Breaking News LIVE | जालना पोलिसांकडून 10 किलो चांदी,12 तोळे सोने अन् रोख रक्कम 13 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त

Breaking News LIVE Updates, 22 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Feb 2021 10:48 PM
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांच्यासह तीन जणांवर पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Covid-19 अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचं पालन न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला..
पुण्याच्या हडपसर परिसरातील लक्ष्मी लॉन्स मध्ये धनंजय महाडिक यांचा मुलाचा रविवारी विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी नियम डावलून हजार ते बाराशे लोकांची गर्दी जमल्याचा आरोप त्यांच्यावर आहे..
जालना : पोलिसांनी आज घरफोडी करणाऱ्या तीन आरोपीना जेरबंद केलंय, ज्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 10 किलो चांदी ,12 तोळे सोन आणि 1 लाख 80 हजाराची रोकड जप्त केलीय, काही दिवसांपूर्वी शहरातील नळगल्ली भागात घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्यानी लाखोंचा मुद्देमाल पळवुन पोलिसांना आव्हान दिल होत, दरम्यान आरोपीच्या शोधा साठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात आलं होतं या पथकाला खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्या तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.. सागरसिंग अंधरेले, मखनसिंग भादा आणि वल्ली दर्गा मामू अशी तीन आरोपींची आरोपींची नावं असून त्यांना न्यायालयाने 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
परभणीत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यात विविध पक्ष, संघटना, यांच्याकडून आयोजित केल्या जाणार्‍या मोर्चे, निदर्शने, रास्तारोको, उपोषणे व अन्य सर्व प्रकारच्या आंदोलकांवर निर्बंध घातल्या गेले असून त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस अधीक्षकांवर राहील, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.कोणी उल्लंघण केल्यास कठोर कारवाई करावी, असेही त्यात नमूद केले आहे.

पूजा चव्हाणच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे. याप्रकरणी पहिल्यांदाच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले होते. पण अद्यापही या प्रकरणी पोलीस कारवाई करत नसल्याने आज चित्रा वाघ यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेतली आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "पूजा चव्हाणने आत्महत्या केली, गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला असं पोलिसांनी म्हटलं. तिच्या आईवडिलांनी आमची कोणाबाबत तक्रार नाही अशी स्टेटमेंट दिलं. त्याच दरम्यान मीडियातून समोर आलेल्या बातम्यांनुसार तिची आजी, भाऊ यांनी मात्र आमची मुलगी आत्महत्या करणारी नव्हती म्हणत ही हत्या असून याची चौकशी व्हावी ही मागणी केली. दरम्यान 12 ऑडिओ क्लिप बाहेर आल्या. हा आवाज दुसरा तिसरा कोण नसून राज्याचा शिवसेनेचा वनमंत्री संजय राठोडचा आहे, काही फोटो ही आहेत ज्यात पूजा ही संजय राठोडच्या संपर्कात होती हे ही दिसतंय, इतके ढळढळीत पुरावे असतानाही पुणे पोलीस मात्र संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाही."
परभणीत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यात विविध पक्ष, संघटना, यांच्याकडून आयोजित केल्या जाणार्‍या मोर्चे, निदर्शने, रास्तारोको, उपोषणे व अन्य सर्व प्रकारच्या आंदोलकांवर निर्बंध घातल्या गेले असून त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस अधीक्षकांवर राहील, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.कोणी उल्लंघण केल्यास कठोर कारवाई करावी, असेही त्यात नमूद केले आहे.
ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिलानी इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांस राज्य शासनातर्फे ३ लाख तर केंद्र शासनातर्फे 2 लाख अशी एकूण रुपये 5 लाख नुकसान भरपाईच्या माध्यमातून सहाय्यता निधीच्या धनादेशाचे वाटप ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर भिवंडीचे आमदार रईस शेख आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. 21 सप्टेंबर, 2020 रोजी मध्यरात्री अचानक जमीनदोस्त झालेल्या भिवंडीतील जिलानी बिल्डिंग दुर्घटनेत एकूण 38 व्यक्तींचा मृत्यू झाला होता तर 25 नागरिक गंभीर जखमी झाले होते. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे लवकरात लवकर मदत मिळण्याबाबत राज्याच्या भूकंप व पुनर्वसन मंत्री यांचेकडे अनेक निवेदने सादर करून सततचा पाठपुरावा केल्याचे हे फलीत आहे असे मत आ.रईस शेख यांनी व्यक्त केले. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडीतील जुन्या इमारती दुर्घटना व अनधिकृत इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्लस्टर योजना अंमलात आणण्याबाबत मार्गदर्शन केले.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील तडवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजुरांच्या 1 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या ऊस तोडणी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्या आणि पोलिसांनी भेट दिली आहे. शिराळा येथे शासकीय रुग्णालयात बॉडीचे शव विच्छेदन करण्यात आले. या बालकाच्या कुटुंबास वन विभागाकडून 15 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून तत्काळ पाच लाख रुपये कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात येणार आहेत.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी मंगल कार्यालये, धार्मिक कार्यक्रमासह देवस्थान व पर्यटन स्थळावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याची माहिती दिली. 50 पेक्षा कमी व्यक्तीचा सहभाग, मास्क, सॅनिटायझर सुविधांचा वापर होतो की नाही याची कसून तपासणी केली जाणार आहे. सर्वांनी नियम पाळा, जिल्हा लॉकडाऊन मध्ये जायची पाळी आणू नका. आज झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण, डॉ श्रीपाद पाटील, डॉ संदेश कांबळे उपस्थित होते. मास्क न वाटल्यास दंडात्मक कारवाई, कोरोना टेस्टिंग वाढवणे, मृत्यू दर कमी करणे, गर्दीवर नियंत्रण करणे. तसेच राजस्थान, गोवा, गुजरात, केरळ राज्यातून येणाऱ्या व्यक्तीची आर. टी. पी. सी. आर टेस्ट सक्तीची असेल.
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये झाले आहे. मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू असेल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. 1 मार्चपासून ही भाडेवाढ लागू होईल. तर 31 मे पर्यंत मीटर कॅलिबरेशन पूर्ण व्हायला पाहिजे, असं अनिल परब यांनी सांगितलं.
मंत्रालयात पुन्हा कोरोनाचा विळखा पाहायला मिळत आहे. महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच विभागातील इतके कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद महापालिका परीक्षेत्रात येणार्‍या सर्व खाजगी आणि सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या शाळेतील पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी आणि अकरावीच्या वर्ग पूर्णपणे बंद असतील. दहावी आणि बारावीचे वर्ग मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू असतील. येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद असतील. याबरोबरच शहरात असणारे सर्व कोचिंग क्लासेस देखील आजपासून ते 28 तारखेपर्यंत बंद असतील. तसे परिपत्रक महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी काढले आहे.
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. घरी पुन्हा परतताना अंबाबाईचे दर्शन घेऊन भाविक घराकडे जातात. त्यामुळे आज अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने राज्यभर सूचना आणि आदेश काढण्यात आले आहेत. त्या सूचनांचे पालन करुनच देवीचे दर्शन घ्यावे अशा पद्धतीचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहेत.
भाजपचे नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा हडपसर परिसरातील लक्ष्मी लॉन्स याठिकाणी रविवारी सायंकाळी विवाह संपन्न झाला.. यावेळी सर्व राजकीय पक्षातील दिग्गज नेते या विवाह सोहळ्याला हजर होते.. covid-19 च्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचं याठिकाणी उल्लंघन झालं.. या लग्न सोहळ्यासाठी 100 पेक्षा जास्त नागरिक एकत्र जमले होते..त्यामुळे याठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे या लॉन्स मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हडपसर पोलिस ठाण्यात सुरू आहे

या विवाह सोहळ्यात कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचं पालन न झाल्यामुळे हा गुन्हा दाखल करत असल्याची माहिती हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली....
डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी नांदेड येथे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होणारा 'संगीत शंकर दरबार' हा सांस्कृतिक महोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर स्थगित केला आहे.अशोक चव्हाण यांची माहिती
नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे ,आदिती तटकरे कार्यक्रमाला उपस्थित, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे कार्यक्रमाला 50 जणांची मर्यादा, सोशल डिस्टन्सिंगमध्ये कार्यक्रम सुरू
मुंबई: अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने मालाड भागातून 60 लाख रुपयांचे 3 किलो चरस जप्त; मादक पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक, एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
मुंबई: अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने मालाड भागातून 60 लाख रुपयांचे 3 किलो चरस जप्त; मादक पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक, एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
महाविद्यालयं सुरु ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण,

15 फेब्रुवारीला महाविद्यालय सुरु झाली आहेत ,

पण सध्या परिस्थिती पाहता पुणे येथे निर्णय घेतला आहे ,
जिल्हाधिकारी आणि कुलगुरूंनी मिळून महाविद्यालयं सुरु ठेवण्याचा निर्णय घ्यावा
शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पहिला जामीन मंजूर,

मुंबई उच्च न्यायालयाकडनं जेष्ठ कवी वरवरा राव यांची अंतरिम जामीनावर सुटका,

50 हजारांच्या वैयक्तिक जामीनावर केवळ सहा महिन्यांसाठी सुटका,

82 वर्षीय राव यांना वैद्यकीय कारणांसाठी हायकोर्टाकडनं जामीन मंजूर,

पासपोर्ट एनआयएकडे जमा करण्याचे निर्देश, विना परवानगी राहत घर सोडण्यास मनाई,
पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत, मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत चाचणीत अपयशी, काँग्रेस आमदारांचा सभात्याग
पुण्यात धावत्या पीएमपीएल बसने अचानक पेट घेतल्यामुळे लागलेल्या आगीत एक प्रवाशी जखमी झाल्याची घटना खराडी बायपास चौकात घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि विमानतळ पोलिसांनी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत,

मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यावर शरद पवार यांचा निर्णय
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण, भुजबळ यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

-काल दिवसभर कोरोना, साहित्य संमेलन बैठकांना होते हजर

-सकाळी शरद पवार यांच्यासह आमदार सरोज अहिरे यांच्यां लग्नाला लावली होती हजेरी

-नाशिकचे जिल्हाधिकारीसह बैठकांना उपस्थित असणाऱ्या सर्वांची खबरदारीसाठी होणार कोरोना चाचणी
सांगली : सांगली महापालिकेच्या महापौर निवडीत ट्विस्ट. भाजपचे सात नगरसेवक अजूनही भाजपच्या संपर्कात नाहीत. सात ही नगरसेवक नॉट रिचेबल तर काँग्रेसचे नऊ नगरसेवक महापौरपदाच्या उमेदवारी वरून नाराज. नऊ नगरसेवकांकडून दबाव गट तयार करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधी सत्तेचा फॉर्म्युला ठरवावा अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या ऑनलाइन पद्धतीने महापौर, उपमहापौर निवड होणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा बंद झालेली कोविड सेंटर सुरू होणार,

कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने आरोग्य व्यवस्था अलर्ट,

कोविड सेंटर सुरू करण्याच्या पाहणीसाठी एका समितीची स्थापना
शिर्डी : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गवर भीषण अपघात, नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड फाटा येथे भीषण अपघात.... स्विफ्ट आणि लक्झरी गाडीची धडक होऊन झाला अपघात...
अपघातात 5 जण जागीच ठार..
पहाटे 2 च्या सुमारास घडली घटना...
मयत जालना जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती.
कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेची प्रतीक्षा संपली,

आजपासून आठवड्यातून तीन दिवस मिळणार विमानसेवा,

व्यापारी आणि व्यावसायिकांना या विमानसेवाचा मोठा फायदा होणार,

विमानफेरीत 35 प्रवासी असून तिकीट दर 3600 असणार आहे
अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड फाटा येथे भीषण अपघात, अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू, स्विफ्ट आणि लक्झरी गाडीची धडक होऊन झाला अपघात...पहाटे 2 च्या सुमारास घडली घटना... मयत जालना जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती...
कोरोना संकटात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयांना कोल्हापूर महापालिकेचा दणका,

काल दिवसभरात कोल्हापूर शहरातील 27 मंगल कार्यालयांवर पालिकेची कारवाई,

सोशल डिस्टनसिंग, 50 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित, सॅनिटायझर नसल्याचा ठपका,

कारवाई करण्यात आलेल्या मंगल कार्यालयांकडून 35 हजाराचा दंड वसूल
टिकटॉक स्टार अभिनेता समिर गायकवाड याने घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीतील त्याच्या घरात त्याने गळफास लावला

पार्श्वभूमी

Bigg Boss 14 Winner Rubina Dilaik : रुबिना दिलैक बनली बिग बॉस 14 ची विजेती


 


Bigg Boss 14 : Rubina Dilaik बिग बॉस 14 ची विजेती बनली आहे. सोशल मीडियावर आधीच याबाबत शक्यता व्यक्त केली जात होती की यावेळची विजेती Rubina Dilaik असेल आणि तसंच झालं. राहुल वैद्यला पराभूत करत तिने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. राहुल वैद्य बिग बॉस सीझन 14 चा पहिला उपविजेता ठरला आहे तर निक्की तांबोळी दुसरी उपविजेती ठरली आहे.


 


पेट्रोल-डिझेल की मार, क्या यहीं अच्छे दिन है यार? युवासेनेचा केंद्र सरकारला पोस्टरमधून सवाल


 


वाढत्या महागाईविरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम पोस्टरबाजी होत असल्याचं बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपांवर युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.. वांद्रे पश्चिम, खार आणि सांताक्रूझमधल्या सर्व पेट्रोल पंम्पांवर हे पोस्टर मध्यरात्रीच्या सुमारास लावण्याचं काम सुरु होतं. या पोस्टरमध्ये ‘यही है अच्छे दिन?’ असा प्रश्न उपस्थित करत मागील मोदी सरकार पहिल्या टर्मची आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या दरवाढीची तुलना करण्यात आली आहे. यात 2015 साल आणि 2021 मधल्या गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींच्या दरवाढीची तुलना केली गेली आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात 2015 साल आणि 2021 सालच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांमध्ये फरक असल्याचं म्हणत युवासेना कार्यकर्तांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. वाढत्या महागाईविरोधात निषेध नोंदवण्यासाठी ही पोस्टरबाजी केली जात असल्याचं वांद्र्यातील युवासेना कार्यकर्ते अक्षय पानवलकर यांनी स्पष्ट केलं आहे. आताच्या महागाईच्या अच्छे दिनपेक्षा आधीचे वाईट दिवसही चालतील म्हणत युवासेना कार्यकर्ते श्याम जैस्वाल यांनी केंद्राला टोला लगावला आहे.


 


राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यासा सुरुवात करण्यात आली असून उद्यापासून सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.