Breaking News LIVE : शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन
Breaking News LIVE Updates, 30 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे रात्री साडे नऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. ते 95 वर्षाचे होते. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते
ईडीकडून अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखला नवीन समन्स. सोमवारी सकाळी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची पुरग्रस्त भागासाठी मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त भगत वीजबिल वसुली न करण्याचे महावितरणला आदेश दिले आहेतय. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत ग्राहकांना वीजबिल देण्यात येणार नाहीत. वीजबिल माफ करण्याचा माझा अधिकार नाही, हा अधिकार राज्य मंत्रिमंडळाला आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.
Breaking News LIVE : पूरग्रस्तांना तातडीची मदत तर दिलीच पाहिजे, मात्र यावर कायमस्वरुपी उपाय काढावा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-july-30-2021-maharashtra-political-news-mumbai-rain-updates-hsc-results-996637
Breaking News LIVE : मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही कोल्हापूरच्या दौऱ्यावर, जिथं मुख्यमंत्री येणार आहेत तिथे आधी फडणवीस पोहोचले
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-july-30-2021-maharashtra-political-news-mumbai-rain-updates-hsc-results-996637
शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना, ममतांच्या दिल्ली दौऱ्यात पवारांची भेट नाहीच,
ममता पाच दिवस दिल्लीत, अनेक नेत्यांची घेतली भेट,
विरोधी एकजुटीची चर्चा सुरू असताना ममता बॅनर्जी यांनी पवारांची भेट का टाळली?
सोनिया, केजरीवाल, कनिमोळींची भेट घेणा-या ममता पवारांना मात्र नाही भेटल्या
मुख्यमंत्री थोड्याच वेळात कोल्हापूरमधील शाहूपुरीत पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहचतायत.
पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला. आज सकाळी नऊ वाजल्यापासून 4650 क्यूसेकने विसर्ग सुरु केला आहे. काल 3500 क्यूसेकने विसर्ग सुरू होता. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पवना नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात मेट्रोची आज चाचणी घेण्यात येणार असून त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे 3.5 किलोमीटर अंतरात ही चाचणी होणार आहे. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक आणि महापौर राखी कंचर्लावार यांचे पती संजय कंचर्लावार यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी, अश्लील शिवीगाळ आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचे उपायुक्त विशाल वाघ यांनी सिटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. महापौरांच्या दालनात काल आमसभेच्या आधी झालेल्या बैठकीत संजय कंचर्लावार यांनी धमकी दिल्याचा वाघ यांचा आरोप आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Corona Cases : राज्यात काल 11, 124 रुग्णांना डिस्चार्ज, 7,242 रुग्णांची भर
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल 7242 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 हजार 124 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 75 हजार 888 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59टक्के आहे.
राज्यात काल 190 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 27 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 78 हजार 562 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (9), जालना (84), हिंगोली (69), वाशिम (85), गोंदिया (97), गडचिरोली (61) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
Ind vs SL 3rd T20I: श्रीलंकेने रचला इतिहास, पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी-20 मालिका जिंकली
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात श्रीलंकेने भारताला 7 गडी राखून पराभूत केले. यासह श्रीलंकेने ही तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. श्रीलंकेने दोन वर्षानंतर द्विपक्षीय टी -20 मालिका जिंकली आहे. याआधी त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टी -20 मालिका जिंकली होती. त्याचबरोबर भारताविरुद्ध पहिल्यांदाच श्रीलंकेचा संघ टी -20 मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. बर्थडे बॉय वनिंदू हसरंगा हा श्रीलंकेच्या विजयाचा नायक होता. पहिल्यांदा गोलंदाजीत हसरंगाने त्याच्या चार षटकांत केवळ 9 धावा देऊन चार महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. आणि नंतर 9 चेंडूत 16 धावांची नाबाद खेळी खेळली.
'पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी', मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पुर्तता करून लवकरात लवकर मिळावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्त भागातील व्यावसायिक दुकानदार आणि नागरिकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्याच्या अनुषंगाने विमा कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -