Breaking News LIVE :  पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधू मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Breaking News LIVE Updates, 24 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jun 2021 10:54 PM
 पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधू मुंबई पोलिसांनी ताब्यात

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांना अटक केली होती.. त्यानंतर आता पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना देखील मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक करणे आणि विश्वासघात केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी पुण्यातील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले..
शशांक पुरुषोत्तम परांजपे  आणि श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. विलेपार्ले पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसुंधरा डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक आणि विश्वास घात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

कारणहुणवीच्या सणानिमित्ताने काढली बैलांची मिरवणूक , सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील प्रकार

सोलापूर - कारणहुणवीच्या सणानिमित्ताने काढली बैलांची मिरवणूक ,


सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील प्रकार,


जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवत गावकऱ्यांनी आयोजित केली बैलगाडा शर्यत ,


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लागू आहेत कडक निर्बंध ,


त्यामुळे कारणहुणवी सणाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकवरी घालण्यात आली आहे बंदी ,


नियमांची पायमल्ली करत कारणहुणवी सण केला साजरा,

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर कारवाई संदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली राज्यपालांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर कारवाई संदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते  आज राज्यपालांची भेट घेतली.  पदोन्नती मधील आरक्षण देणार असल्याचे वारंवार अजित पवार आणि नितीन राऊत मागासवर्गीय समाजाला सांगतात.  मात्र मुंबई उच्च न्यायालय आणि मॅटमध्ये राज्य सरकारच्या वतीने जे प्रतिज्ञापत्र दाखल केलेला आहे त्यात पदोन्नतीमधील आरक्षण देता येणार नाही  असे स्पष्ट म्हटले आहे.

पुणे आंबील ओढा घरांच्या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात बैठकीला सुरुवात

पुणे आंबील ओढा घरांच्या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीला एकनाथ शिंदे,दिलीप वळसे पाटील,नीलम गोर्हे ,पुणे महापालिका अधिकारी उपस्थित आहे. 

नाना पटोले हे आपला दौरा अर्धवट सोडून उद्या तातडीनं दिल्लीला रवाना होणार

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपला दौरा अर्धवट सोडून उद्या तातडीनं दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळतेय. नाना पटोले सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा अध्यक्षपद, स्वबळाच्या मुद्द्यांबाबत दिल्लीत वरिष्ठांसोबत चर्चेची शक्यता वर्तवण्याच येत आहे. 

पालघर जिल्ह्यातील तलासरी डहाणू तालुक्यात भूकंपसत्र पुन्हा सुरु, 3.7 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी डहाणू तालुक्यात भूकंपसत्र पुन्हा सुरु झालं आहे. 3.7 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. बोर्डी,घोडवड,तलासरी,चारोटी भागात पुन्हा भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांची माहिती. काही महिने थांबलेलं भूकम्प धक्के सत्र पुन्हा सुरु झाले आहेत. 

स्थानिकांना दिलेल्या नोटिसा नाहीत, तर ते निवेदन आहे : केदार असोसिएट्स

पुणे-आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांवर अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे. केदार असोसिएट्स बिल्डरच्या लेटरहेडवर आंबिल ओढाच्या रहिवाशांचा नोटीस धाडण्यात आली आहे. या नोटीशीवर पुणे मनपाचा शिक्का का नाही? असा प्रश्न कारवाई करणाऱ्यांना स्थानिकांच्या वतीनं विचारण्यात येत आहे.  


यासंदर्भात बोलताना केदार असोसिएट्सच्या प्रताप निकम यांच्यासोबत एबीपी माझानं संवाद साधला. त्यावेळी बोलताना पुणे-आंबिल ओढा परिसरात कारवाई झालेल्या प्लॉटशेजारी आमचा एसआरए प्रकल्प सुरु आहे. आजची कारवाई आम्ही केलेली नाही, स्थानिकांना दिलेल्या नोटिसा नाहीत, तर ते निवेदन आहे, असं केदार असोसिएट्सच्या प्रताप निकम यांनी सांगितलं. 

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरचा सिमेंट कॉंक्रिटचा स्लॅब पुन्हा वाहून गेला

कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरचा सिमेंट कॉंक्रिटचा स्लॅब पुन्हा वाहून गेला. काँक्रिट स्लॅब वाहून गेल्याने बंधाऱ्यावर मोठे खड्डे पडले आहेत. बंधाऱ्यावरील पाणी पातळी कमी होताच हा प्रकार समोर आला. दोन वर्षापूर्वी इथे स्लॅब टाकला होता. स्लॅब वाहून गेलेल्या बंधाऱ्यावरील वाहतूक पोलिसांनी बॅरिकेट लावून बंद केली. याआधीही तीन वेळा बंधाऱ्यावरील स्लॅब वाहून गेला आहे. नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर प्रवाहामुळे स्लॅब उखडला जातो. पर्यायी पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानक करत आहेत.

पुण्यातील कारवाई प्रकरणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली

पुण्यातील कारवाई प्रकरणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मंत्रालयात ही ऑनलाईन बैठक होईल. या बैठकीला नगरविकास खात्याचे सचिव, पुणे आयुक्त, महापालिकेचे अधिकार, एसआरए अधिकारी उपस्थित असतील.

पुणे आंबिल ओढा अतिक्रमण प्रकरणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक

पुणे आंबिल ओढा अतिक्रमण प्रकरणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मंत्रालायत बैठकीला नगरविकास खात्याचे सचिव, पुणे महापालिकेचे आयुक्त, महापालिकेचे अधिकारी, एसआरए अधिकारी उपस्थित असतील.

केदार असोसिएट्स बिल्डरच्या लेटरहेडवर आलेल्या नोटीशीवर पुणे मनपाचा शिक्का का नाही?, पुणे-आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा सवाल

पुणे-आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांवर अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे. केदार असोसिएट्स बिल्डरच्या लेटरहेडवर आंबिल ओढाच्या रहिवाशांचा नोटीस धाडण्यात आली आहे. या नोटीशीवर पुणे मनपाचा शिक्का का नाही? असा प्रश्न कारवाई करणाऱ्यांना स्थानिकांच्या वतीनं विचारण्यात येत आहे.  

पुणे-आंबिल ओढा परिसरातील नागरिक आक्रमक, खाजगी बिल्डरच्या नोटीशीनंतर कारवाई सुरु असल्याचा स्थानिकांच्या दावा

पुणे : पुणे-आंबिल ओढा परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. आक्रमणविरोधी कारवाईदरम्यान नागरिक आणि पोलिसांमध्ये राडा. खाजगी बिल्डरच्या नोटीशीनंतर कारवाई सुरु असल्याचा दावा स्थानिकांच्या वतीनं केला जात आहे. 

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखीचं प्रातिनिधीक स्वरुपात थोड्याच वेळात प्रस्थान

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी प्रातिनिधीक स्वरुपात थोड्याच वेळात प्रस्थान ठेवणार आणि मोजक्या 50 जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे, श्रींची पालखी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली आहे. पालखीचे मानकरी दिंडेकरी यांच्यां उपस्थितीत भजन किर्तन धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. 

पुणे-आंबिल ओढा परिसरात नागरिक आक्रमक, आक्रमणविरोधी कारवाईदरम्यान राडा

पुणे : पुणे-आंबिल ओढा परिसरात नागरिक आक्रमक झाले असून आक्रमणविरोधी कारवाईदरम्यान राडा झाला आहे. आंबिल ओढा परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न केला जात आहे. 

बुलढाण्यातील पावसामुळे शेतीच्या कामांना वेग

बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळीपासून रात्री उशिरापर्यंत दमदार पाऊस पडल्याने अनेक नद्या, ओढ्याना पूर आलेत. जिल्ह्यातील नांदुरा, मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणीच्या नंतर आलेल्या पावसाने समाधान व्यक्त केलंय. जवळपास एक आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर पडलेल्या पावसाने मात्र शेतीच्या कामांना वेग आलाय.

अलिबाग येथील जिल्हा कारागृहाच्या जेलर सुवर्णा चोरगे यांना लाच घेताना ताब्यात

अलिबाग येथील जिल्हा कारागृहाच्या जेलर सुवर्णा चोरगे यांना लाच घेताना रायगड लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. कैद्याला आवश्यक सामान व सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी मागितली लाच चार हजार रुपयांची मागितली होती.

पार्श्वभूमी

मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाबाधित वाढले, 10,066 नवीन कोरोनाबाधित तर 11,032 डिस्चार्ज
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. मात्र कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. आज 10,066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काल 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 9 हजार 046 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता राज्यभरात बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,53,290 इतकी झाली आहे. आज 163 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.93 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 163 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. 


महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा हायकोर्टात बिनशर्त माफीनामा
राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना हायकोर्टाने दणका दिला आहे. औरंगाबादमधील जयेश इन्फ्रा या कंपनीशी संबंधित जमीन महसुलाच्या संदर्भात मंत्रिमहोदयांनी दिलेले आदेश हायकोर्टाने रद्द केले आहेत. तसेच याप्रकरणी अब्दुल सत्तार यांना नोटीस जारी करत आपल्या कार्यकक्षेबाहेर दिलेल्या बेकायदेशीर आदेशांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. यावर उत्तर देताना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हायकोर्टात आपला बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. तसेच भविष्यात असे निर्देश पुन्हा देताना काळजी घेण्याचंही आश्वासन दिलं आहे. हायकोर्टानं याप्रकरणी दिलेले निर्देश का पाळले नाहीत? म्हणून महसूल विभागाचे सचिव, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी आणि औरंगाबाद ग्रामीण विभागाचे तहसिलदार यांनाही हायकोर्टानं नोटीस जारी करत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते.


शेगाव दर्शन पॅटर्न पंढरपूर मंदिरात राबविण्यात यावा, विश्व वारकरी सेनेची मागणी
पांडुरंगाच्या दर्शनाची आषाढी वारीमध्ये भाविकांची गर्दी होऊ नये आणि गर्दी झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असे कारण सांगून सरकारने मंदिर बंद ठेवले आहे. पण जर शेगाव दर्शन पॅटर्न हा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू करावा व भाविकांना ऑनलाईन पद्धतीने पास देऊन दर्शन द्यावे आज सरकारने विचार केला तर पूर्ण महिन्यात कमीत कमी एक लाख पन्नास हजार भाविक दर्शन घेऊ शकतील त्यामुळे पंढरपूर येथे शेगाव दर्शन पॅटर्न राबविण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी केली आहे.


न्यूझीलँड कसोटीचा बादशाह! भारताचा 8 विकेट्सनं पराभव करत जिंकली पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
WTC 2021, 2 Innings Highlight: न्यूझीलँड जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव करत न्यूझीलँड संघानं पहिल्या कसोटी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे.  भारताचा दुसरा डाव 170 धावांवर गुंडाळला गेल्यानं न्यूझीलँडला 139 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान न्यूझीलँडच्या संघानं 8 गडी राखून पार केलं. न्यूझीलँडकडून कर्णधार केन विलियमसन आणि रॉस टेलरनं विजयी खेळी केली. विलियमसननं शानदार अर्धशतक ठोकत 52 धावा केल्या तर टेलरनं 47 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. दोन डावांमध्ये सात विकेट घेणाऱ्या कायले जेमिसनला सामनावीराचा खिताब देण्यात आला. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.