Breaking News LIVE : कोविड 19 वरील उपचारामधून प्लाझ्मा थेरपी काढली जाण्याची शक्यता, अंतिम निर्णय प्रतिक्षेत : सुत्र

Breaking News LIVE Updates, 15 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 May 2021 11:41 PM
कोविड 19 वरील उपचारामधून प्लाझ्मा थेरपी काढली जाण्याची शक्यता, अंतिम निर्णय प्रतिक्षेत : सुत्र

कोविड 19 वरील उपचारामधून प्लाझ्मा थेरपी काढली जाण्याची शक्यता, अंतिम निर्णय प्रतिक्षेत : सुत्र

राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची सख्या जास्त

दिलासादायक! राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची सख्या जास्त. आज 59 हजार 073 रुग्णांना डिस्चार्ज तर नवीन 34 हजार 848 लोकांना कोरोनाची बाधा.

उल्हासनगर मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटना अपडेट, 17 जणांना बाहेर काढण्यात यश 

उल्हासनगर मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटना अपडेट, 17 जणांना बाहेर काढण्यात यश. 14 वर्षाच्या मिलिंद पारचा आणि 23 वर्षीय ऐश्वर्या डोटवाल या दोघाचा मृत्यू. आणखी तीनजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता. टीडीआरफ, उल्हासनगर अग्निशमन दलाचे मदतकार्य सुरू.

Mumbai Corona Cases : मुंबईत आज 1447 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2333 रुग्णांना डिस्चार्ज

Mumbai Corona Cases : मुंबईत आज 1447 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2333 रुग्णांना डिस्चार्ज, आतापर्यंत 6 लाख 34 हजार 314 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या आणखी दोन समर्थकांना बेड्या

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या आणखी दोन समर्थकांना बेड्या ठोकण्यात आल्यात. हृतिक उर्फ भावड्या वाघमारे आणि आतिष जगताप अशी दोघांची नावं आहेत. कथित गोळीबारातील आरोपी तानाजी पवारला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कंत्राटदार अँथोनीच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. आत्तापर्यंत आमदार अण्णा बनसोडेंच्या चार समर्थकांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी आमदार पुत्र आणि पीए पर्यंत मात्र पिंपरी चिंचवड पोलीस पोहचू शकलेली नाही. हा कथित गोळीबार 12 मे च्या दुपारी घडला. त्याच दिवशी गोळीबाराचा आरोप असलेल्या तानाजी पवारला तातडीनं अटक करण्यात आलेली आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय आमदारांच्या मुलाला तातडीनं अटक का झाली नाही, असा प्रश्न आहे.

उल्हासनगरमध्ये इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळला, इमारतीतील 9 कुटुंबातले काही जण अडकले असण्याची शक्यता

 उल्हासनगरमध्ये इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळला, इमारतीतील 9 कुटुंबातले काही जण अडकले असण्याची शक्यता, अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचे काम सुरू

नाशिकमध्ये बेड न मिळाल्याने 24 वर्षीय राष्ट्रीय शुटींग व्हॉलीबॉल खेळाडूचा कोरोनाने मृत्यू

सुशीलला 22 एप्रिलला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचा एच.आर.सी.टी स्कोर एक होता. नाशिकला उपचार घेण्याचा विचार केला. मात्र, बेड उपलब्ध नसल्याने शेवटी त्याला घरीच उपचार घ्यावे लागले. सुशीलला श्वास घेण्यास त्रास व्होऊ लागल्याने ओझरमधील खासगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी उपचारा यंत्रणा अपूर्ण होती. ऑक्सिजनही उपलब्ध नव्हता. यामुळे 28 एप्रिलला त्याला नाशिकच्या एस.एम.बी.टी वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. सुशीलच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले जात होते. परंतु, 3 मे ला त्याचा मृत्यू झाला. पाटील कुटुंब हे मूळचे औरंगाबादच्या सोयगावाचे रहिवाशी आहे.

काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती नाजूक, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

 


काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक असून, त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला असून, त्यांच्या शरीरात इन्फेक्शन देखील झाले आहे.  या सर्व कारणाने प्रकृती नाजूक झालीय, मात्र त्यांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात असून उद्या आपण जहांगीर रुग्णालयात भेट देणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं. 

