Breaking News LIVE : शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंचे मोठे बंधू हिरामण बारणे यांचा कोरोनामुळं मृत्यू

Breaking News LIVE Updates, 31 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Jul 2021 05:12 PM
मराठा आरक्षण बाबत राज्य सरकारच्या भूमिकेवर नाखूष असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षण बाबत राज्य सरकारच्या भूमिकेवर नाखूष असल्याचे  खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया. या राज्य सरकारने सारथीच्या बाबतीत काही बाबी पूर्ण केल्या. त्याव्यतिरिक्त कोणतेही आश्वासन पार पाडले नाही. यासाठी क्रांतीदिन 9 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार. बैठकीत आधीचे सरकार आणि आत्ताचे सरकार यांनी मराठा आरक्षण बाबत काय भूमिका पार पडली यावर चर्चा होईल.

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंचे मोठे बंधू हिरामण बारणे यांचा कोरोनामुळं मृत्यू

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंचे मोठे बंधू हिरामण बारणे यांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. विद्यमान नगरसेवक निलेश बारणेंचे ते वडील होते. अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या हिरामण बारणेंना वयाच्या सत्तरीत कोरोनाने गाठले. अर्धांगवायूच्या उपचारासाठी पंधरा दिवसांपूर्वी ते निपाणीला गेले होते. तिथून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आणि आज खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. हिरामण बारणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत नगरसेवक झाले तसेच त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पद ही भूषवले होते. थेरगावचे उपसरपंच, महापालिकेच्या स्थापनेनंतर 1986 च्या पहिल्या निवडणुकीत नगरसेवक आणि 1988-89ला स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणून ही त्यांनी काम केले. त्याबरोबरच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.

निर्बंधांमधुन पुणेकरांना कोणतीही सुट मिळणार नाही

पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधुन पुणेकरांना कोणतीही सुट मिळणार नाही. आज महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आधीच्या निर्बंधांपेक्षा कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पुण्यातील दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ चारपर्यंतच असणार आहे. पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत येत्या काही दिवसांत विचार केला जाईल असे उपमुख्यमंत्री अजीत पवार काल म्हणाले होते. मात्र, आज जाहीर झालेल्या निर्बंधांमधे आधीपेक्षा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात येत्या आठ तारखेला निर्णय

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात येत्या आठ तारखेला निर्णय. नाशिकमध्ये होऊ घातलेलं साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. ते होणार की नाही ऑनलाईन करायचे का या यासंदर्भात ठोस निर्णय घेणार.. औरंगाबादच्या  अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यालयात होणाऱ्या बैठकीत घेणार निर्णय.. कार्यवाह दादा गोरे यांची एबीपी माझाला माहिती...

कोकण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगावमधील सामाजिक संस्था सरसावल्या
कोकण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगावमधील सामाजिक संस्था मदतीला धावून आल्याच पाहायला मिळत आहे,शहरातील विविध सामाजिक संस्थांनी साडेसात लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू  कोकणाकडे रवाना केल्या आहेत. कोकणात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणी महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालेले आहे. अनेकांची घर दार पाण्याखाली गेल्याने ,आता जगायचं कस असा प्रश्न या ठिकाणच्या नागरिकांच्या पुढे आ वासून उभा राहिलेला असल्याने ,या ठिकाणच्या नागरिकांच्या मदती साथी जनतेने आणि सामजिक संस्थांच्या वतीने मदत उभी करून द्यावी अशा प्रकारचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते.

प्रशासनाच्या या आवाहनाला जळगाव शहरातील सेवारथ परिवाराने पुढाकार घेऊन मदत गोळा करण्यात सुरुवात केली असता अनेक सामजिक संस्था आणि व्यक्तींनी या वेळी सढळ हाताने मदत केली असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मदत करणाऱ्या संस्थांच्या मध्ये प्रामुख्याने  सेवारथ परिवार, सुमतीलाल टाटिया,जैन श्र्वेतांबर मूर्ती पूजक संघ,जैन महिला मंडळ,सिंधी समाज,रोटरी क्लब जळगाव मिड टाऊन,चटई असो,रत्ना जैन,विजय रेवतानी,कस्तुरी चांद बाफना,लघु उद्योग भारती,सेवा धर्म परिवार यांचा समावेश होता.

 

कोकणातील जनतेला सध्या येत असलेल्या प्रचंड अडचणी पाहता त्यानुसार मदत साहित्य गोळा करण्यात आले आहे.या मध्ये साड्या,शर्ट पँट,महिलांसाठी सॕनीटरी पॕड, टिकाव, फावडे,रिकामे डबे, बिस्किट,मॕगी, तेल, चहा, साखर,हळद, आटा,चटई,पाणी शुद्ध करण्याचे ड्रॉप,लहान मुलांचे कपडे, चपला,औषधी ,प्लास्टिक शीट, फिनाॕईल इत्यादी प्रकारच्या साडेसात लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आलेल्या आहे.

 

जिल्हाप्रशासनाचा आवाहनाला सामाजिक संस्थांनी केलेली ही मदत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून थेट पूरग्रस्तांच्या साठी वाटप केली जाणार आहे.प्रशासनाच्या मदती साठी सेवारत परिवाराच्या सह 50 कार्यकर्ते हे मदत वाटप साठी कोकणाकडे रवाना झाले आहेत.

 

 जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मानले आभार

 

जिल्हाप्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामजिक संस्थांनी केवळ दोन दिवसात साडेसात लाख रुपयांची मदत उभी करून दिल्या बद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व सामजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. 
महाड येथे लेप्टोस्पायरसिसचे 15 रुग्ण आढळले

महाड येथे  शुक्रवारपर्यंत झालेल्या तपासणीत लेप्टोस्पायरसिसचे 15 रुग्ण आढळले आहेत. तसेच तीन कोरोनाचे रुग्णही आढळले आहेत. महाड येथे वैद्यकीय तपासणी सुरु असून त्यामधून या रुग्णांची माहिती मिळाली असल्याचं रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं.

सांगोल्यात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांची गर्दी, सांगोल्यात शोकाकुल वातावरण, अंत्ययात्रेला सुरुवात

Breaking News LIVE : सांगोल्यात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांची गर्दी, सांगोल्यात शोकाकुल वातावरण, अंत्ययात्रेला सुरुवात, सांगोला सूतगिरणी परिसरात होणार अंतिम संस्कार #GanpatraoDeshmukh



 



https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-july-31-2021-maharashtra-political-news-mumbai-rain-news-996776

उल्हासनगरात महापालिका कर्मचाऱ्याचा विद्युत खांबावर दुरुस्ती करताना शॉक लागून मृत्यू

महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. दिलीप मोहिले असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. दिलीप मोहिले हे उल्हासनगर महापालिकेच्या विद्युत विभागात टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी मोहिले हे उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागात महावितरणच्या खांबावर दुरुस्ती करत होते. यावेळी सर्व्हिस लाईन्स ओपन असल्यानं मोहिले यांना त्याचा जोरदार झटका बसला आणि ते जागीच कोसळले. त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 

उल्हासनगरात महापालिका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू

उल्हासनगरात महापालिका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू,


विद्युत खांबावर दुरुस्ती करताना लागला शॉक

रेती चोरीचा गुन्हा दाखल करतो म्हणून धमकी देऊन लाच घेतल्याची तक्रार

घर बांधकामाला रेती नेणाऱ्या हॉटेल व्यावसायिकावर रेती चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मुकूटबन ठाणेदार धर्मा सोनोने, सहायक पोलिस उपनिरीक्षक ऋषी ठाकूर, पोलीस कर्मचारी सुलभ उईके यांनी 50 हजार रुपयांची लाच घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. मुकुटबन येथील हॉटेल व्यावसायिक दीपक उदकवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकाकडे तक्रार दिली आहे. 

ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवुन सोनाराला सव्वा चार लाखांचा गंडा घालणारा भामटा गजाआड

ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवून सोनाराकडून सव्वा चार लाखाचे सोने घेऊन पसार झालेल्या भामट्याला कल्याण क्राइम ब्रांचने  24 तासांत बेड्या ठोकल्यात. विनय लोहिरे अस या भामट्याचं नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात याआधी देखील पुणे व ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत . 

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पार्थीवावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले.  वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी एक वाजता शेतकरी सहकारी सुतगिरणी सांगोला येथे त्यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. 

पार्श्वभूमी

शेकापचे ज्येष्ठ नेते 'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख यांचे निधन
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले.  वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.


गणपत देशमुखांना संपूर्ण राज्यभरात आबा नावाने त्यांना हाक मारली जात होती. गणपतराव देशमुखांचा जन्म 10 ऑगस्ट 1927 साली सोलापूर येथे झाला.  1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. सुरूवातीपासून गणपत देशमुख शेतकरी कामगार पक्षात  होते.  1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले होते. त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.1999 मध्ये गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता.  2019 ला राजकारणातून निवृत्ती घेतली. नातू डॉ. अनिकेत देशमुख याने या मतदारसंघात निवडणूक लढवली.


शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी सुरेंद्र गडलिंग यांना हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर
एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी ॲड. सुरेंद्र गडलिंग यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी ॲड. सुरेंद्र गडलिंग यांना 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गडलिंग यांच्या दिवंगत आईच्या श्राद्ध विधींबाबत हा जामीन शुक्रवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने मंजूर केला. गडलिंग यांच्या आईचं मागील वर्षी ऑगस्टमध्ये कोरोनामुळे निधन झालंय. मात्र त्यांचे काही विधी आणि शोकसभा अद्यापही झालेली नाही. वर्षपूर्तीच्या आधी हे विधी करायला हवे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा अशी मागणी त्यांनी एका अर्जाद्वारे हायकोर्टाकडे केली होती. ती मान्य करत न्यायालयानं त्यांना 13 ते 21 ऑगस्टपर्यंत त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.


Maharashtra Corona Cases : राज्यात काल 7,431 रुग्णांना डिस्चार्ज; 6,600 रुग्णांची भर
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल 6,600  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 431 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 83 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61टक्के आहे. राज्यात काल 231 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 30 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 77 हजार 494 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (9), जालना (92), हिंगोली (70), वाशिम (84), गडचिरोली (54)या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 001 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.