Breaking News LIVE : महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज  

Breaking News LIVE Updates, 16 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jun 2021 08:56 PM
महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज 

महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज, 


दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, उत्तर कोकणातही चांगल्या पावसाची शक्यता,


पुढील 2 तासात जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पाऊस ,


औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये देखील पुढील 2 तासात मुसळधारेचा अंदाज,

महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज  

महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, उत्तर कोकणातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढील 2 तासात जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये देखील पुढील दोन तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संभाजीराजे आणि समन्वयक यांच्याबरोबर उद्या मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक

संभाजीराजे आणि समन्वयक यांच्याबरोबर उद्या मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक, अशोक चव्हाण यांच्यासह मराठा आरक्षण उपसमितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार, 


उद्या संध्याकाळी 5.30 वाजता या महत्वपूर्ण बैठकीला होणार सुरुवात, पहिल्याचं मूक आंदोलनानंतर होणाऱ्या बैठकीकडे मराठा समाजाचे लक्ष

मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडनदी, निर्मला नदी, तेरेखोल नदीला पूर

मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडनदी, निर्मला नदी, तेरेखोल नदीला पूर आला आहे. कणकवली मधील गडनदीला पूर आल्याने किर्लोस -गोठणे गावचा संपर्क तुटला आहे.  निर्मला नदीला पूर आल्यामुळे आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने 27 गावांचा संपर्क तुटला आहे. तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा वाजारपेठेत पाणी शिरले आहे.  वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा पुलावर सुद्धा पाणी असल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पुढील तीन चार दिवस कोकणांत मुसळधार पावसाची शक्यता

पुढचे 3, ४ दिवस कोकणांत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई ठाणे,
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज

आशा वर्कर यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने पुन्हा बैठक, आशा वर्कर आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात पुन्हा बैठक

आशा वर्कर यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने पुन्हा बैठक, आशा वर्कर आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात पुन्हा बैठक, मानधन आणि भत्ता वाढवून देण्याच्या मुद्द्यावर चर्चा

शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाकडून आज सेना भवन येथे विरोध प्रदर्शन

शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाकडून आज सेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचे उत्तर देण्यासाठी शिवसेना भवन परिसरात शिवसैनिकही जमले आहेत.. 

एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेता मयुरेश कोटकरला जामीन मंजूर

राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक करण्यात आली होती. शिवसेना कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. मयुरेश कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून आज त्यांच्या जामीनावर सुनावणी झाली आहे. अखेर मयुरेश कोटकर याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकेत काम केलं आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसी संघटना आक्रमक, उद्या नाशिकमध्ये रास्तारोको आंदोलन

नाशिक : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भुजबळ फार्मवर थोड्याच संघटनांची बैठक पार पडणार आहे. उद्या नाशिकमध्ये रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी ओबीसी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन सुरु असताना नाशिकमध्ये ओबीसी अरक्षणाच्या मागणीवर बैठकांच सत्र सुरु आहे.

'आपलं खडकवासला'च्या सेल्फी पॉईंटची 24 तासांत तोडफोड; खासदार सुप्रिया सुळेंनी केलं होतं उद्घाटन
पुणे : खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या धरण चौपाटीवरिल सेल्फी पॉईंटची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे.  हवेली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु आहे. पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरण चौपाटीवर खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे दोन लाख रुपये खर्चून 'आपलं खडकवासला' हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आता 'या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी काही तरुण चालण्यासाठी धरण चौपाटीवर गेले असता हा प्रकार उघडकीस आला. दगड आणि इतर वस्तूंनी अक्षरे आणि सरपंचांच्या नामफलक तोडण्यात आला आहे. या तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात सरपंच सौरभ मते यांनी कारवाईची मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी उद्घाटन केलेल्या 'आपलं खडकवासला' सेल्फी पॉईंटची 24 तासात तोडफोड, एका दिवसात दोन लाख रुपये पाण्यात
खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या धरण चौपाटीवरिल सेल्फी पॉईंटची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. हवेली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु आहे. पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरण चौपाटीवर खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे दोन लाख रुपये खर्च करुन 'आपलं खडकवासला' हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. सोमवारी (14 जून) सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आता 'या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मंगळवारी (15 जून) सकाळी काही तरुण चालण्यासाठी धरण चौपाटीवर गेले असता हा प्रकार उघडकीस आला. दगड व इतर वस्तूंनी अक्षरे आणि सरपंचांच्या नामफलक तोडण्यात आला आहे. या तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांविरोधात सरपंच सौरभ मते यांनी कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई आणि कोकणात मागील 24 तासात झालेला पाऊस
मुंबईत मागील 24 तासातील पावसाची नोंद
मुंबई (सांताक्रूज) - 6.2 मिमी
मुंबई (कुलाबा) - 73 मिमी

कोकणात मागील 24 तासातील पावसाची नोंद
वेंगुर्ला - 130 मिमी
रत्नागिरी - 110 मिमी
मोरमुगाव - 100 मिमी
हरनाई - 90 मिमी
पावसामुळे मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे  लोकल ट्रेन (मध्य आणि पश्चिम मार्ग) सुरळीत आहेत. सध्या तरी कुठेही पाणी साचल्याचं वृत्त नाही. तर मुंबई विमातळावरील सेवाही सामान्य आहे. 

मुंबईतील हिंदमाता परिसरात पाणी भरण्यास सुरुवात, वाहतूक धीम्या गतीने सुरु

मुंबईत सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. हिंदमाता परिसर हा सखल भाग मानला जातो. इथे पाणी भरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम देखील युद्धपातळीवर सुरु झालं आहे. 

रेल्वेने अवैधरित्या पैशाची वाहतूक करत असलेल्या आरोपीला अटक, 9 लाख रूपये जप्त

गोंदिया रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर एक वर पोलिस गस्त घालत असताना एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला.  त्याला पकडुन विचारपूस केली असताना त्याच्या कडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली त्यांनतर पोलीसांनी त्याच्या जवळ असेल्या बॅगची तपासणी केली असुन त्यामध्ये पैसे आढळून आले, त्यामुळे रेल्वे पोलिसांनी पुन्हा पैसा विषयी विचारणा केली असताना त्याच्या कडून समधान कारक उत्तर मिळाले नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पैश्याची मोजनी केली असताना बॅग मध्ये एकून 9 लाख रूपये आढळून आले आहेत. रेल्वे पोलिसांनी आरोपी राजकुमार देवांगन रा. शंकरपुर राजनांदगाव (छत्तीसगढ) याला अटक केली आहे.



पुढील तीन तासात मुंबई, ठाणे आणि रायगडमधील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन तासात मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढील दोन तासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सिंधुदुर्गातील आंबोली घाटात अहमदनगर इथल्या युवतीची उडी, रेस्क्यू टीमने सुखरुप बाहेर काढलं

सिंधुदुर्गातील आंबोली घाटात एका युवतीने उडी घेतली. तीने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा संशय आहे. ही घटना काल (15 जून) सायंकाळी आंबोली घाटातील मुख्य धबधबा इथे घडली. तिचा शोध घेऊन रेस्क्यू टीमने सुरक्षित बाहेर काढलं. संबधित मुलगी त्या ठिकाणी रिक्षाने आली होती. आणि तिने अचानक उडी घेतली, अशी माहिती हवालदार दत्ता देसाई यांनी दिली.

रविवारनंतर विश्रांती घेतलेल्या पावसानं रत्नागिरीला झोडपलं, मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात

रत्नागिरी : रविवारनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाच्या सध्या जोरदार सरी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये कोसळत आहेत. मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. रविवार दुपारनंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत होता. त्यानंतर पुन्हा दोन दिवस गायब झालेल्या पावसाचं मध्यरात्रीपासून आगमन झालं आहे. सद्यस्थितीत कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी- नाल्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. 5 जून रोजी जिल्ह्यात मान्सून दाखल झाला होता. पण, त्यानंतर देखील आठवडाभर पावसाची प्रतिक्षा नागरिकांना होती. 

पुण्याजवळील सासवडमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली

पुणे : पुण्याजवळील सासवडमध्ये आज सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता त्या महिलेच्या आठ वर्षाच्या मुलाचाही खून झाल्याचं उघड झालंय. महिलेचे नाव आलीया शेख असून तिच्या मुलाचं नाव अयान शेख आहे.  मात्र आलीया यांचे पती आबीद शेख मात्र गायब आहेत. हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहणारे असुन तीन दिवसापूर्वी आबीद शेख यांनी ब्रीझा कार पिकनीकला जाण्यासाठी भाड्यानं घेतली होती. हे कुटंब पिकनिकसाठी बाहेर पडलं खरं पण आज सकाळी सासवड गावात आलीया यांचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला. सासवड पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत एका आठ ते दहा वर्षांच मुलाचाही मृतदेह आढळून आला. कात्रज पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच सकाळी सासवडला ज्यांचा मृतदेह आढळून आला त्या आलीया यांचा तो अयान नावाचा  मुलगा असल्याचं उघड झालं. तर आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रीझा कार पुणे सातारा रस्त्यावर एका चित्रपट गृहासमोर सोडून दिल्याच आढळून आलय. आबीद शेख हे एका एका कंपनीत ब्रॅच मॅनेजर म्हणून काम करतात. 

पार्श्वभूमी

Central Railway : मध्य रेल्वेची 'फ्लड रिलीफ टीम' सज्ज, सध्या पाच स्थानकांवर तैनात


वारंवार रेल्वे स्थानकांमध्ये पावसाचे पाणी भरल्यानंतर प्रवासी हे लोकलमध्ये अडकतात. त्यावेळी लोकलमधून बाहेर पडणे देखील धोक्याचे असते. कारण सर्वत्र रुळांवर पाणी साचलेले असते. अशावेळी रेल्वे प्रशासनाला स्थानिक अग्निशमन दलाची किंवा एनडीआरएफ पथकाची मदत घ्यावी लागते. मात्र आता ही पथके येण्याच्या आधीच मध्य रेल्वेचे स्वतःचे आरपीएफ पथक या प्रवाशांना रेस्क्यू करणार आहे. या पथकाने काल (मंगळवारी) ठाण्याच्या मासुंदा तलावात नागरिकांना वाचवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महासंचालक आलोक कंसल, आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार उपस्थित होते.


मध्य रेल्वेच्या आरपीएफने सर्वात पहिली "रेल्वे फ्लड रिलीफ टीम" तयार केली असून या टीममध्ये पंधरा जवानांचा समावेश केला आहे. त्यापैकी 10 पुरुष आणि पाच महिला आहेत. या टीमकडे रेस्क्यू करण्यासाठी बोटी देण्यात आलेल्या आहेत. सध्या पाच स्थानकांवर या बोटी आणि ही टीम तैनात आहे. या टीमला एनडीआरएफ पथकाने पुण्यात प्रशिक्षण दिले आहे. संकटकाळात प्रवाशांचे जीव कसे वाचवावे याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. 


SSR : सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं फेटाळला


दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याशी संबंधित ड्रग्ज तस्करीच्या केसमध्ये एनसीबीच्या रडावर असलेल्या साहिल शाहचा अटकपूर्व जामीन मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. साहिल शाहवर सुशांत सिंग याच्या साथीदारांना ड्रग्स पुरवल्याचा आरोप आहे. शाहनं पुरवलेले अमलीपदार्थ सुशांतचे हे साथीदार नंतर सुशांतला देत होते.


सदर प्रकरणी एनसीबीनं साहिलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एनसीबीनं मोठ्या प्रमाणात ड्रग्सही जप्त केलं होतं. मात्र एनसीबीची कारवाई टाळण्यासाठी साहिल सध्या फरार आहे. दरम्यान त्याच्या वतीनं प्रथम मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनसीबी कोर्टात दाखल झालेला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज कोर्टानं फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला आव्हान देत साहिलनं मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जो हायकोर्टानं मंगळवारी फेटाळून लावला.


साहिल हा अद्याप फरारच असून एनसीबीचे अधिकारी त्याच्या मगावर आहेत. साहिल हा पूर्वी सुशांत राहत असलेल्या सोसायटीतच राहत होता. सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीनं कलेल्या तपासात सुशांतला ड्रग्स दिल जात असल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणात एनसीबीनं एकापाठोपाठ एक अनेक आरोपींना अटक केली होती. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.