Breaking News LIVE : जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर रद्द
Breaking News LIVE Updates, 26th June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर रद्द. राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संवाद साधण्यासाठी काढण्यात आलेली व नांदेड जिल्ह्यात पोहचलेली राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा डेल्टा व्हाइरसच्या वाढत्या प्रभावामुळे अखेर रद्द झालीय. त्यामुळे यापुढील ही परिसंवाद यात्रा नांदेड जिल्ह्यातच थांबवून, राष्ट्रवादीचा हा परिसंवाद यात्रा मागे फिरणार असल्याची माहिती मंत्री जयंत पाटील यांच्या स्वीय सहाय्यकांनी दिलीय.
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, पुढील तीन तासात नंदुरबार, धुळे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड, जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात देखील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित, मान्सून ब्रेक आधी पावसाची अनेक ठिकाणी मोठी हजेरी
सोलापूर - सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून नवे निर्बंध, शहरातील सर्व दुकानांना आता संध्याकाळी 4 पर्यंत परवानगी, बिगर अत्यावश्यक सेवा शनिवार-रविवार संपूर्ण बंद, मॉल्स, थिएटर संपूर्णपणे बंद, सोमवार ते शुक्रवार पर्यंत हॉटेल्स रेस्टॉरंट संध्याकाळी 4 पर्यंत त्यानंतर रात्री 11 पर्यंत केवळ पार्सलची सुविधा, सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात संध्याकाळी 5 पर्यंत जमावबंदी तर 5 नंतर संचारबंदी, पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांचे आदेश जारी, उद्या सकाळी 7 पासून आदेश लागू
तब्बल साडेसहा तासानंतर मुंबई - गोवा हायवेवरील वाहतूक सुरु, लांजा तालुक्यातील वेरळ घाटात मशीन घेऊन जाणारा ट्रेलर पलटी झाल्यानं खोळंबली होती वाहतूक
21 जूनपासून पुण्यात प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन सुरू होते, ते आता उच्च व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या भेटीनंतर मागे घेण्याचा निर्णय प्राध्यापक संघटनेनं घेतला आहे. तीन हजार 74 प्राध्यापक भरतीची फाईल मान्यता पुढील आठवडाभरात होईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. मानधन आणि अजून काही मागण्या होत्या, त्याही काही मान्य करण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची खबर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली . यानंतर बंगल्यावर छापा मारला असता मादक द्रव्यासह बिभत्स अवस्थेत आढळून आले. या रेव्ह पार्टी प्रकरणी 10 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश असून यातील चार महिला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या व एक महिला बिग बॉस या शो मध्ये काम केलेली असल्याचे समजते. घटनास्थळाहून कॅमेरा, ट्राय पॉड, मादक द्रव्य जप्त करण्यात आले आहे.
पालघर : पालघरमधील प्रसिद्ध असलेल्या आशेरी गडावर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालघर जिल्हा प्रशासनाचा निर्णय. जिल्हा प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत गडावर पर्यटनास बंदी. बंदोबस्तासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच उल्लंघनकरून मागील रविवारी हजारो पर्यटकांनी आशेरी गडावर गर्दी केली होती.
गेल्या चार दिवसापासून पुण्यात उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर प्राध्यापकांच टाळ भजन आंदोलन सुरु असून आज वारकरी पद्धतीने आंदोलन केलं जातंय. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत थोड्या वेळात या आंदोलनाला भेट देणार आहेत.
Maan Ki Baat : 21 जून रोजी देशात विक्रमी लसीकरण झालं, लसीकरण मोहिमेत आपलं योगदान द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन केलं आहे. 21 जूनला लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा सुरू झाला आणि त्याच दिवशी देशातील 86 लाखांहून अधिक लोकांनी, विनामूल्य लस घेऊन विक्रम केला आणि तो देखील एका दिवसात. इतक्या मोठ्या संख्येने भारत सरकारने विनामूल्य लसीकरण उपलब्ध केल्याचही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Maan Ki Baat : मिल्खा सिंग यांचं योगदान आपण विसरु शकत नाही, 'मन की बात' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिल्खा सिंग यांचं स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऑलिम्पिकसंदर्भातील भाग घेण्याचं देशवासियांना आवाहन केलं आहे. टोक्योला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे. ह्या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. म्हणूनच मी देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो, की या खेळाडूंवर आपण कळत-नकळत दबाव आणायचा नाही आहे तर खुल्या मनाने त्यांना पाठिंबा द्यायचा आहे असंही मोदी म्हणाले
बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारचे रेल्वे विभागाला पत्र दिलं आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास देण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकलमधून होणारी घुसखोरी टाळण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. सध्या मध्य रेल्वेतून 18 लाख प्रवासी प्रवास करत आहेत तर पश्चिम रेल्वेमधून 11 ते 12 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. यापैकी जवळपास पन्नास टक्के प्रवासी बनावट आय कार्ड बनवून रेल्वे तिकीट मिळत असल्याचा संशय आहे.
लोणावळ्यातील ओबीसी नेत्यांच्या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. आज भाजपच्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि महाविकास आघाडीचे मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर ओबीसी नेते एकत्र येण्यासाठी ही मोट बांधली जात असल्याचा आयोजकांनी म्हटल आहे. 'जो ओबीसी का बात करेगा वही देश पे राज करेगा' अशा घोषणा देत आज सकाळीच ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनाला सुरवात केली
राज्यातील सत्ता गेल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त झाला असून त्यामुळेच चौकशीचा ससेमिरा लावला जातोय अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीय. अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाईवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश झाल्याने पुन्हा जिल्ह्यात निर्बंध लागू झाले आहेत. आज सायंकाळी 5 वाजल्यापासून ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दैनंदिन सर्व व्यवहार आणि आस्थापना संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असून शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील.
औरंगाबाद शहरातील स्टेशन रोडवरील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु असताना तरुण डॉक्टराचा मृत्यू झाला आहे. डॉ. दिग्विजय शिंदे अस या डॉक्टरांच नाव आहे. त्यांच्यावर छोटी झालेली अन्न नलिका मोठी करण्याची शस्त्रक्रिया सुरू होती. डॉ. दिग्विजय शिंदे हे 24तास रुग्णसेवेत स्वतःला झोकून देऊन काम करणारे, शांत, सयंमी डॉक्टर म्हणून परिचित होते.
जम्मू काश्मीरच्या टेक्निकल विमानतळ परिसरात दोनदा स्फोटाचे आवाज, स्फोटामागे दहशतवादी हात असल्याचा संशय, तपास सुरु; घटनास्थळी बॉम्बशोधक पथक, फॉरेन्सिक टीम दाखल
नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे सदस्य यांच्यासमवेत नांदेड जिल्ह्यातील कोविड रूग्णांची स्थिती लक्षात घेवून सोमवार 28 जून 2021 पासून सुरू करावयाच्या विविध सेवा, आस्थापना आणि त्यांच्या वेळा निश्चित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणुने बाधीत रूग्ण आढळून येत आहेत. या विषाणुचा संक्रमणाचा दर जास्त असल्यामुळे विषाणुमधील बदल आणि त्यापासून होणारा प्रादुर्भाव आणि फैलाव रोखण्याच्यादृष्टीने राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये स्तर-3 मधील तरतूदीनुसार सुरू करावयाच्या आस्थापना बाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना निर्देशीत केल्या आहेत.
औरंगाबाद : शहरातील स्टेशन रोडवरील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु असताना तरुण डॉक्टराचा मृत्यू झाला आहे. डॉ. दिग्विजय शिंदे असं या डॉक्टरांच नाव आहे. एका रुग्णाची छोटी झालेली अन्न नलिका मोठी करण्याची शस्त्रक्रिया ते करत होते. शस्त्रक्रिया झाली आणि दुर्बिणीद्वारे पाहत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरचा मृत्यू झाला. उपस्थित डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांना यश आले नाही. डॉ. दिग्विजय शिंदे हे 24तास रुग्णसेवेत स्वतःला झोकून देऊन काम करणारे, शांत, सयंमी डॉक्टर म्हणून परिचित होते.
पार्श्वभूमी
राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय; कोल्हापूर हॉटस्पॉटच्या मार्गावर
मुंबई : राज्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात काल दिवसभरात 9,812 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,752 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1551 रुग्ण आढळले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा हॉटस्पॉटच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सोमवारपासून राज्यात नवीन निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे.
दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला होता. या तीन्ही जिल्ह्यात रोज हजारच्या घरात नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत होती. शासनाने कडक निर्बंध लावल्यानंतर तीन्ही जिल्ह्याची दैनदिन रुग्णसंख्या हजारच्या आत आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. शनिवारी (26 जून) जिल्ह्यात 1551 नवीन बाधित आढळले आहेत तर 21 मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.
सोमवारपासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद!
Maharashtra Corona : राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.
कोरोना आणि लसीकरण मोहिमेवर पंतप्रधान मोदींची आढावा बैठक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस आणि लसीकरण मोहिमेवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला कोरोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओचे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या झालेल्या लसीकरणाची आणि लसींची उपलब्धता तसेच येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह लसीकरण मोहिमेच्या संभाव्य कालवधीची माहिती घेतली.
सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार लसीकरणाची संपूर्ण व्यवस्था हातात घेतल्यानंतर आता केंद्र सरकारला याच वेगाने लसीकरण करण्याची इच्छा आहे. यावर्षी डिसेंबरच्या आधीच देशातील संपूर्ण लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -