Breaking News LIVE : एक कोटी लसींसाठी मुंबई महापालिकेकडून जागतिक निविदा
Breaking News LIVE Updates, 12 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्यमंत्री बच्चू कडू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका....
पंतप्रधान म्हणून जी भूमिका बजावायला हवी होती ती त्यांनी बजावली नाही त्यामुळे ही आपत्ती आली आहे... ती देशासोबत आता राज्यावर येऊन पडली आहे... त्यांनी देशात योग्य नियोजन केले असते तर आज हे दिवस पाहायला मिळाले नसते... बच्चू कडूंची पंतप्रधान मोदींवर टीका
लसीच्या तुटवड्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका... फडणवीस हे राज्याचे नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत... त्यांनी केंद्रात जाऊन लस जास्त द्या किंवा इतर साहित्य द्या अशी मागणी केली का ? राज्य सरकारवर टीका टिपण्णी करण्यापेक्षा केंद्रातून काय आणले याचे उदाहरण द्यावे आणि बोलावे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरासाठी 1 कोटी लसींची जागतिक निविदा काढली आहे. मुंबई महानगरपालिकेचे 60 ते 90 दिवसांच्या आत लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांची माहिती.
सोलापुरात शुक्रवारी साजरी केली जाणार रमजान ईद, आज चंद्रदर्शन न झाल्याने उद्या 30 रोजे पूर्ण करून शुक्रवारी साजरी होणार ईद, सोलापूर शहर काझी अब्दुरराफे अब्दुस सलाम यांची माहिती, यंदा साधेपणाने ईद साजरी करण्याचे मुस्लिम धर्मगुरूंचे आवाहन
राज्यात आज 46 हजार 781 नवीन रुग्णांचे निदान तर 58,805 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात 46781 नवीन रुग्णांचे निदान, आज 58805 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार, कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुख्यमंत्री करणार घोषणा
कोरोनाच्या या महामारीत, भारतातील अनेक राज्यात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स चा दर्जा देण्यात आल्याने बऱ्याच सवलती मिळत असताना, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारची या विषयीची भूमिका मात्र अत्यंत उदासीन असल्याचे स्पष्ट झाले. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी ठाण्यातील मध्यवर्ती पक्ष कार्यालयाला भेट दिली आणि स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा न दिल्याने नाराजी व्यक्त केली. या महामारीच्या काळात पत्रकार देखील आपल्या जीवाची आणि घरादाराची परवा न करता वृत्तांकन करण्यासाठी समाजात वावरतो. त्याला आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या संपूर्ण कुटुंबाला संक्रमणाचा धोका असताना राज्य सरकारने त्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा नाकारल्याने अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून सर्व पत्रकारांना हा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसेकडून कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना अहोरात्र होत असलेल्या मदतीबद्दल त्यांनी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांची पाठ थोपटली व त्यांचे भरभरून कौतुक केले. या कठीण समयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जेवढे शक्य आहे तेवढे आम्ही करत असून, सरकार काय करते ते त्यांनी बघावे असे देखील ते म्हणाले.
उल्हासनगर शहरातील प्रसिद्ध गजानन मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानाचे शटर बंद असताना दुकानाच्या आता 60 पेक्षा जास्त नागरिक कपड्याची खरेदी करत असल्याचा प्रकार उघड झाला. महापालिका व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून दोन दुकाने सील केली.
मुंबई महापालिका पुढील आठवड्यात वॉर्डनुसार लसीकरणाचे कँप सुरू करण्याच्या विचारात, ज्यातून 70 हजार लोकांचं लसीकरण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असेल, मुंबईतील लसीकरणाबाबत नुकतीच आमची पालिका आयुक्तांसोबत बैठक झाली, ज्यात त्यांनी ही माहिती दिल्याची मुख्य न्यायमूर्तींकडून स्पष्ट
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार. तीन गोळ्या त्यांच्या दिशेने झाडण्यात आल्या मात्र सुदैवाने एकही गोळी त्यांना न लागल्याने ते सुखरूप आहेत. अँथोनी नावाच्या ठेकेदाराच्या मॅनेजरने हा गोळीबार केल्याचं समोर आलंय. पवार असं त्यांचं आडनाव असून पिंपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार बनसोडे यांच्या कार्यलयाच्या समोर घडल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. पण गोळीबार का केला हे अद्याप समजलेलं नाही. बनसोडे यांनीच पवारला बोलावलं होतं, अशी माहिती पोलिसांना बनसोडे यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर दिलेली माहिती दिशाभूल करणारी, याचिकाकर्त्यांचा आरोप, बेड मॅनेजमेंटच्या बाबतीत पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नंबरवर हायकोर्टाने कोर्टातून थेट कॉल लावला, वेबसाईटवर पाच व्हेंटिलेटर बेड असूनही, हेल्पलाईनवरील महिलेनं बेड उपलब्ध नसल्याचं फोनवर सांगितलं
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी लहान मुलांच्या लसीकरणाची मागणी केली आहे. तिसऱ्या लाटेची भीती बघता लहान मुलांना लसीकरण सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. पहिल्या लाटेत वृद्धांना धोका होता आता ही आहे, दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात युवकांना लागण होती आणि आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं भाकीत WHO आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आत्ताच या तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून लहान मुला-मुलींना लवकरात लवकर लसीकरण करावे अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
"निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की, दरवाढ ही ठरलेलीच; हे काय वित्त नियोजन आहे का?" असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी देशातील इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना परिस्थितीत देशात आणि राज्यात वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जयंत पाटील यांनी एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये जयंत पाटील म्हणाले की, "केंद्रीय अर्थमंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवल्या जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच! हे काय नियोजन आहे, यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा, असे मत जयंत पाटील यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केले आहे."
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गराडा बुजरूक गवाशेजारी असलेल्या विहिरीत पडून वाघाच्या दोन छाव्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही छावे 2 महिन्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून दोन्ही छाव्याना विहिरी बाहेर काढण्यात आले आहे,
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गराडा बुजरूक गवाशेजारी असलेल्या विहिरीत पडून वाघाच्या दोन छाव्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही छावे 2 महिन्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून दोन्ही छाव्याना विहिरी बाहेर काढण्यात आले आहे,
नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा विषय सध्या ठाणे रायगड जिल्ह्यात चांगलाच गाजू लागला आहे. 14 गाव सर्वपक्षीय विकास समिती, स्मार्ट भूमिपुत्र , 27 आगरी युथ फोरम यांच्यासह आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. आमदार गायकवाड यांनी खरं तर या भागातील लोकांच्या जागा आगरी समाजाच्या होत्या आणि दि.बा. पाटील यांनी आगरी समाजाला न्याय देण्याच काम केलं आहे. त्यामुळे तिथल्या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यास आता पर्यंत 4 लाख 10 हजार 870 लस उपलब्ध झाली असून जवळपास 3 लाख 72 हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आलंय. तर कालच्या तारखेत जिल्ह्यात 26 हजार 334 लस उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .बालाजी शिंदे यांनी दिलीय. परंतु नांदेड शहरातील लसीकरण केंद्रावर लसीकरण उपलब्ध नसल्यामुळे मात्र गोंधळ उडालाय. आज सकाळ पासून नांदेड शहरातील जंगमवाडी,शहरातील इतर लसीकरण केंद्रावर लसीकरण नसल्यामुळे गोंधळ झालाय,एवढेच नाही तर हा गोंधळ व झालेली गर्दी हटवण्यासाठी शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागलेय.
Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. तेल कंपन्यानी आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचं दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 25-25 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत 82.61 रुपये प्रति लीटर झाली आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 98.36 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 89.75 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.
चेन्नईमध्ये पेट्रोल 98.84 रुपये आणि डिझेल 87.49 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 92.16 रुपये आणि डिझेल 85.45 रुपये प्रित लीटर झालं आहे. भोपाळमध्ये पेट्रोल शंभरीपार पोहोचलं आहे. भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत 100.08 रुपये प्रति लीटर असून डिझेलचे दर 90.95 रुपये लीटरवर पोहोचले आहेत.
मागच्या आठवडाभरापासून देशभरात इंधन दरवाढ सुरु असून आठ दिवसांत पेट्रोल 1 रुपया 40 पैसे तर डिझेल 1 रुपये 63 पैश्याने महागले आहे. ज्यामुळे परभणीत पेट्रोलने शंभरी पार केलीय तर डिझेलही नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. आज आठव्या दिवशी 5 राज्याच्या निवडणूका झाल्या आणि देशभरात इंधन दरवाढ सुरु झाली. 8 दिवसांपासून सुरु असलेली दरवाढ आजही कायम असून आज पेट्रोलमध्ये 24 पैसे, डिझेलमध्ये 26 पैसे वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केले जात आहे. अगोदरच कोरोनामुळे लागेलले लॉकडाऊन आणि त्यात ही इंधन दरवाढ त्यामुळे सर्वसामान्य परभणी करांवर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापुरात 45 वर्ष वयोगटावरील नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी सकाळपासून मोठी गर्दी केली आहे. महामार्गावर सकाळपासून रांग पाहायला मिळत आहे. लसीकरण केंद्रात लसीचे 300 डोस उपलब्ध आहेत, परंतु हजारो नागरिक रांगेत उभे आहेत.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल दरात सतत वाढ होत असल्यामुळे सामान्यांचे लॉकडाऊनमधील बजेट मात्र कोलमडले आहे. आज नांदेड जिल्ह्यात पेट्रोलचे दर 100 रुपये 54 पैसे तर डिझेल दर 90 रुपये 49 पैसे झाले आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. काल पेट्रोलचे दर पेट्रोल 100 रुपये 4 पैसे होते, तर डिझेल 89 रुपये 92 पैसे होते. तर आज पेट्रोल मध्ये 51 पैशांनी तर डिझेलमध्ये 57 पैशांनी वाढ झाली आहे.
नांदेड : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल दरात सतत वाढ होत आहे. सततच्या वाढीमुळे सामान्यांचे लॉकडाऊनमधील बजेट मात्र कोलमडलं आहे. आज नांदेड जिल्ह्यात पेट्रोल चे दर 100 रुपये 54 पैसे तर डिझेल दर 90 रुपये 49 पैसे झाले आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसलीय. काल पेट्रोलचे दर पेट्रोल 100 रुपये 4 पैसे होते, तर डिझेल 89 रुपये 92 पैसे होते. तर आज पेट्रोल मध्ये 51 पैशाने तर डिझेल मध्ये 57 पैशाने वाढ झाली आहे.
बुलढाण्याजवळच्या राजूर घाटात सोलापूर-इंदूर महामार्गावर 400 फूट दरीत ट्रक कोसळून अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त ट्रक हा नारळाने भरलेला होता आणि तामिळनाडूहून राजस्थानच्या दिशेने निघाला होता. अपघाता नंतर घाटात या ट्रकमधील नारळ लुटण्यासाठी जवळपासच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरु असताना तसंच अपघातग्रस्त जखमीला मदत करण्याचं सोडून नागरिकांनी नारळ लुटणं पसंत केलं.
सध्या कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाविद्यालयाच्या वसतिगृहाला कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरित करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरातील एमआयटी महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमधील भिंतीवर काही विद्यार्थ्यांनी अश्लील भाषेत लिहिलेलं होतं. मात्र एका माजी सैनिकाने या भिंतीवरील अश्लील भाषेतील मजकूर पुसून तिथे देशहिताचे सुविचार लिहिले. जगदीश गोळीशीवरेकर असं या माजी सैनिकाचं नाव आहे. इतकंच नाही तर या वसतिगृहातील खोली लागलेली जळमटंही त्यांनी स्वच्छ केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे या ठिकाणी उत्खननात साधारण आठशे वर्षांपूर्वीचा तलाव सापडला आहे. वाकरे गावात सौरऊर्जा प्रकल्पासाठी खोदकाम सुरु केलं होतं. त्यावेळी 10 फूट खोदकाम झाल्यानंतर रेखीव आणि चकाकणाऱ्या जांभ्या दगडाच्या पायऱ्या आढळून आल्या. त्यानंतर हे खोदकाम अतिशय सावकाशपणे करण्यात आले. काल या ठिकाणी इतिहास संशोधकांनी भेट दिली. त्यावेळी हा तलाव साधारण आठशे वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला. मराठेशाही किंवा आदिलशाही काळात याचे बांधकाम झाले नसल्याचे देखील इतिहास अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी सांगितले. या तलावसाठी वापरलेला जांभा दगड देखील या भागातला नसून साधारण 100 किलोमीटरवरुन हा दगड आणला असावा असा अंदाज आहे. या तलावात जुनी नाणी, गुळाच्या घाण्याचे साहित्य सापडले आहे. सध्या तलावातील केवळ 10 टक्केच गाळ काढला असल्याने अधिकच्या माहितीसाठी संपूर्ण गाळ काढावा लागणार आहे.
पुणे विभागासाठी दिलासा देणारी बातमी आहे. अवघ्या 37 तासांत 1725 किमीचे अंतर पार करत अंगुलहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस रात्री बाराच्या सुमारास लोणीत दाखल झाली. गाडीला ग्रीन कॉरिडॉर दिला असल्याने रो रो सेवेद्वारे चार टँकर आणण्यात आले. या चार टॅंकरमधून 55 मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक झाली असून पुणे विभागात दाखल झालेली ही पहिलीच तर महाराष्ट्रासाठी ही पाचवी ऑक्सिजन एक्सप्रेस ठरली. अंगुल इथून सोमवारी सकाळी साडेदहा वाजता चार टँकर नागपूरच्या दिशेने रवाना झाले. मंगळवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी नागपूर स्थानकवर गाडी दाखल झाली. क्रू बदलून तात्काळ ही गाडी लोणीसाठी 6 वाजून 30 मिनिटांनी मार्गस्थ झाली. गाडीला ग्रीन कॉरिडॉर असल्याने मार्गात गाडीला सर्वच सिग्नलवर ग्रीन सिग्नल देण्यात आला. त्यामुळे गाडीची गती जरी कमी असली तरीही ग्रीन कॉरिडॉरमुळे वेळेत मोठ्या प्रमाणात बचत झाली.
पार्श्वभूमी
राज्यात मंगळवारी 40, 956 रुग्णांची नोंद, तर 71,966 रुग्ण कोरोनामुक्त
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यात मंगळवारी (11 मे) 71 हजार 966 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर नवीन 40 हजार 956 रुग्णांचे निदान झाले आहे. सोमवारीही (10 मे) राज्यात 37 हजार 326 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 87.67 टक्के झाला आहे. तर राज्यात काल 793 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील होते. आम्ही आमच्या भावना राज्यपालांना कळवण्यासाठी भेट घेतली. भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
अरबी समुद्रात 14 ते 15 मेच्या आसपास चक्रीवादळ येणार? किनारपट्टी भागातील राज्यांना सतर्कतेचा इशारा
कोरोना संकट सुरु असतानाच आता आणखी एक नैसर्गिक संटक देशावर आदळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण अरबी समुद्रात 15 मे च्या आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम सरकण्याची शक्यता आहे. 14 मे रात्रीपासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छिमारांना व बोटींना परतण्यासाठी सूचना दिल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकणातील आरोपी एपीआय सचिन वाझे पोलीस सेवेतून बडतर्फ
मुंबईतील अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणातील चौकशीचा सामना करत असलेले निलंबित सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझे यांना मंगळवारी महाराष्ट्र पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. हा आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केला आहे. अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरण हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं या दोघांना 19 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -