Breaking News LIVE | वाशिम जिल्ह्यात आजपासून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी
Breaking News LIVE Updates, 20 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
20 Feb 2021 08:49 PM
कोरोना काळात कार्यालयीन वेळांबबात केंद्रानं धोरण आखावं. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही पारंपरिक मानसिकता बदलण्याची गरज- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वाशिम जिल्ह्यात आजपासून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी. रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, ऑटोरिक्षा, हायवे वरील पेट्रोलपंप व ढाबे एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग वगळता सर्व आस्थापने सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा. आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद, लग्न समारंभासाठी पूर्व परवानगी आवश्यक.
वेंगुर्ले तालुक्यातील मानसीश्वराचा वार्षिक जत्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने गावमर्यादीत संपन्न.
वेंगुर्ले मधील अतिशय जागृत व लाखो भक्तांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव मानसीश्वराच्या जत्रौत्सवाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून भक्तिमय वातावरणात सुरू आहे.
रायगड : कोरोना विषाणू उपाययोजनांसंदर्भात रायगडच्या जिल्हाधिकारी यांचे निर्देश जाहीर. धार्मिक यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलनं, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठकासाठी 50 व्यक्तींना उपस्थित राहता येणार. मिरवणूक आणि रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध. लग्न समारंभात जास्तीत जास्त 50 पाहुण्यांना परवानगी. मास्कचा वापर सक्तीचा. मंगल कार्यालयात 50 पेक्षा जास्त लोक आढळल्यास मालकाविरुद्ध गुन्हा दाखल होणार. रेस्टॉरंटबाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनांचे पालन केले जाणे बंधनकारक. बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक
यवतमाळमध्ये किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सभेला परवानगी नसताना आझाद मैदानात घोषणाबाजी व भाषण दिल्याने कारवाई.
अमरावती जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांचा स्फोट. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात तब्बल 1 हजार 55 कोरोना रुग्ण आढळले. वर्ष भरातील सर्वात मोठी रुग्णसंख्या. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 28 हजार 648 वर.
दारव्हा ,यवतमाळ दिग्रस, पुसद, पांढरकवडा या 5 शहरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये मास्क वापरावे असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले आहे शिवाय सर्वांनी काळजी घेण्याची गरजेचे आहे आता जिल्ह्यात कोरोना केयर सेंटर पुन्हा सुरू केले आहे आणि होम आयसोलेशन पुन्हा सुरू केले असून आता लोकांनी नियम पाळले नाही तर हॉस्पिटलाईझ करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता लोकांनी घ्यायची आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे
शिवाय यवतमाळ च्या जिल्ह्याच्या ज्या भागात जास्त पेशंट त्या ठिकाणी रॅपिड टेस्ट करण्यासाठी व्हॅन सुरू केली असून ती टेस्ट लोकांनी करावी असेही जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतुषार वारे यांनी सांगितले
अमरावती जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांचा स्फोट. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात तब्बल 727 कोरोना रुग्ण आढळले. वर्ष भरातील सर्वात मोठी रुग्णसंख्या. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 28 हजार 648 वर.
पुण्यातील गुंड गजानन मारणे हा अटकेच्या भीतीने फरार झाल्याच पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. एक प्रसिध्दीपत्रक काढुन पुणे पोलिसांनी याची माहिती दिलीय. सोमवारी तळोजा कारागृहातुन सुटका झाल्यानंतर गजानन मारणेची त्याच्या समर्थकांनी तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणुक काढली होती. शेकडो वाहनांचा ताफा या मिरवणुकीत सहभागी झाला होता. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाची अशी राजरोसपणे मिरवणूक निघाल्याने पोलिस काय करतायत असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. त्यानंतर पोलिसांनी गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमधे गुन्हे नोंद करण्याच सत्र सुरू केलं.
वाशिम : पोहरादेवी येथे धर्मपीठावर महंतांची बैठक पार पडली. पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणाशी जोडल्या गेल्यानंतर 12 दिवसांपासून नॉट रीचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड हे सहपरिवार 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे धर्मपीठावर येणार आहेत. या संदर्भातील माहिती महंत जितेंद्र महाराज व सुनील महाराज यांनी आज माध्यमांशी बोलतांना दिली.
परभणी जिल्हयात प्रशासनाकडून पुन्हा काही निर्बंध. 5 ते 9 पर्यंत च्या सर्व शाळा बंद,11 वीचेही वर्ग बंद.
जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 15 मार्चपर्यंत बंद. कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात पुन्हा निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान,या आदेशाचे पालन न करणार्याहविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल,असाही इशारा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेशात दिला आहे.
कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात पुन्हा निर्बंध घालण्यास सुरुवात केलीय. 5 वी ते 9 वी पर्यंतच्या सर्व शाळा, 11 वीचे सर्व वर्ग 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर 15 मार्चपर्यंत जिल्हाभरातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवावेत असे आदेश बजावले आहेत. महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, आदींनी या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी त्यांच्यावर याबाबत जबाबदारी राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, या आदेशाचे पालन न करणार्याविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल, असाही इशारा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेशात दिला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे पंढरपुरात माघी यात्रा कालावधीसाठी संचारबंदी जाहीर झाली असली तरी राज्यभरातून दिंड्या पंढरपुरात दाखल होऊ लागल्याने पोलिसांनी शहरातील १२०० पेक्षा जास्त मठ व धर्मशाळांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे . कोरोनामुळे कोणत्याही दिंड्या अथवा वारकर्यांना पंढरपुरात प्रवेश नसल्याने या वारकऱ्यांचे निवासाचे ठिकाण असलेले शहरातील मठ व धर्मशाळांनी कोणत्याही भाविकाला निवासासाठी थांबवू नये अशा स्वरूपाच्या या नोटीस असून यात्रेपूर्वी शहरात दाखल झालेल्या हजारो भाविकांना बाहेर काढणे हि प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे . यासाठीच सर्व धर्मशाळा व मठाना अशा नोटीस दिल्या जात आहेत . माघी यात्रेत भाविकांना रोखण्यासाठी कोल्हापूर रेंज मधून जवळळपास ७०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असून यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ८० अधिकारी असणार असल्याचे पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले .
अंबरनाथमध्ये बहिणीला छेडल्याच्या संशयातून तीन लहान मुलाना अमानुष मारहाण. विवस्त्र करून मारहाण करतानाचा व्हिडियो व्हायरल. अंबरनाथ पश्चिम भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी बाळू खोपडी उर्फ अश्विन याला अटक करण्यात आलीय.
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील राशीन गावात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईन द्वारे इजेंक्शन देऊन स्वत: गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती, आज पहाटे घडली घटना, गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती, आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी "माझा थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत" असा केला उल्लेख...
महेंद्र जनार्धन थोरात,
वर्षाराणी महेंद्र थोरात,
कृष्णा महेंद्र थोरात,
कैवल्य महेंद थोरात, अशी मृतकांची नावं
नाशिक शहरात डॉक्टरांवर झाली करावाई,
महापालिकाच्या पथकाने केली दंडात्मक कारवाई,
विना मास्क सेमिनारला उपस्थित राहिल्यानं दोनशे रुपये दंडाची कारवाई,
6 खाजगी डॉक्टरांना ठोठावला दंड, एका हॉटेलमध्ये सुरू होता सेमिनार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करत मनपा ऍक्शन मोड मध्ये
बीडच्या माजलगाव चे उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना 65 हजारांची लाच घेताना एसीबीच्या अधिकायांनी अटक केली आहे..माजलगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांच्या चालका मार्फत हि लाच त्यांनी स्वीकारली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे..
विशेष म्हणजे 1 दिवसापूर्वी त्यांचे वर्गमित्र असलेले पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना देखील लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे आणि त्यांना भेटण्यासाठी गायकवाड हे एसीबीच्या कार्यालयात गेले होते त्यानंतर तेथून थेट माजलगाव ला गेले आणि माजलगाव मध्ये आपल्या चालकाच्या मार्फत लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना देखील अटक केली आहे..गायकवाड आणि मिसाळ हे दोघेही वर्गमित्र असून आता दोघेही एसीबीच्या ताब्यात आहेत...सलग दोन दिवस झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत...
ब्लू इकॉनॉमी म्हणजे मत्स्य व्यवसायामध्ये भारतासाठी व्यापाराच्या आणि विकासाच्या अपार संधी असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. ते नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. यावेळी राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व केंद्र शासित प्रदेशाचे प्रशासक, नीती आयोगाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील सणसवडी एम आय डी सी मधील सिंटॅक्स- बी ए पी एल या कंपनीला आग लागली आहे. औद्योगिक वापरासाठी लागणारे प्लास्टिकचे पार्टस तयार करणारी ही कंपनी आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले आहेत.
सांगली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून शिवजयंती साजरी करण्याच्या निमित्ताने मोठी गर्दी केल्याबद्दल मिरज मधील 2 मंडळावर गुन्हे दाखल
,
संयुक्त मंडळ आणि शिव इच्छा मंडळ अशा 2 मंडळातील एकूण 13 सदस्यावर मिरज पोलीसानी गुन्हे केले दाखल
,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या अटींचे पालन न करणे, मोठी गर्दी जमवणे असे गुन्हे पोलिसांनी दाखल करत साऊड सिस्टीमसह अन्य साहित्य घेतले ताब्यात
मागासवर्गीयांच्या बढती मधील आरक्षणाबद्दल 18 फेब्रुवारी रोजी शासनाकढून काढण्यात आलेला जीआर हा मागासवर्गीयांवर अन्याय करणारा, संविधान न मानणार तसेच बढती मधील आरक्षण बंद करणारा काळा जीआर आहे. अशा शब्दात ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी या जीआरवर टीका केली आहे. याबाबत बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले की, या जीआर मुळे बढती मधील मागासवर्गीयांचे आरक्षण बंद होणार आहे. रोस्टर बिंदु नामावली याला तिलांजली मिळणार आहे. एकंदरीतच हा जीआर म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. त्यामुळे मागासवर्गीय मंत्र्यांनी ही बाब लक्षात घेत तत्काळ राजीनामा द्यावा. माझा मागासवर्गीय मंत्र्यांना सवाल आहे सरकार आता मागासवर्गीयांचा बॅक लॉक भरणार कसा? त्यामुळे आता या जीआर वरून मागासवर्गीय समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे आम्ही आगामी काळामध्ये सरकार विरोधात एक मोठे जनआंदोलन उभे करणार आहोत. आणि हा जीआर मागे घेण्याची मागणी सरकारकडे करणार आहोत.
मागासवर्गीयांच्या बढती मधील आरक्षणाबद्दल 18 फेब्रुवारी रोजी शासनाकढून काढण्यात आलेला जीआर हा मागासवर्गीयांवर अन्याय करणारा, संविधान न मानणार तसेच बढती मधील आरक्षण बंद करणारा काळा जीआर आहे. अशा शब्दात ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी या जीआरवर टीका केली आहे. याबाबत बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले की, या जीआर मुळे बढती मधील मागासवर्गीयांचे आरक्षण बंद होणार आहे. रोस्टर बिंदु नामावली याला तिलांजली मिळणार आहे. एकंदरीतच हा जीआर म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. त्यामुळे मागासवर्गीय मंत्र्यांनी ही बाब लक्षात घेत तत्काळ राजीनामा द्यावा. माझा मागासवर्गीय मंत्र्यांना सवाल आहे सरकार आता मागासवर्गीयांचा बॅक लॉक भरणार कसा? त्यामुळे आता या जीआर वरून मागासवर्गीय समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे आम्ही आगामी काळामध्ये सरकार विरोधात एक मोठे जनआंदोलन उभे करणार आहोत. आणि हा जीआर मागे घेण्याची मागणी सरकारकडे करणार आहोत.
गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्याला चांगलंच झोडपलंय. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या पिकांचे मात्र अतोनात नुकसान नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बार्शी, माढा, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील ज्वारी, गहू, द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यातील तापमान देखील घसरले. हवेत असलेल्या गारव्यामुळे पिकांवर कीड पडण्याची शक्यता देखील आहे. अवघ्या काही दिवसात ज्वारीची काढणी केली जाणार होती. मात्र आता ही सगळी पिकं झोपल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच चिंतातुर होते त्यात दोन झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांची स्वप्नंच हिरवून घेतली आहेत. शासनाने तात्काळ या पिकांचे पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, सामाजिक सुधारणांच्या चळवळींचे प्रमुख आधारस्तंभ कॉम्रेड गोविंद पानसरे साहेबांनी संपूर्ण जीवनभर दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष केला. कष्टकरी कामगारांच्या न्यायासाठी ते लढत राहिले. पुरोगामी विचारांच्या प्रसारातून सामाजिक सुधारणांचं फार मोठं कार्य त्यांनी केले. ते कृतीशील विचारवंत होते. समाजातील कष्टकरी, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी त्यांनी सुरु केलेली लढाई, त्यांनी हाती घेतलेलं सामाजिक सुधारणांचं कार्य पुढे घेऊन जाण्याचा आपण निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, ‘दर्पण’कार आचार्य बाळशात्री जांभेकर यांनी 'दर्पण' वृत्तपत्राची सुरुवात करून मराठी पत्रकारितेचा पाय रचला. मराठी पत्रकारितेला निर्भिड, नि:ष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा दिला. लोकशिक्षण, ज्ञानप्रसाराच्या उद्देशाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्पणकार आचार्य बाळशात्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.
गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्याला चांगलंच झोडपलंय. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या पिकांचे मात्र अतोनात नुकसान नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बार्शी, माढा, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील ज्वारी, गहू, द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यातील तापमान देखील घसरले. हवेत असलेल्या गारव्यामुळे पिकांवर कीड पडण्याची शक्यता देखील आहे. अवघ्या काही दिवसात ज्वारीची काढणी केली जाणार होती. मात्र आता ही सगळी पिकं झोपल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच चिंतातुर होते त्यात दोन झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांची स्वप्नंच हिरवून घेतली आहेत. शासनाने तात्काळ या पिकांचे पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, सामाजिक सुधारणांच्या चळवळींचे प्रमुख आधारस्तंभ कॉम्रेड गोविंद पानसरे साहेबांनी संपूर्ण जीवनभर दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष केला. कष्टकरी कामगारांच्या न्यायासाठी ते लढत राहिले. पुरोगामी विचारांच्या प्रसारातून सामाजिक सुधारणांचं फार मोठं कार्य त्यांनी केले. ते कृतीशील विचारवंत होते. समाजातील कष्टकरी, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी त्यांनी सुरु केलेली लढाई, त्यांनी हाती घेतलेलं सामाजिक सुधारणांचं कार्य पुढे घेऊन जाण्याचा आपण निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
सोलापुरातील होमुर्गी फाटा जवळील तेरामैल परिसरात पालिकेची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. काल संध्याकाळी 4 च्या सुमारास ही पाईपलाईन फुटली, रात्री 12 वाजेपर्यंत पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी काम करत होते. टाकळी ते सोलापूर पाणी पुरवठा करणारी ही मुख्य पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर काहीसा परिणाम देखील होणार आहे. दरम्यान फुटलेल्या पाईपलाईन जवळ लोक सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत होते. सोलापूर ते विजापुर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. याच कामदरम्यान पाईपलाईन फुटली असल्याची प्राथमिक माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
माढा तालुक्यातील वडशिंगे येथील तरुण मुन्ना साठे याने शिवजयंतीचा मुहूर्त साधत गावातील गोरगरीब शेतकऱ्याने मोफत शेतीच्या मशागतीसाठी अवजारांसह ट्रॅक्टर दिला असून याचा वापर कोणीही करू शकणार आहे . यामुळे गावातील अल्पभूदारक शेतकऱ्यांना आता शेतीच्या मशागतीसाठी आता खर्च करावा लागणार नाही . शिवजयंतीच्या मुहूर्तावर मुन्ना साठे या तरुणाने सुरु केलेल्या उपक्रमाचा फायदा गावातील ३०० पेक्षा जास्त गोरगरीब शेतकऱ्यांना मिळणार आहे . शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते हा ट्रॅक्टर गावाला अर्पण करण्यात आला . मुन्ना साठे याने ट्रॅक्टर सोबत शेती अवजारेही गावाला भेट दिल्याने अडचणीत आलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे . शिवजयंतीला या तरुणाने केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे समाजातील गोरगरीब शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे .
नांदेड जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील अर्धापूर, मुखेड, नांदेड, नायगाव,बिलोली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला ज्वारी, गहु, केळी, भुईमूग,हरभरा पिके भुईसपाट होऊन मोठे नुकसान झालंय. टमाटा, वांगी, मिर्ची हा भाजीपाला आणि फळबागांचं ही मोठं नुकसान झालंय.
परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस जोरदार अवकाळी पाऊस बरसला यामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला असून आज जिल्ह्याचे तापमान हे 10.7 अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे.शिवाय अनेक ठिकाणी धुक्याची चादर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.गोदकाठी वसलेल्या गंगाखेड शहरावर आज सकाळपासूनच सर्वत्र दाट धुकं पडलंय त्यामुळे गंगाखेड शहर आज पुर्णपणे धुक्यात हरवलंय..
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या काम पुन्हा चालू करण्याचा आघाडी सरकारचा प्रयत्न आहे त्यासाठी आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध उठवण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली .
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा- मेघा पानसरे,
गेल्या सहा वर्षात झालेल्या तपासाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घ्यावी,
एसआयटीला सूचना देऊन तपास गतिमान करून मारेकऱ्यांना तातडीने पकडावे,
गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांची महाविकास आघाडी सरकारकडे मागणी,
पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कोल्हापुरात होणारी कन्हैया कुमारची सभा रद्द
,
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 6 व्या स्मृतिदिनानिमित्त दसरा चौकामध्ये केलं होतं सभेचे आयोजन
कोरोनाचा वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्राही भाविकाविनाच साजरी होणार असून यात्रेसाठी 22 फेब्रुवारी रात्री 12 पासून 23 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत 24 तासांची संचारबंदी पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
पार्श्वभूमी
भाजपचा कुठलाही कार्यकर्ता बांग्लादेशचा नाही, पण, तुमच्या अध्यक्षा कुठल्या देशाच्या? : आशिष शेलार
भाजपचे काही लोक गोमातेची तस्करी करत असल्याचे समोल आलंय तर काही आयएसआय एजंटही सिद्ध झाले आहेत. पण, आता भाजपच्या मुंबईतील अल्पसंख्यांक कक्षाचे अध्यक्ष रुबेल शेख हे बांग्लादेशी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. दरम्यान, यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार करत उत्तर दिले आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. भाजपचा संघजिहाद, भाजप काही लोक गोमातेची तस्करी करत असल्याचं सिद्ध झालंय तर काही आयएसआय एजंट असल्याचेही समोर आलं आहे.
भंडारा जळीत कांडात प्रशासन जबाबदार असताना फक्त दोन नर्सला बळीचा बकरा बनवण्यात आलंय : चंद्रशेखर बावनकुळे
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात 8 जानेवारीच्या मध्यरात्री आग लागून 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज तब्बल 39 दिवसानंतर दोन कंत्राटी नर्सवर या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भंडारा जळीत कांडात दोन नर्सवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी स्वत:चा बचाव केलाय. अग्निशमन यंत्रणा चालत नव्हती, प्रशासन जबाबदार असताना फक्त दोन नर्सला बळीचा बकरा बनवण्यात आलंय, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तर दोषी डॉक्टरवर गुन्हा का नाही, असा सवाल नर्सेसनी उपस्थित केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोरोनाचा बाऊ : सदाभाऊ खोत
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी सरकारकडून कोरोनाचा आता बाऊ केला जातोय. कोरोनाचा बाऊ करूया आणि आठवड्याभरातच अधिवेशन गुंडाळुया असा सरकारचा विचार आहे, असे खोत म्हणालेत. कोरोना काळात या सरकारने दारूतून जास्त कर मिळतोय म्हणून दारूची दुकाने सुरू केली आणि मंदिरे बंद ठेवली, म्हणून महाविकास आघाडीचे सरकार हे दारुडं सरकार आहे, असे खोत म्हणाले.