Breaking News LIVE : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स
Breaking News LIVE Updates, 07 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स. भोसरी एमआयडीसी भुखंड प्रकरणात चौकशीसाठी उद्या हजर रहाण्याचं समन्स. आज त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. याअगोदर जानेवारी महिन्यात या प्रकरणात ईडीने खडसेंची चौकशी केली आहे.
लातूर : अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर लातुरात जोरदार पावसाला सुरुवात. मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली होती. मात्र आज दुपारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. लातूर शहर, लातूर ग्रामीण भागांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळते. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याची माहिती आहे.
पालघर जिल्ह्यात सक्रिय असलेल्या चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे . पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर भागात काही दिवसांपूर्वी रस्त्याने चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईक वरून आलेले चोरटे घेऊन पसार झाले होते . त्या नंतर परराज्यांतून या आरोपींना अटक करण्यात आली आहे . या टोळ्या संघटित गुन्हेगारी करत असल्याचं लक्षात असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे . जिल्ह्यातील महिलांची सुरक्षा ही सर्वोच्च स्थानी असल्याने अशा प्रकारच्या गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील यावेळी पालघर चे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिला आहे
आज मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नव्या मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नारायण राणे सपत्नीक दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र दिल्लीत दाखल झाले आहेत.
पंढरपूर : सात दिवसानंतर आज पुन्हा पंढरपूर शहरात लसीकरण सुरु झालं आहे. 100 दिवस उलटूनही अनेकांना दुसरा डोस न मिळाल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
खासदार नारायण राणे, कपिल पाटील यांना तातडीनं फोन, केंद्रीय मंत्रिमंडळातली वर्णी निश्चित
बुलढाणा : जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद. बाजारसमितीत सर्व प्रकारचे खरेदी विक्री व्यवहार बंद करण्यात आले असून कडधान्याच्या साठेबाजीवर सरकारने मर्यादा आणल्याने व्यापारीवर्गाकडून बंद पुकारण्यात आला आहे. केंद्राच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध असून व्यापाऱ्यांसाठी कडधान्यासाठी 200 टन साठवणूक मर्यादा लागू करण्यात आली आहे. सरकारने कडधान्य साठवणुकीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मर्यादा घातली आहे.
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा गावाशेजारील शेतशिवारात ही घटना घडली आहे. मोतीराम गरमाळे (62) असं मृत शेतकऱ्याचं नाव असून तो सोमवारी शेतात गेला होता. काल या शेतकऱ्याची गावाला गेलेली पत्नी घरी आली, त्यानंतर शोधाशोध सुरु झाली, आज सकाळी शेताजवळ असलेल्या नाल्याजवळ छिन्न विच्छिन्न अवस्थेत शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला.
देशातील सध्याची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 5 लाख 63 हजार 665
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 97 लाख 99 हजार 534
एकूण सक्रिय रुग्ण : 4 लाख 59 हजार 920
एकूण मृत्यू : 4 लाख 4 हजार 211
आतापर्यंत एकूण लसीकरण : 36 कोटी 13 लाख 23 हजार 548
नाशिक : जिल्हा परिषद शाळेचा मद्यधुंद शिक्षक, मद्यपी शिक्षक प्रकाश चंद्र थेट वर्गात टेबल खाली लोळत पडलेल्या अवस्थेत विद्येच्या मंदिरात तर्राट शिक्षकाचा धुमाकूळ विद्यार्थ्यांनीच कॅमेरात कैद केलं आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना आदिवासी पाड्यावर शिक्षणाच्या नव्या संकल्पना शोधण्याऐवजी शिक्षकाचा दारूचा तास सुरु, त्रंबकेश्वर तालुक्यातील दापुरे ग्रामपंचायत हद्दीतील कुंडल्याची वाडी शाळेतील प्रकार
बुलढाणा : जिल्ह्यातील सर्व बाजारसमितीत सर्व प्रकारचे खरेदी विक्री व्यवहार अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. कडधान्याच्या साठेबाजीवर सरकारने मर्यादा आणल्याने व्यापारीवर्गाकडून बंद पुकारण्यात आलाय . केंद्राच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध केला जातोय. व्यापाऱ्यांसाठी कडधान्यासाठी 200 टन साठवणूक मर्यादा लागू करण्यात आली आहे. सरकारने कडधान्य साठवणुकीसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मर्यादा घातल्या आहेत..
रायगड : खोपोली शिळफाटानजीक ट्रकला भिषण आग आहे. ट्रकने तीन ते चार वाहनांना दिली धडक. यात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून जखमी मोटारसायकल स्वाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पनवेलकडे येणारी वाहतूक शिवाजी चौक मार्गे वळविण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल, आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.
सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ खडसेंना ईडीचा मोठा धक्का दिला आहे. एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
Dilip Kumar Passed Away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला
युरो चषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात इटलीनं स्पेनचा पेनल्टी शूटआऊटवर पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. युरो चषकाची फायनल गाठण्याची इटलीची ही आजवरची चौथी वेळ ठरली. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एकेका गोलची नोंद केली. इटलीकडून चिएसानं 60व्या मिनिटाला गोल डागला. तर स्पेनच्या मोरोटानं 80व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानं या स्पर्धेत तिसऱ्यांदा पेनल्टी शूटआऊटवर निकाल देण्याची वेळ आली. ज्यात इटलीनं 4-2 अशी बाजी मारली. दरम्यान अंतिम फेरीत इटलीसमोर आता इंग्लंड आणि डेन्मार्क सामन्यातल्या विजेत्या संघाचं आव्हान असणार आहे.
पार्श्वभूमी
PM Modi Cabinet Expansion Date: मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या म्हणजे बुधवारी संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.
मंत्रिमंडळ कसे असेल?
मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून महिलांचे प्रतिनिधित्व वाढविले जात आहे. प्रोफेशनल, मॅनेजमेंट, एमबीए, पदव्युत्तर युवा नेत्यांचा मंत्रिमंडळा समावेश होण्याची शक्यता आहे. मोठ्या राज्यांना अधिक वाटा देण्यात येईल. बुंदेलखंड, पूर्वांचल, मराठवाडा, कोकण या भागांना वाटा देण्यात येईल अशी चर्चा आहे.
मंत्रिमंडळात लहान समुदायांना देखील प्रतिनिधित्व दिले जात आहे. यावेळी यादव, कुर्मी, जाट, पासी, कोरी, लोधी इत्यादी समाजाचे प्रतिनिधित्व दिसेल. या विस्तारानंतर दोन डझन ओबीसी किंवा मागासवर्गीय मंत्री यावेळी मंत्रिमंडळात दिसतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
अनेक मंत्रिपदं रिक्त
शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधून बाहेर निघाले तसेच रामविलास पासवान व इतर काही मंत्र्यांच्या निधनानंतर सर्व मिळून अनेक मंत्रिपदे रिक्त आहेत. सध्या मोदी मंत्रिमंडळात फक्त 53 मंत्री आहेत. तर घटनेनुसार मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त 79 असू शकते. त्यामुळे सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 26 मंत्रिपदं रिक्त आहेत. तिथे कुणाची वर्णी लागणार येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.
JEE Main 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे( NTA)घेण्यात येणाऱ्या JEE Mains -2021 परीक्षेच्या उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये JEE Main 2021 तिसऱ्या सेशनची परीक्षा 20 जुलै ते 25 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. तर चौथ्या सेशन ची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान देशभरात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या तारखा आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केल्या आहेत
देशातील कोरोना परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षेसाठी चार सेशन ठेवण्यात आले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिकची संधी परिक्षेसाठी मिळेल. यामध्ये ही परीक्षा फेब्रुवारी,मार्च, एप्रिल , मे या महिन्यात 4 सेशनमध्ये पार पडणार होती. त्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या असून दुसऱ्या लाटेत देशभरातील कोरोना स्थिती पाहता एप्रिल आणि मे महिन्याच्या म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना यावर्षी जेईई मेन्स 2021 परीक्षेसाठी चार संधी देण्यात आल्या आहेत. ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त होतील त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -