Breaking News LIVE : वरळी हनुमान गल्ली येथे मध्ये लिफ्ट कोसळून दोन जणांचा मृत्यू

Breaking News LIVE Updates, 24 July 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jul 2021 06:36 PM
वरळी हनुमान गल्ली येथे मध्ये लिफ्ट कोसळून तीन जणांचा मृत्यू

N M जोशीच्या हद्दीत वरळी हनुमान गल्ली येथे मध्ये लिफ्ट कोसळली असून यामध्ये लोकांना इजा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 
ललित अंबिका असे इमारतीचे नाव आहे. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू ही झाल्याची माहिती मिळत आहे. तर आकडा वाढण्याची देखील  शक्यता आहे.  तर सहा ते सात जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. लिफ्टमध्ये एकूण सहा जण होते. त्यापैकी चार जण अजूनही अडकलेले आहेत.

लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द तर काही उशीरा धावणार


जालना ते बदनापूर सेक्शन मधील दिनेगाव रेल्वे स्थानकावर दिनांक 25 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान 15  दिवस दुपारी 3.30  ते 6.30 वाजेपर्यंत रोज 3 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे


तो पुढील प्रमाणे – 
1. गाडी क्रमांक 07619 नांदेड ते औरंगाबाद साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 30 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान पूर्णतः रद्द करण्यात येत आहे. 
2. गाडी क्रमांक  07050 औरंगाबाद ते हैदराबाद विशेष गाडी दिनांक 25 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून रोज 125मिनिटे उशिरा सुटेल. म्हणजेच तिची नियमित वेळ दुपारी 4.15 वाजता सुटण्याऐवजी या कालावधीत औरंगाबाद येथून सायंकाळी 6.20  वाजता सुटेल.
3. गाडी क्रमांक 07653 हैदराबाद ते पूर्णां विशेष गाडी दिनांक 26 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद येथून 90 मिनिटे उशिरा म्हणजेच तिची नियमित वेळ सकाळी 8.20 वाजता सुटण्याऐवजी सकाळी 9.30 वाजता सुटेल. 

मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन  केंद्रात वरिष्ठ अधिकारी गायब


राज्यात आपत्कालीन परिस्तिथी असताना मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन  केंद्रात वरिष्ठ अधिकारी गायब आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी पाहणी दौऱ्यावर आहेत. मात्र कंट्रोल रूम मध्ये एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नाही. कंट्रोल रूममध्ये कनिष्ठ अधिकारी फक्त उपस्थित आहेतराज्यात एवढी मोठी आपत्ती असताना सनदी अधिकारी गंभीर नाही का?

आयसीएसई दहावी आणि आयएससी 12 वी बोर्डाचा निकाल जाहीर


आयसीएसई दहावी आणि आयएससी 12 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आयसीएसई दहावी बोर्डाचा निकाल 99.98 टक्के  तर आयएससी बारावी बोर्डाचा निकाल 99.76 टक्के लागला आहे. 

नागपुरात चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीला 200 उठाबशा काढायला लावल्या, विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली

नागपूर : नागपूर जिल्ह्यात चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीला 200 उठाबशा काढायला लावल्यानंतर विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याचा प्रकार घडला आहे. नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील महालगाव येथे हा प्रकार घडला. जिल्हा परिषद शाळेत चवथ्या वर्गात शिकणारी गाथा मूल एका महिला शिक्षिकेकड शिकवणीला जात होती. ग्रामीण भागात अनेक मुलांकडे मोबाईल फोन नसल्याने ऑनलाईन शिक्षण शक्य होत नसल्यामुळे ग्राम पंचायत आणि शाळेने गावातल्या शिक्षित तरुण तरुणींकडे मुलांना शिकवणी वर्गाची सोया केली होती. अशाच शिकवणी वर्गात गाथा उशिरा पोहचल्यानं तिला शिक्षिकेने दोनशे उठाबशा काढायला लावल्या. त्यानंतर विद्यार्थिनीची घरी गेल्यावर प्रकृती बिघडली. तिला सुरुवातीला तिला खाजगी डॉक्टर कडे दाखल करण्यात आले. त्यांनतर तिला हिंगणघाट आणि वर्ध्यातही डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. मुलीची प्रकृती सुधारल्यानंतर पालकांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी शिकवणीची शिक्षिका आणि गाथा शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

2 कोटींची लाच मागणारा डीवायएसपी ACB च्या ताब्यात

परभणी : राज्यात लाचखोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. परभणीच्या सेलू तर चक्क उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी एकाला मृत्यूच्या प्रकरणात  अडकवण्याची धमकी देऊन तब्बल दोन कोटी रुपये मागितल्याचे उघड झाले असून या प्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून दीड कोटींची लाच ठरली ज्याचा पहिला टोकन 10 लाख घेताना  एका पोलीस कर्मचाऱ्यास मुंबई एसीबीच्या टीम ने रंगेहात पकडले असून डीवायएसपी यांच्यासाठी ही लाच घेण्यात आल्याने डीवायएसपी राजेंद्र पाल आणि पोलीस नाईक चव्हाण यांना ताब्यात घेतले आहे. 

मराठीतील प्रख्यात कवी सतीश काळसेकर यांचं निधन

मराठीतील प्रख्यात कवी, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

शिरपूर येथील विमान प्रशिक्षण केंद्रातील विमान कोसळून एक जण ठार
जळगाव : शिरपूर येथील विमान प्रशिक्षण केंद्रातील विमान कोसळून त्यात एक जण ठार तर एक जण गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सातपुडा पर्वत परिसरात  नुकतीच घडली होती. ही घटना ज्या ठिकाणी घडली होती त्या ठिकाणी कोणतेही वाहन पोहोचणे अवघड असल्याने या अपघातात गंभीर जखमी तरुणीला इस्पितळात नेण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती , विमान पडल्याचे कळताच घटना स्थळा जवळच शेतीत मजुरीचे काम करणाऱ्या विमल बाई भिल या घटना स्थळी पोहोचल्या, समोर विमानातून पडलेली तरुणी विव्हळत असल्याचे त्यांना दिसले ,तिला दवाखाण्यात नेणे गरजेचे होते,मात्र घटना स्थळा पर्यंत कोणतेही वाहन पोहोचणार नसल्याने ,वाहन येऊ शकते त्या तीन किलो मिटर अंतरावर या जखमी तरुणी ला उचलून न्यायचे कस असा विचार सगळ्यांच्या मनात होता,जखमी तरुणीला उचलून न्यायचे तर स्त्रेचर ची आवश्यकता होती मात्र जंगल भाग असल्याने स्ट्रेचर वेळेत मिळणे मोठे अवघड काम होते. 

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update : राज्यात काल (शुक्रवारी) 6,753 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 5,979 रुग्ण कोरोनामुक्त


राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल 6,753  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 979 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 22 हजार 485 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. 


राज्यात काल 167 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. तब्बल 28 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  94 हजार 769 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (20), हिंगोली (52), यवतमाळ (14), गोंदिया (58), गडचिरोली (91) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 809 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


परभणी  जिल्ह्यात काल शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 817 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 64,46, 360 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,51, 810 (13.46 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,52,702 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,653व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


सरकारी कार्यालयात आता ड्रेसकोडनंतर मोबाईल वापरालाही नियमावली, काय आहेत नियम?


शासकीय कार्यालयात ड्रेस कोड कसा असावा याचे नियम जारी केल्यानंतर आता मोबाईलचा वापर कसा करायचा या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढून नियम जारी केले आहेत.   शासकीय कार्यालयात मोबाईल वापरताना अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाही. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचं सांगत परिपत्रक काढण्यात आलं आहे


शासकीय कार्यालयात मोबाईल वापरण्याच्या संदर्भात काय आहे नियम-



  1.  कार्यालयीन कामासाठी कार्यालयात असलेला दूरध्वनीचा (लँडलाईन) वापर करावा 

  2.  मोबाईल वरती बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा आणि आपल्या बाजूला इतरही उपस्थित आहे याचाही विचार करावा 

  3.  मोबाईल वरती बोलताना संविधानिक भाषेचा वापर करावा

  4.  मोबाईल वरती बोलत असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सला तात्काळ उत्तर द्यावा

  5.  अत्यावश्यक वैयक्तिक मोबाईल कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत

  6.  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल सायलंट मोड वरती ठेवण्यात यावा 

  7.  कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावरती असाल तर मोबाईल बंद ठेवू नये


राज्यातील पूरग्रस्त भागात उद्या होणाऱ्या सीए फाउंडेशन परीक्षेचं काय? आयसीएआयकडून अद्याप सूचना नाही


उद्यापासून देशातील सर्व राज्यात सीए फाउंडेशन कोर्स जून -जुलै 2021ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, राज्यात रत्नागिरी, रायगड भागातील पूरपरिस्थिती पाहता या भागातील विद्यार्थ्यांसाठी तरी या परीक्षा बाबत काही निर्णय घेतला जाणार का ? पुढे ढकलली जाणार का? किंवा विद्यार्थ्यांना काही सवलत मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र, यामुळे काहीसा संभ्रम जरी निर्माण झाला असला तरी  याबाबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटटस ऑफ इंडियाने याबाबत कुठलेही अधिकृत सूचना दिलेली नाही


द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटटस ऑफ इंडियाने 5 जुलै रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे 24,26,28 आणि 30 जुलै रोजी सीए फाउंडेशन कोर्स अभ्यासक्रमाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना कोव्हीड परिस्थितीचा विचार करता असाधारण परिस्थितीत कोव्हीड पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्याला opt out option देण्यात आला आहे. या पर्यायाचा विद्यार्थ्याने स्वीकार केल्यास त्याला जुलै ऐवजी ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये पुन्हा देता येणार आहे. सी ए फाउंडेशनसाठी हा पर्याय विद्यार्थ्यांना 28 जून ते 30 जुलै पर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे साधारण परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना या पर्यायाद्वारे जुलै ऐवजी नोव्हेंबर मध्ये हे पेपर द्यावे लागतील. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.