- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
Breaking News LIVE | जालना : जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती राजेश सोनी यांना पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न
Breaking News LIVE | जालना : जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती राजेश सोनी यांना पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न
Breaking News LIVE Updates, 23 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
23 Feb 2021 10:33 PM
दिल्ली : पाच राज्यांमधील निवडणुकांचे वेळापत्रक अंतिम करण्यासाठी निवडणूक आयोग उद्या बैठक घेणार आहे.
जालना : जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती राजेश सोनी यांना पिस्टलचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. जालना शहराजवळील दत्ताश्रमाजवळील घटना, पोलीस स्टेशनला दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारच्या सुमारास दत्ताश्रमात दर्शन करून आल्यानंतर दोन्ही आरोपींनी पिस्टल दाखवून सोनी यांना गाडीत बसण्याचा आग्रह केला. मात्र आरोपींना बोलण्यात अडकवून सोनी यांनी आश्रमात पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. दत्ताश्रमाजवळ उद्योगपती राजेश सोनी यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. दत्ताश्रमजवळ हा प्रकार घडला. इट्रीका कारमध्ये आलेल्या दोघांनी रिव्हॉलवरचा धाक दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. जालना तालुक्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर प्रकरणाचा तपास चालू असल्याचे पोलिस निरिक्षक यशवंत बागुल यांनी सांगितले.
कोरोनामुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना, ठाणे महानगरपालिका 70 लाखांची वाहन खरेदी करणार आहे. ही वाहने कोणतेही लोकोपयोगी कामासाठी नव्हे तर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, प्रभाग समिती सभापती यांच्यासाठी अत्याधुनिक महागड्या गाड्या खरेदीसाठी विकत घेतली जाणार आहेत. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर झाला. विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शानु पठाण यांना देखील एक गाडी देऊ असे शिवसेनेने म्हटल्यानंतर त्यांचाही विरोध मावळला. काही दिवसांपूर्वी जो अर्थसंकल्प सादर केला त्यात पैसे नसल्याने अवाजवी खर्च नको म्हणून 1200 कोटींची कपात करण्यात आली होती. मात्र त्याच महानगरपालिकेकडे आता महागड्या गाड्या खरेदी करण्यासाठी 70 लाख रुपये कुठून आले असा प्रश्न निर्माण झाला आहे
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर बेपत्ता असलेले राज्याचे वनमंत्री यांनी आज वाशिमच्या पोहरादेवी इथे मोठं शक्तीप्रदर्शन करत आपली भूमिका मांडली. मात्र या दरम्यान कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याने वाशिम पोलीस गर्दी केलेल्या दहा हजार लोकांविरोधात गुन्हे दाखल करणार असून त्यामधील दहा जणांची नावं निष्पन्न झाली आहेत. आजच मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी गर्दीप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
शिर्डीतील साई मंदिर दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवीन नियमावली जारी केली आहे. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच साईचं दर्शन मिळणार आहे. पहाटेची काकड आरती आणि रात्रीची शेजारती भक्तांविना होणार आहे. गुरुवार आणि सलग सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन पास बंधनकारक असेल. तर गुरुवारी होणारा साईपालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. याशिवाय दर्शन रांगेतील 150 ते 200 भक्तांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वर्षा बंगल्यावर पोहोचले
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये जमा करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल ठरला असून राज्याच्या कृषी खात्याने केलेल्या कामामुळे महाराष्ट्रातील एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हजार 638 कोटी रुपये जमा झाले आहे. त्याचबरोबर ही योजना राबवताना शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात पुणे जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. तर या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी करण्यामध्ये अहमदनगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या वाट्याला आलेल्या या तीन पुरस्कारांचा स्वीकार करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे दिल्लीमध्ये पोहोचले असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते या पुरस्करांचं वितरण बुधवारी करण्यात येणार आहे.
जयंत पाटलांनी सांगली कॉंग्रेसमधील वेगवेगळे गट आणि राष्ट्रवादीची यशस्वी मोट बांधली. अडीच वर्षांपूर्वी महापालिका निवडणूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढवली होती. पण गटातटाच्या राजकारणातुन एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रकार झाले होते. यावेळी मात्र सत्तेसाठी सगळे गट एकत्र आले.
जयंत पाटील यांनी महापालिका महापौर निवडीच्या निमित्ताने सांगलीतील काँग्रेस मधील सर्व गट एकत्र आणलेत. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी याना महापौर केले असताना दुसरीकडे विशाल पाटील गटाचे उमेश पाटील यांना उपमहापौर पद दिले आहे. तसेच मदन पाटील गटाला महापालिकेतील महत्वाची पदे देण्याचे आश्वासन देण्यात आलंय. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील देखील राष्ट्रवादी सोबत राहिले. सांगलीतील काँगेसमधील वसंतदादा घर, मदन पाटील गट, पृथ्वीराज पाटील यांना एकत्र आणत जयंत पाटील यांनी महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर तर काँगेसचा उपमहापौर बसवला आहे.
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम रद्द करण्याचं आवाहन केलं आहे. पण काँग्रेसने आज राज्य निवड मंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर प्रमुख पदाधिकारी सगळे उपस्थित राहिले. या नेत्यांबरोबर त्यांचा स्टाफ देखील उपस्थित आहे. एकूणच एकीकडे संजय राठोड आणि आता काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवल्याचं चित्र आहे. नाना पटोले यांना बैठकीआधी विचारला असता ते म्हणाले की, हा सार्वजनिक कार्यक्रम नाही, पक्षाचा कार्यक्रम आहे. इथे 50 हून अधिक लोक नसतील. परंतु इथलं चित्र मात्र तसं नाही.
कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्या वेळात मुंबई आणि मुंबई लगतच्या महापालिकांमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. रुग्ण वाढले तर काय कठोर उपाययोजना करायच्या याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईसह परिसरात रुग्ण वाढले तर लोकल ट्रेनची संख्या कमी करणे, लोकलच्या तिकीटांवर निर्बंध आणणे. या शहरांतील खाऊ गल्ली बंद करणे, हॉटेलच्या वेळा आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून म्हणून काय कारवाई करायची, या सगळ्या मुद्यांवर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, आरोग्य विभागाचे अधिकारी, मुंबईसह लगतच्या सर्व महापालिकांचे आयुक्त आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जालना जिल्ह्यात 6 महिन्यानंतर कोरोनाचा आकडा तीन अंकी झाल्याने प्रशासनाने आजपासून कडक पावले उचलत आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिलेत..
कर्नाटकात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस अडवल्या
,
कोगनोळी टोल नाक्यावरून महाराष्ट्रातील बस जाण्यास अटकाव
,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारचा निर्णय
,
शेकडो प्रवाशांची गैरसोय, चेक पोस्टवर ताटकळत उभा
विनामास्क आढळल्यास 1000 रुपयांचा दंड ही अफवा, विनामास्क आढळल्यास 200 रुपयांचा दंड, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची माहिती, नागरिकांना मास्क घालण्याचंही पोलीस आयुक्तांच आवाहन
जेजुरीच्या खंडेरायाची माघी पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा रद्द केल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं. येणाऱ्या शनिवारी माघी पौर्णिमा आहे. त्यादिवशी खंडेरायाची यात्रा भरते परंतु भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.. तसेच खंडेरायाचे मंदिर देखील भाविकांसाठी बंद असणार आहे.. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मंदिर भाविकांसाठी बंद असेल.जेजुरी गडाच्या पायथ्याशी बॅरिकेट्स बसवण्यात येणार आहेत. गडावर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात येतंय. मंदिर जरी भाविकांसाठी बंद असलं तरी धार्मिक विधी हे नित्यनेमाने केले जातील.
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा गोदावरी गौरव पुरस्कार स्थगित, एक वर्ष आड दिला जातो पुरस्कार, कोरोनामुळे मागील वर्षी दिला जाणार पुरस्कार रद्द करून यावर्षी दिला जाणार होता,
विविध क्षेत्रातील 6 मान्यवरांचा होणार होता गौरव, तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या जन्मदिनी 27 फेब्रुवारीला होणार होते पुरस्कार वितरण, नाट्य परिषदेचा शिरवाडकर, कानेटकर, बाबुराव सावंत पुरस्कार सोहळाही पुढील निर्णय येईपर्यंत स्थगित
जालना जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फोजदार प्रवीण देशमुख यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले ते 54 वर्षाचे होते, त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर 12 तारखेपासून उपचार सुरू होते, आज औरंगाबादच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
जालना जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फोजदार प्रवीण देशमुख यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले ते 54 वर्षाचे होते, त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर 12 तारखेपासून उपचार सुरू होते, आज औरंगाबादच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
परभणीतील जिंतूर शहरातील एका मंगल कार्यालयाला 25 हजार रुपयांचा दंड जिल्हा प्रशासनाने ठोठावला आहे. जिंतूर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात एका लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. ही बाब नगरपालिकेच्या लक्षात आल्यानंतर नगरपालिकेने लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयाला सोमवारी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
वनमंत्री संजय राठोड यांनी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जावं, पोहरादेवी पीठाच्या सूचना, जितेंद्र महाराज यांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह माहिती
नांदेडमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन सर्वांचे श्रद्धा स्थान असणारे माहूर येथील रेणुका माता मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. याविषयीचा निर्णय काल श्री दत्त संस्था विश्वस्थ मंडळाने घेऊन मंदिर बंद करण्यात आलंय. त्यामुळे माहूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी सहकार्य करावे व कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मंदिर समितीने केलंय.
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम जैसे थे ठेवण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, औरंगाबाद महापालिका सिडको प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार आहे, योगेश बालसाखरे आणि सोमनाथ करोळे यांनी केली होती प्रियदर्शनी उद्यानातील वृक्षतोडी विरोधात याचिका
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
पार्श्वभूमी
संजय राठोड पोहरागडला जाणार, शासकीय दौरा जाहीर
यवतमाळ/वाशिम : गेले अनेक दिवस नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा शासकीय दौरा जाहीर झाला आहे. टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर संजय राठोड अनअव्हेलेबल होते. परंतु उद्याचा त्यांचा शासकीय दौरा जाहीर झाला असून अनेक दिवसांनी ते कॅमेऱ्यासमोर दिसतील. संजय राठोड वाशिममधल्या पोहरादेवीचं दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे. यावेळीच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आपली बाजू स्पष्ट करतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे राठोड काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Coronil औषधा संदर्भातील बाबा रामदेव यांचा दावा खोटा, IMA ने आरोग्यमंत्र्यांकडे मागितले स्पष्टीकरण
पतंजलीच्या कोरोनिल (Coronil) टॅबलेटला जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणपत्र दिल्याची बातमी खोटी असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) सोमवारी सांगितले. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. कोरोनील औषध कोविड 19 वर प्रभावी असल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला आहे. कोणत्याही आयुर्वेदीक औषधाला कोविडवर उपचार करण्यासाठी प्रमाणपत्र दिले नसल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने 19 फेब्रुवारीला डब्ल्यूएचओ सर्टिफिकेशन योजनेत कोरोनील औषधाला कोविडवरील उपचारासाठी आयुष मंत्रालयाने प्रमाणपत्र दिल्याचे सांगितले होते.
मुंबई महापालिकेने नोकरी नाकारलेल्या शिक्षकांच्या समर्थनात मराठी एकीकरण समिती रस्त्यावर; आंदोलनाचा इशारा
आझाद मैदानात मागील 21 दिवसांपासून मुंबई महापालिकेत नोकरी मिळावी या मागणीसाठी काही शिक्षक आंदोलन करत आहेत. या शिक्षकांना आता मराठी एकीकरण समितीने देखील पाठींबा दिला आहे. याबाबत बोलताना मराठी एकीकरण समितीचे दक्षिण मुंबईचे अध्यक्ष सचिन दाभोळकर म्हणाले की, "या शिक्षकांचे म्हणणे आहे की त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत मराठीत झाल्यामुळे त्यांना पालिकेने नोकरी नाकारली आहे." सचिन दाभोळकर पुढे बोलताना म्हणाले की, "जवळपास दीडशे विद्यार्थ्यांच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेकडून हा अन्याय करण्यात आलेला आहे. ज्यावेळेस शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली. त्यावेळी जाहिरातीमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषेत शिक्षण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत.