- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
Breaking News LIVE : लातूर जिल्ह्यात आज नवीन 48 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
Breaking News LIVE : लातूर जिल्ह्यात आज नवीन 48 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
Breaking News LIVE Updates, 3 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
03 Mar 2021 11:25 PM
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील खर्डी उंबरमाळी स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे रुळालगत जंगल परिसरात भीषण आग लागल्याने वणवा पेटला. त्यामुळे आगीचे लोळ रुळांवर येत असल्यामुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या... मोनिका टेम्भुरणे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव.. मोबाईल वर जास्त बोलते या।मुद्द्यावर आई सोबत वाद झाल्याने मुलीने शेजारच्या वस्तीत राहणाऱ्या आजीच्या घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.. पोलिसांनी जरीपटका पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूचे प्रकरण नोंदविले आहे...
कसारा - मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील खर्डी उंबरमाळी स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे रुळालगत जंगल परिसरात भीषण आग लागल्याने वणवा पेटला.त्यामुळे आगीचे लोळ रुळांवर येत असल्यामुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. हि घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 371कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडलीय तर 7 जणांचा मृत्यू झालाय. वाढत असलेल्या कोरोना रुग्णासोबतच मृत्यूचा आकडाही वाढल्यानं चिंतेत भर पडलीय. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 51 हजार 287 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1 हजार 278 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2 हजार 445 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 308 जणांना (मनपा 279, ग्रामीण 29) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 47 हजार 564 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून शाळा बंद करण्याचा आदेश. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय. नववी पर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश. शाळकरी मुलांमधील करोनाची वाढती आकडेवारी पाहून निर्णय. सातारा जिल्हाधिकारी यांनी काढलेली काढले आदेश. 31 तारखेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश
लातूर जिल्ह्यात आज नवीन 48 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25493 वर पोहचली आहे. लातूर जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 622 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 711 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 24160 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 44 आहे.
अमरावती : जिल्ह्यात आज दिवसभरात 671 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आज सर्वाधिक 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या 37 हजार 123 वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या नवव्या दिवशीही जिल्ह्यातील परिस्थीती फारशी बदललेली नाही.
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 671 कोरोना रुग्ण आढळले. आज 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 37 हजार 123 वर. लॉकडाऊनच्या नवव्या दिवशीही परिस्थीती जैसे थे
जालना अंबड रोडवर 5 च्या सुमारास अज्ञात ट्रकने धडक दिल्याने काळवीटाचा मृत्यू झाला, जालना शहराजवळील इंदेवाडीजवळ सूतगिरणी समोर हे काळवीट रस्त्यावरून पळत असताना याला अज्ञात ट्रक ची धडक बसली, दरम्यान स्थानिकांनी या कळवीटाला रस्त्याच्या बाजूला घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या धडकेत हे काळवीट जागीच गतप्राण झाल.
विदर्भाची पंढरी म्हणून मानल्या जाणाऱ्या संत नागरी शेगावात यावर्षीच्या श्री संत गजानन महाराजांच्या 143वा प्रगटदिनोत्सवात भाविकांना सहभागी होता येणार नाही. सध्या बुलढाणा जिल्ह्यात कोरोना आपले पाय पसरवीत असल्या कारणांनी जिल्हाधिकारी बुलढाणा एस राममूर्ती जिल्ह्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देशीत असल्याने यावर्षीचा 143 वा प्रगटदिनोत्सव मंदिरात अंतर्गत कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील 'फार्मा - पार्क'ला गावकऱ्यांचा विरोध. लोकांना फसवून बेकायदेशीर रित्या जमिनी खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप... जमिनी खरेदी करण्यासाठी हुकूमशाही केली जात असल्याचा आरोप. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भूमिका या परस्पर विरोधी ... शेतकऱ्यांच्या बाजूने कोण आहे आणि फसवणूक कोण करतय हे समजणे गरजेचे. समाजसेविका उल्का महाजन यांचा आरोप , ४ मार्च रोजी महसूल मंत्र्यांची भेट घेणार. उल्का महाजन यांनी पत्रकार परिषदेत केले आरोप.
एबीपी माझाच्या दणक्यानंतर वेळापूर येथे दणक्यात वाढदिवस साजरा करणारा पोलीस कर्मचारी विनोद साठे व उपस्थित असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांचेसह 20 ते 25 जणांवर वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, चौकशी अधिकारी डिवायएसपी नीरज राजगुरू यांनी पुढील कारवाईचा अहवाल पोलीस अधीक्षकांना पाठवला.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा झेंडा. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. संतोषकुमार कोरपे. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे श्रीधर कानकिरड. डॉ. संतोषकुमार कोरपे सलग तिसऱ्यांदा बँकेच्या अध्यक्षपदी. जिल्हा बँकेच्या सर्व 21 जागांवर सहकार गटाचा झेंडा. बँकेचं अकोला आणि वाशिम जिल्ह्यात कार्यक्षेत्र.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा झेंडा. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. संतोषकुमार कोरपे. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे श्रीधर कानकिरड. डॉ. संतोषकुमार कोरपे सलग तिसऱ्यांदा बँकेच्या अध्यक्षपदी. जिल्हा बँकेच्या सर्व 21 जागांवर सहकार गटाचा झेंडा. बँकेचं अकोला आणि वाशिम जिल्ह्यात कार्यक्षेत्र.
बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिला आहे. अश्लील व्हिडीओ प्रकरणावरुन मोठी कर्नाटकात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिल्याची माहिती रमेश जारकीहोळी दिली. रमेश जारकीहोळी हे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री होते. युवतीला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुसद मध्ये 7 मार्चपर्यंत कडक संचारबंदी तर यवतमाळ शहरात आठ दिवसाचा लॉकडाऊन लावायचा? किंवा नाही हे उद्याच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. यवतमाळ जिल्हाधिकारी एम देवेंद्रर सिंग यांची माहिती.
ठाणे जिह्यातील उल्हासनगरसारख्या शहरी भागात बालविवाह संपन्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार वधू-वराकडील 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मेटेंच्या घरी आयकराने छापेमारी केली आहे.
मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने व्हिडीओ काढत चक्क आत्महत्येची धमकी दिल्याचा प्रकार जालना जिल्ह्यात घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर पोलीस ठाण्याचा हा कर्मचारी असून त्याचं नाव अशोक कांबळे आहे. बदनापूर पोलीस स्टेशनचे पीआय हे अवैध धंद्याचं कलेक्शन करतात. त्यामुळं त्यांच्या जाचाला मी कंटाळलो असून त्यांची बदली ही कंट्रोल रुमला करावी.अन्यथा मी आत्महत्या करेन अशी धमकी या पोलीस कर्मचाऱ्यानं या व्हिडिओत दिली आहे. त्याचबरोबर माझ्या आत्महत्येला सर्वस्वी वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहतील असंही या व्हिडिओत म्हंटलं आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकारामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद सौद्यादरम्यान कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचं पहायला मिळालं. व्यापारी सौदे सुरू असताना बहुतांश व्यापारी विनामास्क दिसून येतायत. व्यापाऱ्यांनी मास्क ही घातला नाही आणि सोशल डिस्टन्सही पाळला नाही.
नाशिकचं साहित्य संमेलन पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरु, साहित्य संमेलनावर कोरोनाचं सावट
नाशिक तालुक्यातील रोहिले परिसरातील वनक्षेत्रात वणवा पेटून 11 हेकटर वरील जंगल आगीत जळून खाक झालाय. गवत, पाला पाचोळासह 3 वर्षांपूर्वी लावलेली 210 रोप आगीच्या भक्षस्थानी गेली असून इतर मोठ्या झाडांना ही आगीची आस लागली आहे. आग कशी लागली हे स्पष्ट नसलं तरी कोणीतरी जाणूनबुजून आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परिसरातील झाड झुडपं मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहेत .रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याने मोठं नुकसान झालंय, स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वनक्षेत्राकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला..मात्र आगीने रौद्र रूप धारण केलेलं असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात बराच वेळ गेला, त्यामुळे वनक्षेत्र जळून खाक झालं आहे, वन वनविभागाच्या अधिकारीनी सकाळी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पोलिसात तक्रार करण्यात आलीय.
भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मध्ये भीषण आग लागली आहे. मेन व ऊद ठेवलेल्या गोदामात भीषण आग लागली असून आगीचे कारण अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
नायगाव तालुक्यातील देगाव येथील साने गुरुजी विद्यालयातील शिक्षकाने दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे व मोबाईल वरून अश्लील चॅटिंग करून छेडछाड केलीय. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक बापूराव मोरे याला अटक करून यांच्या विरोधात कुंटूर पोलीसात 354 (ड )12 आयटी 65,अनुसूचित जाती 3 (1)(6)(1)3(6) या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मंत्री एकनाथ शिंदे मुक्त विद्यापीठाची बीए परीक्षा उत्तीर्ण, 78 टक्के गुण मिळाले, दीक्षांत समारोहात केला सन्मान
विरोधकांकडे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. संजय राठोड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला अडचणीत आणू शकतात.
औरंगाबाद - औरंगाबाद वाळूंज एम आय डी सी भागाती कामगार चौकातील ध्रुव तारा कंपनीला आग, पहाटेच्या सुमारास आग, आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान, आगीच कारण अद्याप अस्पष्ट
रत्नागिरी जिल्ह्यात राज्याच्या इतर भागांचा विचार करता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. पण, असं असलं तरी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर या तुलनेनं छोट्या असलेल्या बाजारपेठांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. मंगळवारी केवळ दोन तासात राजापूरमध्ये 22 जणांकडून 500 रूपये प्रति व्यक्ति याप्रमाणे 11 हजार तर लांजामध्ये 39 जणांकडून 19 हजारांचा दंड वसुल करण्यात आला. सध्या जिल्ह्यात रात्री 10 ते पहाटे 5 यावेळेत संचार बंदी आहे.
सोलापूर-
बार्शीत शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या अन्नछत्र आणि कार्यालयात तोडफोड,
अन्नछत्र आणि कार्यलयावर हल्ला करून खुर्च्यांची तसेच साहित्याची तोडफोड केल्याची माहिती,
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि नगरसेवक अमोल चव्हाण यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आंधळकरांचा आरोप,
5 मार्च रोजी नगरपरिषदेच्या विरोधात नियोजित मोर्चाच्या फेसबुक पोस्टवरून वाद झाल्याचे आंधळकर यांची माहिती,
या प्रकरणात गुन्हा दखल करणार असल्याची आंधळकर यांनी दिली माहिती
भिवंडीमध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिवंडीतील भाग्यनगर लसीकरण केंद्रावरची मंगळवारी ही घटना घडली. मयत सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा आहे.
पार्श्वभूमी
पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता, शांताबाई राठोड यांचा गंभीर आरोप
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. पूजाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करायला गेलेल्या पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या परिवारावर गंभीर आरोप केले आहेत. पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे.
Ramesh Jarkiholi | बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल
बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. नोकरीच्या निमित्ताने जवळीक साधून युवतीवर अत्याचार केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे.
Congress | बंगालच्या आघाडीवरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान, जी-23 गटाच्या आनंद शर्मांची जाहीर टीका
निवडणुकीची लढाई पश्चिम बंगालमध्ये सुरु झालीय. पण तलवारी उपसल्या जातायत काँग्रेस पक्षातच. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं जी निवडणूकपूर्व आघाडी केली आहे त्यावर पक्षाचेच ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी जाहीरपणे टीका केली आहे. आनंद शर्मा हे सोनिया गांधींना पक्षाच्या अवस्थेबद्दल पत्र लिहिणाऱ्या जी23 गटाचे एक महत्वाचे सदस्य. बंगालमध्ये काँग्रेस-डावे- आयएसएफ अशा तीन पक्षांची एकत्रित आघाडी झालीय. त्यात आयएसएफला सोबत घेण्यावरुन आनंद शर्मांनी नाराजी व्यक्त केलीय.
'गोकुळ'च्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा, पुन्हा हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य सरकारच्या अध्यादेशामुळे आधीच वादाच्या भोवर्यात अडकलेल्या कोल्हापूर दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती आर.डी. धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता या निवडणुका अधिक काळ थांबवता येणार नाहीत आपल्याला आता कोरोना सोबत जगायला शिकायला हवं असे स्पष्ट केलं. त्यामुळे आता या निवडणूक कार्यक्रमात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टानं नकार दिल्यानं अखेर संचालक मंडळानं यासंदर्भात दाखल केलेली आपली याचिका मागे घेतली.