नवी मुंबई महानगर पालिका काढणार लसीचे ग्लोबल टेंडर, 4 लाख लसींचे ग्लोबल टेंडर काढणार

नवी मुंबई महानगर पालिका काढणार लसीचे ग्लोबल टेंडर, 4 लाख लसींचे ग्लोबल टेंडर काढणार, आतापर्यंत 2.5 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे, नवी मुंबईतील 15 लाख लोकसंख्येत 10 लाख 50 हजार 15 वर्षांवरील लोकांची संख्या, मुंबई महानगर पालिकेनंतर आता नवी मुंबई महानगर पालिका ग्लोबल टेंडर काढणार

जीएसटी कौन्सिलची 28 मे रोजी महत्वाची बैठक, कोरोना काळात होणारी महत्वाची बैठक

जीएसटी कौन्सिलची 28 मे रोजी महत्वाची बैठक, कोरोना काळात होणारी महत्वाची बैठक, पेट्रोल डिझेल जीएसटी अंतर्गत आणणे, कोरोनाशी लढताना आवश्यक सामुग्रीवरचा जीएसटी माफ करणे या गोष्टींवर बैठकीत चर्चा अपेक्षित

नागपूरमध्ये रुग्णाचा अपघाती मृत्यू

नागपूरच्या शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. संबंधित रुग्णाला मूत्रपिंडाशी संबंधित आजार होते. तो रुग्णालयातील स्ट्रेचर साठीच्या रॅम्प वरून चालत जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो तोल जाऊन रॅम्प वरून खाली कोसळला. त्यात त्या रुग्णाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारला आपले असलेले अधिकार गमवायचे आहेत, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समरजितसिंह घाटगे यांची टीका

महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल ज्याला आपले असलेले अधिकार गमवायचे आहेत, अशी टीका कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली आहे. मराठा आरक्षणावरुन केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अद्याप राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली नाही. 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात वक्तव्य करुन राज्य सरकार केंद्रावर टीका करत असते. मात्र आता केंद्राने याबाबत फेरविचार याचिका दाखल करुन सुद्धा राज्य सरकार गप्प का असा सवाल केला जातो. यावरून एकच गोष्ट समोर येते ती म्हणजे राज्य सरकारला आपले असलेले अधिकार गमवायचे आहेत.

खासदार राजीव सातव यांची प्रकृती गंभीर

पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये भरती असलेले कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती गंभीर बनली असून कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात दुपारी जहांगीर हॉस्पिटलमध्ये येणार आहेत. काही दिवसांपूर्वी राजीव सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याच डॉक्टरांनी सांगीतलं होतं. मात्र त्यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहीला. त्यामुळे राजीव सातव यांची प्रकृती सुधारते आहे असं वाटत असतानाच ती पुन्हा खालावलीय. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी राजीव सातव यांच्या तब्येतवर लक्ष ठेवून आहेत आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेतेही जहांगीर हॉस्पिटलमध्ये येऊन सातव यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतायत.

खतांचे दर कमी करण्यासाठी राज्याच्या कृषीमंत्र्यांचे केंद्र सरकारला पत्र

कोरोनाच्या काळात केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे वाढवलेले खतांचे दर केंद्र सरकारने कमी करावेत अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. 

ब्रिटनमध्ये 12 ऐवजी 8 आठवड्यांतच कोरोना लसीचा दुसरा डोस

ब्रिटनमध्ये 12 ऐवजी 8 आठवड्यांतच कोरोना लसीचा दुसरा डोस देण्याची शिफारस, भारतातील लसींमधील अंतर वाढवण्याचा निर्णय़ कितपत योग्य, यावर प्रश्नचिन्हं. कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी अंतर वाढवल्याच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित

वर्ध्यातील श्री हॉस्पिटलमध्ये धुडगूस घालणाऱ्या चार तरुणांना अटक

वर्ध्यातील श्री हॉस्पिटलमध्ये धुडगूस घालणाऱ्या चार तरुणांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणांनी रुग्णालयातील डॉक्टर तोटे यांना शिवीगाळ करत स्टूल उचलला होता. तसंच रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या कारवर दगड मारुन काचा फोडल्या होत्या. या तरुणांनी सात ते आठ दिवसांपूर्वी एका महिलेला उपचारासाठी आणलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या दवाखान्यात जाण्यास डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यावेळी उपचार का केला नाही, असं म्हणत युवकांनी धुडगूस घातला होता.

गुजरातमधून येणाऱ्या वाहनचालकांची नंदुरबारच्या बेडकी पाडा सीमावर्ती भागात नवापूर पोलिसांकडून कसून तपासणी, कोरोना अहवाल निगेटिव्ह असला तरच महाराष्ट्रात प्रवेश

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील बेडकी सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांकडून गुजरात राज्यातून येणाऱ्या वाहन चालकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाचा आरपीटीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्यास वाहनचालकांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जात आहे. ज्या वाहनचालकांकडे आरपीटीसीआर रिपोर्ट नाही, त्यांना महाराष्ट्रात प्रवेश न देता पुन्हा गुजरात राज्यात माघारी पाठवलं जात आहे. तसंच गुजरातमधील उच्छल पोलिसांनीही महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात तपासणी सुरु केली आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास अशा लोकांनाच गुजरातमध्ये प्रवेश दिला जात आहे. कोरोना रिपोर्ट नसल्यास वाहनचालकांना महाराष्ट्रात परत पाठवलं जात असच्याचं चित्र दिसत आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही राज्यातील वाहनचालकांची कसून तपासणी केली जात आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये नवापूर पोलीस करत आहे. नवापूर तालुक्यातील बेडकी पाडा सीमावर्ती भागात नवापूर पोलिसांनी चोवीस तास नाकाबंदी केली आहे.

अवघ्या आठ तासात नागपूर शहरात दोघांचा खून

अवघ्या आठ तासात नागपूर शहरात दोघांचा खून झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात सहा जणांच्या हत्या झाल्याचं समोर आलंय. लॉकडाऊनमध्ये पावलोपावली पोलीस बंदोबस्त असताना ही शहरात गुन्हेगारी बोकाळली आहे. खुनाची पहिली घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाल परिसरसतील गांधी गेट जवळ घडली तर दुसरी घटना नागपुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत सप्तक नगरात घडली

नवी मुंबईत सिडको 10 एकरावर उभारणार सुसज्ज रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज

नवी मुंबईकरांना दिलासा देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता सिडको नवी मुंबईत 10 एकरावर सुसज्ज असे अद्ययावत रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारणार आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे रुग्णालयाची मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता सिडकोने बेलापूरमध्ये रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोचे एमडी संजय मुखर्जी आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. येत्या वर्षभरात हे रुग्णालय उभारुन महापालिकेला हस्तांतरण केलं जाणार आहे.

जूनमध्ये कमी, जुलै महिन्यात चांगला, ऑगस्टमध्ये साधारण पाऊस; भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष जाहीर

बुलढाण्यातील प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष आताच जाहीर झाले आहेत. या भेंडवळच्या भाकिताकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असतं. जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात चांगल्या प्रमाणात पाऊस असून ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होईल. विशेष म्हणजे अवकाळी पावसातून आगामी वर्षात दिलासा मिळेल, असं भेंडवळच्या घट मांडणीचे यंदाचे निष्कर्ष आहेत.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. या वादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात जाणवणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन मनुष्यबळ तसंच साधनसामुग्री तयार ठेवण्याची सूचना विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केली.


 

पार्श्वभूमी

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहून मनुष्यबळ, साधनसामुग्री तयार ठेवा; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना
अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (14 मे) ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसंच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या. 


खुशखबर! एकदिवस अगोदर मान्सून केरळात दाखल होणार! तॉक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सज्ज
कोरोनामुळे सध्या सगळीकडेच नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. यंदा मान्सून केरळमध्ये एकदिवस आधी दाखल होणार आहे. 31 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर हजेरी लावणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. 
तॉक्ते वादळ भारतीय हद्दीतून 21-22 मे ला बाहेर पडल्यानंतर पोषक वातावरण तयार होत असल्याने त्यानंतर आठ दिवसात अरबी समुद्रात मान्सून दाखल होणार आहे. तर 21 मे रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल होणार आहे. त्याआधी 20 मे पासून बे ऑफ बंगालमध्ये मान्सूनला पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.


दिलासा...! राज्यात शुक्रवारी 53,249 रुग्ण बरे होऊन घरी तर 39,923 नवीन रुग्णांचे निदान 
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 53,249 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर  39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 4707980 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  यामुळं  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.68% एवढे झाले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.