Breaking News LIVE : कोल्हापुरातील शासकीय बालकल्याण संकुलात कोरोनाचा शिरकाव
Breaking News LIVE Updates, 09th May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नागपूर - मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, महाराष्ट्राचे माजी लोकायुक्त गुलाबराव देवराव पाटील यांचे 8 मे रोजी नागपूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ग्रामीण रुग्णालय परिसरात बंद अवस्थेत उभी असलेल्या रुग्णवाहिकेला दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने संपूर्ण रुग्णवाहिका जळून भस्मसात झाली आहे. परिसरात पेटवण्यात आलेल्या कचऱ्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही
आज राज्यात 48,401 नवीन रुग्णांचे निदान, 60,226 रुग्ण बरे होऊन घरी, 572 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद
कोल्हापुरातील शासकीय बालकल्याण संकुलात कोरोनाचा शिरकाव ,
सहा ते अठरा वर्षांखालील 14 मुलींना कोरोनाची लागण,
कोरोनाची लागण झालेल्या मुलींची प्रकृती चांगली ,
शिवाजी विद्यापीठातील कोविड केंद्रात विलगीकरण ,
लहान मुलांसाठी देखील कोरोना धोकादायक ठरत असल्याचे येत आहे समोर,
दोन महिला कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण,
सोलापूर शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
विजांच्या कडकडाटसह मुसळधार अवकाळी पाऊस
बारामतीमध्ये नीरा डाव्या कालव्या( कॅनॉलमध्ये )पडून आजोबा आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. उत्तम पंचगणे हे दूध घालण्यासाठी बारामतीत त्यांच्या 10 वर्षीय समृद्धी या नातीसह आले होते. बारामतीतून घरी परत जात असताना वाटेत पाटस रोडवर कॅनॉलचा अरुंद पूल लागतो. त्या पुलावरून जाताना पाचगणे यांचं गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीसोबतच दोघे कॅनॉलमध्ये पडले. कॅनॉलचे आवर्तन सुरू असल्याने पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने दोघे वाहून गेले. कालांतराने लोकांना मेडद येथे त्यांची बॉडी दिसली. परंतु फार उशीर झाला होता. वाहून गेल्याने नात समृद्धी आणि उत्तम पंचगणे यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात आलाय.
सांगली- परदेशातून भारतात आलेल्या वैद्यकीय मदतीवरून जयंत पाटील यांचा पुन्हा केंद्रावर निशाणा, परदेशातून भारतात वैद्यकीय साहित्याची मदत घेऊन आलेली विमानेच्या विमाने उतरलेली टीव्हीवर पाहतोय, पण त्यातली मदत महाराष्ट्रला पोहोचलेली नाही, केंद्र सरकार त्यावर योग्य तो खुलासा करेल, केंद्र सरकार देशात कुणाकुणाला मदत वाटप करतय हे स्पष्ट केले तर किती मदत परदेशातू आली आणि किती वाटप झाली हे जनतेला कळेल
राहणं, खाणं आणि पिण्याच्या पाण्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण करा, परिचारिका आणि डॉक्टरांचा संप. वरिष्ठांकडे तक्रार करुनही दखल घेतली न गेल्याचा यंत्रणेवर आरोप.
सातारा जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी वाढत असताना संपूर्ण सातारा जिल्ह्यात सात दिवसाचा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. या कडक लॉकडाऊ नंतरही बाधितांची संख्या कमी झाली नसल्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला असून 15 मेपर्यंत त्याच पद्धतीने हा लॉकडाऊन सुरू राहणार असल्याची माहिती सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. सध्या सातारा जिल्ह्यात 24240 रुग्ण एक्टिवा असून काल एका दिवसात 2334 कोरोनाचे रिपोर्ट हे पॉझिटिव आलेले आहेत. तर जवळपास 80 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.हा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर झालेल्या बैठकीत बाळासाहेब पाटील आणि प्रशासकीय यंत्रणा यांनी हा निर्णय घेतला.
मृतदेह बददल्याने संतप्त नातलगांनी केली तोडफोड. यवतमाळ येथील ऍड अरुण गजभिये. यांचा आज शाह रुग्णालयात मृत्यू झाला त्याच्या मृतदेहा ऐवजी त्यांच्या नातेवाईकांना शेळके नामक दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह दिला गेला. स्मशानभूमीत गेल्यानंतर सदरची बाब नातलगांना लक्षात आली त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन केली तोडफोड. शाह हॉस्पिटलचा अनागोंदी कारभार पुन्हा उघड या आधी 12 दिवस अगोदर शाह हॉस्पिटल मधील स्टाफ नर्स ने रुग्णाचे ऑक्सिजन मास्क काढल्याने रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप करत तेंव्हा नातेवाईकांनी केली होती तोडफोड. सध्या डॉ. शाह विरुद्ध अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे सुरू
भिवंडी शहरातील बाजारपेठ मंडई भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड पाहायला मिळाली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे तीनतेरा वाजलेत. पुढच्या आठवड्यात ईद असल्याने नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ना मास्क,ना सोशल डिस्टन्स आशा पध्द्तीने लॉकडाऊनचे तीनतेरा वाजल्याचे पाहावयास मिळत आहे. अनेक भाजी विक्रेता व ग्राहक यांच्या चेहऱ्यावर मास्क देखील नाही.
कोरोना नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी केळवे ग्रामपंचायतीने रिसॉर्ट मालकाला दंड ठोठावला असून पोलिसांनी रिसॉर्ट मालकावर गुन्हा दाखल दाखल केला आहे. ग्रामपंचायतीने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून वर-वधू पिता ,रिसॉर्ट मालक, कॅटरर्सवर केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात उद्या सोमवार 10 मेपासून 15 मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश केवळ कल्याण ग्रामीण भागासाठी लागू असणार आहेत. ग्रामीण भागात 68 गावे अहेत .कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला कोवीड चा धोका व वाढती रुग्णसंख्या यामुळे कल्याणचे तहसीलदार दिपक आकडे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे या कडक निर्बंधांबाबत प्रस्ताव दिला होता. त्याला ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंजुरी दिली. या आदेशानुसार कल्याण तालुक्यातील किराणा, भाजीपाला, दूध डेअरी, फळे, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची अन्न पदार्थ विक्री दुकाने केवळ घरपोच सेवा वगळता बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्या सोमवारी 10 मे सकाळी 7 वाजल्यापासून ते शुक्रवार 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात जैविक कचरा विल्हेवाट लावण्यासाठी बायोवेस्टजची यंत्रणा असूनही कार्यान्वित नसल्याचे चित्र आहे. नांदेड शहरातील बहुतांश खाजगी रुग्णालयातील बायोवेस्टेज अथवा जैविक कचरा बायो वेस्टेज मध्ये नष्ट न करता रुग्णालयाच्या परिसरात इतरत्र फेकल्या जात असल्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तर शहरातील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णांचा जैविक कचरा उचड्यावर टाकल्या जात आहे.
आदित्य ठाकरेंना लगेच कॅबिनेटमध्ये स्थान दिलं गेलं, जसं आदित्य ठाकरे बाबत तत्परता दाखवली तीच तत्परता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत त्या बाबतीत का मांडली नाही असा सवाल करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी मराठा आणि धनगर समाजाला या सरकारला आरक्षण द्यायचेच नाही असा आरोपही केली.
मुंबई : ब्रेक द चेन अंतर्गत प्रशासनानं लावलेल्या कठोर निर्बंधांचा शेवटचा आठवडा सुरु झालाय. रविवारची सकाळ असल्यानं दादरच्या भाजी मार्केटमध्ये रोजच्यापेक्षा थोडी जास्तच गर्दी आज पाहायला मिळाली. रविवार असल्यानं अनेकांची आठवड्यासाठीची भाजी घेण्यासाठी इथं गर्दी होती तर मुंबईतील अनेक किरकोळ विक्रेते रोजच्या खरेदीसाठी इथं येत असतात. मात्र कोरोना सुरक्षा नियमांचा इथं पूर्णपणे फज्जा उडालेला पाहायला मिळाला. त्यामुळे हे निर्बंध आठवड्याभरात संपणार की आणखीन वाढणार असा विचार हे दृश्य पाहिल्यावर मनात निर्माण होतोय.
Mumbai Vaccination Update : मुंबईत आज केवळ 18 ते 44 या वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरु आहे. मुंबईचं सर्वात मोठ लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी जंबो वैक्सिनेशन सेंटरवर आज नोंदणी केलेल्या केवळ 370 जणांना लस दिली जात आहे. त्यातही कोवैक्सिन साठी लोकांना काहीकाळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण अपु-या पुरवठ्यामुळे सध्या केवळ कोविशिल्ड ही लस अनेक ठिकाणी दिली जातेय.
मुंबई : यावर्षी कोरोनाचा राज्यात वाढलेला प्रादुर्भाव पाहता दहावी बोर्ड परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशासाठी नेमके काय निकष असावे ? याबाबत शिक्षण विभागाचे विचार विनिमय सुरू असताना आता दहावीच्या विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशासाठी CET परीक्षा घेण्याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. अकरावी प्रवेशासाठी गुण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत एक स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी का ? याबाबत विद्यार्थ्यांकडून मत जाणून त्याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना याबाबत आपले स्पष्ट मत शिक्षण विभागाने दिलेल्या लिंक वर जाऊन या प्रकारची परीक्षा हवी की नाही ? याबाबतचे मत मांडायचे आहे
Mumbai Vaccination Update : आज मुंबईतील लसीकरण केंद्र उशीरानं सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच आज मुंबईकरांना कोवॅक्सिनचा डोस देण्यात येणार नाही. केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच आज कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र काल राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आज 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 4347592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.3% एवढे झाले आहे.
मेडिकल जर्नल लँसेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संपादकिय लेखातून भारताचे पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत टीका करण्यात आली आहे. मोदी सरकारकडून कोरोना हटवण्यास नव्हे, तर ट्विटरवर त्यांच्याविरोधात आलेल्या टीका आणि आक्षेपार्ह कमेंट्स हटवण्याला प्राधान्य असल्याचं म्हणत ताशेरे ओढण्यात आले आहेत. या संपादकियाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसनंही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पार्श्वभूमी
राज्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबत आरोग्यमंत्री टोपेंचं महत्वाचं वक्तव्य
जालना : राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय येत्या 15 तारखेला घेणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळं त्या राज्यात कडक लॉकडाऊन लावणार असून राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट अजून कमी होत नाही. दररोज 50 ते 60 हजारांच्या घरात रुग्ण संख्या येत आहे. त्यामुळं एक तृतीअंश राज्य हे उतरत्या वळणार असून उर्वरित भागावर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती टोपे यांनी दिली.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळं काही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं मत हायकोर्टानं देखील व्यक्त केलं होतं. आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मेडिकल आणि आरोग्य सुविधांशी संबंधित कामं वगळता सर्व गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
ऑक्सिजन आणि औषध पुरवठ्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. याची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं नॅशनल टास्क फोर्सच्या निर्मितीचे आदेश दिले आहेत. राज्यांना असणारी ऑक्सिजनची गरज-पुरवठा यातल्या समन्वयासाठी हा टास्क फोर्स काम करणार आहे. एकूण 12 सदस्यांत वेगवेगळ्या मेडिकल संस्थांवरचे तज्ञ, आरोग्य मंत्रालयातल्या सचिवांचाही या टास्क फोर्समध्ये समावेश असणार आहे.
निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती, मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत 'विशेष कार्य अधिकारी'
मुंबई : सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा राज्याचे मुख्य सचिव येत्या सोमवारपासून संबंधित विभागाच्या सचिवांकडून आढावा घेणार असून, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज जाहीर केले आहे.
मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. अशोक चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या नियुक्त्यांना संरक्षित केले आहे. परंतु, नोकर भरती प्रक्रियेत निवड आणि नियुक्ती अशा दोन बाबी आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्ण झालेल्या व अपूर्ण अशा दोन्ही भरती प्रक्रियांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव संबंधित विभागांच्या सचिवांसमवेत तातडीने बैठकी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांना न्याय देण्याबाबत राज्य शासन अनुकूल असून, मुख्य सचिवांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतले जातील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -