Breaking News LIVE : मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांकडून मंदिर व्यवस्थेची पाहणी

Breaking News LIVE Updates, 19 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jul 2021 11:56 PM
मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांकडून मंदिर व्यवस्थेची पाहणी

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर यांनी  मंदिर परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरू

 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरू. दोन लेन वरून ही वाहतूक धीम्या गतीने वाहतूक पुण्याला येत आहे. मात्र तिसरी लेन बंद आहे, त्या लेन वरील दरड हटविण्याचे काम सुरू आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली. बोरघाटात पावणे दहाच्या सुमारासची घटना आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प, काही वेळात वाहतूक सुरू होईल. अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली. युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू आहे. 

ठाणे डान्स बार प्रकरण : दोन सिनिअर पीआय निलंबित, तर दोन एसीपींची तात्काळ बदली


ठाणे डान्स बार प्रकरण : दोन सिनिअर पीआय निलंबित, तर दोन एसीपींची तात्काळ बदली करण्यात आली आहे

अकरावी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर

अकरावी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान अकरावी सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. 20 जुलै सकाळी 11:30 पासून  ते 26 जुलै पर्यंत परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आवेदन पत्र ऑनलाइन भरायचे आहेत.

एबीपी माझा इम्पॅक्ट : डान्सबार प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांची तातडीनं कारवाई

डान्सबार प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांची तातडीनं कारवाई करण्यात आली आहे. 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि 2 एसीपी यांच्यावर कारवाई करण्याच आले आहे. चौघांना त्यांच्या सध्याच्या पदावरून काढून कंट्रोल रूमला बदली केलं. अतिरीक्त आयुक्त या सर्व प्रकरणाची चौकशी करून 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

फादर स्टॅन स्वामी हे उमद्या व्यक्तिमत्वाचे होते, त्यांनी समाजासाठी फार भरीव योगदान दिलं - हायकोर्ट

कायदेशीरदृष्ट्या न्यायनिवाडा करताना आम्हालाही अनेकदा मानवतेचा दृष्टीकोन बाजूला सारणं कठीण जातं, फादर स्टॅन स्वामी हे उमद्या व्यक्तिमत्वाचे होते, त्यांनी समाजासाठी फार भरीव योगदान दिलं, फादर स्वामी यांच्याबाबतीत जे घडलं ते दुर्भाग्यपूर्ण आहे, त्यासाठी आम्ही कुणालाही दोष देत नाही. पण कुठेतरी आम्हालाही उत्तर द्यावं लागेल  - हायकोर्ट

आम्हीदेखील त्यांचा अंत्यविधी ऑनलाईन पाहिला, त्यांना यथोचित सन्मानात निरोप देण्यात आला - न्यायमूर्ती एस.एस. शिंदे

आम्ही कोर्टाचा पूर्ण आदर करतो, हायकोर्टानं वेळोवेळी आम्हाला पूर्ण ऐकून घेतलं, वैद्यकीय सेवा मिळवून दिली. हायकोर्टाबाबत आमची कोणतीही तक्रार नाही - अॅड. मिहीर देसाई, फादर स्टॅन स्वामी यांचे वकील

माऊलींच्या पालखीवर खंडेरायाच्या जेजुरीत गावकऱ्यांकडून भंडाऱ्याची उधळण

एसटी बसने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या माऊलींच्या पालखीवर खंडेरायाच्या जेजुरीत गावकऱ्यांकडून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.. साडे अकराच्या दरम्यान माऊलींची पालखी जेजुरीतून पुढे गेली, यावेळी ही उधळण करण्यात आली.  माऊलींची पालखी जेजुरीत आल्यानंतर  भंडाऱ्याची उधळण करण्याची परंपरा आहे.

दहिसर पश्चिमेत भागात भरदिवसा 2 वकिलांवर तलावारीने हल्ला

दहिसर कांदरपाडा झोन मैदानाच्या बाजूच्या परिसरात एक खाजगी जमीनीच्या वादातून भर दिवसा 2 वकिलांवर तलवारीने वार करण्यात आले आहे. त्यामध्ये वार करण्यात आलेल्या व्यक्ती अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. मात्र भरदिवसा अश्याप्रकारे प्रकार  झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या यासंदर्भात MHB पोलिसांनी 20 जणांवर गुन्हा नोंद करून यातील तीन आरोपींना अटक केली आहे. MHB पोलीस आणखी आरोपीचे शोध घेत आहे, वकील सत्यदेव जोशी आणि अंकित टंडन यांच्यासह त्यांचे अशील अशा एकूण तिघा जणांवर हा हल्ला करण्यात आलाय… या सर्व घटनेचे मोबाईल व्हिडिओ एका जागरुक नागरीकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केल्याने हा धक्कादायक प्रकार किती भयावह होता ते समोर आले 

राज्यपाल राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावावर उत्तर देण्यास बांधिल नाही,केंद्र सरकारतर्फे एएसजी अनिल सिंह यांचा हायकोर्टात दावा

राज्यपाल राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावावर उत्तर देण्यास बांधिल नाही,केंद्र सरकारतर्फे एएसजी अनिल सिंह यांचा हायकोर्टात दावा, मग अश्या परिस्थितीत या समस्येवर उपाय काय?, हायकोर्टाचा सवाल. आठ महिने उलटले तरी विधानपरिषदेवर 12 नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती नाही, यासंदर्भात नाशिकचे रहिवासी रतन सोली यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, याप्रकरणावर केंद्र सरकार आपली भूमिका मांडत आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कुटुंबासह दुपारी 3 वाजता पंढरपूरसाठी मुंबई विमानतळावरून सोलापूरकडे निघणार

'आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कुटुंबासह दुपारी 3 वाजता मुंबई विमानतळावरून सोलापूरकडे निघणार.'

विदर्भातील माता रुख्मिणीच्या पालखीचं पंढरपूरला प्रस्थान

विदर्भातील प्रतिपंढरपूर आणि रुक्मिणीचं माहेर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील देवी रुक्मिणीचा पालखीसोहळा कालच पंढरपूरकडे रवाना झाला. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं. कौंडण्यपूर पालखीला ४२७ वर्षांची परंपरा आहे. यंदा कोरोनामुळे पायी वारी नाही, त्यामुळे एसटीनं आणि मोजक्या कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या ४० वारकऱ्यांसह पालखीनं काल पंढरपूरडे प्रस्थान ठेवलं.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनंही पंढरीकडे प्रस्थान ठेवलंय. सजवलेल्य़ा २ शिवशाही बसमधून आणि ४० वारकऱ्यांच्या उपस्थिती पालखी सोहळा पहाटे 5 वाजता पंढरपूरकडे रवाना झालाय. पालखीसोहळ्यात होणाऱ्या सर्व पूजा आरती या बसमध्येच होणार असून पालखी कुठेही न थांबता दुपारी 3 पर्यंत वाखरीला पोहचणार आहे.

दहा मानांच्या पालख्यांचं आज पंढरीकडे प्रस्थान, पालख्यांसाठी एसटीच्या 20 शिवशाही बस सजल्या

जय जय राम कृष्ण हरी... ग्यानबा तुकारामच्या गजरात मानाच्या 10 पालख्या आज एसटीनं पंढरपूरकडे रवाना होत आहेत. आषाढी एकादशी उद्या आहे. आणि मानाच्या 10 पालख्या आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवताहेत. त्यातील संत मुक्ताई पालखीनं पहाटेचं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. तर इतर पालखी सोहळ्यांचीही आता पंढरपूरडे प्रस्थान ठेवण्याचीच तयारी सुरु आहे. दरवर्षी शेकडो दिंड्या, पालख्यांसोबत हजारो वारकरी पायी वारी करत पंढरीत दाखल होत असतात. पण यंदा कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी निघालेली नसल्यानं मानाच्या 10 पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय.  त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत 40 वारकऱ्यांना परवानगी आहे. पण त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आलीए. 

राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच

राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे एकीकडे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही राज्यात मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे.  राज्यात काल दिवसभरात ९ हजार नवीन करोनाबाधितांची नोंद झालीए तर  १८० रूग्णांचा मृत्यू झालाय. तर ५ हजार ७५६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

राज्यात अद्याप तिसरी लाट नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात अद्याप कोरोनाची तिसरी लाट नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचंही टोपेंनी म्हटलंय. पुढील 100 ते 125 दिवस सजग राहावं लागेल, असं आवाहनही टोपेंनी केलंय. निर्बंधांबाबत मात्र नागरिकांना प्रतीक्षा करावी लागेल असंही टोपे म्हणालेत. 

भिवंडीत केमिकल गोदामाला भर पावसात भीषण आग, आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू
भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीच्या घटना काही नवीन नाहीत. या परिसरामध्ये नेहमीच आगी लागत असताना रविवारी रात्रीच्या सुमारास मुसळधार बरसणाऱ्या पावसात पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील दालमिल कंपाऊंड येथील केमिकल साठवलेल्या गोदामास भीषण आग लागली आहे .या आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण व ठाणे अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले. परिसरात  या आगी मुळे मोठ्या प्रमाणावर धूर आकाशात जात असतानाच तेथील नागरीकांना श्वसनाचा त्रास जाणवत होता .त्यामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. परंतु ही आग ज्वलनशील केमिकलला लागलेली असल्याने व त्याचा पाण्याशी संपर्क आल्यानंतर ती अजूनच भडकत  होती तर या आगीतून केमिकल ड्रमचे मोठमोठे स्फोट होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .  आग विझवण्यासाठी ज्या फोम ची आवश्यकता असते ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्याने तसेच पाण्याच्या कमतरतेमुळ अग्निशामक दलाचे जवान हतबल झाले होते .  
संत मुक्ताई पालखीचं मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे प्रस्थान

जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. जळगाव जिल्ह्यातील या मानाच्या पालखीचं आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने प्रस्थान झालं. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील संत मुक्ताई पालखीचं राज्याच्या अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात मोठं मानाच स्थान आहे.राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध पालख्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यातील ही पालखी सर्वात आधी निघत असते. तशी ती पंढरपूर येथेही संत मुक्ताई पालखीचं पहिल्यांदा आगमन होत असतं.

पार्श्वभूमी

Breaking News LIVE Updates, 19 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Mumbai Rain : येत्या 24 ते 36 तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी


 येत्या 24 ते 36 तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचसोबत नैऋत्य वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचं बघायला मिळत आहे.  मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. 


Monsoon Session : आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, या अधिवेशनात नेमकं काय अपेक्षित, 'हे' मुद्दे वादळी ठरणार?
संसदेच्या पावसाळी अधिवेशन आजपापासून राजधानी दिल्लीत सुरु होत आहे. जवळपास 20 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात नेमकं काय काय अपेक्षित आहे, कुठले मुद्दे वादळी ठरु शकतील हे जाणून घेऊयात.  मोदी सरकारच्या नव्या मंत्र्यांची या अधिवेशनातली ही पहिलीच परीक्षा असणार आहे. 7 महिन्यांपासूनही तोडगा न निघालेलं शेतकरी आंदोलन, कोरोनाच्या दुसरा लाटेतला कहर आणि तिसऱ्या लाटेची भीती, प.बंगालच्या निकालानंतर विरोधकांमध्ये वाढलेला आत्मविश्वास या पार्श्वभूमीवर हे आंदोलन वादळी ठरण्याची शक्यता आहे. 


India vs Sri Lanka: शिखर धवननं रचला इतिहास, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेत केले हे विक्रम, गांगुलीचाही विक्रम मोडीत 


India vs Sri Lanka:  भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं सात विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह भारतीय कर्णधार शिखर धवननं अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. धवननं या सामन्यात पहिल्यांदा कर्णधारपद सांभाळलं आणि नाबाद 86 धावा करत काही विक्रमही आपल्या नावे केले. त्यानं माजी कर्णधार सौरव गांगुलीचा एक विक्रम मोडीत काढला.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.