Breaking News LIVE : शहापुरात वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू तर तीन जखमी
Breaking News LIVE Updates, 06 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स केवळ एका क्लिकवर... देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 15 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन,
8 मे रात्री आठपासून 15 मे सकाळी सात वाजेपर्यंत शहर आणि ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन,
हॉस्पिटल, मेडिकल वगळता सर्व सेवा राहणार बंद,
सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असलेले किराणा दुकान इतर अत्यावश्यक सेवेवर देखील निर्बंध,
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश,
आज 63842 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात 62194 नवीन रुग्णांचे निदान, राज्यात आज 853 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युंची नोंद
दिल्लीहून चालणाऱ्या 28 ट्रेन्स पुढील आदेशापर्यंत रद्द, यामध्ये शताब्दी, दूरंतो, राजधानी एक्स्प्रेस अशा महत्वाच्या गाड्यांचा समावेश, कोरोना काळात प्रवाशी संख्या कमी झाल्यानं रेल्वे प्रशासनाचा निर्णय
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर, सनातन संस्थेचा सदस्य असलेल्या विक्रम भावेला सीबीआयने साल 2013 मध्ये केली होती अटक, सीबीआयने जामीनावर मागितलेली स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, एक लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश, मात्र पुणे एनआयए कोर्टाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मनाई, निर्धारित केलेल्या वेळेत नियमितपणे तपास यंत्रणेपुढे हजेरी तसेच कोर्टातील सुनावणीस उपस्थित राहणं बंधनकारक
राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी विकत घेण्यात आलेली कोवॅक्सिन 45 वर्षावरील नागरिकांना देण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी 45 वयोगटातील नागरिकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे.
राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार अशी चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता भाजप नगरसेवक आंदोलन करतात. संपूर्ण राज्याचा सर्वोच्च न्यायालयानं गौरव केल्याचं भाजपला कौतुक नाही, म्हणत भाजपवर साधला निशाणा
मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार, 1 जूनला मान्सूनचे केरळात आगमन होण्याची शक्यता, सरासरी 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होणार, तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज, मागील दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबला होता, मात्र, सध्या अशी कोणतीही चिन्ह दिसत नसल्याची हवामान विभागाची माहिती. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
सांगली जिल्हा कारागृहात दीपक आवळे नावाच्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आरोपीने मध्यरात्री टॉवेलने गळफास घेतल्याचं समोर आलं आहे. सहा महिन्यांपूर्वीपासून चोरीच्या गुन्ह्यात हा आरोपी कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
येवला शहरातील बस स्थानक परिसरात चोरट्यानी आज पहाटेच्या सुमारास एका मेडिकलच्या आणि मोबाईलच्या दुकानात चोरी केल्याची घटना घडली आहे. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सध्या करोनामुळे अनेक दुकान बंद असून त्याचा फायदा चोरटे घेत असल्याचे समोर आलंय. या दोन्ही दुकानातील शटर उचकवत चोरट्यानी आत प्रवेश केला आणि दुकानातील रोख रक्कम आणि काही मुद्देमाल घेऊन पोबारा केला. चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस त्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.
Coronavirus Update : केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी तिसर्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच तिसरी लाट नक्की येणार असा दावाही त्यांनी केला आहे. विजय राघवन यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या बऱ्यास केसेस समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येईल हे सांगता येणार नाही. पण ती नक्की येणार हे नक्की आहे. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या लाटेच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की कोरोनाची तिसरी लाट टाळता येणार नाही.
पुणे : पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली असून कडक लॉकडाऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पुण्यात खुनाचा थरार पाहायला मिळाला. पूर्ववैमनस्यातून तलवार आणि कोयत्याने वार करून तरुणाचा खून करण्यात आला आहे. तर दुसरा तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली. शाम सोनटक्के (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेत योगेश चव्हाण (वय 19) हा जखमी आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात 5 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ पसरली असून पोलीस संशयितांच्या मागावर आहेत.
रायगड जिल्ह्यात खोपोलीजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला आणि यात चालकासह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तर क्लिनर अपघतात थोडक्यात बचावला आहे. खोपोली एक्झिट मार्गे मुंबईच्या दिशेने येताना आज सकाळी हा अपघात झाला.
पोलिसांनी रचला सापळा रचून केला प्रकार उघड. 40 हजाराचे इंजेक्शन तब्बल 2 लाख 60 हजार रुपये किमतीला होत होती विक्री. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. इतर दोन जण फरार. मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता. क्राईम ब्रँच युनिट 2 ची करावाई
8 मेच्या सकाळी 7 वाजतापासून 13 मेच्या सकाळी 7 वाजतापर्यंत असणार निर्बंध, कोरोना बधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे निर्देश. अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी. किराणा, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ सर्व दुकान बंद राहणार, तथापी सकाळी 7 ते सकाळी 11 वाजतापर्यंत घरपोच सेवा देता येणार, ग्राहकांना दुकानात जाता येणार नाही. शिवभोजन थाळी, हॉटेल, खानावळ सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत केवळ घरपोच पार्सल सुविधा राहणार
कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन काही जण रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत. बुलडाणा एलसीबीच्या पथकाने धडाकेबाज कार्रवाई करत काळ्याबाजारात विकले जाणारे 10 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करुन तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एलसीबीच्या पथकाने एकूण एक लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई नांदुरा इथल्या गैबीनगरमध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात हा काळाबाजार उघडकीस आणल्याने पोलिसांचे कौतुक होत आहेत. पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यापूर्वीच काळ्याबाजारात रेमडेसिवीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
भंडारा शहरातील कॅनरा बँकेला पहाटेच्या सुमारास आग लागली. शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या कॅनरा बँकेतून धूर निघत असल्याने याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.
मुंबई उच्च न्यायालयात आज वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला तसंच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांनी याचिका दाखल केली आहे. तर सीबीआयकडून दाखल झालेला एफआयआर रद्द करण्यासाठी अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारने याचिका दाखल केली आहे.
गोव्यात मडगावमध्ये असलेल्या रवींद्र भवनमध्ये सध्या 'सूर नवा ध्यास नवा' या शोचं चित्रीकरण चालू आहे. त्या सेटवर मंगळवारी गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सारदेसाई यांनी धडक दिली. त्यांनी थेट चित्रकरणाला विरोध दर्शवला. अशा शूटमुळे गोव्यात कोरोना वाढत असल्याचा सूर गोव्यात वाढतो आहे. मडगाव फातोर्डा परिसरात रुग्ण वाढल्याचा दावा त्यांनी केला. त्याचवेळी प्रॉडक्शन युनिटने आवश्यक परवानग्या घेतल्याचा दावा केला आहे. अवधूत गुप्ते यांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला. तीन दिवसांपूर्वी अलका कुबल यांनाही अशा विरोधाचा सामना करावा लागला आहे. गोव्यात 10 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. गोव्यात मंगळवारी कोरोनामुळे 71 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि नामांकित कलाकार दलीप ताहील यांचा मुलगा ध्रुव ताहीलला मुंबई पोलिसांच्या एमसी नार्कोटिक्स सेलने अटक केली आहे. ध्रुवकडून नार्कोटिक्स सेलने 35 ग्राम एमडी (mephedrone) ड्रग्स सुद्धा जप्त केलं आहे. अँटी नार्कोटिक्स सेलचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मुजम्मिल अब्दुल रहमान शेख या ड्रग्ज पेडलरला मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्या चौकशीतून ध्रुव ताहीलचं नाव समोर आलं होतं. 2019 पासून ते मार्च 2021 पर्यंत ध्रुव मुजम्मिल अब्दुल रहमान शेखच्या संपर्कात आला होता. आणि त्याने त्याच्याकडून ड्रग्सची मागणी केली होती. तसेच ड्रग्स विकत घेण्यासाठी ध्रुवने मुजम्मिलला सहा वेळा पैसेही दिले होते.
मुंबई : मनी लॉन्ड्रिंग तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेता व उद्योगपती सचिन जोशी याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सचिन जोशी याला मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केलेला जामीन न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी रद्द करत याप्रकरणी तपासयंत्रणेनं दाखल कलेली याचिका योग्य असल्याचं म्हणत ती स्वीकारली आहे.
नागपूर : जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे. आज ओरिसा राज्यातील अंगुल येथून 90 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार असून नागपूर एयरपोर्ट येथून आज चार टॅंकर विमानाने भुवनेश्वरला रवाना करण्यात आले आहेत. ऑक्सिजन भरलेले टँकर येत्या तीन दिवसांत नागपूरला परत पोहोचतील.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून नागपूरहून इंडियन एयरफोर्सच्या मदतीने चार टॅंकर एअरलिफ्ट करून भुवनेश्वरला नेण्यात आले आहेत. भुवनेश्वरपासून 130 किमी दूर असलेल्या अंगुलवरुन दररोज 60 मॅट्रिक टन ऑक्सिजन भरून हे टॅंकर नागपूरला पोहचतील.
पार्श्वभूमी
CM Uddhav Thackeray : रुग्णवाढ मंदावतेय पण गाफील राहू नका, महाराष्ट्र अजूनही धोक्याच्या वळणावर : मुख्यमंत्री ठाकरे
राज्यातील कोरोना रुग्णवाढ कमी होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं आहे. हे सगळं असलं तरी गाफील राहू नका, महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांच सुप्रीम कोर्टानं कौतुक केलंय. हे आपल सर्वांच यश आहे. सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद.... आपण सर्वांनी संयमाने, जिद्दीने शासनाला आणि महापालिकेला मदत करत आहात, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील रुग्णवाढ मंदावत आहे. तरीही गाफील राहु नका, महाराष्ट्र अजुनही धोक्याच्या वळणावर! जे जे करण्याची गरज आहे ते ते करण्याचा प्रयत्न सुरु.
आपण निर्बंध लादुन किंवा पाळून म्हणा, एक सुरुवात केली दुसर्या लाटेशी युद्धाची. अन्य राज्ये देखील आता लॉकडाऊन करत आहेत. तिसर्या लाटेचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील इशारा दिला आहे. 25 एप्रिलला राज्यात जवळपास सात लाखाला पोहचलो होतो आणि 4 मे म्हणजे काल 641000 इतकी आपण रुग्णवाढ थोपवली आहे. काही जिल्ह्यात मात्र रुग्णवाढ होत आहे, आपण लक्ष ठेवून आहोत, असं ते म्हणाले.
CM Thackeray On Maratha Reservation : तुमचा न्यायहक्क तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही : मुख्यमंत्री
मराठा समाजाने जो संयम आणि शांतता आजवर दाखवली तीच पुढेही दाखवावी, सरकारवर विश्वास ठेवावा, ही लढाई सरकार जिंकून दाखवेल, तुमचा न्यायहक्क तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते. मराठा नेत्यांनी, समाजाने शांतपणे हा निर्णय ऐकला, त्याबद्दल त्यांचे हात जोडून धन्यवाद असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा विशेष उल्लेख केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षण प्रकरणी जास्त वेळ न घालवता केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, आता या माध्यमातून मी विनंती करत आहे, उद्या पत्र देखील लिहिणार आहे. जर गरज असेल तर आम्ही तिथे येऊन चर्चा करण्याची तयारी आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडुन प्राप्त निकालाच्या प्रतीचा अभ्यास विधी तज्ञांची समिती हा छोटा शब्द ठरेल, फौज त्याचा अभ्यास करत आहे. आरक्षणाचा अधिकार केंद्र आणि राष्ट्रपतींचा असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. कलम 370 हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत दाखवा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -