Breaking News LIVE | करोनाची इतिश्री अद्याप झाली नाही; सातत्याने सावधगिरी बाळगण्याचे राज्यपालांचे आवाहन
Breaking News LIVE Updates, 16 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
16 Feb 2021 11:52 PM
चोरट्यांची नजर आता शाळांवर
अंबरनाथ भगिनी मंडळ शाळेत दोन दिवसात दोनदा चोरी
9 कॉम्प्यूटर , 25 हजार रुपयांसह महत्वाची कागदपत्र चोरली
पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरूद्ध अवमानाचा गुन्हा दाखल केलेला नाही, असं निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने जारी केलं आहे. ते म्हणतात की राजदीपच्या यांच्याविरुद्ध अवमान केल्याबद्दल स्वत: ची जाणीव करून देण्याची स्थिती कोर्टाच्या वेबसाइटवर दिसते. त्याची दुरुस्ती केली जात आहे.
पुण्यातील गुंड गजानन मारणे आणि त्याच्या 26 साथीदारावंर कोथरुड पोलिस स्टेशनमधे आणखी एक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा गुन्हा दाखल झाला की रात्री उशिरा गजानन मारणेला पोलिस अटक करण्याची शक्यता आहे. आज सकाळी गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांवर पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनमधे पहिला गुन्हा नोंद झाला आहे. काल तळोजा कारागृहातुन सुटका करण्यात आल्यानंतर गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांनी तळोजा ते पुणे शेकडो वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 29 एप्रिल ते 20 मे 2021 दरम्यान दहावी बोर्डाची परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर 23 एप्रिल ते 21 मे 2021 दरम्यान बारावीची परीक्षा होणार असल्याचं या संभाव्य वेळापत्रकात बोर्डाने जाहीर केलं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी येथे १८ फेब्रुवारीला आपली भूमिका मांडणार असल्याचं बोललं जात होतंय. मात्र, असं काहीच होणार नसल्याचं पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे महंत जितेंद्र महाराज यांनी स्पष्ट केलंय.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी येथे १८ फेब्रुवारीला आपली भूमिका मांडणार असल्याचं बोललं जात होतंय. मात्र, असं काहीच होणार नसल्याचं पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे महंत जितेंद्र महाराज यांनी स्पष्ट केलंय.
करोना संसर्ग देशात येऊन एक वर्ष होत आले. मात्र करोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही. करोनाचे संकट कधीपर्यंत चालेल हे आज कुणीही खात्रीने सांगू शकत नाही. यास्तव सर्व नागरिकांनी यापुढेही सातत्याने करोनाबद्दल सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील लॉकडाऊन टळला असून लॉकडाऊन लागू न करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे स्थानिक आणि पोलीस प्रशासनास निर्देश देण्यात आले आहे. कॉन्टेक्ट ट्रेसिंग, रॅपिड टेस्ट करण्यावर प्रशासनाचा भर आहे. मार्केटमध्ये सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्या व मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर नगर परिषद व पोलीस प्रशासन एकत्रित कारवाई करणार आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत 300हून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
नांदेडच्या किनवट तालुक्यातील सारखणी गावात आज (16 फेब्रुवारी) गोर बंजारा लेंगी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवासाठी मराठी चित्रपट 'सैराट'मधील अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरु, तेलगु अभिनेत्री गयिका अश्विनी राठोड आणि दिल्लीतील निर्माते-दिग्दर्शक संजीवकुमार राठोड आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. लेंगी या पुरातन गोरबंजारा समाजाच्या गाण्यांच्या माध्यमातून गोर बंजारा संस्कृतीची जपवणूक या उत्सवाच्या माध्यमातून केली जाते.
खासदार नवनीत राणा यांना अॅसिड टाकून जिवे मारण्याची धमकी, शिवसेनेच्या लेटरहेडवरुन धमकी आल्याचा दावा, दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
गेल्या काही महिन्यांपासून अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये अंतर्गत धुसफूस चालू आहे. नियामक मंडळातल्या जवळपास 40 सदस्यांनी अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याविरोधात नाराजी नोंदवली आहे. यापार्श्वभूमीवर प्रसाद कांबळी यांनी आज पत्रकारवपरिषद घेऊन आपले मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी माजी अध्यक्ष मोहन जोशी यांच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं नमूद केलं.
2022 मधील मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप सरकारने केलेली वॉर्ड रचना आणि आरक्षण बदलावं या मागणीसाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीआधी तत्कालीन भाजप सरकारने वॉर्डची रचना आणि आरक्षण बदललं होतं. त्याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे 2022 च्या महापालिका निवडणुकीआधी वॉर्ड रचना आणि आरक्षण बदललं जावं याबाबत आज काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. या वॉर्ड रचना आणि आरक्षणामुळे समाजातील विविध घटकांना न्याय मिळाला नाही, अशी भूमिका काँग्रेसची आहे.
पुणे : पुण्यातील देवाच्या आळंदीत आज वाहतूक जनजागृती दिंडी काढण्यात आली. यामध्ये शाळेतील विध्यार्थी मोठ्या संख्येने सामील झाले होते. पालखी सोहळ्यावेळी जे चित्र पहायला मिळतं, अगदी तसंच चित्र आज आळंदीकरांना अनुभवायला मिळालं. वाहतूक नियमांचं प्रबोधन करण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी याचं आयोजन केलं होतं.
पालघर -
मास्क न वापरणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे . शिवसेनेच्या पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी या एका विषयावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात गेल्या . मात्र नो मास्क नो एन्ट्री असा बोर्ड असतानादेखील मास न लावताच भारती कामडी या जिल्हा अधिकाऱ्यांच्या दालनात शिरल्या . त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांना दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका बाजूला सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विविध आवाहन करत असल तरी सरकार मधीलच पदाधिकारी हे अशाप्रकारे शासनाचे नियम पायदळी उडवत असतानाचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळतंय . या कारवाईमुळे पालघरमध्ये सोशल मीडिया वर मात्र चर्चांना उधाण आलेलं पहायला मिळतंय .
सातारा -
साताऱ्यातील वाई येथील घटना मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा पोलीसांकडून जप्त ,
दोन फॉरेनर पोलिसाच्या ताब्यात ,
फॉरेनर राहात असलेल्या बंगल्यातून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त
नामचीन गुंड गजानन मारणे तुरुंगातून बाहेर पडताच त्याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेच्या उर्से टोल नाक्यावर फटाके फोडणे, आरडाओरडा करणे आणि हे करत असताना त्याचं ड्रोन द्वारे शूटिंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मध्य प्रदेशमध्ये सिधी जिल्ह्यात रिवा-सिधी बॉर्डरच्या जवळ एक अपघात झाला आहे. 54 प्रवाशांनी भरलेली बस तलावात कोसळल्याने 30 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी मध्य प्रदेशचे मंत्री तुलसी सिलावत यांनी दिली आहे.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु आहे. राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येतंय. राठोड यांनी राजीनामा देण म्हणजे आरोप मान्य करण्यासारखी गोष्ट असल्याचं राजीनाम्याला विरोध करणाऱ्या गटाचं मत आहे. संजय राठोड प्रकरणातून चुकीचा पायंडा पडू नये असं अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मत मांडलंय.
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, ५ प्रवासी जखमी, फुडमॉलजवळ टेम्पो, ट्रेलर, कारचा अपघातात, मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर फुडमॉजवळ अपघात, दोन जखमीना पनवेल , दोन वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले...
पुण्यातील नामचीन गुंड गजानन मारणेची तळोजा कारागृहातुन सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. मारणे तळोजा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातुन बाहेर पडला तोच मुळी ओपन कारमधुन. त्यानंतर तो पुण्यास येण्यासाठी निघाला असता मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर त्याच्या समर्थकांचा वाहनांचा भला मोठा ताफा सोबत होता. गजानन मारणे हा 2014 साली विरोधी टोळीतील पप्पु गावडेच्या हत्येच्या प्रकरणात अटक होता आणि त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र मोक्का न्यायालयाने पुराव्यांभावी गजानन मारणे आणि त्याच्या 12 साथीदारांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर हे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मारणेवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण,;खंडणी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
औरंगाबाद, ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी बेंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून गुन्ह्यातील शंतनू शिवलाल मुळक बीड याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. टूलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी शंतनू मुळक याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड. सतेज जाधव अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. या अर्जावर आज सुनावणी अपेक्षित आहे.
पार्श्वभूमी
माझ्याविरोधातील देशद्रोहाचे आरोप बिनबुडाचे, कंगनाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
माझ्याविरोधातील देशद्रोहाचे सारे आरोप हे बिनबुडाचे आहेत. माझ्या ट्विटमुळे कोणाच्या काय भावना दुखावल्या? कुठे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली? असे सवाल उपस्थित करत कंगना रनौतनं मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं. वांद्रे कोर्टानं कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानं या दोन्ही बहिणींनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे.
कोरोना फोफावतोय, कठोर निर्णय घ्यावे लागतील; अजित पवारांचे संकेत
राज्यात कोरोना (CoronaVirus) रुग्णसंख्या पुन्हा एकदा डोकं वर काढू लागली आहे. त्यामुळं या धर्तीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. राज्यात डिसेंबरनंतर रविवारी एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे 4 हजारांहून अधिक कोरोनारुग्ण आढळून आले. रविवारी नव्यानं कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 4092वर पोहोचला होता. त्यामुळं ही बाब आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या चिंतेत भर टाकून गेली.
अभिनेता संदीप नाहरचा संशयास्पद मृत्यू, अखेरच्या फेसबुक पोस्टमधून अनेक खुलासे
अभिनेता संदीप नाहर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातं आहे. 'कहने को हमसफर हैं', 'एमएस धोनी', 'केसरी' या चित्रपटांतून संदीप प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. फेसबुकवर जवळपास मृत्यूच्या तीन ते चार तासांपूर्वी त्यांनी एक सोशल मीडिया पोस्टही लिहिली होती. जी पाहता ही त्यांची सुसाईड नोट आहे, असंही मत अनेकांनी मांडलं.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना हायकोर्टाचा दिलासा
परदेशी विनिमय व्यवस्थापन (फेमा) कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या रडारवर असलेल्या अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलगा अमित यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने ताप्तुरता दिलासा दिला आहे. 24 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत.