Breaking News LIVE : पोस्ट कोव्हिडमुळे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोराडे यांचे निधन
Breaking News LIVE Updates, 08 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राहुल वैजिनाथ बोराडे (वय 36, रा. विजय देशमुख नगर, विजापूर रोड सोलापूर) यांचे निधन झाले. कोरोनानंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने निधन झाले. त्यांना कोरोना झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, कोरोनानंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. फौजदार राहुल बोराडे हे काही महिन्यापुर्वीच सोलापूर पोलीस आयुक्तालयात रुजू झाले होते. अवघ्या 36 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
मराठा आरक्षण प्रश्नावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली असं म्हणता येणार नाही. त्यांनी इतर 10, 12 विषयांबरोबर मराठा आरक्षणाचा विषय तोंडी लावण्यासाठी नेला होता. पुनर्विचार याचिका केंद्राने आरक्षण रद्द झाल्यानंतर केवळ 3 दिवसांत दाखल केली होती. यांनी आद्यप याचिका दाखल केली नाही. अजून हे परवानगी घेण्यातच अडकले आहेत. माझ्या माहितीनुसार केंद्राची पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करत आहेत.- विनायक मेटे
काल पासून राज्यात चित्र रंगवलं गेलं की भेट फक्त मराठा आरक्षण साठी आहे,मात्र अस काही घडलं नाही आम्हाला फक्त आशा दाखवण्यात आली. आम्हाला वाटलं आज जबाबदारी निश्चित होईल, केंद्र किंवा राज्य मात्र असं काहीच झालं नाही, अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता आरक्षणाचा. साधं आश्वासन सुदधा मिळालं नाही यामुळं नाराजी व्यक्त करत मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्यसरकारने करून घेऊ नये ही बाब विनोद पाटील यांनी स्पष्ट केली.
खासदार नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द; माजी सेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर निकाल
अमरावती हा लोकसभेसाठी एससी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातील खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला लागलेली आग ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं सांगत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आगीच कारण आणि त्याला जबाबदार कोण याचा तपास करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखाली समिती नेमली आहे. याचा सगळा आढाव घेऊन गुन्हा दाखल केला जाईल असंही त्यांनी सांगितलं.
लोणावळ्यात काल रात्री रानगव्याचे दर्शन झाले. भुशी धरण मार्गावरून मुख्य शहरात तो दाखल झाला आणि तब्बल तीन तासांनी तुंगारली धरणाकडून तो राजमाचीच्या दिशेने गेला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली, यामुळे बचावकार्यात अडथळे आले. मात्र सुदैवाने रानगव्याला कोणतीही इजा झाली नाही. वनविभाग आणि प्राणी मित्रांनी थेट पकडण्याऐवजी त्याला शहराबाहेरचा मार्ग दाखविण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय फायद्याचा ठरला. रात्री 8 वाजता शहरात दाखल झालेला रानगवा 11 वाजता बाहेर पडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सावत्र आईने आपल्या अल्पवयीन मूकबधिर मुलाच्या गुप्तांगाला रबर बांधून चटके दिल्याची घटना घडली आहे. घरगुती कारणाच्या वादातून रागाच्या भरात सावत्र आईकडून लहानग्याचा अमानुष छळ करण्यात आला आहे. त्या सावत्र आईविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्या अल्पवयीन मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
माझगांव आणि डोंगरी या भागांना जोडणाऱ्या हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीतील महत्त्वाचा टप्पा असलेला दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 6 जून 2021 रोजी पूर्ण करण्यात आले. हा आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने या पुलाच्या पुनर्बांधणीला आणखी वेग येणार आहे.
मुंबईतील माझगांव आणि डोंगरी यांना जोडणारा हँकॉक पूल सन-2016 मध्ये मध्य रेल्वेने तोडला. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाने उप आयुक्त (पायाभूत सुविधा) तथा प्रमुख अभियंता (रस्ते व पूल) श्री. राजेंद्रकुमार तळकर आणि त्यांचे सहकारी, अधिकारी हे या पुलाच्या पुनर्बांधणीची कार्यवाही करीत आहेत.
मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. आज सकाळी ही भेट होणार आहे.
पार्श्वभूमी
मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ आज पंतप्रधान मोदींना भेटणार
मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तौक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. उद्या संध्याकाळी वाजता भेटणार असून या क्रायक्रमाची रुपरेषा पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षणसंदर्भातील बैठकीला शिष्ठमंडळासोबत मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिलं होते. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते.
PM Modi Speech Highlights: 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
देशावरील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केलीआहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे.
देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -