Breaking News LIVE : अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन, राहत्या घरी 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Breaking News LIVE Updates, 6 March 2021:दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Mar 2021 11:11 PM
राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या ५ डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल १ लाख ८ हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी 'ग्लोबल कोकण' आणि 'मायको' या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. कोकणातील १० आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम ५ मार्च रोजी अंधेरीतील मॅरिएट येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी 'मायको' ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी १ लाख ८ हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली. हापूस आंब्याच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे.
भारत बायोटेकच्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीची चाचणी सुरु झाल्याची माहिती आहे. नागपूर सह देशातील चार ठिकाणी ही चाचणी गोपनीय पद्धतीने सुरु करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भारत बायोटेक ने ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया कडे या लसीच्या चाचणीची परवानगी मागितली होती. ती मिळाल्यानंतर ही चाचणी नागपूर आणि इतर तीन अशा एकूण चार शहरांमध्ये केली जात असल्याची माहिती आहे. नागपुरात भारत बायोटेकच्या इंजेक्शन द्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी या आधी ज्या रुग्णालयांमध्ये झाली होती, त्या रुग्णालयातील डॉक्टर्सनी या चाचणी संदर्भात बोलण्यास नकार दिले आहे. या संदर्भात भारत बायोटेकचे प्रवक्ते हैद्राबाद मधून भाष्य करतील असे त्यांचे म्हणणे आहे.
भारत बायोटेकच्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीची चाचणी सुरु झाल्याची माहिती आहे. नागपूर सह देशातील चार ठिकाणी ही चाचणी गोपनीय पद्धतीने सुरु करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भारत बायोटेक ने ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया कडे या लसीच्या चाचणीची परवानगी मागितली होती. ती मिळाल्यानंतर ही चाचणी नागपूर आणि इतर तीन अशा एकूण चार शहरांमध्ये केली जात असल्याची माहिती आहे. नागपुरात भारत बायोटेकच्या इंजेक्शन द्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी या आधी ज्या रुग्णालयांमध्ये झाली होती, त्या रुग्णालयातील डॉक्टर्सनी या चाचणी संदर्भात बोलण्यास नकार दिले आहे. या संदर्भात भारत बायोटेकचे प्रवक्ते हैद्राबाद मधून भाष्य करतील असे त्यांचे म्हणणे आहे.
नांदेड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचे नगरसेवक पद नांदेड च्या दिवाणी वरिष्ठ न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिलाय. त्यामुळे आता त्यांच्या जागी प्रतिस्पर्धी राहिलेले दिनेश मोरताळे यांना विजयी घोषित करण्यात आलंय.
नांदेड वाघळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 ला वार्ड क्रमांक (ड) मधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर काँग्रेस च्या दिनेश मोरताळे यांना एक मताने हरवून विजयी झाले. या निकाला विरोधात मोरताळे यांनी सात दिवसाच्या आत आक्षेप नोंदवीत नांदेड दिवाणी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणीत फेरफार केला. पोस्टल मतदानात दिर्लक्ष करून पोस्टल मतदान लपवल्याचा आरोप मोरताळे यांनी केला होता. या दरम्यान पोस्टल मतदानाची फेरमतमोजणी झाली असता काँग्रेस चे दिनेश मोरताळे एक मताने विजयी झाले.या दरम्यान निवडणूक प्रक्रिया दोषपूर्ण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.या प्रकरणी नांदेड दिवाणी न्यायालयाने आमदार बालाजी कल्याणकर यांच्या बाजूने लागलेला निकाल रद्द करत काँग्रेस च्या दिनेश मोरताळे यांना नगरसेवक म्हणून घोषित केलंय.
नाशिकमधील कोरोनाचा धोका वाढताच. गेल्या 24 तासांत नाशिक जिल्ह्यात 645 नवे कोरोना बाधित 6 रुग्णांचा मृत्यू. नाशिक शहरात 406 रुग्णांना कोरोनाची बाधा, दोघांचा मृत्य
भिवंडी-वाडा रोडवर शेलार नदीनाका इथं आरसीसी रोड आणि नाल्याचे काम सुरु असून ठेकदाराच्या गलथान कारभारामुळे नाल्याच्या ठिकाणी खड्डे असताना कोणत्याच प्रकारे नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही. बॅरेकेट लावले नसल्याने दुचाकीस्वार दुचाकीसह थेट नाल्यात पडल्याने दुचाकीस्वार व त्याची मुलगी जखमी झाले आहेत. तेथील नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात नेले आहे, ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे.
महाशिवरात्रीला त्रंबकेश्वर मंदिर राहणार बंद राहणार. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने घेतला निर्णय, इतिहासात पहिल्यांदाच महाशिवरात्रीला मंदिर बंद राहणार. 12 ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी होणारी हजारोंची गर्दी टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. 10 ते 14 मार्च दरम्यान जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश जारी केल्यानं निर्णय. तसेच त्रंबकेश्वर पाठोपाठ नाशिकचे कपालेश्वर मंदिर ही बंद राहणार
कोल्हापूर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पार्किंगमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न, मालमत्तेच्या वादातून, अवैधरित्या सुरू असलेल्या मद्यविक्रीबाबत दखल न घेतल्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. गोकुळ शिरगाव इथल्या भिमराव करवते यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्याकडून प्रदूषण केले जात आहे, असा आरोप वारंवार केला जातो. काल रात्रीच्या सुमारास डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात उग्र दर्प पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रदूषणाचा त्रास नागरीकांना नेहमीच होत असतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्याच वर्षी डोंबिवलीला भेट दिली होती. नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोकण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही सरकारी यंत्रणांनी डोळेझाक केली आहे. शिवसेनेचे राजेश कदम यांनी आज एमआयडीसीमध्ये पाहणी करत व्हिडियोच्या माध्यमातून गलथान कारभार उघड केलाय. रासायनिक सांडपाणी सीईटीपी केंद्रापर्यंत वाहून नेण्यासाठी बांधण्यात आलेली चेंबर भरून वाहत असून हे रसायन मिश्रित पाणी थेट नाल्यात जात असल्याचे दिसून आले आहे. राजेश कदम यांनी काही कंपन्यांकडून रासायनिक प्रदूषित सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असून एमआयडीसीने सदोष गटार तटार केले आहे. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न जैसे थे असल्याचा आरोप केलाय.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याला आग. बोईसर-तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाइल कंपनीला आग. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल. बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट.
पंढरपूर भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विदुल आधटराव यांचे घर आणि कार्यालयावर छापे टाकत सावकरीचे साहित्य जप्त केलं आहे. शहर पोलिसांनी या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. आधटराव यांच्या घरातून 48 चेक, 9 हिशोब वह्या, कोरे स्टॅम्प पोलिसांनी जप्त केले असून त्याचा शोध सुरू केला आहे. सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांची जात पडताळणी चौकशी सुरू आहे. उपमहापौर खंडणी प्रकरणी वादात असताना भाजपचा अजून एक पदाधिकारी बेकायदा सावकरीत अडकल्याने भाजपचे हे नवीन रूप समोर येऊ लागले आहे.
पुण्यातील ओशो आश्रमाची तीन एकर जागा विकण्याचा निर्णय ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनने घेतला आहे. लॉकडाउनमुळे आश्रमाचा खर्च चालवणं अवघड झाल्याने जागा विकावी लागत असल्याचं फाऊंडेशनने धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केलेल्या अर्जात म्हटलय. या जागेसाठी ओशो आश्रमाला लागूनच ज्यांचा बंगला आहे त्या राजीव बजाज यांनी एकशे सात कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखवली आहे. मात्र ओशो आश्रमाची जमीन विकण्यास ओशोंच्या अनुयायांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
यवतमाळ : वनमंत्री पद कुणाला मिळणार यावर सध्या राजकीय चर्चा होत आहे. मात्र, वनमंत्रीपद कुणाला द्यावे याचा निर्णय महाविकास आघाडीतील प्रमुख नेते घेतील, असे स्पष्टीकरण काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी दिले. विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसकडे आहे अशी स्पष्ट भुमिका ठाकरे यांनी मांडली. तर काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी भूमिका सुद्धा त्यांनी मांडली होती.
भाजपचे माजी खासदार दिलीप गांधींची पिंपरी चिंचवड पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. तर आत्तापर्यंत अहमदनगरमधून दोघांना अटकही करण्यात आलीये. नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतून 22 कोटींचे कर्ज बनावट पद्धतीने घेण्यात आले आहे. असा आरोप अहमदनगर मधील तक्रारदार महादेव साळवे यांनी केलाय. मार्च 2018मध्ये घडलेल्या या घोटाळ्याप्रकरणी जानेवारी 2021मध्ये फिर्याद देण्यात आलेली आहे. अवघ्या काही तासांमध्ये कर्जासाठी अर्ज दाखल झाला आणि कागदपत्रांची शहानिशा न करताच 22 कोटींचे कर्ज बहाल करण्यात आल्याचे गुन्ह्यात नमूद आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी महिनाभर सखोल चौकशी करून काल नगरमध्ये धाडी टाकल्या. माजी खासदार दिलीप गांधींची चौकशी करण्यासाठी घरी आणि कार्यलयात पोलीस दाखल झाले होते, मात्र गांधी तिथून गायब होते. पण यज्ञेश चव्हाण आणि नवनीत सुरकुर्या या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. दिलीप गांधींचा शोध घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस त्यांची चौकशी करणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कुरियर माल वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागल्याने मोठी धांदल उडाली. चंद्रपूर-नागभीड मार्गावरील तळोधी येथील ही घटना असून या घटनेच्यावेळी स्थानिकांची समयसूचकता देखील पाहायला मिळाली. ट्रकने पेट घेताच नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र आग वाढून ट्रक खाक होऊ नये यासाठी चक्क जेसीबीच्या साह्याने ट्रक उलटवून मोठी हानी टाळली गेली. या दरम्यान ट्रकमधील साहित्य काही प्रमाणात राख झाले.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक,

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके (राष्ट्रवादी समर्थक)यांची निवड...
तर उपाध्यक्ष पदी माधवराव कानवडे ( काँग्रेस समर्थक ) यांची निवड...
मनमाड शहरातील दर रविवारी भरणारा आठवडी बाजार उद्या पासून बंद.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आठवडी बाजार राहणार बंद.
नपा मुख्याधिकारी यांनी केले पत्रक प्रसिद्ध..
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रात्र संचारबंदी 14 मार्च पर्यंत वाढवणार
,
परराज्यातून सोलापुरात येण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध देखील 14 मार्च पर्यंत राहतील कायम
,
25 फेब्रुवारी रोजी 7 मार्च पर्यंत लागू करण्यात आले होते निर्बंध, तेच निर्बंध 14 मार्च पर्यंत राहतील कायम
,
परिस्थितीनुसार 14 मार्च रोजी पुढील निर्णय घेतला जाईल
,
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची फोनवरून माहिती
मुलुंड येथील वसंत ऑस्कर इमारती मध्ये एका तरुणाने स्वतः च्या वडील, आजोबा यांची चाकूने वार करून हत्या केली असून स्वतः सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. शार्दूल मांगले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान त्याने त्याचे वडील मिलिंद मांगले आणि आजोबा सुरेश मांगले यांच्यावर चाकूने वार केले.या वेळी त्यांचा केयर अनंत कांबळे घरात होता.त्याने या लोकांना प्रथम वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र शार्दूल चे कृत्य पाहून तो बाथरुम मध्ये कडी लावून लपला.त्यामुळे त्याने ही सर्व घटना पाहिली.सध्या घटनास्थळी मुलुंड पोलीस दाखल झाले आहेत.थोड्याच वेळात सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल होत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, कोरोना लस सुरक्षित असून नागरिकांनी लस घेण्याचं गडकरींचं आवाहन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांची पत्नी कांचन गडकरी यांनी नागपूर एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना संदर्भात लसीकरण करून घेतली. दोघांनी आज लसीचा पहिला डोस घेतला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांची पत्नी कांचन गडकरी यांनी नागपूर एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना संदर्भात लसीकरण करून घेतली. दोघांनी आज लसीचा पहिला डोस घेतला आहे.
राज ठाकरे मुंबईला रवाना झाले असून 15 दिवसांनी पुन्हा नाशिकला येणार आहे. पक्षाचा आढावा घेण्यासाठी पुढील दौरा असणार आहे.
मिलिंद एकबोटेंवर पुण्यातील कोंढवा पोलिस स्टेशनमधे प्रक्षोभक वक्तव्य करून दोन समाजांमधे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन गुन्हे नोंद करण्यात आलेत. पुणे महापालिकेच्या वतीने कोंढवा भागात मुस्लिम समाजासाठी हज हाऊस उभारण्यात येणार आहे. मिलिंद एकबोटेंनी हे हज हाऊस उभारण्याला विरोध करताना प्रक्षोभक वक्तव्य करून ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा साध्या पद्धतीने साजरी केली जात आहे. दरवर्षी लाखो भाविक आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला राज्यासह परराज्यातील भाविक येत असतात. प्रामुख्याने राजकीय लोकांची रेलचेल या यात्रेत असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने इतर भाविकांना यात्रेत मज्जाव केला आहेत. त्यामुळे आंगणेवाडी भराडी मंदिर बाजूने जाणाऱ्या मार्ग सील केले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी केलेला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संकट गडद होत असतानाच बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात आमदारगायकवाड यांची पत्नी, सून, 12 दिवसांची नात, दोन्ही पुतणे, आमदार गायकवाड यांच्या वहिनी, त्यांचे भाचे आणि परिवारातील आणखी काही सदस्य अशा 12 जणांचा कोविड अहवाल आज, 6 मार्चला पॉझिटिव्ह आला आहे.सोबतच आमदार गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयातील टाईप राइटर आणि चालक सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने 11 मार्चपर्यंत त्यांचे कार्यालय सुद्धा बंद राहणार असल्याची माहिती आमदार गायकवाड़ यानि दिली .
आमदार गायकवाड अधिवेशनासाठी मुंबईत असल्यामुळे ते स्वतः व त्यांच्या सोबतची टीम मात्र निगेटिव्ह आहे. आज 6 मार्चला आमदार गायकवाड घरी येणार असले तरी घरी किंवा कार्यालयावर सध्या कुणी संपर्क करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. रविवारी संध्याकाळी आमदार गायकवाड पुन्हा मुंबईला जाणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात रविवारी कडक लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाउन मधून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. शनिवार सायंकाळी 6 वाजेपासून सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत कडक निर्बंध.
औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 459कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडलीय तर 5 जणांचा मृत्यू झालाय. वाढत असलेल्या कोरोना रुग्णासोबतच मृत्यूचा आकडाही वाढल्यानं चिंतेत भर पडलीय. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 हजार 103 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2 हजार 284
जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2 हजार 910 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 179 जणांना (मनपा 152, ग्रामीण 27) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 47 हजार 909 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
नागपूर शहरासाठी 25 फेब्रुवारी पासून 7 मार्च पर्यंत लावलेले सर्व निर्बंध पुढील आदेशपर्यंत (14 मार्च) वाढविले, मंगल कार्यालय, लॉन, सेलिब्रेशन हॉल मधील विवाह बंद राहतील

,सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी कायम राहील
नागपूर शहरासाठी 25 फेब्रुवारी पासून 7 मार्च पर्यंत लावलेले सर्व निर्बंध पुढील आदेशपर्यंत (14 मार्च) वाढविले, मंगल कार्यालय, लॉन, सेलिब्रेशन हॉल मधील विवाह बंद राहतील

,सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी कायम राहील
गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड येथील नारायणपूरमध्ये कार्यरत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसमधील (आयटीबीपी) हेड कॉन्स्टेबल मंगेश हरिदास रामटेके (वय ४०) यांना वीरमरण आले.

नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेल्या भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने ते शहीद झाले.
भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, शहरातील धामणकर नाका येथील सोनीबाई कंपाउंड परिसरात यंत्रमाग कारखान्याला भीषण आग, आगीत 2 यंत्रमाग कारखाना व 1 कापडाचा गोदाम जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू, माघील पाच दिवसात आगीचे दहावी घटना

पार्श्वभूमी

क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला, मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत, पत्नीची माहिती


 


कांदिवलीहून क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता. मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत. ते आत्महत्या करु शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमना हिरेन यांनी दिली. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं, असंही त्या म्हणाला. विमला हिरेन यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान ही प्रतिक्रिया दिली. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला.


 


सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींना तुरुंगात टाकल्याचा राग आहे का? फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्र्यांचं प्रत्युत्तर


 


उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युमुळे आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी काळंबेरं असल्याचं सांगत, मनसुख हिरेन आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात फोनवरुन संवाद होत असल्याचा दावा केला. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का, असा प्रतिसवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला.


 


ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदरावारांची यादी जाहीर


 


तृणमूल काँग्रेस अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 291 जागांसाठी उमेदरावारांची यादी जाहीर केली. यादीत नमूद केल्यानुसार ममता बॅनर्जी नंदीग्राममधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळं भवानीपूर मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. ममता बॅनर्जी यांच्या जागी तृणमूल नेते सोवान चॅटर्जी हे भवानीपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीसुद्धा शिवपूर येथून निवडणूक लढवणार असल्याचं या यादीतून स्पष्ट करण्यात आलं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.