Breaking News LIVE : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Breaking News LIVE Updates, 27 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Jul 2021 09:50 PM
orona Update : राज्यात आज 6,258 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 126745रुग्ण कोरोनामुक्त

orona Update : राज्यात आज 6,258 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 126745रुग्ण कोरोनामुक्त

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या (28 जुलैपासून) तीन दिवसांचा दौरा पूरग्रस्त भागांचा करणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांत जाऊन पूरग्रस्तांच्या ते भेटी घेतील आणि पाहणी करतील. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही या दौर्‍यात उपस्थित राहणार आहेत. 28 ते 30 जुलै या कालावधीत हा दौरा होणार आहे

ल्डमॅन दत्ता फुगेच्या मुलाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली अटक

गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मुलाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चापट मारल्याचा रागातून त्याने एकाची हत्या केलीये. शुभम फुगे असं त्याचं नाव आहे. अमन डांगळे नावाच्या व्यक्तीवर शस्त्राने हल्ला करत त्याची हत्या केली. दारू खरेदी करताना अमन आणि शुभम मध्ये वाद झाले. तेंव्हा अमन ने शुभम चापट मारली. मग गोड बोलून शुभम आणि अल्पवयीन मुलाने अमनला एका ठिकाणी घेऊन गेले. तिथं अमन ने शुभमला पुन्हा एक चापट मारली. तू आमच्या भाईला चापट का मारली, असा जाब अल्पवयीन मुलाने विचारला. याच रागाच्या भरात शुभम आणि अल्पवयीन मुलाने त्याच्यावर शस्त्राने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी शुभमला अटक तर अल्पवयीन मुलाला चोवीस तासात ताब्यात घेतले.

नागपुरातील व्यापारी आक्रमक, कार-बाईक रॅलीच्या माध्यमातून सरकारचा निषेध

नागपुरातील कोरोना निर्बंधामुळं व्यापारी आक्रमक झाले असून आज व्यापाऱ्यांनी कार-बाईक  रॅली काढत सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर लेव्हन वनमध्ये असूनही लेव्हल तीन अंतर्गत असलेल्या निर्बंधामुळं व्यापारी त्रस्त झाले असून व्यापार नष्ट होत चालल्याचा आरोप करत आज शेकडो व्यापारी कार आणि बाईक रॅली च्या माध्यमातून रस्त्यावर उतरले. निर्बंध हटवा, व्यापार वाचवा असा नारा देत सरकारचा निषेध सुरु केला आहे. 'सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समिती' च्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे.

नागपुरातील व्यापारी आक्रमक, कार-बाईक रॅलीच्या माध्यमातून सरकारचा निषेध

नागपुरातील कोरोना निर्बंधामुळं व्यापारी आक्रमक झाले असून आज व्यापाऱ्यांनी कार-बाईक  रॅली काढत सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर लेव्हन वनमध्ये असूनही लेव्हल तीन अंतर्गत असलेल्या निर्बंधामुळं व्यापारी त्रस्त झाले असून व्यापार नष्ट होत चालल्याचा आरोप करत आज शेकडो व्यापारी कार आणि बाईक रॅली च्या माध्यमातून रस्त्यावर उतरले. निर्बंध हटवा, व्यापार वाचवा असा नारा देत सरकारचा निषेध सुरु केला आहे. 'सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समिती' च्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार : शरद पवार 

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार, तसेच पूरग्रस्तांना भांडी, पांघरुण, मास्क आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 

पूरपरिस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल : शरद पवार

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि कोल्हापुरात पुरामुळे अतोनात नुकसान, पूरपरिस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल ; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लाईव्ह

अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान : शरद पवार

अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांना मदतीची गरज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लाईव्ह

अतिवृष्टीमुळे राज्याचं मोठं नुकसान, राज्य सरकार लवकरच मदत करणार: शरद पवार

अतिवृष्टीमुळे राज्याचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकार लवकरच मदतीची घोषणा करेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचे जास्त नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या पूर परिस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल असंही ते म्हणाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापुरातील पुराचे पाणी आलेल्या कुंभार गल्ला भागाचा दौरा केला. त्यावेळी या भागातील व्यापारांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. 

दोन वर्षांपासून रखडलेल्या सोडतीला अखेर दसऱ्याचा मुहूर्त, नऊ हजार घरांची सोडत होणार

दोन वर्षांपासून रखडलेल्या सोडतीला अखेर दसऱ्याचा मुहूर्त ठरला असून त्यावेळी नऊ हजार घरांची सोडत करण्याचा म्हाडाच्या कोकण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेतील 6500, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर 20 टक्के योजनेतील 500 घरांचा या सोडतीत समावेश आहे. मिरारोड, वर्तक नगर ठाणे, विरार, कल्याण, गोठेघर, वडवली या ठिकाणच्या घरांसाठी ही सोडत आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आज महाड, नागोठणे व पेण दौऱ्यावर

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आज महाड, नागोठणे व पेण दौऱ्यावर असून पुरामुळे विद्युतविभागाच्या झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 04.30 वाजता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत एमआयडीसी, महाड विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतील.

आईकडून मुलीला वायरने मारहाण, दामिनी पथकाने मुलीला ताब्यात घेतलं

औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर भागात आईकडून मुलीला बेदम मारहाण झाल्याची घटना घडलीय.  चुकून कपडे धुण्याचा सोडा/निरमा जास्त पडले गेल्यामुळे  आणि भांडी घासली नाहीत म्हणून आईने वायरने आपल्याच मुलीला मारहाण केली आहे. त्यामुळे मुलीच्या अंगावर मारहाणीचे ओळ पडले असून मारहाणीमुळे मुलीला चालता येईना. दामिनी पथकाने मुलीला घेतले ताब्यात घेतलं आहे. 

सांगली जिल्ह्याला रात्री तब्बल 65 हजार कोरोना लसीचा पुरवठा, जिल्ह्याला प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीचा पुरवठा

सांगली जिल्ह्याला रात्री तब्बल 65 हजार कोरोना लसीचा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्याला प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीचा पुरवठा करण्यात आला असून पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर, नागरिकांची झालेली  गर्दी आणि यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने पूर पट्टातील नागरिकांचे  लसीकरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

सांगलीकरासाठी दिलासादायक बातमी, कृष्णेची पातळी पाच फुटाने ओसरली

कृष्णेची पातळी पाच फुटाने ओसरली आहे तर जिल्ह्याला तब्बल 65 हजार कोरोना लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे. आयर्विन पुलाजवळ 55 फुटांवरीव पाणी पातळी आता  50 फुटापर्यंत ओसरली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Flood : पूरग्रस्तांसाठी सरकारचा हा अॅक्शन प्लॅन, कॅबिनेटमध्ये होणार निर्णय
महापूरामुळे कोकणाचे पुरते नुकसान झाले असून, नुकसानग्रस्तांना नेमकी कशा पद्धतीने मदत केली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आता ठाकरे सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अॅक्शन प्लॅन तयार केला असून, येत्या कॅबिनेटमध्ये आर्थिक अहवाल समोर ठेवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरस्थितीमुळे किती आर्थिक नुकसान झाले याचा आढावा घ्या असे आदेशच प्रशासनाला दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज सातारा दौरा रद्द झाला त्यानंतर त्यांनी थेट मुंबईत येऊन बैठक बोलवली होती या बैठकीत पूरग्रस्तांना काय मदत करता येईल? आर्थिक पॅकेज कसं देता येईल यावर चर्चा झाली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. 


राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता समुद्र किनारी राज्य सरकार बांधणार संरक्षण भिंत, तब्बल 1 हजार 600 कोटींचा खर्च अपेक्षित
राज्याच्या अनेक भागात पुराचा मोठ्या प्रमाणावर तडाखा बसलाय. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान तर झालंच आहे. मात्र अनेकांचे बळी ही गेलेत. त्यामुळे राज्य सरकार आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात काही निर्णय घेत आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहेत. केरळ राज्यात अश्याप्रकारे निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धरतीवर राज्य सरकार हा निर्णय घेत आहे. समुद्रकिनारा लाभलेल्या जिल्ह्यांपैकी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. संपूर्ण किनारपट्टीला संरक्षण भिंत बांधणं शक्य नाही. त्यामुळे ज्या गावांना समुद्राचा धोका आहे. पावसाळ्यात अथवा भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी गावात आणि वाड्या-वस्त्यांमध्ये येऊ नये यासाठी ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. 


Maharashtra Flood : घरात पाणी शिरलेल्या कुटुंबांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत, विजय वडेट्टीवार यांची घोषणा
राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील परिस्थिती बिकट बनली होती. नागरिकांच्या घरांचं, शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले आहे. या नागरिकांना तातडीची मदत सरकारन जाहीर केली आहे. ज्या नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत सरकारने जाहीर केली आहे. तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजारांची मदत जाहीर केली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या मदतीची घोषणा केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकरी व्यापारी यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत. पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे अडचणीतल सापडलेल्यांना नक्कीच मदतीचा हात दिला जाईल. मुख्यमंत्री सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि केंद्राला देखील याबाबत माहिती दिली जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं.


Maharashtra Corona Update : राज्यात काल 4877 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 11,077 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. काल 4,877 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 हजार 077 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 46 हजार 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 टक्के आहे. राज्यात काल 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. तब्बल 44 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  88 हजार 729रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (43), हिंगोली (57), यवतमाळ (9), गोंदिया (60), गडचिरोली (61) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 550 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


Vijay Mallya Bankrupt: कर्जबुडव्या विजय माल्ल्या ब्रिटीश कोर्टाकडून दिवाळखोर घोषित, बँका पैसे वसूल करु शकणार
बँकांची हजारो कोटींची फसवणूक करुन फरार झालेला भारतीय उद्योजक विजय माल्ल्याला सोमवारी लंडन हायकोर्टाने दिवाळखोर घोषित केले. या निर्णयानंतर भारतीय बँकांना विजय माल्ल्याची मालमत्ता सहज ताब्यात घेता येणार आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वात असलेल्या भारतीय बँकांच्या संघटनेने माल्ल्याविरोधात ब्रिटिश कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सला देण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी माल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.