Breaking News LIVE :  सोलापुरात राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Breaking News LIVE Updates, 18 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jul 2021 08:19 PM
नवज्योतसिंह सिद्धू यांची पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा

अखेर सिद्धू यांची पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. 



 सोलापुरात राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याप्रकरणी गुन्हा दाखल

 सोलापुरात राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. नियमापेक्षा जास्त गर्दी करून कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष भरत जाधव यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.  सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 143, 188, 269, 336 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठक घेतल्याने संयोजकसह पडळकर यांच्यावर देखील गुन्हा नोंदविला आहे. तर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलन केल्याने कार्यकर्त्यांसह त्यांच्यावर ही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रवासी वाहतूक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळून भीषण अपघात

रणमाळ सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे.  अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे .

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे आता  गोंदियापर्यंत विस्तारीकरण होणार : खासदार प्रफुल्ल पटेल

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे आता  गोंदियापर्यंत विस्तारीकरण होणार असल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेलांनी आज  गोंदियात दिली. समृद्धी महामार्गाच्या  सर्व्हेला  लवकरच होणार सुरूवात होणार असून आता समृद्धी महामार्गामुळे गोंदिया - मुंबाई प्रवास सोपा  होणार आहे. 

मंदिरात प्रवेश बंदी फक्त सर्वसामान्य भाविकांनाच का?

मंदिरात प्रवेश बंदी फक्त सर्वसामान्य भाविकांनाच का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि ह्याला कारण ठरलय ते म्हणजे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दुपारी नाशिकच्या श्री नवश्या गणपती मंदिराच्या चक्क गाभाऱ्यातच जाऊन गणपती बाप्पाची पूजा आणि आरती केली. आव्हाड यांचे कार्यकर्तेही त्यांच्यासोबत यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे नाशकात विकेंड लॉकडाऊनही सुरु असताना रविवारी आव्हाड यांनी मंदिरात पूजा केल्याने हा चर्चेचा विषय ठरतोय."

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान फक्त शेवटी आठ मिनिटासाठी आल्याने शिवसेनेसह विरोधकांची नाराजी

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान फक्त शेवटी आठ मिनिटासाठी आल्याने शिवसेनेसह विरोधकांची नाराजी, अडीच तासांच्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानांची केवळ आठ मिनिटासाठी हजेरी हे दुर्दैव, विनायक राऊतांचा आरोप,  या बैठकीत त्यांनी विरोधकांचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक, ही परंपरा मोडीत निघते आहे, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया, मराठा आरक्षण, ओबीसी एम्पिरिकल डाटा, लसीचा तुटवडा हे राज्याचे तीन प्रमुख प्रश्न शिवसेना संसदेत उपस्थित करणार, शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधकही एकत्रितपणे आंदोलन करणार

भाजपा-शिवसेना कार्यकर्ते दोडामार्गमध्ये एकमेकांना भिडले

दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, यावरुन भाजप-शिवसेनेने आज दोडामार्ग गांधी चौक येथे आमने सामने आले. दोडामार्ग पोलिसांच्या दक्षतेमुळे वाद टळला. सकाळी 11 वाजता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने राजकीय वातावरण तापलं. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला


 

यूपी धर्मांतरण प्रकरणी महाराष्ट्र कनेक्शन, नागपूर येथून तिघांना अटक

उत्तर प्रदेशसह देशभरात गाजत असलेल्या अवैध धर्मांतरण प्रकरणात यूपी एटीएसच्या पथकाने नागपूर येथून प्रसाद कावरे, कौशर आलम आणि भुप्रिय बंडो ऊर्फ आर्सनाल या तिघांना परवा रात्री अटक केली होती. हे तिघे उमर गौतमच्या अवैध धर्मांतरण गँगचे महाराष्ट्र कनेक्शन म्हणून सक्रिय होते.

ईडीकडून अनिल देशमुख यांच्या काटोल येथील घरी तपास

Breaking News LIVE : ईडीकडून अनिल देशमुख यांच्या काटोल येथील घरी तपास, कुटुंबियांच्या विविध संपत्तीची आणि व्यवहारांची दहा ते पंधरा वर्षांपूर्वीची कागदपत्रंही मागितल्याची माहिती. ईडीचे पथक चार गाड्यांमध्ये नागपूरच्या दिशेने रवाना झाले.  चार गाड्यांच्या  मधल्या दोन गाड्यांमध्ये ईडीचे आठ ते दहा अधिकारी होते. तर समोर आणि मागे सीआरपीएफच्या हत्यारबंद गाड्या होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे ईडीने काटोल मध्ये देशमुख कुटुंबियांचा शेतीचा व्यवहार पाहणाऱ्या पंकज देशमुखला त्यांच्या वडविहिरा या गावातून आणून त्याच्या उपस्थितीमध्ये सर्व तपास केले आहे.. मिळालेल्या माहितीप्रमाणे ईडीच्या पथकाने काटोल येथील घरी देशमुख कुटुंबीयांच्या विविध संपत्तीचे आणि व्यवहारांचे अगदी दहा ते पंधरा वर्ष जुने कागदपत्रंही मागितली.. सकाळी आठ ते दुपारी एक वाजे दरम्यान ईडीचे आठ ते दहा अधिकारी काटोल येथील बंगल्यात तपास करत होते...

पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेना मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणार

पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेना मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणार,


शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थित बैठकीसाठी राहणार,


अधिवेशनाच्या आधी आज अकरा वाजता होत आहे सर्वपक्षीय बैठक,


102 व्या घटनादुरुस्तीत बदल करून राज्यांना अधिकार देतानाच 50 टक्के मर्यादिबाबतही केंद्राने सवलत द्यावी ही मागणी,


ओबीसी आरक्षणाचा एम्पिरिकल डेटा केंद्राने तातडीने द्यावा यासाठीही मागणी,


याशिवाय वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरही लक्ष वेधणार,

गुरे चराईसाठी गेलेल्या ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

चंद्रपूर : गुरे चराईसाठी गेलेल्या ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, सिंदेवाही तालुक्यातील गोविंदपूर (चक) गावालगतच्या जंगलात झाला हल्ला, आज संध्याकाळी झाला हल्ला, काशीनाथ तलांडे (62) असे आहे मयताचे नाव 

देहू, आळंदी सह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पालखी मार्गावर एक दिवसाची जमावबंदी

देहू, आळंदी सह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पालखी मार्गावर एक दिवसाची जमावबंदी असेल. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका 19 जुलैला एसटीने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. यावेळी भाविक दर्शनासाठी देहू, आळंदी सह पालखी मार्गावर गर्दी करण्याची शक्यता आहे.  खबरदारी उपाय म्हणून त्या दिवशी जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने,डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी,ऍम्ब्युलन्स सेवा याना ह्या जमावबंदी मधून वगळण्यात आले आहे. तसेच देहूगाव, आळंदी मधील स्थानिक नागरिकांना ओळखपत्र दाखवून प्रवेश मिळणार आहे.

पार्श्वभूमी

Breaking News LIVE Updates, 18 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...


मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस


मुंबई : मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे.


राज्यात काल 8 हजार 172 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद


राज्यात काल 8 हजार 172 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 950 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 74 हजार 594 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.28 टक्के झाले आहे. राज्यात काल 124 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख  429 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 5 लाख 77 हजार 615 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 156 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. 


शरद पवारांचा आशिर्वाद असल्यानेच उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री : डॉ. अमोल कोल्हे


सध्या महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सर्वकाही ठीक नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अशी वक्तव्ये करण्यात आघाडीवर आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पवार साहेबांचा आशीर्वाद डोक्यावर आहे, म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर असल्याचं मोठं विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. नाशिक महामार्गावरील खेड घाट व नारायणगाव बायपासच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे याचे काय पडसाद उमटतात तो येणारा काळच ठरवेल. मात्र, या वक्तव्यामागे स्थानिक राजकारण असल्याचे बोलले जात आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.