Nashik Politics : नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात (Deolali Vidhan Sabha Constituency) उमेदवारीवरून महायुतीत (Mahayuti) झालेला संघर्ष निवडणुकीनंतरही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर नगरपरिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेचा काल रविवारी (दि. 17) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. यानंतर देवळालीच्या अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांचं नाव न घेता उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र हे पाणीपुरवठा योजनेचे काम भगूर नगर परिषदेचेच असून येत्या आठ दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती विजय करंजकर यांनी दिली आहे. यामुळे देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा वाद पुन्हा उफाळून येणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर देखील देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेत विकासकामांवरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयावरून राष्ट्रवादी दोन्ही पक्षातील नेते आमनेसामने आले आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचे शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केला होता. मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे, माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. भगूरमध्ये तुम्ही काम करू नका असं मला सांगितलं जातं, असे सरोज अहिरे यांनी म्हटले होते. यानंतर अजित पवारांनी देखील सरोज अहिरे यांची पाठराखण केली होती.
शिवसेना नेत्यांकडूनही सरोज अहिरेंवर पलटवार
भगूर नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाली आहे. आमच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या योजनेचे श्रेय विद्यमान आमदार सरोज अहिरे घेत आहेत, असे प्रयुत्तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय करंजकर यांनी सरोज अहिरे यांनी दिले आहे. येत्या आठ दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केलं जाणार असल्याचे देखील विजय करंजकर यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या