Breaking News LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Breaking News LIVE Updates, 13 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jun 2021 05:26 PM
चंद्रपूर : नाल्यात ट्रॅक्टर वाहून गेल्याने 3 जणांचा मृत्यू, राजुरा तालुक्यातील देवाडा येथील घटना

चंद्रपूर : नाल्यात ट्रॅक्टर वाहून गेल्याने 3 जणांचा मृत्यू, राजुरा तालुक्यातील देवाडा येथील घटना, मल्लेश शेंडे यांच्या शेतात गावातील काही मजूर मशागतीचे काम करायला गेले होते, अंदाजे 5 वाजता मुसळधार पाऊस झाल्याने सर्व मजूर ट्रॅक्टरने गावाकडे निघाले, मात्र शेतजवळील नाल्यात ट्रॅक्टर टाकताच नाल्याच्या पाण्यात तो वाहून गेला ज्यात माधुरी वगणे (27), मल्लेश शेंडे (45) आणि लक्ष्मी वगणे (7) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 3 जण बचावले

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील बावची परिसरात दहशत, पिसाळलेल्या लांडग्याने एकूण सहा जणांचा चावा

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील बावची परिसरात दहशत पिसाळलेल्या लांडग्याने एकूण सहा जणांचा चावा घेवून गंभीर जखमी केलेले आहे. यामध्ये यशराज राजू फोंडे वय १५ , सुकदेव सिदू जाधव वय ६०, तानाजी श्रीरंग चव्हाण वय ३२ यांना तातडीने सोलापूर येथे सिव्हील हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे .  याशिवाय अनुसया बसवराज माळी वय ३५, पार्वती इराप्पा माळी वय ३२, भारत विठोबा म्हमाणे रा. . पौट यांनाही लांडग्याने जखमी केलेले आहे. तसेच या हल्ल्यात दोन कुत्रे , एक गाय व म्हैस यांनाही चावले आहे . सदर लांडगा पिसाळलेला असल्याचे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. 

चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारा आणि पावसाची जोरदार हजेरी

चंद्रपूर : विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारा आणि पावसाची जोरदार हजेरी, चंद्रपूर शहरात जवळपास अर्धा तास कोसळला मुसळधार पाऊस, चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनजवळ एक झाड कोसळल्याची प्राथमिक माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापुरातील स्वप्नील पार्टे आणि सचिन तोडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मराठा समाजाच्या तरुणांचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा ताफा अडवणार असा दिला होता इशारा. उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कोल्हापुरातील स्वप्नील पार्टे आणि सचिन तोडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, मराठा समाजाच्या तरुणांचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा ताफा अडवणार असा दिला होता इशारा, उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कोल्हापुरातील स्वप्नील पार्टे आणि सचिन तोडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, मराठा समाजाच्या तरुणांचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा ताफा अडवणार असा दिला होता इशारा, उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

युट्यूबवर पाहून बॉम्ब बनवण महागात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नागपूरमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय मुलानं युट्यूब पाहून बॉम्ब तयार केला. परंतु, निकामी करता न आल्यानं त्याची पंचायत झाली. त्यानंतर त्यानं एक शक्कल लढवून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी बॉम्ब पथक पाचारण करुन बॉम्ब निकामी केला आणि याप्रकरणी अधिक तपास सुरु केला. त्यावेळी तरुणानं हा प्रकार केल्याचं उघड झालं. नागपूर पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. 

सांगली जिल्हा पुन्हा एनआयएच्या रडारवर

सांगली : जिल्ह्यातील पूर्वेकडील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गलाई व्यावसायिक आहेत. या तालुक्यातील अनेक गलाई व्यावसायिक हे या व्यवसायाच्या निमित्ताने देशभरात विखुरले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकाच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होत असल्याचे एनआयए संस्थेच्या तपासात समोर येत आहे. जिल्ह्यातील पूर्व भागातील आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यातील अनेक लोक या व्यवसायात आहेत. सोने गाळण्याच्या व्यवसायात या लोकांचा कुणी हात धरू शकत नसल्याने हे लोक या व्यवसायाच्या निमित्ताने देशातील अनेक राज्यात वसले आहेत. त्यामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोने तस्करी होत असावी, असा तपास यंत्रणांना संशय आहे. जिल्ह्यात अशा तस्करी झालेल्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या असून त्याचा तपास देखील सुरु आहे. आता दुबईतून केरळमध्ये आणलेले 100 किलो सोने तस्करीनेच सांगली जिल्ह्यात आणल्याची बाब समोर आल्याने तस्करीशी पुन्हा सांगलीचे कनेक्शन घट्ट असल्याचे स्पष्ट होत आहे.

वैभववाडी करुळ घाटातील वाहतूक सुरळीत

सिंधुदुर्गातील वैभववाडी करुळ घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आता ही दरड जेसीबीने बाजूला करून वाहतूक सुरळीत केलेली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता मालवाहतूक ट्रक उलटला, दोन जणांचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो वैनगंगा नदी पुलावरून खाली कोसळला. गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील आलापल्लीवरून बल्लारशाला वाहतूक करत असताना पहाटे 3 वाजता ही घटना घडलीय. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. त्याला आष्टी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू राम शिंदे यांच्यात गुप्त भेट

अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू राम शिंदे यांच्यात गुप्त भेट पार पडली आहे. अहमदनगरमध्ये अर्धा तासांसाठी ही भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 



 

नाल्याच्या पुरात वाहून 65 वर्षीय वृध्द शेतकऱ्याचा मृत्यू, मुखेड तालुक्यातील खातगाव येथील दुर्दैवी घटना

नांदेडमधील मुखेड तालुक्यातील खातगाव येथे नाल्याच्या पुरात वाहून जाऊन वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. काल दुपारी मुखेड तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे परिसरातील नदी नाले तुडुंब भरून प्रवाहित झाले. विठ्ठल धोंडिबा माने, वय 65 वर्षे, असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

जालन्यात बस खासगी बस आणि क्रुझरचा अपघात, एक ठार तर आठ जखमी

जालन्यात खासगी बस आणि क्रुझर जीपची समोरासमोर धडक झाली आहे. शहराजवळील अंबड टी पॉईंटवर सकाळी सहा वाजता हा अपघात झाला असून त्यात एक व्यक्ती ठार तर आठ जण जखमी झाले आहेत.  जखमीना जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं आहे. 

बुलढाणा : खामगावात बेडकांचा पाऊस पडल्याची अफवा आणि नागरिकांची धावाधाव.

खामगावात बेडकांचा पाऊस पडल्याची अफवा आणि नागरिकांची धावाधाव. रात्री खामगाव परिसरात जोरदार पाऊस पडल्याने बेडूक जमिनीवर आले. नागरिकांमध्ये बेडुकांचा पाऊस पडल्याची अफवा पसरल्याने बघ्यांची गर्दी. प्रजनन काळामुळे बेडूक जमिनीतून वर आल्याची जाणकारांचं मत.

मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे घाटातल्या खारेपाटणजवळ दरड कोसळली, एकेरी मार्गाने वाहतूक सुरु

मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे घाटातल्या खारेपाटणजवळ दरड कोसळली, दरड हटवण्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने वाहतुकीचा खोळंबा, एकेरी मार्गाने वाहतूक सुरु

सिधुदुर्गात तुरळक पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस झाला. आता मात्र जिल्ह्यातील काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. वैभववाडी, देवगड, कणकवलीत पाऊस आहे. जिल्ह्यातील इतर भागात मात्र ऊन पडतंय.

सोने तस्करी प्रकरणी सांगली जिल्हा पुन्हा एनआयएच्या रडारवर

सांगली : सोने तस्करी प्रकरणी सांगली जिल्हा पुन्हा एनआयएच्या रडारवर आहे. केरळमधील 100 किलो सोने तस्करी प्रकरणी एनआयएचे पथक तपासासाठी सांगली जिल्ह्यात दाखल झालं आहे. दुबईतून केरळमध्ये तस्करीने आणलेले 100 किलो सोने तस्करीनेच सांगली जिल्ह्यात आणल्याची बाब उघडकीस आल्यानंतर एनआयएने तस्करीतील मुख्य सूत्रधाराला अटक केली. या अटकेनंतर एनआयएच्या एका पथकाकडून जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव,  खानापूर तालुक्यात छापे टाकण्यात आले. एनआयएच्या जिल्ह्यातील कारवाईबाबत अत्यंत गोपनियता ठेवण्यात आली आहे. जुलै 2020 मध्ये एनआयएने केरळमधून सांगलीत तब्बल 100 किलो सोने तस्करी केल्याप्रकरणी काही संशयितांना कस्टम विभागाने अटक केली आहे. 

शिवसेना आमदाराने नालेसफाई कंत्राटदाराला बसविले नाल्याच्या कचऱ्यात

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसाने ठीक ठिकाणी मोठ्या प्रमानात पाणी भरले होते. यामुळे मुंबईची नालेसफाईबाबत विरोधक जोरदार टीका करीत आहेत. अशातच चांदीवलीच्या शिवसेनेच्या आमदार दिलीप लांडे यांना चक्क पालिकेच्या कंत्राटदाराला नाल्याच्या कचऱ्यात बसविण्याची आज वेळ आली. चांदीवली मधील संजय नगर भागात मोठ्या प्रमाणत नाले तुंबलेले होते. या बाबत नागरिकांनी तक्रार केल्यावर स्थानिक आमदार दिलीप लांडे हे त्या ठिकाणी गेले, सोबतच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील घेऊन गेले आणि ही नालेसफाई सुरु केली. मात्र या नालेसफाईचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले होते, त्याला त्या ठिकाणी बोलावून आमदारांनी  चक्क त्याच नाल्याच्या कचऱ्यात बसवले. जनतेचा त्रास त्याला कळवा म्हणून असे केल्याचे ते यावेळी सांगत होते. मात्र यामुळे एकीकडे महापौर संपूर्ण नालेसफाई झाल्याचे सांगत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आमदराला कंत्राटदाराला नाल्याच्या तुंबलेल्या कचऱ्यात बसविण्याची वेळ आल्याचे दिसत आहे.

पार्श्वभूमी

PM Modi G7 Speech: जी-7 शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा 'वन अर्थ वन हेल्थ'चा नारा, व्हर्चुअली सहभाग


PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज ब्रिटनमध्ये होत असलेल्या G7 परिषदेमध्ये व्हर्चुअली सहभागी झाले.  यूनायटेड किंगडमनं दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी जी-7 शिखर संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी 'वन अर्थ वन हेल्थ' चा मंत्र दिला. जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल  यांनी देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करत त्यांच्या या विचाराला पाठिंबा दिला.  


12 आणि 13 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन भाषणं (PM Modi Speech Live) या समिटमध्ये होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे G7 समिटमध्ये दुसऱ्यांदा सहभागी झाले आहेत. याआधी 2019 साली फ्रांसमध्ये झालेल्या समिटमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. 


सूत्रांनी सांगितलं की या बैठकीत फ्रांसचे राष्ट्रपती इमेनुएल मॅक्रो यांनी भारतासह अन्य देशांना कोरोना लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करताना त्यात सूट देण्याची मागणी केली.  त्यांनी कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरील बंदी हटवण्याचीही मागणी केली. लस बनवणाऱ्या देशांना कच्चा माल मिळायला हवा, असं ते म्हणाले.  


Maharashtra Corona Cases : राज्यात शनिवारी 10,697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 14,910 डिस्चार्ज, सध्या 1,55,474 ॲक्टिव्ह रुग्ण


Maharashtra Corona Cases : राज्यात काल तर 10,697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 14,910 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 360 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, शुक्रवारी ही संख्या कमी नोंदवण्यात आली होती. राज्यात आज एकूण 1,55,474 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 


आजपर्यंत एकूण 56,31,767 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.48% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 360 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84  टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,78,34,054 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,98,550 (15.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 9,63,227 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,807 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.