Breaking News LIVE : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या
Breaking News LIVE Updates, 25 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या. आज सायंकाळी 7 वाजता सरकारी बंगल्यात आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ. दिपाली चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी, हरीसाल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प असं महिला अधिकाऱ्याच नाव. आत्महत्या करण्यापूर्वी 4 पानांचं सुसाईट नोट लिहल्याची माहिती कळतेय. त्यात काय लिहलंय हे अद्याप कळू शकले नाही.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आशा भोसले यांचं संगीत क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांनी असंख्य मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत.
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 381 कोरोना रुग्ण आढळले. आज 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 46 हजार 997 वर. एकूण रुग्णांची संख्या - 46997. सक्रीय रुग्ण - 4121. एकूण मृत्यू - 647.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी निर्बंध घातले आहेत. यात हॉटेल, रिसॉर्ट, हॉल आणि खाजगी मोकळ्या जागेत एकत्रित येऊन हे सण साजरे करू नयेत असे आदेश दिलेत. पण तसा अध्यादेश लोणावळा नगरपरिषदेला आणि हॉटेल व्यावसायिकांना आलेला नाही. त्यामुळे पर्यटकांना इथं बंदी नाही. तेव्हा त्यांनी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी यावं. मात्र तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं आवाहन लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केलंय.
मागील 68 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे आंदोलन करत असलेलं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वर्षा बंगल्यातुन बाहेर पडलं. साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचं मराठा आरक्षण मिळण्यासाठी 68 दिवसांपासून आंदोलन. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आंदोलकांनी शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेटीत मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा, आरक्षण प्रश्नी मार्ग काढण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन. 'कोपर्डी बलात्कार प्रकरणी सरकारी वकील उज्वल निकम यांची तत्काळ नियुक्ती करण्याचं आश्वासन'. मुख्य आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची एबीपी माझाला माहिती माहिती.
मुंबई : मागील 68 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे आंदोलन करत असलेलं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचं मराठा आरक्षण मिळण्यासाठी 68 दिवसांपासून आंदोलन, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार, शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी पोहोचले
सचिन वाझेंसाठी एनआयएनं मागितली 15 दिवसांची कोठडी, वाझेंंचा गुन्हा हा देशपातळीवरील मोठा गुन्हा, एखाद्या पोलिसाचा अश्या गुन्ह्यात सहभाग असणं ही शरमेची बाब, एनआयएच्यावतीनं एएसजी अनिल सिंह यांचा युक्तिवाद
नाशिक महापालिका प्रशासनाची चिंता वाढली, महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक आणि नोडल अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण , एकीकडे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असतांनाच दुसरीकडे कोरोना नियंत्रणाची मुख्य जबाबदारी असलेले अधिकारी कोरोनाच्या विळख्यात , आठवडाभरात महापालिकेतील 20 कर्मचारी बाधित
कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प शरद पवारांमुळे रखडला,
केंद्रानं तयारी दाखवूनही प्रतिसाद न दिल्यानं प्रकल्प थंड बासनात..
भाजप खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचा केंद्रीय टास्क फोर्सला भेटल्यावर आरोप
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बोलवली गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक, बैठकीला गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवही उपस्थित, बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल तयार करण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती, फोन टॅपिंग झालं तेव्हा कुटे गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव होते, आपल्याकडून या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली नसल्याचं काल कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे, तसंच काही प्रमाणात फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली आणि दुसरेच नंबर टॅप केल्याचंही कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, याप्रकरणात आता सविस्तर अहवाल तयार केला जात असल्याची माहिती
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
सोलापुरातील मार्कंडेय रुग्णालयात झालेले ऑक्सिजन टॅंक स्फोट प्रकरणात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एक रुग्ण आणि एका रुग्णाच्या नातेवाईकाचा समावेश आहे. या दोघांच्या मृत्यूस ऑक्सिजन टॅंकचा स्फोटच कारणीभूत असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
जालना तालुक्यात रात्री झालेल्या पाऊस आणि गारपीटीन द्राक्ष बागांचे मोठं नुकसान झालंय, तालुक्यातील,कडवंची, धारकल्याण, नाव्हा, नंदापुर या भागात रात्री 9 ते 10 च्या जोरदार पाऊस झाला,यात गारपीट मोठ्या प्रमाणावर झाल्याने मोठ्या प्रमाणावर द्राक्ष लागवड असलेल्या या गावात द्राक्ष बागांना याचा चांगलाच फटका बसलाय रात्री तासभर चाललेल्या जोरदार पाऊस आणि गारपीटी ने द्राक्षाचे गड जमिनीवर पडून अनेक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालय दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय..
महाविकास आघाडी सरकारमधील नेते आज राज्यपालांची भेट घेणार होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत नसल्याने ही भेट टळणार आहे. राज्यपाल 28 मार्चपर्यंत डेहरादूनच्या दौऱ्यावर.
महाराष्ट्र राज्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता महाराष्ट्रातील वाहनांना गुजरात राज्यात प्रवेश नाकारला. गुजरात पोलीसांनी अनेक वाहने परतवली. नंदुरबार,धुळे,जळगाव जिल्ह्य़ातील वाहनचालकांना प्रवेश नाकारल्याने रुग्णांचे हाल झाले आहे. महाराष्ट्र राज्यात दररोज 25 ते 30 हजार कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने गुजरात सरकारने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जाणारे लोकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.
महाबळेश्वरातील वेण्णालेक परिसरातील अज्ञात वाहणारे वाहनाने सांबराला ठोकरल्याने सांबराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. धडक इतकी जोरात होती की सांबराच्या शिंगाचे काही भाग तुटले.
नांदेड जिल्हा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे नांदेड जिल्हा कोरोनाचा हाँटस्पाँट ठरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने दहा दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.आज 25 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कडक राहणार आहे..भाजीपाला, किराणा जीवनावश्यक वस्तूही सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत खरेदी करता येतील तर पार्सल सेवेची मुभा देण्यात आलीय. शिवाय जिल्हाअंतर्गत बससेवा ही बंद करण्यात आली आहे..या लॉकडाऊन दरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत..
परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढलाय या मार्च महिन्यातील 25 दिवसात जिल्ह्यात ३००० रुग्ण नव्याने आढळले आहेत तर 20 रुग्णांचा मृत्यू झालाय यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी 1 एप्रिल पर्यंत 7 दिवसांची संचारबंदी लागू केली.या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले आहेत.मात्र अनेक व्यापाऱ्यांनी या संचारबंदीला विरोध केला असला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूट देऊन संचारबंदी मात्र कायम ठेवली आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्यावर अवैध रित्या गुटखा घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीला कवठेमहांकाळ पोलिसांनी पकडून तब्बल 10 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आलाय. अवैधरित्या गुटखा घेऊन जाणार असल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. यावेळी पोलिसांनी नागज फाट्यावर ही पिकअप गाडी पकडली. या गाडीत भुसा भरलेला होता. त्यामध्ये 60 पोती तंबाखू आणि 60 पोती गुटखा आढळून आला. यावेळी गाडी ड्रायव्हर आणि किन्नर अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. तर तब्बल 10 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर एक पिकअप व्हॅन असा 11 लाख 54 हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली माहिती, महाविकास आघाडी सरकारवर लावण्यात आलेल्या आरोपांच्या सत्यतेची माहिती राज्यपालांनी दिली जाणार
पार्श्वभूमी
परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी होणार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. अशातच आता याप्रकरणी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. आता या आरोपांची चौकशी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज वर्षा येथील बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः माझी चौकशी करा अशी मागणी केली. याआधीही परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतरही अनिल देशमुख यांनी माझी चौकशी करा अशी भूमिका मांडली होती. गृहमंत्र्यांच्या या भूमिकेनंतरच याप्रकरणी चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य सरकार चौकशी आयोग नेमणार आहे.
राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट; अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन
राज्यात आज विक्रमी 31 हजार 855 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. हा आकडा सर्वांच्याच चिंता वाढवणारा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करुनही हा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, आज नवीन 15 हजार 098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2262593 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 247299 सक्रीय रुग्ण असू राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21% झाले आहे.
मनसुख हिरण प्रकरणातील एटीएसकडे असलेले दोन्ही आरोपी एनआयएच्या ताब्यात
मनसुख हिरण हत्या प्रकरण एनआयएला सुपुर्द करण्याचे निर्देश ठाणे सत्र न्यायालयाने दिल्याने एटीएसला हा मोठा झटका मानला जात आहे. मनसुख हिरण यांची केस मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात वर्ग करण्याचे निर्देश ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. ठाणे सत्र न्यायालयाकडून केस विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे सर्व पुरावे, कागदपत्र आणि दोन्ही आरोपी विनायक शिंदे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -