Breaking News LIVE : गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाचं मोठं यश, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त

Breaking News LIVE Updates, 5 March 2021:दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Mar 2021 11:37 PM
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव संवर्धनासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाची अखेर आज 12 व्या दिवशी यशस्वी सांगता झाली. इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी 12 दिवसापूर्वी हे आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आज लेखी आश्वासनासह निधी तरतूद करण्याचे पत्र दिल्यावर या आंदोलनाची समाप्ती करण्यात आली. प्रशासन यासाठी खनिज विकास निधीतून रकमेची तरतूद करणार असून निधीची अडचण भासल्यास अन्य स्रोतातून निधी दिला जाणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी याविषयी घेतलेल्या व्हिडिओ कॉनफरेसिंग मध्ये या कामाचे खोलीकरण आणि सौंदर्यीकरण असे 2 टप्पे सुचवित निधी उपलब्ध करून दिला होता. सोबतच पुरातत्व विभागाच्या परवानगी साठी विहित नमुन्यात सादरीकरण करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले होते. हे निर्णय झाल्यावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करुन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार निलेश गौड यांनी आंदोलन मंडपात पोचून धोत्रे यांना आंदोलन समाप्त करण्याची विनंती केली आणि त्यानंतर बंडू धोत्रे यांनी आपले आंदोलन समाप्त केले.
बारामती शहरातील बुरुड गल्ली आणि दुर्गा थेटर जवळ चेन स्नॅचिंगचा प्रकार घडलाय. एकाच दिवशी बारामती शहरात 2 ठिकाणी चैन स्नॅचिंगचे प्रकार घडले आहेत. सदरची चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीत. या चोरीत चोरट्यांनी एका ठिकाणी मंगळसूत्र तर दुसऱ्या ठिकाणी सोन्याची चैन लांपस केली आहे. दोन चोरटे शाईन गाडीवरून आले आणि महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि साखळी चोरून पोबारा केलाय. दोन अज्ञात चोरट्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून बारामती शहरासह तालुक्यात चोरीच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
गांजा तस्करी साठी कल्याणात आलेल्या गुजरातच्या गांजा तस्कराला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केलीय .विजय पटेल असे या गांजा तस्कराचे नाव असून त्याच्याकडून 100 किलो गांजा व त्याची गाडी असा सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करन्यात आलाय .गुजरात येथील गांजा तस्कर कल्याणात गांजा घेऊन येणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलीसांना मिळाली होती .या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत विजय पटेल याला त्याला ताब्यात घेतलं ,त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे 100 किलो गांजा आढळून आला या गांजाची किंमत सुमारे 14 लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली .त्याने गांजा कुठुन व कुणाला विकण्यासाठी आणला याचा शोध घेत आहेत.
दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या आयोजन व उपयोजनाबाबत तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीची बैठक पुणे बोर्ड कार्यलयात पार पडली. दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर आज बोर्डाची परीक्षा नेमकी कशी घ्यायची? त्याचे आयोजन नेमके कसे करावे यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षांचे आयोजन करताना आवश्यक उपाययोजना निश्चितीसाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची प्रथम बैठक आज राज्यमंडळ, पुणे येथे घेण्यात आली. यामध्ये अनेक बोर्डाच्या परीक्षेच्या आयोजनाच्या प्रश्नावर ही समिती चर्चा करुन आयोजनाबाबात उपाययोजना करणार आहे. यामध्ये बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील, माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे, बोर्डाचे सेवानिवृत्त अध्यक्ष आणि विभागाचे सचिव उपस्थित होते. एप्रिल-मे महिन्यात परीक्षा घेतली जाणार याबाबत वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर त्याच्या आयोजन व उपाययोजना साठी ही समिती सल्लागार म्हणून काम करणार आहे.
गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाला मोठं यश आलं आहे.
छत्तीसगड सीमेपासून 4 ते 5 किमी आत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त केला आहे. विशेष म्हणजे नक्षलींचा हा शस्त्र कारखाना नक्षलींचा गड मानल्या जाणाऱ्या अबुझमाड भागात होता. त्यामुळे एकाप्रकारे वाघाच्या जबड्यात घुसून गडचिरोली पोलिसांच्या सी 60 दलाने त्याचे दात पाडले आहे, असा पोलीस अधिकाऱ्यांचा दावा आहे. दरम्यान या घटनेत सी 60 दलाचा एक जवान जखमी झाला आहे, इतर जवान सुरक्षित आहेत. मार्च ते मे महिन्यादरम्यान नक्षलींचा टीसीओसी म्हणजेच टेक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन असते. त्याकाळात नक्षली सीमा ओलांडून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे यंदा सी 60 पथकाने अॅडिशनल एसपीच्या नेतृत्वात नक्षलींचा टीसीओसीला आळा घालण्यासाठी काऊंटर ऑपरेशन राबवले होते. त्याच दरम्यान नक्षलींचा शस्त्र कारखाना अबुझमाड परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.
रायगड - मधमाशा चावल्याने उरण इथल्या द्रोणागिरी डोंगरावरुन तीन इसम दरीत कोसळले, दोघे गंभीर जखमी, तर एकाच्या डोक्याला दुखापत, जखमींमध्ये दोन तरुण आणि एक 60 वर्षीय व्यक्तीचा समावेश, दरीत कोसळलेल्या जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु, डोंगरातील जंगलातून जखमींना स्थानिक तरुण आणि डॉक्टरांच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलकांची तोडफोड... गेले महिनाभर तिथले पाचशे कंत्राटी कामगार पगारासाठी करत आहेत डेरा आंदोलन, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने काठी- झाडू घेऊन कार्यालयात शिरले आंदोलक, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांच्या कक्षाची काही अंशी तोडफोड, सातत्याने सनदशीर आंदोलन करून देखील अधिकारी जुमानत नसल्याने उग्र आंदोलन करत दिला इशारा
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. काल रात्रीपासून बेपत्ता असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीत सापडला.
औरंगाबाद : ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याला भीषण आग लागली असून आग तब्बल 5 एकर परिसरात पसरली आहे. किल्ल्याच्या तटबंदी भागाभोवती आग लागली आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. देवगिरी किल्ला परिसरात धुरच धूर पसरला आहे.
ममता बॅनर्जी यांनी आपल्या तृणमूल काँग्रस पक्षाचे उमेदवार जाहीर केले असून त्या स्वत: नंदीग्राममधून निवडणूक लढणार आहेत. TMC ने 50 महिलांना तिकीट दिले आहे तर 27 पेक्षा जास्त जागांवर युवकांना तिकीट दिलं आहे. भवानीपूरातून शोभन चटर्जी यांना तिकीट दिलं असून क्रिकेटर मनोज तिवारी शिवपूरातून निवडणूक लढणार आहे. TMC एकूण 291 जागांवर निवडणूक लढणार असून 3 जागा सहयोगी पक्षांना सोडल्या आहेत.

जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेत पिकांचे आणि फळ पिकांचे नुकसान झाले. पीडित शेतकऱ्यांना कमाल 2 हेक्टर क्षेत्रातीतील शेत पिकांसाठी प्रति हेक्टर 10 हजार रुपये
फळ पिकांसाठी 25 हजार प्रति हेक्टर
या दराने दोन हफ्त्यात चार हजार 374.43 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर

बीड इथल्या एका रंगेल प्राध्यापकाला पाच वर्षाच्या कारावासाची विशेष आतिरिक्त न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सहकारी प्राध्यापिकेचे अश्लील चित्रफितीची लिंक पाठवून विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील रंगेल प्राध्यापकास विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीएम खडसे यांनी पाच वर्ष सश्रम कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावलेल्या प्राध्यापकाचे नाव गजानन नरहरी करपे वय वर्षे 41 राहणार स्वराज नगर बीड असे आहे हा प्राध्यापक शहरातील एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात नोकरीला होता याच महाविद्यालयातील प्राध्यापक केला व्हाट्सअप वरून अश्लील व्हिडिओ असलेली लिंक पाठविली दरम्यान पीडित प्राध्यापिका ही स्वतः विशाखा समितीच्या अध्यक्षा होती तिने हा प्रकार महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला नोव्हेंबर 2017 मध्ये घडलेल्या या प्रकारावरून महाविद्यालय प्रशासनाने करपे याला निलंबित केलं होतं.
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड आणि एटापल्ली तालुक्याच्या लगत असलेल्या छत्तीसगड सीमेवर पोलिस-नक्षली यांच्यात गेल्या काही तासात दोनदा चकमक झाली आहे. गडचिरोली नक्षलविरोधी पथकाचे जवान या सीमावर्ती भागात मोहीम राबवत होते. मात्र नक्षल्यांनी पथकाला घेरल्यानंतर धुमश्चक्री उडाली. एक जवान जखमी असल्याची माहिती, गडचिरोली पोलिसांच्या मदतीला छत्तीसगड पोलिसांची चमू परिसरात दाखल, गडचिरोली पोलिसांचे हेलिकॉप्टर देखील मदतीसाठी तैनात केले. कोपर्शी जंगल परिसरात अशी चकमक सुरू असल्याच्या घटनेला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रियेस नकार दिला आहे.
अकोला शहरातील लकडगंज परिसरातील लाकडांच्या दुकानांसह घरांना आज पहाटे भीषण आग लागली आहे. सोबतच आगीत तीन सिलेंडरचे स्फोटही झालेत. पहाटे तिनच्या सुमारास ही आग लागलीये. या आगीत विदर्भ टिंबर, दुर्गेश मार्ट, डेहनकर टिम्बर मार्ट, नुर अहेमद टिंबर मार्ट ही लाकूड आणि बांबूंची दुकानं जळून खाक झालीत. अग्नीशमन दलाच्या दहावर बंबांनी सकाळी सहा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवलंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतेये. या आगीत 50 लाखांवर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आमदार पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत व जामखेड या तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन या विषयात रुची निर्माण व्हावी यादृष्टीने फिरते तारांगण व टेलिस्कोपचे उद्घाटन आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

यावेळी ग्रामीण शाळेत शिकणाऱ्या मुलांना अंतराळाबाबत व या विषयातील शिक्षणाबाबत रुची निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम करत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं

या विषयात कोणताही राजकारण न आणता सीएसआर फंडातून अशा गोष्टी मूलापर्यंत पोचवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे

हे फिरते तारांगण राज्यातील विविध खेड्यापाड्यातील शाळांमध्ये पोहचवून विद्यार्थ्यांना एक वेगळ्या माध्यमातून शिक्षण देण्याचे या संकल्पना मागचे उद्दिष्ट आहे
भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गांजाची तस्करी करताना तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 137 किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा ट्रक छतीसगढ राज्यातून नागपूरला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारधा टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
ओबीसी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात बोलावली तातडीची बैठक
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ॲडव्होकेट जनरलही यांच्यासह संबंधित बैठकीला उपस्थित राहणार
अन्न व औषध प्रशासन विभागाची मेडिकल स्टोअर्स आणि फार्मसीसाठी एडवायजरी, दुकानात येणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला सर्दी, खोकला आणि ताप संदर्भातल्या औषधी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देऊ नये.. पूर्व विदर्भात कोरोनाचा फैलाव लक्षात घेऊन हा निर्णय..

नाशिक- दुय्यम निबंधक कार्यालयातील कागदपत्रे गहाळ झाल्याचे प्रकरण
, कनिष्ठ लिपिक सुनील पवार वर गुन्हा दाखल
,सरकारवाडा पोलिस ठाण्यात भारतीय नोंदणी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल
, सहाय्यक दुय्यम निबंधक संजय ठाकरे यांनी दिली तक्रार
, कायमस्वरूपी जतन करण्याचे 3 दस्तक चोरी केल्याचा आरोप
, पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फ़त या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु
कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड साहित्य खरेदी घोटाळा विधिमंडळात गाजणार. घोटाळ्याबाबत विधिमंडळात लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्र फडणवीस यांच्याकडे केली सुपूर्द केली आहे. घोटाळ्याची कॅग मार्फत चौकशी करण्यासाठी फडणवीस केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. साहित्य खरेदीत 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा निंबाळकर यांचा दावा आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-१९ विरोधी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. विजय सुरासे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर : चंद्रपूर शहराजवळ असलेल्या जमनजट्टी परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात 2 जण जखमी, अस्वलाच्या हल्ल्यात महादेव गुंडेट्टीवार (55) हा किरकोळ जखमी तर सुनील लेनगुरे (30) हा गंभीर जखमी, हे दोघे या परिसरात शौचास गेल्याची प्राथमिक माहिती
चंद्रपूर : चंद्रपूर शहराजवळ असलेल्या जमनजट्टी परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात 2 जण जखमी, अस्वलाच्या हल्ल्यात महादेव गुंडेट्टीवार (55) हा किरकोळ जखमी तर सुनील लेनगुरे (30) हा गंभीर जखमी, हे दोघे या परिसरात शौचास गेल्याची प्राथमिक माहिती
चंद्रपूर : चंद्रपूर शहराजवळ असलेल्या जमनजट्टी परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात 2 जण जखमी, अस्वलाच्या हल्ल्यात महादेव गुंडेट्टीवार (55) हा किरकोळ जखमी तर सुनील लेनगुरे (30) हा गंभीर जखमी, हे दोघे या परिसरात शौचास गेल्याची प्राथमिक माहिती
नागपूर-

भाजप नगरसेवक प्रकाश भोयर यांची नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे...

