Breaking News LIVE : शरद पवार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीत चीनच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा

Breaking News LIVE Updates, 16 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jul 2021 09:45 PM
शरद पवार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीत चीनच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा

शरद पवार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीत चीनच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा. चीन सीमेच्या सद्यस्थितीबाबत सरकारने शरद पवार आणि ए के अँटोनी या दोन संरक्षण मंत्र्यांना विश्वासात घेऊन दिली माहिती. या बैठकीला देशाचे सीडीएस बिपीन रावत, लष्कर प्रमुख मनोज नरवणे हेदेखील उपस्थित होते. चीन वादाची इत्यंभूत माहिती प्रेझेन्टेशन द्वारे या दोन माजी संरक्षण मंत्र्यांना देण्यात आली. संसदेचे अधिवेशन सुरु होण्याआधी या मुद्द्यावर विरोधकांना शांत करण्याची सरकारची रणनीती.

आषाढीसाठी आलेल्या 1600 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीत केवळ चारजण पॉझिटिव्ह

आषाढीसाठी आलेल्या 1600 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीत केवळ चारजण पॉझिटिव्ह. त्याना तात्काळ विलगिकरण ठेवण्यात आले आहे. उद्या होणार 1200 पोलिसांची तपासणी.

कुख्यात गुंड गणेश रासकरची गोळी घालून हत्या, पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसंचा संशय

कुख्यात गुंड गणेश रासकरची गोळी घालून हत्या करण्यात आली. पुरंदर तालुक्यातील नीरा गावात संध्याकाळी 7 च्या दरम्यान गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसंचा संशय आहे. गणेश रासकरवर जुने 5 ते 6 गंभीर गुन्हे असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. गणेश रासकरवर निरेतील एसटी स्टँडजवळ  2 गोळ्या झाडल्या आहेत. उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्याआधीच गणेश रासकरचा मृत्यू झाला.

पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर उद्यापासून जमावबंदी

पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर उद्यापासून जमावबंदी लागू केली जाणार आहे. पर्यटनबंदी असताना ही पर्यटक पर्यटनस्थळी मोठी गर्दी करता आहेत. म्हणून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिलेत. मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यासाठी हा आदेश लागू असेल.

मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थित केला पक्ष प्रवेश

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

औरंगाबाद येथील व्हिडीओकॉन कंपनीवर ईडीचे छापे

औरंगाबाद येथील व्हिडीओकॉन कंपनीवर ईडीने छापा टाकला आहे. चितेगाव येथील व्हिडीओकॉन कंपनी आणि औरंगाबाद शहरातील ऑफिसेस आणि इतर ठिकाणी ईडीने छापे टाकले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावाजवळ सातपुडा पर्वत रांगेत हेलिकॉप्टर कोसळून एकजण ठार तर एक जखमी

हेलिकॉप्टर कोसळून एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील वर्डी गावाजवळ सातपुडा पर्वत रांगेत घडली आहे. ही घटना काही वेळा पूर्वीच घडली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून हे हेलिकॉप्टर कोठून कोठे जात होते. त्याचा अपघात कशामुळे झाला किंवा त्यातील व्यक्ती कोण याची अद्याप माहिती पोलिसाना उपलब्ध झालेली नाही. ही घटना जंगल परिसरात घडली असल्याने या ठिकाणी पोहोचण्यासाठी यंत्रणेलाही मोठे कष्ट पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी मदतीला धावले असून यात हेलिकॉप्टर मधील महिलेची सुटका करण्यात त्यांना यश मिळाले असले तरी पुरुषाचा मात्र मृत्यू झाला आहे.

ईडीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4.20 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त

ईडीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4.20 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त.

Breaking News LIVE : वर्ध्याचे केशव कोलते ठरले मानाचे वारकरी, 20 वर्षांपासून विठ्ठल मंदिरात देत आहेत वीणा वादनाची सेवा 


आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेत सामील होण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांनी मिळाला . आज मंदिर समिती सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते चिठ्ठी द्वारे मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली .  केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून 1972 पासून महिन्याची वारी करीत असत . गेल्या 20 वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत . गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भविकातून मानाचा वारकरी निवडता ये नसल्याने मंदिरात सेवा देणाऱ्या भविकतून ही निवड केली जाते . आपण केलेली सेवा फळाला आली आणि विठुरायाचे पूजा करण्याचे भाग्य मिळाले अशी भावना कोलते यांनी व्यक्त केली . 

आता पंढरपुरात 18 ते 25 जुलै काळात राहणार संचारबंदी, केवळ दूध आणि औषधांना सूट 

आषाढी सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविकांनी पंढरपुरात येऊ नये यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीत थोडी सुधारणा करण्यात आली असून आता 17 जुलै ऐवजी १18 जुलैपासून संचारबंदी अमलात येणार असून पंढरपूर शेजारील गोपाळपूर वगळता इतर 9 गावांची संचारबंदी 22जुलै रोजी संपणार आहे . आषाढी काळात 9 दिवसाच्या संचारबंदीच्या विरोधात नागरिक आणि व्यापाऱ्यांनी जोरदार आवाज उठवूनही प्रशासनाने म्हणावा असा दिलासा दिलेला नाही . आषाढी काळात येणाऱ्या मानाच्या 10 पालख्याचा निवास पौर्णिमा म्हणजे 25 तारखेपर्यंत असल्याने मंदिर परिसर , प्रदक्षिणा मार्ग , चंद्रभागा वाळवंट या भागात ही संचारबंदी 18 ते 25 जुलै पर्यंत राहणार असून शहरातही याच पद्धतीने अंमलबजावणी होणार आहे . संचारबंदी काळात केवळ दूध आणि औषध दुकानांना सूट दिली असून इतर जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत अजूनही संभ्रम कायम आहे . सर्वसाधारणपणे दशमी आणि एकादशी म्हणजे 19 आणि 20 जुलै रोजी मुख्यमंत्री पंढरपूर मध्ये असल्याने अतिशय चोख पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे 

पुण्यात असलेल्या देशातील नामांकित संशोधन संस्था IISERमध्ये लागली आग, दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी, लॅबमध्ये आग लागल्याची माहिती

पुण्यात असलेल्या देशातील नामांकित संशोधन संस्था IISERमध्ये लागली आग, दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी,  लॅबमध्ये आग लागल्याची माहिती

किरकोळ कारणावरुन शेजाऱ्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी, डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल 

डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा परिसरातील साई एन्क्लेव्ह  या सोसायटीमध्ये 14 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन शेजाऱ्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला होता .काही क्षणातच या  वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही फ्री स्टाईल हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. या व्हिडीओमध्ये काही महिला एकमेकींना बेदम मारहाण करत आहेत तर पुरुषांमध्ये देखील हाणामारी होताना दिसत आहे .सोसायटीमधील या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय .

कोल्हापूरमधील व्यवसाय सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता

कोल्हापूरमधील व्यवसाय सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता,


जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट कमी आल्याने निर्णय घेतला जाणार,


कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांनी घेतली आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट,


आरोग्य मंत्र्यांनी लवकरच याबाबत आदेश काढणार,


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांची माहिती,

पायावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्ण बेडवर तब्बल पाच तास ताटकळत

पायावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्ण बेडवर तब्बल पाच तास ताटकळत,


कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार,


संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची  स्थानिकांबरोबर मनसे कार्यकर्त्यांची मागणी,


भुलतज्ञ वेळेत न आल्याने आणि नातेवाईकांचे निधन झाल्याने निघून गेल्याचे डॉक्टरने दिले कारण,


ऑपरेशनसाठी बेडवर नेण्याच्या मी सूचना दिल्या नसल्याचंही डॉक्टरांचं उत्तर,

संस्कृत पंडित डॉक्टर आडशिव मोरेश्वर आयाचित यांचे वयाच्या 92 व्या वर्षी काल पुण्यात निधन

नागपूर - संस्कृत पंडित डॉक्टर आडशिव मोरेश्वर आयाचित यांचे वयाच्या 92 व्या वर्षी काल पुण्यात निधन. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये अधिकारी होते. . त्यांनी हस्तलिखिते नुसती वाचवलीच नाहीत तर एक मोठा संग्रह निर्माण करत एक वेगळा विभागच निर्माण केला. ते संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे सचिव तर संस्कृत भवितव्यमचे संपादक ही राहिले आहेत

अखेर पिंप्राळा गावाला मिळणार रस्ता, जिंतुरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचे गावकऱ्यांना आश्वासन 

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा गावात रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांची मोठे हाल होत आहेत. गेल्या आठवड्यात एका आजारी महिलेला रुग्णालयात नेत असताना रस्त्यामुळे उशीर झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला होता तर एका महिलेची प्रसूती ही माळरानावर करण्याची वेळ आली होती. गावात रास्ता नसल्याने दरवर्षी ही परिस्थिती निर्माण होते. याबाबत एबीपी माझाने बातमी दाखवल्या नंतर जिंतुर मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर स्वतः चिखलातून या गावात दाखल झाल्या व त्यांनी बैठक घेऊन लवकरच हा रस्ता करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसंपर्क अभिनयानाचा वैभववाडी येथे दौरा आटपून रात्री उदय सामंत आपल्या ताफ्यासहित कणकवलीकडे रवाना होत असताना त्यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात झाला. कणकवली तालुक्यातील कासार्डे तळेकरवाडी दरम्यान ताफ्यातील पोलीसांच्या वाहनाला ताफ्यातीलच दंगल नियंत्रण पथकाच्या पोलीस गाडीची धडक बसून हा अपघात झाला. या अपघात चार पोलीस जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात, चार पोलीस जखमी

सिंधुदुर्ग : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसंपर्क अभिनयानाचा वैभववाडी येथे दौरा आटपून रात्री उदय सामंत आपल्या ताफ्यासहित कणकवलीकडे रवाना होत असताना हा अपघात झाला. कणकवली तालुक्यातील कासार्डे तळेकरवाडी दरम्यान ताफ्यातील पोलीसांच्या वाहनाला ताफ्यातीलच दंगल नियंत्रण पथकाच्या पोलीस गाडीची धडक बसून अपघात झाला. या अपघात चार पोलीस जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका टपरी धारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन दमदाटी करत, जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी छिंदमसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये अट्रोसिटीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी टपरी चालक भागीरथ भानुदास बोडखे याने फिर्याद दिली आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे बंद

मुंबईत पहाटे साडेतीन वाजेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे खाली दोन ते अडीच फूट पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे

बुलढाणा जिल्ह्यातील तीन गावांना पुराचा फटका

काल सायंकाळी जिल्ह्यातील सिंदखेडराजा व चिखली तालुक्यात अतिवृष्टीमुळे मेरा, देऊळगाव घुबे, सिंधी या गावाना पुराच्या पाण्याचा फटका बसला. भोगावती नदीला महापूर आल्याने काही गावात पाणी घुसले होते तर अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. सध्या पाऊस बंद असून तहसीलदार व कर्मचारी रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.

पार्श्वभूमी

दहावीचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल
दहावीचा निकाल ( SSC Result 2021) आज जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. उद्या दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे उद्या दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.  बोर्डाच्या  www.mahahsscboard.in  या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच दहावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.


राज्यात गुरुवारी 8,010 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7,391 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. आज 8,010  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 52 हजार 440 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के आहे. राज्यात आज 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 7 हजार 205 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदुरबार (70), हिंगोली (71), यवतमाळ (23), गोंदिया (66), चंद्रपूर (22) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 17, 401 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनच्या परीक्षेच्या तारखा जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनसाठीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रक जारी करण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.  तसेच चौथ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला असून त्या आता 26 , 27 , 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबरआणि 2 सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार आहे. जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनसाठीचे ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 20 जुलैपर्यंत सुरु आहे. इच्छुक विद्यार्थी jeemain.nta.nic.in. या संकेतस्थळावर अर्ज करु शकतात. 


कला दिग्दर्शक राजू सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी गजाआड
कला दिग्दर्शक राजू सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी राकेश मौर्य याला गजाआड करण्यात यश आलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी कीज हॉटेलमधून मौर्यला अटक केली. राकेश मौर्य हा लेबर युनियनचा पदाधिकारी आहे. अटक पूर्व जामीन मिळवण्यासाठी तो वकिलांना भेटायला पिंपरीत आला होता. तेव्हा वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे. कला दिग्दर्शक राजू सापते यांनी 2 जुलैच्या रात्री राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं होतं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे पदाधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत असल्याचं कारण देत आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या व्हिडिओमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली होती. त्यादिवसापासून राकेश मौर्य फरार होता. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.