Maharashtra Weather Update: अवकाळी पावसाला गेल्या चार दिवसात तयार झालेली पोषक स्थिती आता विरली आहे. परिणामी राज्यात पुन्हा एकदा हवेचे कोरडे झोत वाहू लागणार आहेत.त्यामुळे वातावरणातला गारठा वाढणार असून किमान तापमान येत्या 3 दिवसात 2-3 अंशांनी कमी होणार असल्याचं हवामान विभागानं संगितलंय. (IMD Forecast)
गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रात आर्द्रता तयार झाल्यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे सावट होते. काही भागात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. किमान आणि कमाल तापमान काही अंशांनी वाढले होते. त्यामुळे नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाड्याचा सामना करावा लागला. पावसाचा जोर अधिक नसला तरी ढगाळ वातावरणाने शेतकरी चितेंत होते. आता पुन्हा एकदा थंडीला पोषक हवामान होत असून किमान तापमान हळूहळू घटणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच घट झाली होती. पहाटे हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिक कुडकुडले होते. आता येत्या दोन दिवसात राज्यात किमान तापमान घसरणार आहे.
हवामान विभाागाचा अंदाज काय?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत असून पंजाब व परिसरात सक्रीय आहे. उत्तरेत पश्चिमेकडील वाऱ्यांचे झोत येत आहेत. त्यामुळे थंडी कमी अधिक होत असून जमिनीलगत दाट धुक्याचं साम्राज्य तयार झाले आहे. उत्तरेकडील बदललेल्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून आता तापमानात येत्या तीन दिवसात घट होणार असल्याचं सांगण्यात आलंय. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अहवालानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात येत्या 4-5 दिवसांत हवामानात फारसा फरक नसेल. पण येत्या 48 तासांत किमान व कमाल तापमान 1-2 अंशांनी कमी होणार आहे. विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. (Temperature today)
मुंबईकरांना तापमानात दिलासा
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पहाटे हलका गारवा आणि दुपारी घामाच्या धारांसह प्रचंड उकाड्याला नागरिक सामोरं जातायत. गेल्या आठवड्यात कमाल तापमान 35 अंशांपर्यंत जाऊन ठेपलं होतं. मागील दोन दिवसांपासून पहाटेचा गारवा वाढलाय.त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. आता कमाल आणि किमान तापमानात आजपासून 2-3 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मुंबईत 35 अंशांपर्यंत गेलेला कमाल तापमानाचा पारा 28-30 अंशांपर्यंत येण्याची शक्यता आहे. (IMD Weather Update)
हेही वाचा:
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, किमान तापमानासह कमाल तापमानात होणार घट, काय सांगितलंय IMD ने?