स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे आज निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रकाश भोयर यांची स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी निवड जाहीर केली..

प्रकाश भोयर हे भाजपचे वरिष्ठ नगरसेवक असून ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील एक प्रमुख नगरसेवक आहेत..

विशेष म्हणजे पुढील वर्षी नियोजित असलेल्या महापालिका निवडणुकांच्या आधी ही स्थायी समितीचे अंतिम टर्म असल्याने भोयर यांच्या समोर गतीने काम करण्याचे आव्हान असणार आहे...
विदर्भाची पंढरी शेगावात यावर्षीच्या श्री संत गजानन महाराजांच्या १४३ वा प्रगटदिनोत्सवात भाविकांना सामील होता येणार नाही.......सध्या बुलढाणा जिल्ह्यात कोरोना आपले पाय पसरवीत असल्याने जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी जिल्ह्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिलेत , त्यामुळे यंदाचा १४३ वा प्रगटदिन उत्सव मंदिरात अंतर्गत कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. श्रींचा प्रगटदिन उत्सव दरवर्षी श्री संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमासह लाखो भाविक भक्तांच्या व वारकऱ्यांचे उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. मागील वर्षापासून आतापर्यंत कोरोना च संकट पसरल असल्याने, तसेच कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाचे निर्देशानुसार प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देशीत असल्याने आज असलेला श्रींचा १४३ वा श्री प्रगटदिनोत्सव यावर्षी सालाबादाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार नाही. उत्सवातील कार्यक्रम धार्मिक प्रथा-परंपरेनुसार मोजक्या उपस्थितीत अंतर्गतच संपन्न होतील. अशी माहिती श्री गजानन महाराज संस्थानकडून देण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-१९ विरोधी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला.

यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. विजय सुरासे आदी उपस्थित होते.
नागपूर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरच्या घरी लग्न करायचे असल्यास गट विकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांना सूचना देऊन नियमांचे पालन करून लग्न करावे, असा आदेश दिला आहे. 50 लोकांच्या आत गर्दी ठेऊन , social डिस्टनसिंगचे नियम पाळून लग्न करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
बारावे ज्योतिर्लिंग असलेले वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराची महाशिवरात्रीची यात्रा प्रशासनानं रद्द केली आहे. वाढता कोरोना चा प्रसार पाहता ही यात्रा यावर्षी साठी स्थगित करण्यात आली आहे .. फक्त काही स्थानिक पुजारी मोजक्या संख्येने मंदिरात त्यादिवशी जातील आणि पूजाअर्चा करतील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या दिवशी राज्यभरातून हजारो लोक वेरुळला दर्शनासाठी येतात ही गर्दी धोक्याचे ठरू शकते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे
पुणे : आज पूजा चव्हाण प्रकरणात भाजप वकिल आघाडीने दाखल केलेल्या खटल्यात आदेश दुपारी चार वाजण्याच्या होईल असा अंदाज आहे.
औरंगाबाद शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कृष्णा पाटील डोनगावकर यांच्या गाडीवर अज्ञात दुचाकीस्वरांनी हल्ला केलाय, गुरुवारी रात्री गंगापूर औरंगाबाद रोडवर ही घटना घडली आहे ...कृष्णा डोनगावकर गंगापूर वरून औरंगाबादकडे निघाले असता गंगापूर शहरापासून काही अंतरावर दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला करत धुम ठोकली असा आरोप कृष्णा यांनी केला आहे, या हल्ल्यात कृष्णा कारच्या गाडीची समोरील काच फुटली आहे..गंगापूर सहकारी कारखान्याच्या गैरव्यवहार प्रकरण डोनगावकर यांनी उघडकीस आणल्या प्रकरणी हा हल्ला झाल्याची चर्चा आहे..कृष्णा पाटील यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात दुचाकी स्वरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
नांदेड येथे टंकलेखन (टायपिंग)च्या परीक्षांना सुरवात झाली आहे. या परीक्षेसाठी नांदेड शहरातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या ड्रीमलँड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत परीक्षा सेंटर देण्यात आलेय. परंतु गेल्या एक दिवसा पासून परीक्षेच्या वेळेत लाईट जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेपासून मुकावे लागत आहे .टंकलेखन परीक्षेचा वेळ सकाळी 9 ते 10:30 असा असतांना अद्याप विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रातच प्रवेश देण्यात नाही आलाय.त्याच प्रमाणे सदर मराठी, इंग्रजी टंकलेखन परीक्षेचा पेपरच्या वेळा केंद्र प्रमुख आपल्या मर्जी नुसार बदलत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. तसेच परीक्षा केंद्र निश्चित करतांना वीज, पाणीपुरवठा ,स्वच्छता, बैठक व्यवस्था ह्या गोष्टीची पूर्तता सदर संस्थेकडे आहे की नाही.याची कोणतीही तपासणी नांदेड शिक्षण विभागाकडून न करता परीक्षा केंद्र देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.टंकलेखन परीक्षेत एवढा मोठा गोंधळ होत असतांना व टंकलेखन चे मराठी,इंग्रजी थर्टी फॉर्टी या दोन विषयाचे पेपर रद्द झालेले असतांना याची कोणतीही माहिती नांदेड शिक्षण विभागाला नाहीय. त्यामुळे ऐन परीक्षेच्या वेळेला विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊन ,शैक्षणिक नुकसान होत आहे.
'मास्क काढा' मनसे अध्यक्ष राज ठाकरेच्या माजी महापौरांना सूचना,

माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी केले राज ठाकरेंचे स्वागत,

बुके देऊन स्वागत करताना राज यांनी इशारा करत मास्क काढण्याच्या दिल्या सूचना,

राज स्वतः विनामस्क नाशिक मध्ये दाखल

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची घडामोड,

हे प्रकरण अकरा न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे द्यावे अशी मागणी करणारा राज्य सरकारचा अर्ज दाखल,

8 मार्चला सुनावणी होत आहे त्याआधी राज्य सरकारची कोर्टापुढे मागणी,

मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात प्रकरण 8 मार्चला प्रत्यक्ष सुनावणी ऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होणार,

सध्या हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आहे.. इंद्रा सहानी प्रकरणात 50 टक्के आरक्षण मर्यादेचा निर्णय नऊ न्यायमूर्तींचा असल्याने हे प्रकरण आता अकरा न्यायमूर्तींंकडे सोपवण्याची मागणी

पार्श्वभूमी

शहरातील जुन्या वास्तूंचा खासगीकरणातून विकास करण्याचा पुणे महानगरपालिकेचा निर्णय
केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत पुणे महापालिकेनेही खासगी गुंतवणूकीची दारं उघडली आहेत. त्यातही पुणेकरांच्या आपुलकीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूंचा पुनर्विकास खासगी सहभागातून केला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे. पुण्याची ओळख असलेली ही ठिकाणी आता खासगी विकसकांच्या हवाली केली जाणार असल्याने या स्थळांचे जतन होणार की खासगीकरण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.


 


तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरी आयटी छाप्यानंतर कंगना रनौतचे ट्विट
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची बुधवारी सकाळपासून इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे. अशा परिस्थितीत कंगना रनौतने आपली प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहे. आज कंगनाने ट्विट करुन दोघांवरील आपला राग व्यक्त केला आहे. कर चुकवण्याबरोबरच काळ्या पैशाच्या व्यवहाराचेही गंभीर आरोप तिने केले. मात्र, तिने कोणाचेही नाव घेतले नाही.


 


"दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" मास्क घालत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला
"काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. अरं बाबा तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसर्‍याला होईल त्याचं काय? दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानपरिषदेत उत्तर देत होते. "मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी "मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय", असं उत्तर राज ठाकरेंनी पत्रकारांना दिलं होतं. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधानपरिषदेत राज ठाकरे यांना टोला लगावला.


 


OPEC चा कच्च्या तेलाचे उत्पादन न वाढवण्याचा निर्णय, इंधनाच्या किंमती वाढणार?
जगातल्या तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या OPEC देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या ज्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येतंय तेवढाच उत्पादनाचा स्तर राखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमती लवकरच कमी होतील हा आशाही धुसर झाली आहे. सौदी अरबच्या नेतृत्वाखाली ओपेक देशांची गुरुवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यामध्ये ओपेकचा सदस्य नसलेला पण प्रमुख तेल उत्पादक असलेला देश रशियाही सामिल झाला होता. जगाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे मंदीच्या खाईत गेली असताना या पार्श्वभूमीवर ओपेकने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या अनेक देशांना याचा फटका बसणार असून त्या देशांची अर्थव्यवस्था बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.