Breaking News LIVE : परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी होणार
Breaking News LIVE Updates, 24 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये... cc
परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी होणार. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचा निर्णय. लवकरच नियुक्त करणार चौकशी आयोग.
जव्हार आदिवासी विकास विभागाच्या दाभेरी आश्रम शाळेतील दहा विद्यार्थ्यांना कोरोना. दाभेरी आश्रम शाळा सील. मंगळवारी याच आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. डहाणू आणि जव्हारच्या प्रकल्प अधिकारी तथा प्रांत अशिमा मित्तल यांनी केल्या कडक उपायोजना. आश्रम शाळेत येणारे बहिस्थ विद्यार्थ्यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच बाहेरून ये-जा करणाऱ्या शिक्षकांमुळे पसरतोय कोरोना. त्यामुळे सर्व शिक्षकांना कामाच्या ठिकाणी दिले निवासी राहण्याचे आदेश.
मालेगाव तालुक्यातील विराणे येथील धरणात सेल्फी काढत असताना दोघा मित्रांचा पाण्यात पडून झाला मृत्यू. दोघेजण जवळच्या अंजगवडेल येथील तरुण.
हिंगोली जिल्ह्यात आज तब्बल 139 नवीन रुग्णांची भर तर एका रुग्णाचा मृत्यू. दिवसभरात 80 रुग्ण बरे झाल्याने देण्यात आला डिस्चार्ज. सध्या एकुण 547 रुग्णांवर उपचार सुरू.
उदगीर येथील भाजी मार्केट भागात मटणाचे दुकान आहेत..या ठिकाणी दुकान लावण्यावरून दोन मटण दुकानदारांना भाडणं झाले. वादावादी वाढली, प्रकरण हाणामारीवर गेले यावेळी दोन्ही बाजूकडून मटण दुकानातील हत्यारांचा वापर झाला. या हाणामारीत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या भागात जखमी लोक आणि सर्वत्र रक्त दिसत असल्यामुळे मोठी दशहत निर्माण झाली होती. घटना अचानक घडल्यामुळे भाजीमार्केट भागात दशहत निर्माण झाली होती. याची माहिती उदगीर शहर पोलिसांना मिळताच ते तातकल घटनास्थळी दाखल झाले यामुळे पुढील अनर्थ टळला. जखमी वर उदगीरच्या शासकीय रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. उदगीर शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
केडीएमसीचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांचा वाढदिवस गाजावाजा करीत साजरा करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कार्यालयासमोर त्यांचे काही समर्थक उभे असताना त्याठिकाणी निलेश गवळी आणि महेश भोईर हे दोघे जण आले. निलेश गवळीचा काही महिन्यापूर्वी जगदीश राठोड नावाच्या तरुणासोबत भांडण झाले होते. निलेश जगदीश यांच्यात चर्चा सुरु असताना निलेश सोबत असलेल्या महेश भोईर यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान महेशने आपल्या जवळ असलेली लायसन्स रिव्हॉल्वर काढली आणि हवेत गोळीबार केला. या दरम्यान एक गोळी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला लागली गोळीचा आवाज येताच परिसरांमध्ये गोंधळ उडाला सुदैवाने या गोळीबारात कोणीतीही जिवीत हानी झाली नाही.
सचिन वाझेंविरोधात एनआयएनं यूएपीए कलमांअंतर्गत आरोप लावले, दहशतवाद्यांविरोधात लावण्यात येणारी कलमं सचिन वाझेंविरोधात, एनआयएची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात माहिती, देशाविरोधात युद्ध पुकारणे, स्फोटकांचा वापर असे सचिन वाझेंविरोधात गंभीर आरोप
जुहू बीच वर फिरायला जायचं असेल तर कोविड टेस्ट करा, जुहू बीच वर पर्यटक, फिरायला येणा-या मुंबईकरांची वाढती गर्दी पाहाता कोविड संसर्ग रोखण्यासाठी के वेस्ट वॉर्ड कडून जुहू बीचवरही अॅन्टीजेन टेस्टींग कॅम्प लावण्यात येत आहेत. सोबतच, चौपाटीवरील फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याही टेस्ट केल्या जाणार आहेत... अॅन्टिजेन टेस्ट करुनच चौपाटीवर प्रवेश करता येईल अशी व्यवस्था तयार करण्यात येत आहे... यासाठी स्थानिक पोलिस आणि क्लिनअप मार्शलची मदत घेतली जाईल... तसंच, चौपाटीवर मास्क न घालणा-यांवरही कारवाई करण्यात येत आहे
मनसुख हिरण यांची केस मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात वर्ग, ठाणे सत्र न्यायालयाकडून केस विशेष न्यायालयात वर्ग, एनआयएकडून ठाणे सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता,एनआयएकडे केस सुपुर्द करण्याचे ठाणे न्यायालयाचे निर्देश
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची राज्य सरकार चौकशी करण्याची शक्यता, परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात केलेल्या आरोपांची चौकशी होणार ,
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत न्यायालयीन चौकशी आयोग नेमला जाण्याची दाट शक्यता, निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होण्याची शक्यता
टीआरपी घोटाळ्याचा तपास येत्या 12 आठवड्यांत पूर्ण करू, राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही
जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा जिल्हा लॉकडाऊन करण्याच्या विचारापर्यंत पोहचले आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे अशा वारंवार सूचना देवूनही ठिकठिकाणी होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सचा उडत असलेला फज्जा या सार्या बाबी लक्षात घेता जिल्ह्यात पुन्हा एकदा 26 मार्च ते 4 एप्रिल पर्यत लॉककडाऊन जाहीर करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ही माहिती दिली.
बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नगररचना विभागातून निलंबित केलेले सह संचालकास हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय 55, रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरूड) यांना अटक केली आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाझीरकर हे पसार झाले होते.
महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा संवैधानिक, केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात मांडली बाजू, याआधी ॲटर्नी जनरल यांनी कायदेतज्ञ म्हणून आपलं मत व्यक्त केलं होतं, आता केंद्र सरकारच्या वतीने देखील पुन्हा अधिकृतपणे हे सांगण्यात आले आहे, 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावर महाराष्ट्राला अनेक राज्यांचा पाठिंबा, बिहार, झारखंड, कर्नाटक पंजाब राजस्थान तमिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांनी कोर्टात अधिकृतपणे आपली भूमिका मांडताना 50% वर आरक्षणाचे समर्थन केलं आहे
सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन आठवड्यांसाठी आठवडी बाजार बंद राहणार, मागील काही दिवसात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने निर्णय, गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवण्याच्या प्रशासनाला सूचना
सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन आठवड्यांसाठी आठवडी बाजार बंद राहणार आहे. मागील काही दिवसात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील मध्य मुंबईचा लालबाग व दक्षिण मुंबईचा भायखळा विभागाला जोडणारा महत्त्वाचा लालबाग उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी आज पासून दररोज रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.या पुलाचे पियर्सच्या बेयरिंग व सांधे बदलण्याचे दुरुस्तीचे काम पालिकेकडून पुढील तीन महिने करण्यात येणार आहे.त्यामुळे 15 जूनपर्यंत ह्या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुंबई दक्षिण विभागाचे वाहतूक पोलीस उप आयुक्त योगेश कुमार यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे. या उड्डाणपुलावरून ये जा करणारी वाहतूक पुढील तीन महिने रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत लालबाग उड्डाणपुलाखालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने ये जा करणार आहे.
कोल्हापूरच्या कुंरूदवाडमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली, भागात चार दिवसातील दुसरी घटना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाने गिफ्ट म्हणून ठेवला होता बॉक्स. बॉम्बनाशक पथकाकडून बॉम्ब सदृश्य वस्तू केली निकामी, भालचंद्र सिनेमा गृहाजवळील एका हॉटेलमध्ये ठेवला होता बॉक्स, सदर घटनेनंतर चौकशीसाठी एकजण ताब्यात
उद्या पासून महाराष्ट्रातून गुजरात किंवा सिल्वासा,दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात प्रवेश करण्यासाठी कोविड टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच अनेक मंत्र्यांनााही कोरोनाची लागण झाली आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
अनिल देशमुख प्रकरणी शिवसेनेची सावध भूमिका, मुख्यमंत्री हस्तेक्षेप करणार नाहीत, सूत्रांची माहिती
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्र सरकारला बॅकफुटवर जावे लागले असताना आता शिवसेनेने देखील या प्रकरणात सावध पवित्रा घेतला आहे. अनिल देशमुख प्रकरणात शिवसेना हस्तक्षेप करणार नाही अशी माहिती मिळत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजीनामा होणार की, नाही याबाबत शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. मात्र सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाहीत. देशमुखांचे काय करायचे याचा सर्वस्वी निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
हायकोर्टात परमबीर सिंह प्रकरणात दोन स्वतंत्र याचिका; भ्रष्टाचाराबद्दल गुन्हा दाखल करत स्वतंत्र चौकशीची मागणी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहयांच्या लेटरबॉम्बमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्यातील हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची सीबीआय अथवा ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात करण्यात आली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या याचिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही प्रतिवादी करण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -