Breaking News LIVE : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी लाॅकडाऊनचा विचार नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Feb 2021 09:12 PM
लसीकरणानंतरही राज्यात रुग्ण संख्या वाढत असली तरी लाॅकडाऊनचा विचार नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीकरणानंतरही राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मात्र याबाबत कोरोनाच्या नियमांचं पालन करणं हाच एकमेव पर्याय आहे. मात्र राज्यात कुठेच पुन्हा लाॅकडाऊन लावण्याचा विचार नाही किंवा त्याचा संबंध पण नाही, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचं अंतर पाहिजे आणि त्यानंतर पंधरा दिवस काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचंही टोपे यांनी म्हंटलं आहे.
पंतप्रधान अवास योजनेच्या घरकुलचे बिल काढण्यासाठी दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाची धाड ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले.
निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील ग्रामसेवक वैजनाथ चाञे हे गावातील राम वामन बिरादार यांच्याकडून पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे बिल आदा करण्यासाठी दोन हजाराची लाच मागितली व ती देताना लातूर येथील लाचलुचपत विभागाने गावच्या ग्राम पंचायत मध्ये रंगेहाथ पकडल्याची घटना घडली
ठाणे : मुंबई आणि आसपास राहणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना निदान शनिवार आणि रविवार या दोन दिवशी कोणत्याही वेळेच्या बंधनाशिवाय प्रवास करू द्यावा अशी मागणी विविध रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी अनेक कार्यालयांना सुटी असल्याने लोकांमध्ये पर्यायाने कमी गर्दी असते. त्यामुळे ही मागणी करण्यात आलेली आहे. त्याच सोबत पीक अवर असताना, सकाळच्या वेळेस सीएसएमटी वरून येणाऱ्या गाड्या असतात. त्यामुळे त्यामध्ये मच्छी विक्रेते दूध विक्रेते आणि विद्यार्थी यांना प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशीही मागणी प्रवासी महासंघाने केली आहे. तर ही मागणी मान्य झाली नाही तर मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिला आहे. मात्र एकीकडे मुंबईमध्ये covid-19 रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत 2 बांधकाम मजुरांचा मृत्यू, चंद्रपूर-मूल मार्गावरील जानाळा फाट्यावरील घटना, अजयपूर येथून हे मजूर मारोडा या आपल्या गावी जात असताना झाला अपघात, प्रदीप मानकर (41) आणि विनोद मानकर (35) अशी मृतकांची नावं, अपघातानंतर ट्रकसह चालक फरार
सनदी अधिकाऱ्यांची बदली..
एस चोकलिंगम, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नियुक्ती महासंचालक, यशदा पुणे या पदावर. श्रावण हर्डीकर महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे यांची नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर.
राजेश पी पाटील (Odissa Cadre) आंतरराज्य प्रतिनियुक्तीने राज्य महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे या पदावर. शितल उगले-तेली यांची नियुक्ती संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर. प्रेरणा देशभ्रतार आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी वर्धा या पदावर
अनिता पाटील भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर. एन के सुधांशु यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती.
नवी मुंबईच्या उलवे भागात पाईपलाईन फुटली. दुरूस्तीच्या कामासाठी 10 ते 12 तास लागण्याची शक्यता. हजारो लीटर पाणी वाया.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे, पालकरवाडी, खानोली, वरचीवाडी या गावातून ११ केव्ही विद्युत लाईन आंबा, काजू बागेतून गेल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. विद्यमान जि. प. अध्यक्षा समीधा नाईक या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
जिल्ह्यातील नागपुर-मुंबई मार्गावर पिंपरी खंडारे गावाजवळ नॅनो कार व बुलेटचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बुलेटस्वार व नॅनो कार चालक जागीच ठार झालेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या जव्हार भागातील रुग्णालयाची पाहणी केली . जामसर येथील बाल उपचार केंद्र , कॉटेज हॉस्पिटल , खरवंद अंगणवाडी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची देखील पाहणी केली . जव्हार सारख्या ग्रामीण भागात असलेली आरोग्यव्यवस्था सुधारण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले . तसच जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यू च प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या याचा आढावा घेतला
पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळल्याचा दावा करण्यात येतोय. तिचा शोध घेण्यासाठी आता अॅनिमल रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली आहे. लकडी पूल ते भिडे पुलाच्यामधील मुठा नदी पात्रात सकाळी दहाच्या सुमारास मगरसदृश्य प्राणी आढळला, असं एका अज्ञाताने सांगितले. तसा कॉल अॅनिमल रेस्क्यू टीमला आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय. भिडे पूल आणि झेड ब्रिजवर बघ्यांची गर्दी वाढल्याने चर्चा रंगली आणि रेस्क्यू टीमला अनेक कॉल येऊ लागले. त्यामुळे रेस्क्यू टीम, वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
लातूर : बारा हजार लोकवस्ती असलेले गंगापूर गावात सध्या पिण्याचा पाण्याचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साखर कारखानाच्या हलगर्जीपणामुळे मळीमिश्रीत पाणी गावाच्या शिवारात सोडल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा अडचणीत आली आहे. या प्रकरणात आता महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मांजरा साखर कारखान्यामुळे आमचे नुकसान झाल्याची तक्रार गावकरी करत आहेत.

या वर्षीपासून नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार, PG कोर्स सुरू करणार, मंत्री छगन भुजबळांची माहिती,

सोमवारी केंद्र सरकारकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवणार,


मनपा, जिल्हा शासकिय रुग्णालयाचे सहकार्य घेणार,

नाशिक जिल्ह्याला 151 वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर निर्णय
नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला
सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण तापलं,

निलेश राणेंच्या खासदार विनायक राऊत यांना धमकी प्रकरणावरून शिवसेना आक्रमक,

शिवसैनिक उतरले रस्त्यावर,

जिल्ह्याप्रमुख संजय पडते, सतिश सावंत, संदेश पारकर व जिल्हाभरातील कार्यकर्ते एकवटले,

निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून केला निषेध.

निलेश राणेवंर कारवाई करण्याची शिवसेनेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली निवेदनाद्वारे मागणी.
राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे बनणार विरोधी पक्षनेते, गुलाम नबी आझाद यांची टर्म संपत आहे.त्यांच्या जागी आता काँग्रेसकडून नवी निवड, आधी लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेले मल्लिकार्जुन खर्गे आता राज्यसभेत हे पद सांभाळणार... विरोधी पक्षनेतेपदासाठी राज्यसभेत आनंद शर्मा, पी चिदंबरम दिग्विजय सिंह यांची नावे चर्चेत होती, मात्र मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण येथे चालकाच नियंत्रण सुटल्याने कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. डिव्हायडरला धडकून कंटेनरचा चक्काचूर झाला असून दोन जण गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात केलं दाखल केलं आहे.
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण येथे चालकाच नियंत्रण सुटल्याने कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. डिव्हायडरला धडकून कंटेनरचा चक्काचूर झाला असून दोन जण गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात केलं दाखल केलं आहे.
संत साईबाबा यांच्या परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथल्या मंदिर विकासासाठी तयार केलेल्या आराखड्यातील प्रस्तावित जमीन अधिग्रहित करण्यासाठी गुरुवारी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत मोजणीच्या कामाला प्रारंभ झाला. पाथरी येथील साईबाबा मंदिर विकासासाठी प्रशासनाने 198 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. मागील आठवड्यात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत विकास आराखड्यातील शाळेतले आराखड्यातील दुरुस्ती करण्यासाठी पाथरीत विशेष बैठक घेण्यात आली. त्यानंतर आता प्रत्यक्षात मोजणीच्या कामाला सुरुवात झाली आहे
पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज नाशिकच्या लासलगावजवळील विंचूर चौफुलीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता - रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल डिझेलच्या भाव कमी करण्याच्या घोषणा करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारमुळे पेट्रोल शंभरी पार होत आहे..केंद्र सरकारने वाढलेली महागाई त्वरित कमी न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आला. दरम्यान, या आंदोलनावेळी वाहनांच्या नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील विंचूर चौफुलीजवळ दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघरच्या जव्हार दौऱ्यावर असून 9.30 च्या सुमारास त्यांचं जव्हारमध्ये आगमन होणार आहे . मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जव्हार दौऱ्यावर येत असून जव्हार मोखाद्यातील आरोग्य यंत्रणेची ते पाहणी करतील . जव्हार मोखाद्या सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात आज ही आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था असून मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यानंतर तरी येथील आरोग्य व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे . जव्हार मधील जामसर येथील बाल उपचार केंद्र , कॉटेज हॉस्पिटल , खरवंद अंगणवाडी, घरकुलांची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे. अवघ्या दोन तासांचा हा दौरा असला तरी यात आरोग्य यंत्रणेतील सुधारणा करण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे. कारण जव्हार मोखाडा भागात आजही कुपोषण, बालमृत्यू याचं प्रमाण मोठं असून मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यातून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे.
सातारा - साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तरुणींचा एका तरुणीला मारहाण करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.या सातारा शहरातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या महाविद्यालयाच्या परिसरात वारंवार तरुणींना मारहाणीचे प्रकार होत असतात.काही मुलींनी या मारहाणीचे चित्रीकरण केल्यामुळे आणि  या मारहाणीचे व्हिडिओ अनेक मुलींनी स्टेटस ला ठेवल्या नंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.सातारा पोलिसांनी या विडिओ ची दखल घेतली असून काही मुलींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले.
सातारा - साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तरुणींचा एका तरुणीला मारहाण करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.या सातारा शहरातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या महाविद्यालयाच्या परिसरात वारंवार तरुणींना मारहाणीचे प्रकार होत असतात.काही मुलींनी या मारहाणीचे चित्रीकरण केल्यामुळे आणि  या मारहाणीचे व्हिडिओ अनेक मुलींनी स्टेटस ला ठेवल्या नंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.सातारा पोलिसांनी या विडिओ ची दखल घेतली असून काही मुलींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले.
पंढरपूरः सांगोला रस्त्यावर कासेगाव जवळ चंदगड कोल्हापूरमधून पंढरपूरला दर्शनास येणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे. बोलोरे आणि ट्रकमध्ये अपघात झाला असून बोलोरे मधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. 16 जण बोलोरे मधून प्रवास करत होते. थांबलेल्या ट्रक ला बोलेरो ने धडक दिली
आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ,
पेट्रोलच्या दरात 28 पैशांची , तर डिझेलमध्ये 38 पैशाची वाढ,
मुंबईत आज पेट्रोलचा दर ₹ 94.64 तर
मुंबईत आज डिझेलचा दर ₹ 85.32
आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ,
पेट्रोलच्या दरात 28 पैशांची , तर डिझेलमध्ये 38 पैशाची वाढ,
मुंबईत आज पेट्रोलचा दर ₹ 94.64 तर
मुंबईत आज डिझेलचा दर ₹ 85.32
खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण झालीय. मात्र आज पहाटे अचानक भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानच्या कर्मचार्यांमधे झटापट देखील झाली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आणि ते कार्यकर्त्यांसह निघुन गेले.
बुलढाणा तालुक्यातील मासरुळ येथे सरपंच निवडणुकीत तूफान राडा झाला आहे. एका गटाची महिला सदस्याला दुसऱ्या गटासोबत सहलीला गेली होती. त्यामुळे दोन गटात राडा झाला आहे. महिला व सदस्य सहलीहून परतताच वादाला सुरुवात झाली.

पार्श्वभूमी

कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'केंट' संपूर्ण जगभरात पसरणार : ब्रिटनच्या वैज्ञानिकाचा दावा


 


ब्रिटनच्या एका वैज्ञानिकाने कोरोना व्हायरसबाबात मोठा दावा केला आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट केंट (Kent) संपूर्ण जगभरात पसरेल. यामुळे कोरोनव्हायरसविरुद्धची लढाई कमीत कमी दशकभर सुरु राहिल. ब्रिटनमधील जेनेटिक सर्विलिएन्स प्रोग्रामचे प्रमुखांनी सांगितलं की, "ब्रिटनच्या केंट परिसरात आढळलेला कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंटचा फैलाव जगभरात होण्याची शक्यता आहे. परिणामी कोरोना विषाणूविरुद्धची लढाई कमीत कमी दशकभर चालेल."





देशाची आक्रमकता टिकवणं महत्त्वाचं : लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे


 


देशाच्या सीमांवर सध्याच्या घडीला सुरु असणारी परिस्थिती आणि एकंदर वातावरण पाहता लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी देशाची आक्रमता आणखी बळावण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं. लष्करप्रमुखांचं वक्तव्य अशा वेळी करण्यात आलं आहे, जेव्हा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं सैन्य पॅगाँग त्सोच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन मागे हटत असल्याची माहिती दिली.





उदयनराजेंकडून शरद पवारांची भेट घेण्यामागचं मूळ कारण उघड


 


राष्ट्रवादीतून काढता पाय घेतल्यानंतर शरद पवारांची भेट घेण्यासाठी भाजप खासदार उदयनराजे जाणार असल्याची माहिती समोर आली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींची थेट दिल्लीत होणारी भेट अनेक चर्चांना वावही देऊन गेली. अखेर खुद्द उदयनराजे यांनीच भेटीनंतर त्यामागचं खरं कारण उघड केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपण शरद पवार यांच्या भेटीला आल्याचं उदयनराजे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. पवारांच्या दिल्लीती निवासस्थानी या भेटीदरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पवारांना भेटलात आता मोदींना भेटणार का, या प्रश्नावर हा विषय राजकारणाचा नाही असं म्हणत उदयनराजेंनी बगल देण्याचा प्रयत्न केला. ke


 


 


 


भांडुप परिमंडळात 28 हजार ग्राहकांची वीज तोडली


 


एकीकडे वाढीव वीज बिलामुळे सामान्य माणूस कर्ज काढण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे महावितरणने ग्राहकाकडून सक्तीने वीज बिलाची वसुली सुरू केली आहे. फक्त भांडुप परिमंडळ क्षेत्रात महावितरणने 28 हजार पेक्षा जास्त ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले आहेत.  महाराष्ट्रात असे लाखो ग्राहक आहेत ज्यांना अव्वाच्या सव्वा वीजबील सोपवण्यात आले आणि आता ते वीजबिल भरावे यासाठी सक्तीची वसुली केली जात आहे. गेल्या वर्ष भरात कोरोना संसर्गाची झुंजत असलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेला महावितरणने मोठा शॉक दिला. त्यानंतर अधिक खोटी आश्वासने दिली गेली विरोधकांनी आंदोलने केली मात्र महावितरण काही मागे हटले नाही. महावितरणाच्या केवळ भांडुप परीमंडळामध्ये शनिवार पासून आतापर्यंत तब्बल 28 हजार ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्यात आलेली आहे.





 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.