Breaking News LIVE | हिंगणघाटच्या निवासी शाळेतील 75 विद्यार्थी कोरोनाबाधित
Breaking News LIVE Updates, 11 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
11 Feb 2021 11:35 PM
वर्धा : हिंगणघाटच्या निवासी शाळेतील 75 विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत. काल 30 आणि आज 45 विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण 247 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली असून त्यातील 75 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. 1 विद्यार्थी आणि 9 कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे. तर 30 कर्मचाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आलेत. विद्यार्थ्यांना याच शाळेच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यातील काहींना सौम्य लक्षण होती तर काहींना लक्षणदेखील नव्हती.
इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला , चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्याबबत बोर्डाने मुदत वाढ दिली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा कलांमध्ये विशेष प्राविण्य मिळवण्याऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे.
गडचिरोली : 2 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश मिळालं आहे. मंगलू कुडीयामी आणि मदनय्या तलांडी अशी त्यांची नावे आहेत. दोघेही छत्तीसगड राज्यातील सेंड्रा दलमचे सक्रिय नक्षली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील दामरंचा पो. स्टे. हद्दीत कुर्ताघाट येथे झालेल्या चकमकीत दोघांचा होता सक्रिय सहभाग होता. यातील मंगलू 2018 पासून तर मदनय्या 2005 पासून नक्षली कारवाईंमध्ये सक्रिय आहेत.
नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील सरपंचनगर इथे पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना वर्षभरापूर्वी घडली होती. या घटनेत मयत शरद कुऱ्हाडेचा मृतदेह त्याच्या घरात आढळला होता. त्यावेळी मयताच्या नातेवाईकांच्या जबाबावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर वैद्यकीय अहवाल आणि पोलीस तपासाअंती हा मृत्यू आकस्मिक नसून त्याचा खून झाल्याचं एका वर्षानंतर निष्पन्न झालं आहे. या घटनेत मयत शरद कुऱ्हाडेला त्याची पत्नी अश्विनी कुऱ्हाडे आणि तिच्या मुलाने इतर सहा साथीदारांच्या मदतीने एक लाख रुपयांची सुपारी देऊन जीवे मारल्याचे कळतं. त्यानुसार भाग्यनगर पोलिसात भादंवी 302 नुसार आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतीचा वाद जर विकोपाला गेला तर अनर्थ अटळ असतो. लातूर जिल्ह्यातील हेर येथेही अशीच घटना घडली आहे. शेतीच्या वादातून भावाने भावाचा खून केला आहे. उपचारासाठी सासऱ्याला नेणाऱ्या जावायासही जबर मारहाण करण्यात आली. यात जावयाचेही प्राण गेले आहे.
लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्याप्रमाणात विक्रीसाठी आणला आहे. त्यामुळे बाजार समितीत 12 हजार 129 क्विंटल सोयाबीनची आवाक झाली आहे. सध्या सोयाबिनला 4 हजार 761 रुपयांचा कमाल तर 4 हजार 640 रुपयांचा सर्वसाधारण दर मिळत असल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
सिंधुदुर्ग : शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्या विरुद्ध अपमानास्पद प्रक्षोभक विधान करून राऊत यांना मारहाण करणार अशी धमकी देणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले व शिवसेना शिष्टमंडळ यांनी कणकवली पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे सारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद मिळणार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच दुर्दैव अशी खोचक प्रतिक्रिया दिल्यानंतर विनायक राऊत यांनी आपली भाषा बदलावी नाहीतर दिसेल तिथे मारण्याची धमकी दिल्यानंतर आज कणकवलीत शिवसेनेने कणकवली पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पुणे : पुण्याच्या मावळमध्ये विदेशातून आलेले सहा फ्लेमिंगो पक्षी मृतावस्थेत आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. बर्ड फ्लूमुळं तर मृत पावले नसावेत ना? अशी शंका सुरुवातीला उपस्थित झाली. मात्र वनविभागाने केलेल्या पडताळणीनंतर शवविच्छेदन अहवालात विजेच्या धक्क्याने मृत पावल्याचं स्पष्ट झालं. नवलाख उंबरे परिसरात मृतावस्थेतील फ्लेमिंगो आज सकाळी आढळले होते. प्रत्येक वर्षी अनेक पक्षी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत विसावतात, इथला पाहुणचार घेतात. पण आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
पुण्याच्या मावळमध्ये विदेशातून आलेले सहा फ्लेमिंगो पक्षी मृतावस्थेत आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. बर्ड फ्लूमुळं तर मृत पावले नसावेत ना? अशी शंका सुरुवातीला उपस्थित झाली. मात्र वनविभागाने केलेल्या पडताळणीनंतर शवविच्छेदन अहवालात विजेच्या धक्क्याने मृत पावल्याचं स्पष्ट झालं. नवलाख उंबरे परिसरात मृतावस्थेतील फ्लेमिंगो आज सकाळी आढळले होते. प्रत्येक वर्षी अनेक पक्षी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत विसावतात, इथला पाहुणचार घेतात. पण आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
जळगाव : भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन हे गेल्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते. मात्र तरीही त्यांनी जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्षं केलं. त्यामुळेच अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्प रखडला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे प्रकल्पाच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
बेलाड येथे शाळेत जात असतांना रस्त्याच्या कड़ेला असलेल्या विहिरीत पडून बारा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील ग्राम बेलाड येथील ईयत्ता सहावीत शिकणाऱ्या कु.दिव्या गोविंदा संबारे या बारा वर्षीय मुलीचा शाळेत जात असताना रस्त्यांवरील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना साडे अकरा वाजेदरम्यान घडली. बेलाड येथील कु.दिव्या ही ग्रामीण विकास विद्यालयात इयत्ता सहाव्या वर्गात शिकत होती आज सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान शाळेत जाण्यासाठी ती निघाली असता रस्त्यावरील विहिरीत पडल्याने तिचा मृत्यू झाला याबाबत ची माहिती शहर पोलीसांना मिळताच पोलीस पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले, ग्रामस्थांच्या सहकार्याने विहीरीतील पाणी मोटारींद्वारे उपसुन दिव्याचा मृतदेह विहिरीतुन बाहेर काढुन उपजिल्हा रुग्णालयात आणला.
नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या 20 गावातील शेतकऱ्यांची महावितरणकडून वीज तोडणी. हानेगाव परिसरातील 600 शेतकऱ्यांची बांधावरील वीज पूर्व सूचना न देता महावितरण ने तोडली. गहू, हरभरा पिकाच्या भिजवणी हंगामात शेती पंपाची वीज खंडित केल्यामुळे पिके वाळून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलीय. त्यामुळे या परिसरातील 15 ते 20 गावातील शेकडो शेतकऱ्यांनी हणेगाव येथील उपकेंद्रावर अभियंत्यास घेराव घालून वीज जोडणी करण्याबाबत ठिय्या आंदोलन सुरु केलेय. शासनाने शेतकऱ्यांची वीज तोडणीचे आदेश जारी न करता महावितरण ही तुघलकी भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
नांदेड : 'विकेल ते पिकेल' आणि कृषी विभागाच्या 'आत्मा' योजने अंतर्गत बचतगट तसंच शेतकऱ्यांना शेतातील भाजीपाला, धान्य विक्रीसाठी जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयात जागा उपलब्ध, शेतकऱ्यांचा माल विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाळला.
दिल्लीत महाराष्ट्राच्या भुवया उंचावणारी मोठी राजकीय घडामोड, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले घेणार शरद पवार यांची भेट, शरद पवार यांच्या 6 जनपथ या दिल्लीतल्या निवासस्थानी होणार दोघांची भेट, संध्याकाळी साडेपाच वाजता उदयनराजे पवारांना भेटणार, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतरची पहिलीच भेट, दोघांमध्ये कुठल्या विषयावर चर्चा होणार याची उत्सुकता
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात रेती तस्करांनी अक्षरश: धुमाकूळ घातलाय. धोंडाआखर गावातून रेतीची तस्करी होत असल्याची माहिती तलाठी किशोर गायकी आणि सतीश दांडगेंना मिळाली होती. यावेळी त्यांनी वाहनावर कारवाईसाठी प्रयत्न केलाय. मात्र, यावेळी रेती तस्करांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. यात दोन्ही तलाठ्यांना मुक्कामार लागलाय. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद आहे. त्यांनी जमावापैकी फक्त दोघांवरच गुन्हे दाखल केलेत. सोबतच कॅमेर्यासमोर काहीही बोलायचं पोलीस टाळतायेत. अकोट आणि बाळापूर उपविभागातील रेती तस्करी रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी झालंय.
पुण्यातील धायरी भागातील धनगरवाडी जवळ इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरला मोठी आग लागली आहे, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग आटोक्यात आल्याच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं
अहमदनगर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक
,
21 पौकी 5 जागा झाल्या बिनविरोध...
बिनविरोध झालेल्या 5 पैकी भाजप 4 तर राष्ट्रवादीची 1 जागा बिनविरोध...
आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस...
बुलढाणा - मलकापूर उपनगराध्यक्ष वाढदिवासानिमित्त कार्यक्रमात तलवार डांस प्रकरणी ABP माझाच्या बातमी नंतर पोलिसांची कारवाई,
तलवार डांस प्रकरणी आतापर्यंत दोन तरुणांना अटक , पाच तलवारी जप्त,
दोन्ही तरुणांवर आर्म एक्ट नुसार मलकापूर शहर पोलिसात गुन्हा दाखल
राज्यपाल आणि सरकारमधील वादाचा नवा अंक, हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन राज्यपाल कोश्यारी राजभवनात
राज्यपाल आणि सरकारमधील वादाचा नवा अंक, राज्य सरकारच्या विमानातून हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, स्पाईज जेटच्या विमानाने उत्तराखंडला जाणार असल्याची माहिती
पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या युवतीने रविवारी रात्री पुण्यातील वानवडी भागात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मूळची बीड जिल्ह्यातील परभणीची असलेली पूजा तिच्या मित्रासोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत तिने पार्टी केली आणि त्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली. मात्र तिच्या आत्महत्येनंतर तिचे आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारमधील एका मंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागले. त्यामुळे पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून केली जातेय. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने पुणे पोलिस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करावी असं निवेदन देखील देण्यात आलय. परंतु संबंधित मुलीचे भारतीय जनता पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात वायरल झालेत. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
पंढरपूर शहरातील बाजारपेठ असलेल्या कर्नल भोसले चौक येथे आज पहाटे चारच्या सुमारास अचानक काही दुकानांना आग लागल्याचे निदर्शनास येताच अग्निशामक दलाने दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले . पहाटेच्या सुमारास भोसले चौकातील गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेले गॅरेज , कपड्यांच्या गोडावूनला आग लागली होती . यात गॅरेज मधील दुरुस्तीला आलेल्या अनेक दुचाकी जाळून खाक झाल्या असून काशीकपदी समाजाचे कपड्यांचे गोडावूनही आगीत भस्मसात झाले आहे . माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी आगीची माहिती काळातच तातडीने नगरपालिकेला निरोप देत कार्यकर्त्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला . वेळीच आगीची माहिती मिळाल्याने लोकवस्तीत आग पसरण्याचा धोका टाळला . ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळत नसली तरी पोलिसांनी तपास सुरु केला आहे .
आज पुन्हा इंधनच्या दरात वाढ,
पेट्रोलच्या किंमतीत 24 पैशाची वाढ, तर डिझेलमध्ये 31 पैशाची वाढ,
पेट्रोल - 94.34 तर
डिझेल - 84.92
विरार पोलिसांनी एका 8 महिन्याच्या मुलीला 2 लाखांत विकण्यासाठी आलेल्या चार आरोपींना अटक करून मुलीची सुखरूप सुटका केली आहे. यात दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. यातील एक इसम हा डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीच आहे. या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या चौघांना 16 फेब्रुवारी पर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
पुण्यातील कात्रजच्या नवीन बोगद्याच्या वरती असलेल्या टेकडीवरील झाडा झुडपांना मोठ्या प्रमाणात आग लागलीय. कात्रजच्या टेकडीला लागलेली ही आग नसल्यामुळे लागलेली असावी अशी शक्यता आहे. कात्रजच्या नवीन बोगद्यापासुन ही आग जुन्या बोगद्याच्या दिशेने वाढत चाललीय. या टेकडीवर काही हॉटेल्स असुन त्या हॉटेल्समधील सर्वांना सुरक्षितपणे खाली आणण्यात आलंय.
सांगलीत 8 सराफा व्यावसायिकांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. आर्थिक व्यवहारात या लोकांनी फसवणूक केल्याने 82 वर्षीय हरिश्चंद्र खेडेकर यांनी रविवारी केली होती आत्महत्या. खेडेकर यांनी आत्महत्या पूर्वी लिहलेल्या चिट्ठीत या सराफांनी आर्थिक फसवणूक, पैशासाठी मानसिक त्रास दिल्याचा केला होता उल्लेख. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि सावकारी कायदा,असे गुन्हे या सराफावर सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल
पार्श्वभूमी
18 फेब्रुवारी रोजी देशभरात रेलरोको
तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमांवर जवळपास 80 दिवसांपासून शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) 18 फेब्रुवारी रोजी देशभरात रेलरोको अभियान राबवण्याची घोषणा केली. संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं की, ''18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून चार वाजेपर्यंत संपूर्ण देशभरात रेलरोको अभियान राबवलं जाईल. तसंच 12 फेब्रुवारीपासून राजस्थानचे सर्व टोलनाके मोफत करणार असल्याचंही संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं.
आठ महिन्याच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड
विरार पोलिसांनी एका 8 महिन्याच्या मुलीला 2 लाखांत विकण्यासाठी आलेल्या चार आरोपींना अटक करून मुलीची सुखरूप सुटका केली आहे. यात दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. यातील एक इसम हा डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीच आहे. या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या चौघांना 16 फेब्रुवारी पर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
समुद्रात आलेल्या शक्तिशाली भूकंपानं हादरलं न्यूझीलंड
गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये सातत्यानं भूकंपाचे हादरे जाणवले. आता न्यूझीलंडसमवेत तीन राष्ट्रांमध्ये समुद्रात आलेल्या भूकंपामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पॅसिफिक महासागराच्या दक्षिण भागात बुधवारी भूकंपाचे जबर धक्के जाणवले. न्यूझीलंडसह वानुअतू, न्यू कॅलेडोनिया या भागांनाही भूकंपानं हादरा दिला. बुधवारी सायंकाळच्या सुमारास न्यूझीलंडच्या उत्तर भागात भूकंपाचे जबर हाजरे जाणवले. येथील बहुतांश भागांमध्ये त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र संस्थेच्या माहितीनुसार लॉयल्टी आयलंडपासून दक्षिण पूर्वेकडे 10 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता 7.7 रिक्टर स्केल इतकी होती.