Breaking News LIVE : राज्यात सोमवारी 15, 277 रुग्णांना डिस्चार्ज, 7,603 रुग्णांची भर

Breaking News LIVE Updates, 12 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jul 2021 07:25 PM
काँग्रेस नेत्यांची उद्या मुंबईत बैठक, बैठकीला प्रभारी एचके पाटील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार

काँग्रेस नेत्यांची उद्या मुंबईत बैठक, बैठकीला प्रभारी एचके पाटील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार, बैठकीत नाना पटोले यांचे वादग्रस्त वक्तव्य, विधानसभा अध्यक्ष आणि संघटनात्मक कामावर होणार चर्चा

राज्यात सोमवारी 15, 277 रुग्णांना डिस्चार्ज, 7,603 रुग्णांची भर

आज  7, 603 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.  राज्यात आतापर्यंत 59 लाख 27 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के आहे. 


 

NEET 2021 Exam Date: नीट परीक्षेची तारीख जाहीर, 12 सप्टेंबरला कोविड प्रोटोकॉल पाळून NEET ची परीक्षा होणार

कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे नीटची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.  या परीक्षेच्या नवीन तारखांची घोषणा करण्यात आली आहे. 12 सप्टेंबरला कोविड प्रोटोकॉल पाळून NEET ची परीक्षा होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजल्यापासून NTA च्या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. 

बुलढाणा ABP माझाचा इम्पेक्ट, मलकापूर येथील स्मशानातील अघोरी पूजा केल्याचं प्रकरण. चार जणांवर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

बुलढाणा ABP माझाचा इम्पेक्ट, मलकापूर येथील स्मशानातील अघोरी पूजा केल्याचं प्रकरण. चार जणांवर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पूजा करवून घेणारा आशिष गोठी पोलिसांच्या ताब्यात, तीन मांत्रिक फरार. तीन मांत्रिकांना अटक करण्यासाठी मलकापूर पोलिसांचे पथक झारखंडमधील टाटानगरला जाणार. तपास अधिकारी संजय ठाकरे यांची माहिती.

नाशिक शहरात पुढील आठवड्यापासून पाणी कपातीची शक्यता

नाशिक शहरात पुढील आठवड्यापासून पाणी कपातीची शक्यता, दर बुधवारी शहरात कोरडा दिवस पाळला जाणार, रविवारपर्यंत पाऊस न आल्यास आठवड्यातील एक दिवस ड्राय डे, नाशिकच्या महापौरांची घोषणा, महापौर सतिश कुलकर्णी यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक, बैठकीत पुढील आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय, गंगापूर धरणात 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

नाशिक शहरात पुढील आठवड्यापासून पाणी कपातीची शक्यता

नाशिक शहरात पुढील आठवड्यापासून पाणी कपातीची शक्यता, दर बुधवारी शहरात कोरडा दिवस पाळला जाणार, रविवारपर्यंत पाऊस न आल्यास आठवड्यातील एक दिवस ड्राय डे, नाशिकच्या महापौरांची घोषणा, महापौर सतिश कुलकर्णी यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक, बैठकीत पुढील आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय, गंगापूर धरणात 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैभववाडीतील करुळ घाट खचला

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैभववाडीतील करुळ घाट खचला, करुळ घाट खचल्याने एकेरी वाहतूक सुरू, वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल, सुरक्षिततेच्या दृष्टीने घाट मार्ग बंद करण्याची मागणी


नांदेड: खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करून नांदेड जिल्ह्यातून आजपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेस सुरुवात

नांदेड: खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करून नांदेड जिल्ह्यातून आजपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेस सुरवात

मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणी बंद  

कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली केंद्र आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या कांबा सब स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवार 13 जुलै रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत केले जाणार असल्याने मोहिली आणि नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीत वाद आणि बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं नाना पटोले म्हणालेत. 

सोलापुरातील बावीत नवजात अर्भक मंदिराच्या परिसरात सोडून गाडी फरार

कुर्डूवाडी पंढरपूर रस्त्यावर असलेल्या माढा तालुक्यातील बावी येथील मंदिरात आज सकाळी आठ ते दहा दिवसांचे नवजात अर्भक आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बावी येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी आली होती. या गाडीतून चार पुरुष व एक महिला हातात लहान बाळाला घेऊन उतरले व मंदिरात जाऊन ते लहान बाळ तिथेच सोडून आलेल्या गाडीतून कुर्डूवाडीच्या दिशेने घाईगडबडीने निघून गेले.

सोलापुरातील बावीत नवजात अर्भक मंदिराच्या परिसरात सोडून गाडी फरार

कुर्डूवाडी पंढरपूर रस्त्यावर असलेल्या माढा तालुक्यातील बावी येथील मंदिरात आज सकाळी आठ ते दहा दिवसांचे नवजात अर्भक आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बावी येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी आली होती. या गाडीतून चार पुरुष व एक महिला हातात लहान बाळाला घेऊन उतरले व मंदिरात जाऊन ते लहान बाळ तिथेच सोडून आलेल्या गाडीतून कुर्डूवाडीच्या दिशेने घाईगडबडीने निघून गेले.

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या राहुल पाटील तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या जयवंतराव शिंपी यांची नावं निश्चित

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या राहुल पाटील तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या जयवंतराव शिंपी यांचे नाव निश्चित करण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी नावांची घोषणा केली. इतर पदाधिकाऱ्यांची नावे उद्या जाहीर केली जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.  राहुल पाटील हे आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज दुपारी निवड प्रक्रिया होणार आहेत. सर्वाधिक संख्याबळ महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांकडे आहे. आता भाजप आणि मित्रपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का याकडे लक्ष लागलं आहे. संख्याबळ नसल्याने विरोधकांनी निवडी बिनविरोध पार पाडाव्यात असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं आहे. 

रायगडमध्ये दोन गावांत पाणी शिरलं, नागरिकांच्या स्थलांतरणाला सुरुवात

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील वावलोटी आणि सुपेगाव या दोन्ही गावात पाणी शिरले. वावटोली आणि सुपेगाव गावातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं आहे. मुरुड तालुक्यात गेल्या 24 तासात 384 मिमी पावसाची नोंद झाली असून मुरुड -आगरदांडा रस्तेमार्गावर पाणी साचल्याने रस्ता पाण्याखाली गेला आहे.

कणकवलीतील खारेपाटण मध्ये पूरजन्य परिस्थिती, शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खारेपाटण गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली काही दिवस पावसाने दडी मारल्यानंतर रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे नदी नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत.  चिंताग्रस्त असलेला कोकणातील शेतकरी या पावसामुळे काहीसा सुखावला असून शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर घेतला आहे. 

पंकजा यांचं पुढचं राजकीय पाऊल काय असणार?

मुंडे भगिनींच्या समर्थनार्थ भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरुच, काल दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे लवकरच समर्थकांना भेटणार, पंकजा मुंडे समर्थकांची समजूत काढणार?, पंकजा यांचं पुढचं राजकीय पाऊल काय असणार?


 


 

किल्ले रायगड परिसरातील धबधब्यात पडल्याने तरुण पर्यटक जखमी

किल्ले रायगड परीसरात घरोशीवाडी जवळच्या धबधब्यावर जाताना 26 वर्षीय तरुण पर्यटकाचा पाय घसरून पडल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे. रायगड किल्ला ते माणगाव रस्त्यावरील डोंगर भागातील हि घटना असून महाडमधील साळुंखे रेस्क्यु टीमने बचाव कार्य करीत जखमी अवस्थेतील या तरुणाला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले. सदर जखमी मुलावर महाडमधील खाजगी रुग्णालयामध्ये प्रथोमोपचार करण्याता आले. त्यानंतर त्याला पुढच्या उपचाराकरता मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'समान काम, समान वेतन', गोंदियातील पांढराबोडी ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर

गोंदिया जिल्ह्याच्या पांढराबोडी ग्राम पंचायतीने समान काम, समान वेतन या तरतुदीची अंलबजावणी करण्यासाठी ठराव पारित करुन याची अमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. सध्या गोंदिया जिल्ह्यात शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून काही शेतकरी आपल्या शेतीची कामे लवकर आटोपून घेण्यासाठी मजुरांना जास्त मजुरी देत आपली कामे काढून घेतात. त्यामुळे गावात शेतमजुरांमध्ये भांडणं झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र ग्राम पंचयतीने गावातील मजुरांसाठी मजुरीचे दर आणि तासिका ठरवून दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


 

अभिनेता सुनील शेट्टी राहत असलेली मुंबईतील इमारत सील

अभिनेता सुनील शेट्टी राहत असलेली मुंबईतील इमारत सील करण्यात आलीय. पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्याने ही कारवाई करण्यात आलीय. सुनील शेट्टी किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कुणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती पालिकेनं दिलीय

पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष रघुनाथ येमुल यांना अटक, अघोरी सल्ला देत उद्योजकाला लग्न मोडण्यास भाग पाडल्याचा ठपका

उद्योजकाला अघोरी सल्ला देऊन लग्न मोडायला भाग पाडल्याचा आरोप असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ राजाराम येमुल यांना पोलिसांनी अटक केलीय. 27 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केलीय. फिर्यादी महिलेच्या पतीनं तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केले आणि ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता असा आरोप आहे. ज्योतिषी रघुनाथ येमुल यांनी फिर्यादी महिलेचा संसार मोडण्यासाठी अनिष्ट व अघोरी त्याचा वापर केला आहे. तसेच तिचा संसार मोडण्यासाठी त्यांच्या बेडरूम बाहेर हळदी कुंकू लावलेल्या आणि टाचण्या मारलेला लिंबू ठेवण्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी रघुनाथ येमुल यांना अटक केली आहे.

मराठवाड्यात कुठे मुसळधार तर कुठे मध्यम पाऊस, नांदेडमध्ये 3 तर हिंगोलीत 2 जणांचा मृत्यू 

गेल्या 24 तासांत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झालाय. परभणी, नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. उस्मानाबादमध्ये ही जोरदार पाऊस झालाय तर बीड, लातुर, औरंगाबादमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झालाय. ज्यामुळे अनेक पिकांना मात्र जीवदान मिळाले असले तरी नांदेड आणि परभणी शहराची अवस्था मात्र फार वाईट झाली होती.

देशभरात वीज कोसळून तब्बल 50 जणांचा मृत्यू

 देशभरात वीज कोसळून तब्बल 50 जणांचा मृत्यू, यात राजस्थानच्या जयपूरमध्ये वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू , तर तिकडे उत्तर प्रदेशातल्या विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून एकूण 30 जणांचा मृत्यू  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग मध्ये मुसळधार तर देवगड, वैभववाडीत संततधार पाऊस सुरु आहे. रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सकल भागात पाणी साचलं आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी 1323.91 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. 

EURO Cup Final : युरो चषकाच्या अंतिम सामन्यात इटलीचा विजय, इंग्लंडचा स्वप्न भंगलं

EURO Cup Final : युरो कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटवर पराभव करून इटलीनं दुसऱ्यांदा युरो चषकावर आपलं नाव कोरलं. तब्बल 53 वर्षांच्या अंतरानं इटलीनं युरो चषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा हा मान मिळवला. विजेतेपदासाठीचा हा सामना निर्धारित वेळेत आणि त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेतही चांगलाच रंगला. 


युरो चषकाचा सामना अत्यंत अटी-तटीचा झाला. 120 मिनिटांपर्यंत सुरु राहिला. दोन्ही संघांकडून सामन्यात आघाडी घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र सामना बरोबरीत सुटल्यानं पेनल्टी शूटआऊटचा थरार रंगला. ज्यामध्ये इटलीनं विजय मिळवला. इटलीनं इंग्लंडचा 3-2 नं पराभव केला. इंग्लंड सलग 3 पेनल्टी स्कोर करु शकला नाही, तर इटलीनं 2 पेनल्टी चुकवल्या, मात्र 3 गोल डागले. याचसोबतच इटलीनं 1968 नंतर युरोपियन चॅम्पियनचा किताब पटकावला 

उस्मानाबादमध्ये चार तास संततधार

काल रात्री उशीरापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार झाली. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. सतत चार तासाच्या पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. उस्मानाबादेत नव्याने तयार करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.

पार्श्वभूमी

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापूर, सांगली अजूनही हॉटस्पॉट


राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाही अजून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढत आहे. कोल्हापूरमध्ये हजार तर सांगलीमध्ये हजारच्या जवळपास दैनदिन रुग्ण आढळत आहेत. राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 8 हजार 535 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर आज 6 हजार 13 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 59,12,479 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के इतके झाले आहे.   


कोल्हापूर, सांगलीत रुग्णसंख्या कमी होईना 
कोल्हापूर जिल्ह्यात आज 1 हजार 193 नवीन कोरोना बाधित आढळले तर सांगलीत 927 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी कोल्हापुरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तिकडे सांगलीतही 19 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. राज्यात दुसरी लाट ओसरत असताना या दोन जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. यामुळे प्रशासन चिंतेत असून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 


भारतीय महिला ब्रिगेडचं जोरदार कमबॅक; दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी


भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला आहे. विजयासह टीम इंडियांना तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 149 धावांचं लक्ष्य ठेवलं होते. या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकांत 140 धावाच करता आल्या. 


इंग्लंडकडून टम्सिनने चांगली फलंदाजी केली. तिने 50 चेंडूत 59 धावा केल्या. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लंडची पहिली विकेट 13 धावांवर गेली. त्यांनतर 106 वर 3 अशा भक्कम स्थितीत इंग्लंडचा संघ होता. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी पटापट विकेट सोडली. नाइट, डंकले, जोन्स, ब्रंट, विलियर्स एका मागोमाग आऊट झाले. इंग्लंडकडून टॅमी बीमाँटने सर्वाधिक 59, कर्णधार हेथर नाईटने 30, तर अॅमी जोन्सने 11 धावा केल्या. भारताकडून पूनम यादवने दोन, तर अरुंधती रेड्डी, दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 


शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांची अनुकूलता नाही; लसीकरण झाले नसल्याने धोका असल्याचे मत


राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण चालू केले आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र शाळा सुरु करण्यास अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. शाळा अद्याप सुरू करू नयेत, लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान 18 वर्षापेक्षा जास्त मुलांचे लसीकरण होत असल्याने महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचही ते म्हणाले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. 


मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर आजपासून पुन्हा लसीकरण सुरू होणार


मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर सोमवारी पुन्हा लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईतील लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु होणार आहे. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. मात्र, पुढील दोन दिवस हे डोस पुरतील. कारण दररोज कोविशील्ड लसीचे 40-50 हजार डोस दिले जातात. त्याच वेळी, कोवॅक्सिन लसीचे 15 हजार डोस दररोज दिले जातात. मंगळवारपर्यंत लसीचा पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. सध्या कोविशिल्डचे 85 हजार डोस आणि कोवॅक्सिनचे 50 हजार डोस उपलब्ध आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.