Breaking News LIVE : राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, आरोग्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकित तोडगा निघाला
Breaking News LIVE Updates, 23rd June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील... देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नागपूर : प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला, नागपूर विभागाच्या त्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त आहेत. आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध विभाग प्रमुखांची बैठक घेऊन प्रशासकीय कामांचा आढावा घेतला.
नागपूर : प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला, नागपूर विभागाच्या त्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त आहेत. आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध विभाग प्रमुखांची बैठक घेऊन प्रशासकीय कामांचा आढावा घेतला.
नंदुरबार: जो पर्यंत ओबीसी आरक्षण संदर्भात निर्णय होत नाही तो पर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. ओबीसी आरक्षण संदर्भात भूमिका मांडण्यात राज्य सरकार कमी पडल्याचा खासदार रक्षा खडसे यांचा आरोप.
चंद्रपूर : कोरपना-आदिलाबाद मार्गावरील पारडी येथे भीषण अपघात. अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी, 2 बाईकवर होते हे 4 तरूण, अपघात नेमका कसा झाला आणि मृतकांची ओळख पटवण्याचे काम सुरू, मृतक हे तेलंगाणातील इंदरवेली परिसरात राहणारे असल्याची प्राथमिक माहिती
शिर्डी : शिर्डी साई विश्वस्त मंडळ पुन्हा लांबणीवर, राज्य सरकारने दोन आठवड्यांची मागितली मुदत, दोन आठवड्यात विश्वस्त मंडळ जाहीर करू, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही, औरंगाबाद हायकोर्टाने मुदत दिली वाढवून, अध्यक्ष उपाध्यक्षासह सदस्य कोण होणार याची पुन्हा उत्कंठा, शिवसेना-राष्ट्रवादी आणी काँग्रेसमध्ये वाटपावरुन मतभेद? याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे यांची माहिती
सांगली : तासगाव येथे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यास तत्वतः मान्यता, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा निर्णय, आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी दिली माहिती, मागील काही वर्षांपासून उपकेंद्र कुठे असावे असा सुरू होता वाद
जमात-उद-दावाचा सर्वेसर्वा हफिज सईदच्या घराबाहेर स्फोट, गॅस पाइपलाइन फुटल्यामुळे स्फोट झाल्याचा संशय, हफिज सईद राहत असलेल्या सोसायटित स्फोट
शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ वाटप जाहीर करण्यात आलं असून अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आ रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा तर शिवसेनेचे पाच सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्याची काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्षाध्यक्षांकडे मागणी केलीय. शिंदे कुटुंब निस्सीम विठ्ठल भक्त असल्याने वारकऱ्यांचे प्रश्न चांगल्या रीतीने सोडवू शकतील अशा भावना शहराध्यक्ष अड राज भादुले यांचेसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
जिल्हा परिषदेतील रद्द झालेल्या ओबीसी जागांवरील पोटनिवडणुकांची घोषणा ; सर्व जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, निवडणुकांना विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई विमानतळाला स्व. वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे. आज सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंजारा समाजाचे नेते आज भेटणार आहेत. शिवाय आज सकाळी अकरा वाजता ते विधानभवनासमोर निदर्शन करणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याशी काल रात्री बंजारा समाजाच्या नेत्यांची भेट झाली.
बिटकॉईनच्या किमतीत मोठी घट झाली आहे. किंमत 5 महिन्यांतील सर्वात निचांकी पातळीवर येऊन स्थिरावली आहे. बिटकॉईनच्या किमती 30 हजारांनी घटत 29 हजार 511 डॉलवर स्थिरावल्या आहेत. चीनमध्ये क्रिप्टो करन्सीविषयी करण्यात आलेल्या नव्या नियमांमुळे बिटकॉईनला फटका बसला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आरटीओमधील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी नाशिकमध्ये कोणताच गुन्हा घडला नसल्याचं पोलीस चौकशीतून निष्पन्न झालं आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी 15 मे 2021 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये त्यांनी आरटीओ विभागातील बदल्या, अधिकाऱ्यांच्या कामकाजातील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार या संदर्भात तक्रार केली होती. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते.
निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारिनंतर पोलिसांनी कथित आरटीओ भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरु केली होती. या चौकशीत पोलिसांना भ्रष्टाचार झाल्याचं आढळलं नाही. त्यामुळे वरिष्ट अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांनाही क्लिन चीट देण्यात आली आहे. नाशिकमध्ये अशा प्रकारचा कोणताच गुन्हा घडला नाही, असं पोलीस चौकशीतून स्पष्ट झालं आहे. नाशिक क्राईम ब्रँचच्या माध्यमातून ही चौकशी सुरु होती. तक्रारदारसह, वरिष्ठ अधिकारी आणि इतर अशा 30 हुन अधिकांचे जबाब याप्रकरणी नोंदवण्यात आले होते.
धुळे : धुळे शहरातील मोगलाई भागात असलेल्या कल्याणी नगर याठिकाणी शासनाच्या आदेशानुसार, 25 हजारांवरील थकबाकी असलेल्या नागरिकांकडे वसुली करण्यासाठी गेलेल्या असिस्टंट इंजिनिअर लोकेश चव्हाण यांना या भागातील काही नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्यांमध्ये पोलीस खात्यातील एक कर्मचारी असल्याची देखील माहिती समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. या घटनेची ऊर्जा मंत्र्यांसह वरिष्ठ पातळीवरून गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे.
नवी मुंबई : खारघरमधील सेक्टर पंधरा येथील खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर पनवेल महानगरपालिका आणि पोलीस दलाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. सदर डॉक्टरकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसल्याचे सिध्द झाल्याने खारघर पोलीस स्थानकांमध्ये या डॉक्टरवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून बनावट रूग्ण सदरच्या डाॅक्टरकडे उपचारासाठी पाठवला होता. यावेळी आरोपी डाॅक्टरने योग्य रित्या उपचार न केल्याने याबाबत संशय आला. पोलिसांनी डाॅक्टरची डीग्री तपासली असता, ती बोगस असल्याचे लक्षात आल्यावर त्याला अटक करण्यात आली.
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून गेल्या काही दोन-तीन वर्षांत 15 हजार घरांची लाॅटरी काढण्यात आली होती. घर लागेलल्या लाभार्थ्यांना सिडकोने पैसे भरायचे टप्पे करून दिले होते. अचानक 2019मध्ये कोरोना आल्याने गेल्या दोन वर्षात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जणांचे पगार कमी झाले, व्यावसाय बंद पडले. यामुळे मिळालेल्या घराचे हप्ते भरणं लोकांना जिकिरीचे झाले होते. सिडकोकडून मिळालेल्या घरांचे हप्ते अनेकांनी भरले नसल्याने त्यांना विलंब शुल्क लागले होते. मात्र कोरोनाची स्थिती पाहता उशीरा भरलेल्या 6 व्या आणि 7 व्या हफ्त्यावरील विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ज्या लाभार्थ्यांकडून तो वसूल केला होता त्यांच्या बॅंक खात्यावर घेतलेले विलंब शुल्काचे पैसे पाठविण्यात येणार आहेत. यामुळे साडेतीन हजार घर लाभार्थ्यांना याचा दिलासा मिळणार आहे.
पार्श्वभूमी
काल (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरलेल्या आणि कोरोनामुक्त गावांमध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु करता येतील का? याबाबत तपासणी करण्याची परवानगी शिक्षण विभागाला मुख्यमंत्री यांनी दिली आहे. शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या आणि भविष्यात गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावात दहावी बारावीचे वर्ग सुरु करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाच्या विषयावर महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, यांच्यासह शिक्षण विभागातील काही अधिकारी उपस्थित होते. एकीकडे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरु असताना दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येऊन शिकता येईल आणि त्यांचा अभ्यासक्रम योग्य पद्धतीने पुढे सुरु राहील आणि त्याप्रमाणेच शिकवता येईल, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी यामुळे दूर होतील. अशाप्रकरचे नियोजन शिक्षण विभागामार्फत केले जात आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गाव सोडून इतर कुठेही अद्याप शाळा सुरु करण्याबाबत कुठलाही विचार करण्यात आलेला नाही. पुढील कोरोना परीस्थिती पाहून शाळांबाबत विचार केला जाईल. शिवाय, तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता कोरोना परिस्थितीचा सुद्धा वेळोवेळी आढावा घेऊनच शाळांबाबत महत्वाचे निर्णय घेतला जाईल.
दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्णवाढ दुपटीचा वेग 722 दिवसांवर
मुंबईत कोरोना संसर्गाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा डबलिंग रेट हा 722 दिवसांवर गेला आहे. आज मुंबईत कोरोनाचे 570 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आज 742 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, कोरोनामुळे आज 10 रुग्णांचा मृत्यू झाले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबईतील कोरोनाचं प्रमाण काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपासून मुंबईत एक हजाराच्या खाली रुग्णसंख्या आल्याचं दिसून येत आहे. आज दिवसभरात 32 हजार 307 कोरोना चाणण्या करण्यात आल्यानंतर 742 जण संक्रमित आढळले आहेत. सध्या शहरात 14 हजार 453 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रिकव्हरी रेट आता 95 टक्के इतका झाला आहे. 15 जून ते 21 दरम्यान कोरोनाचा ग्रोथ रेट हा 0.09 टक्के इतका आहे. दिलासादायक म्हणजे कोरोना रुग्णसंख्येचा डबलिंग रेट हा 722 दिवसांवर गेलाय. मुंबईत सध्या 11 कंटेनमेंट झोन आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -