे. अशातच कोलकातामध्ये पट्रोल आता 110.49 आणि डिझेल 101.56 रुपये प्रति लिटर आहे. याव्यतिरिक्त चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर 106.66 रुपये आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत आता 110.04 रुपये आणि डिझेलची किंमत 98.24 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे.
जी 20 शिखर परिषद आणि हवामान बदल परिषद 26(COP26) मध्ये सहभागी होऊन देशात परतल्यानंतर लगेचच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण (Covid Vaccine) झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 50% पेक्षा कमी दिलेल्या आणि दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश असेल. झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या 48 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
पार्श्वभूमी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तांवर आयकरची कारवाई
Anil Deshmukh Arrested : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली. मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशमुखांना यंदाची दिवाळी कारागृहातच काढावी लागणार आहे. पुढील चौकशीसाठी देशमुखांच्या कोठडीची गरज असल्याचा दावा ईडीच्यावतीनं करण्यात आला.
राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विक्रमी संख्येने दर दिवशी कोरोना लस देण्याची राज्याची तयारी आहे. यापूर्वी देखील तसे डोस दिले आहेत. आता लसीकरणाला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -