Breaking News LIVE : जळगाव शहरात 11 मार्च रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू

Breaking News LIVE Updates, 9 March 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Mar 2021 07:32 AM
जळगाव शहरात 11 मार्च रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू

जळगाव शहरात 11 मार्च रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती.

उल्हासनगरमध्ये विशेष समित्यांवर भाजपचे वर्चस्व

उल्हासनगर महापालिकेत एकूण ९ विशेष समित्यांची आज ऑनलाइन निवडणूक पार पडली, या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम समिती डिम्पल ठाकूर,नियोजन व विकास समिती दीपा पंजाबी,पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती अजित गुप्ता,आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती शंकर लुंड,आणि महिला बाल कल्याण समितीवर ज्योती पाटील हे भाजपचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले.

उल्हासनगरमध्ये विशेष समित्यांवर भाजपचे वर्चस्व, सत्ताधारी शिवसेनेला चारली धूळ

उल्हासनगर महापालिकेत भाजपने सत्ताधारी शिवसेनाला धूळ चारली आहे. इथे आज पार पडलेल्या विशेष समित्यांच्या निवडणुकीत भाजपने 9 पैकी 8 जागांवर आपले वर्चस्व निर्माण केले. उल्हासनगर महापालिकेत एकूण 9 विशेष समित्यांची आज ऑनलाइन निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम समिती डिंपल ठाकूर, नियोजन व विकास समिती दीपा पंजाबी, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती अजित गुप्ता, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती शंकर लुंड आणि महिला बाल कल्याण समितीवर ज्योती पाटील हे भाजपचे सर्व उमेदवार बीन विरोध निवडून आले. महत्वाचे म्हणजे क्रीडा समाज कल्याण या समितीत शिवसेनेच्या उमेदवाराने अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या समितीवर देखील भाजप उमेदवार गीता साधनानी बिनविरोध विजय झाले. तर पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिक्षण समिती वर शिवसेनेच्या शुभांगी बेहनवाल यांची फक्त निवड झाली, पालिका सभागृहात पार पडलेल्या या ऑनलाइन निवडणुकीत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पीठासीन अधिकारी म्हणुन काम पाहिले.

पुण्यात कापला कोरोना केक

राज्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या घटनेला वर्ष पूर्ण झालं. वर्षभरानंतरही राज्यात कोरोना उद्रेक कमी झालेला नाही. त्यामुळे मनसेने पुण्यात उपहासात्मकपणे कोरोना केक कापून गो कोरोना गो अशी घोषणाबाजी केली.मनसेच्या नेत्या रुपाली पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा केक कापत सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सरकारची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केलाय. पुणेकरांवर पुन्हा लॉकडाऊन लादण्या ऐवजी आरोग्य यंत्रणा सक्षम करावी अशी मागणी रुपाली पाटील यांनी यावेळी केली.

कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह भासवण्याचा प्रकार, मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर गुन्हा

विमान प्रवासासाठी कोविड पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये फेरफार करुन रिपोर्ट निगेटिव्ह भासवण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघड झाला आहे. खारमधील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींवर खार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल

शिक्षकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार

महाबळेश्वरातील माखरिया हायस्कूल मधील घटना. शिक्षकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर नराधम शिक्षकाला केली अटक. दिलीप ढेबे असे आरोपीचे नाव. आरोपी दिलीप ढेबे हा या शाळेचा मुख्याध्यापक. शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन शाळेतच बलात्कार.

घरगुती वादातुन दिराचा आपल्या भावजय व तिच्या दोन मुलींवर कोयत्याने वार

घरगुती वादातुन दिराने आपल्या भावजय व तिच्या दोन मुलींवर कोयत्याने वार करत जखमी केल्याची घटना चिखली तालुक्यातील सवना गावात घडली. यात एका मुलीचा कान कापल्या गेल्याने गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलय. प्रभाकर हावरे असं हल्ला करणाऱ्यां दिराचं नाव आहे.

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, कशेळी इथल्या चामुंडा कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, कशेळी इथल्या चामुंडा कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग. कॉम्प्लेक्स मधील श्रीजी फर्निचर गोदामाला आग; आगीत फर्निचर जळून खाक. आगीमध्ये लाखोंचं फर्निचर जळून खाक झालं आहे. वेल्डिंग करत असताना गोदामाला लागली आग. घटनास्थळी ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू. जीवितहानी नसून लाखोंचं नुकसान.

शर्जिल उस्मानीविरोधात सोमवारपर्यंत कठोर कारवाई नको- हायकोर्ट

शर्जिल उस्मानीविरोधात सोमवारपर्यंत कठोर कारवाई नको, हायकोर्टाचे आदेश. स्वारगेट पोलीस स्थानकांत शर्जिल उस्मानी बुधवारी चौकशीसाठी हजर राहणार, उस्मानीची हायकोर्टात ग्वाही. पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी शर्जिल उस्मानीची हायकोर्टात याचिका, सोमवारी सुनावणी

अकोला जिल्ह्यातील बोरगाव नजीक रेल्वे रुळावरून घसरलेली गीतांजली एक्सप्रेस मुंबईकडे रवाना

अकोला जिल्ह्यातील बोरगाव नजीक रेल्वे रुळावरून घसरलेली गीतांजली एक्सप्रेस मुंबईकडे रवाना. अपघात ग्रस्त दोन डब्बे हटवून रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ. मात्र, यात रूळाचं मोठं नुकसान झाल्याने संपुर्ण दुरूस्तीला उद्याची सकाळ उजाडणार. दुरूस्तीच्या कामामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक प्रभावीत. मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचा खोळंबा. नागपूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत चालू.
या गाड्या होणार प्रभावित :
गोंदिया-दादर विदर्भ एक्सप्रेस
अमरावती-मूंबई सीएसटी अंबा एक्सप्रेस
कुर्ला मेल एर्सप्रेस
हावडा-कुर्ला एक्सप्रेस

Curfew imposed in Jejuri amid covid 19 risk from 10th to 12th Darshan of Khandoba temple closed on Mahashivaratri 2021

अकोला जिल्ह्यातील बोरगाव नजीक रेल्वे रुळावरून घसरली गीतांजलि एक्सप्रेस मुंबईकडे रवाना अपघात ग्रस्त दोन डब्बे हटवून रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ. मात्र, यात रूळाचं मोठं नुकसान झाल्याने संपुर्ण दुरूस्तीला उद्याची सकाळ उजाडणार. दुरूस्तीच्या कामामूळे मूंबईकडे जाणारा वाहतूक प्रभावीत. मूंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचा खोळंबा. नागपूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत चालू

सचिन वाझे यांना पदावरुन दूर करण्यासाठी सरकारवर कोणाचा दबाव? फडणवीसांचा प्रश्न

महाराष्ट्र हे काय आत्महत्या डेस्टिनेशन होणार का? सचिन वाझे यांना कोण पाठीशी घालतंय? असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री कुठल्या सदनात येऊन निवेदन का करत नाही असा सवालही त्यांनी केला. वाझे यांना पदावरून दूर करण्याबाबत मंत्र्यानी कबूल केलं आहे असं सांगत आता त्यांना पदावरून दूर करण्यासाठी राज्य सरकारवर कोणाचा दबाव आहे हे सांगितलं पाहिजे असं फडणवीस म्हणाले. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबलं : भास्कर जाधव

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबलं, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सचिन वाझे करत होते. त्यामुळे सचिन वाझे यांना टार्गेट केलं जात आहे : आमदार भास्कर जाधव

ठाकरे सरकारविरोधात विरोधकांची विधानसभेत जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्राला आत्महत्येचं डेस्टिनेशन बनवणार का? आदित्य ठाकरेंचं नाव घेता फडणवीसांचा सवाल, यह सरकार खुनी है, ठाकरे सरकारविरोधात विरोधकांची विधानसभेत जोरदार घोषणाबाजी


 


 

 चंद्रपूरच्या दारुबंदी समीक्षा समितीला अहवाल सादर करण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ

चंद्रपूरच्या दारुबंदी समीक्षा समितीला अहवाल सादर करण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 17 मार्च पर्यंत समितीला राज्य सरकारला आपला अहवाल सादर करायचा आहे. समितीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या समितीच्या 15 जानेवारी ते 5 मार्च दरम्यान 11 बैठका झाल्या असून समितीचे कामकाज पूर्ण झाले आहे. समितीचे सदस्य सचिव हा अहवाल लवकरच राज्य सरकारला सादर करतील.

राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पारित

महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत दिल्ली काँग्रेस समिती पाठोपाठ हा दुसरा महत्त्वाचा प्रस्ताव आहे

बीडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मच्याऱ्याचा मृत्यू

 


बीड : रात्रगस्तीवर असेलेल्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा अद्यात वाहनाच्या धडकेत मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावर गढी उड्डाणपुलावर पहाटेची घटन, विवेक सदाशिव कांबळे (वय 34) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव

सातारा : महाबळेश्वरमध्ये शिक्षकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार

सातारा : शिक्षकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार, महाबळेश्वरातील घटना, विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर नराधम शिक्षकाला अटक, शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन शाळेतच बलात्कार

जळगाव जिल्ह्यातील शहादा तालुक्यात अफूच्या शेतीवर पोलीसांची धाड

जळगाव जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिरुड त.ह. या अतिदुर्गम भागातील गावात सुमारे साडेसात एकर अफूची शेती पोलीस प्रशासनाने धाड टाकून जप्त केली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीकांत घुमरे यांना सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम भागात काही शेतकऱ्यांकडून अफूची शेती करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर  शिरुड त.ह. या गावाला सापळा रचून धाड टाकली

नाशिकमध्ये कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. एकच महिन्यात रुग्णसंख्येत जवळपास चारपटीने वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्यास त्यांनी सुरुवात केलीय. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत काही निर्बंध लागू केले असून 9 मार्चच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी नाशिककरांना केले असून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग नवव्या दिवशी स्थिर

गेल्या काही दिवसात सातत्याने वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग नवव्या दिवशी स्थिर आहेत. त्यामध्ये कोणतीही भाव वाढ न झाल्याने सामान्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 31.17 आणि 81.47  रुपये इतकी आहे.

पार्श्वभूमी

राज्यात आज 8744 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 9068 जण कोरोनामुक्त


राज्यात आज नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात सलग तीन दिवस दहा हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या 8744 एवढी आहे. तर आज 9068 जण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झालं आहे. दरम्यान मागील 24 तासात 22 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत 52 हजार 500 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.


ठाण्यात पुन्हा हॉटस्पॉट मध्ये लॉकडाऊन! नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन


ठाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत जात असल्याने हॉट स्पॉट क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे परिपत्रक ठाणे महापालिकेने काढले आहे. एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मोहीम सुरू करण्यात आली असून दुसरीकडे रुग्ण वाढीमुळे लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असले तरी,रूग्णसंख्या वाढतीच राहीली आहे.त्यामुळे शहरातील हॉटस्पॉटची संख्या पुन्हा 16 झाली आहे.तेव्हा,कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या 16 हॉटस्पॉटमध्ये 31 मार्चपर्यत लॉकडाऊन कायम असल्याचे महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.


कोलकाताच्या स्ट्रैंड रोड परिसरातील इमारतीला भीषण आग, 9 जणांचा मृत्यू


कोलकाताच्या स्ट्रैंड रोड परिसरातील एका इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या  आगीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या इमारतीत रेल्वेच कार्यालय देखील असल्याचं कळतय. 10 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.